जगातील सर्वात खतरनाक १५ नोकरया
आज जगातील असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांना आपली स्वताची नोकरी करणे फार कठीण (15 most dangerous jobs in world)अणि अधिक त्रासदायी वाटत असते.आपल्यातील कित्येक जण ते करत असलेल्या नोकरीवर खुष देखील नसतात.
पण जगात काही अशा नोकरी आहेत ज्या पाहुन भीतीने अक्षरश आपल्या अंगावर काटा उभा राहतो.
जगभरात अनेक छोट्या मोठ्या नोकरी असतात ज्यापैकी काही नोकरया तर अशा असतात ज्या करण्यासाठी कामगारांना आपला जीव देखील धोक्यात टाकावा लागतो.
पण तरी देखील ते काम करण्यासाठी त्या कामगाराला खुप कमी किंमत प्राप्त होत असते.यात काही व्यक्तींना तर इतके कमी पैसे दिले जातात ज्यात त्यांचा घरचा महिन्याचा मुलभूत खर्च देखील भागत नाही.
अणि यातील काही नोकरी इतक्या जोखिमदायी असतात की ह्या नोकरी करण्यासाठी व्यक्तीमध्ये खुप धाडस असावे लागते.अणि प्रसंगी आपल्याला आपल्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून ह्या नोकरया कराव्या लागतात.
आजच्या लेखात आपण जगातील अशाच काही सर्वात खतरनाक १० नोकरींविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.
इलेक्ट्रिक पाॅवर लाईन इंस्टॉलर –
इलेक्ट्रिक पाॅवर लाईन इंस्टॉलर यांना चक्क आपल्या जीवाशी खेळत (15 most dangerous jobs in world)आपली नोकरी करावी लागते.
इलेक्ट्रिक पाॅवर लाईन इंस्टॉलर यांना शंभर फुटांपेक्षा अधिक उंच असलेल्या विजेच्या टाॅवर वर तार जोडण्यासाठी चढावे लागते.अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ह्या वीजेच्या तारेत आठ लाखापेक्षा जास्त होलटेज वाहत असते.
हे काम करत असलेल्या व्यक्तींना खाली उतरून जेवण करण्याची देखील मुभा नसते त्यामुळे त्यांना ह्या वीजेच्या तारांवर बसुनच जेवण देखील करावे लागते.
जगातील सर्वात जास्त वेतन देणारे ५ देश 5 highest paying countries in world
टाॅवर क्लाईमबिंग मॅन-
टाॅवर क्लाईमबिंग मॅन म्हणजेच उंच उंच टाॅवर वर चढणारा व्यक्ती.
टाॅवर क्लाईमबिंग मॅन हा जमिनीपासून दीड हजार पेक्षा अधिक उंचीवर असलेल्या टाॅवर वर ह्या नोकरीत व्यक्तीला काही तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्ती करण्यासाठी चढावे लागते.
टाॅवर क्लाईमबिंग मॅन यांना वर चढताना सुरक्षेसाठी फक्त एक दोरी दिली जाते.
अशातच टाॅवर वर चढल्यावर अचानक वारा वादळ आला अणि त्या व्यक्तीला खाली बघुन चक्कर आले किंवा त्याचा तोल गेला तर तो व्यक्ती वाचणे अशक्य आहे.
कमर्शियल फिशरमॅन –
कमर्शियल फिशरमॅन म्हणजेच व्यावसायिक मच्छीमार ही एक अशी नोकरी आहे की ज्यात नोकरदाराला समुद्रातील अत्यंत खोल पाण्यात जाऊन मासे पकडावे लागतात.
मासे पकडत असताना त्यांना अनेक समुद्री संकटांचा सामना करावा लागतो.समुद्रातील पाण्यातील अती प्रवाहामुळे समुद्रात मासे पकडताना कधी कधी त्यांची बोट पाण्यात बुडण्याची देखील शक्यता असते.
ही नोकरी करताना आतापर्यंत अनेक लोकांनी आपले प्राण देखील गमावले आहेत.व्यावसायिक मच्छीमार यांना मायनस डिग्री इतक्या तापमानात ही मच्छीमारी करावी लागते.
आयरन फॅक्टरी वर्कर –
आयरन फॅक्टरी वर्कर्सला ह्या नोकरीत लोखंडाला वितळवून त्यापासून अनेक अवजारे तयार करावी लागत असतात.
त्यामुळे येथील तापमान ७० डिग्री सेल्सिअस इतके जात असते म्हणून इथे काम करत असलेल्या वर्कर्सला सतत त्यांच्या अंगावर पाणी टाकत राहावे लागते.
अंडरवाॅटर वेल्डर –
अंडरवाॅटर वेल्डर ह्या नोकरी मध्ये व्यक्तीला अनेक फुट खोल इतक्या पाण्याच्या आत जावे लागते.अणि वेल्डिंग तसेच दुरूस्तीचे काम करावे लागते.
आपल्यातील कित्येक जणांना थोड्याशा पाण्यात उतरायला भीती वाटते पण अंडर वाॅटर वेल्डर हे आपल्या नोकरी मध्ये अनेक फुट खोल इतक्या पाण्यात तासनतास जातात.अणि आपले काम करत असतात.
हे जोखिमदायी काम करण्यासाठी त्यांना वर्षाला फक्त ५.१ लाख इतके वेतन दिले जाते.
महात्मा फुले यांच्याविषयी कोणालाही माहीत नसलेल्या १० महत्वाच्या गोष्टी
कोल माईनर –
कोल माईनर म्हणजेच कोळशाच्या खाणी मध्ये काम करणारे कामगार.हया नोकरीत आपल्याला कोळशाच्या खाणी मध्ये काम करावे लागते.
ह्या नोकरीत आपल्याला कोळसा खाणीतुन कोळसा खणुन हा कोळसा बाहेर काढण्यासाठी पृथ्वीच्या हजारो फुट इतक्या खाली जातात.
पृथ्वीच्या अत्यंत गाभाऱ्यात काम करत असताना आपल्याला अत्यंत उष्णतेचा सामना करावा लागतो.अशा ठिकाणी काम करत असताना अनेक वेळा एखादा विषारी वायू बाहेर पडण्याची शक्यता देखील असते.त्यामुळे अनेक कामगारांना आपला जीव देखील गमवावा लागतो.
बाॅम्ब स्काॅड –
बाॅम्ब स्काॅड ही नोकरी जगातील सर्वात खतरनाक नोकरींपैकी एक आहे.
ही नोकरी करण्याचा विचार करताना देखील सर्वसामान्य व्यक्तीला घाम फुटतो.कारण ह्या नोकरीत आपल्याला आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवावे लागतात.
यात आपल्याला घटनास्थळी धाव घेत बाॅम्ब शोधुन तो निकामी करून लोकांचे प्राण वाचवावे लागतात(15 most dangerous jobs in world).पण बाॅम्ब निकामी करताना एक छोटीशी चुक केली तरी देखील आपल्याला आपल्या जीवाशी जावे लागेल.
ही नोकरी करत असलेल्या व्यक्तींना वर्षाला ६.४ लाख रुपये इतके वेतन दिले जाते.हया नोकरीत आपल्या अनुभवानुसार वेतन दिले जाते.
समजा आपल्याला तीन चार वर्षे हे काम करण्याचा अनुभव असेल तर आपल्याला महिन्याला 50 हजार रुपये इतके वेतन प्राप्त होत असते अणि समजा आपल्याला आठ वर्षे इतका अनुभव असेल तर आपल्याला महिन्याला1 लाखापर्यंत वेतन प्राप्त होत असते.
फायरमॅन –
फायरमॅन याचे काम पाण्याच्या मदतीने आग विझवून आगीत अडकलेल्या लोकांचा जीव वाचवणे हे असते.अग्नी विझविण्याच्या ह्या नोकरीला अग्नीशामक दल((15 most dangerous jobs in world)) असे देखील म्हणतात.
ह्या नोकरीत आगेत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी फायरमॅनला प्रसंगी स्वताचा जीव धोक्यात घालून आगीत शिरावे लागते अणि लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जावे लागते.
ह्या नोकरीत गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्याकडे उच्च शारीरिक आणि मानसिक शक्ती असणे आवश्यक असते.
फायरमॅनच्या नोकरीत आपल्याला वर्षाला सुमारे चार लाख रुपये इतके वेतन दिले जाते.
बुल रायडर –
बुल रायडर म्हणजेच बैल स्वार होय.हया नोकरीत आपल्याला संतापलेल्या बैलाच्या पाठीवर बसुन त्याला नियंत्रणात आणावे लागते.
हे एक अत्यंत जोखिमदायी काम आहे यात आपल्याला बैलाच्या पाठीवर बसुन त्याला नियंत्रणात आणावे लागते.यातच आपण बैलाच्या पाठीवरून खाली पडलो तर बैल आपल्याला शिंगे मारून चिरडुन(15 most dangerous jobs in world) देखील मारू शकतो.
हे काम करताना आतापर्यंत अनेक लोकांनी आपला जीव देखील गमावला आहे.तरी देखील कित्येक लोक हे काम पैसे मिळवण्यासाठी आपल्या जीवावर खेळत करतात.
बुल रायडर याला वर्षाला १४ ते ३० लाख इतके वेतन प्राप्त होत असते.
स्नेक मिल्कर –
स्नेक मिल्कर हे जगातील सर्वात धोकादायक कामांपैकी एक मानले जाते.
स्नेक मिल्कर ह्या नोकरीत आपल्याला चक्क सापाच्या तोंडातुन विष (15 most dangerous jobs in world)बाहेर काढावे लागते.यात आपल्याला सापाला दोन्ही हाताने पकडुन त्याचे तोंड उघडुन विष काढावे लागते.
ह्या कामात खूप जोखिम असते कारण स्नेक मिल्कर याला सापाला व्यवस्थित पकडता नाही आले तर साप त्याला दंश करू शकतो.
किंवा सापाच्या तोंडातुन विष काढताना ते आपल्या बोटाला लागले अणि ते विष निघाले नाही तर ते विष आपल्या शरीरात गेल्याने आपला मृत्यू देखील होऊ शकतो.
स्नेक मिल्कर यांना दरवेळी आपला जीव धोक्यात घालून हे काम करावे लागते.हे काम करण्यासाठी त्याला वर्षाला २३ लाख रुपये इतके वेतन दिले जाते.
सल्फर मायनर-
सल्फर मायनर ह्या नोकरी मध्ये आपल्याला गंधकाच्या खाणीत काम करावे लागते.हे काम अत्यंत धोकादायक अणि प्राणघातक मानले जाते.
कारण हे काम करत असलेल्या कामगारांच्या अंगात नेहमी जळजळ होत असते.याचसोबत त्यांचे फुप्फुस कोलमडतात डोळे देखील सुजुन येत असतात.
त्यामुळे हे काम करताना कित्येक लोकांचा खाणीत मृत्यू देखील होत असतो.हे काम करत असलेल्या व्यक्तींचे आयुष्य हे कमी होत जाते.
कारण सल्फर मायनर ह्या नोकरी मध्ये आपल्याला आपल्या खांद्यावर उचलून सल्फर घेऊन जावे लागते.कारण अशा ठिकाणी वाहतुकीचे इतर कुठलेही साधन उपलब्ध नसते.
अणि खांद्यावर सल्फरची वाहतुक केल्याने अनेक कामगारांच्या खांद्यावर अनेक गंभीर जखमा देखील होत असतात.याचसोबत हे काम करत असलेल्या कामगारांना असा एखादा आजार जडतो ज्यामुळे हे कामगार पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ जगत नसतात.
सल्फर मायनर कामगाराला हे जोखिमदायी काम करण्यासाठी वर्षाला फक्त दीड लाख रुपये इतके वेतन दिले जाते.
स्काय स्क्रॅपर विंडो क्लिनर –
स्काय स्क्रॅपर विंडो क्लिनर ही जगातील अशी एक धोकादायक नोकरी आहे जिच्याविषयी नुसते ऐकले तरी कोणी ही नोकरी करायला तयार होत नाही.
यात आपल्याला बिल्डींगच्या इमारतीवर चढुन बिल्डींगच्या खिडक्या स्वच्छ कराव्या लागतात.हे काम करण्यासाठी आपल्याला सुरक्षा म्हणून फक्त एक दोरी दिली जाते.ही दोरी काम करताना तुटली तर आपण दोनशे फुट इतक्या उंचावरून खाली पडु शकतो.
यात आपल्याला उंच उंच बिल्डींगच्या इमारतीवर दोरीच्या साहाय्याने लटकत बिल्डींगच्या काचा साफ कराव्या लागतात.
ही नोकरी पाहायला गेले तर सर्वच देशात उपलब्ध आहे पण ह्या नोकरीचे सर्वात जास्त प्रमाण दुबई ह्या शहरात आहे.कारण येथील उंच उंच बिल्डींगच्या खिडकीच्या काचा खुप लवकर खराब होतात म्हणून इथे खिडकीच्या काचा साफ करण्यासाठी स्काय स्क्रॅपर विंडो क्लिनर याची मदत घेतली जाते.
भारतात ही नोकरी केल्यावर आपल्याला महिन्याला 12 ते 15 हजार रुपये इतकीच कमाई होते पण परदेशात ही नोकरी केल्यावर आपल्याला महिन्याला 40 हजार रुपये इतके वेतन दिले जाते.
सेव्हर डायव्हिंग –
सेव्हर डायव्हिंग ही जगातील सर्वात खराब अणि घाणेरडी नोकरी आहे पण काही लोक आपले घर चालवण्यासाठी हीच नोकरी प्रामुख्याने करत असतात.
ह्या नोकरी मध्ये आपल्याला सफाई करण्यासाठी नाली गटारी मध्ये जावे लागते.अणि गटारीत उतरून गटार साफ करावी लागते.
ही नोकरी सर्वाधिक प्रमाणात भारत आणि पाकिस्तान ह्या दोन देशात करताना लोक आढळतात.
हे काम इतके अधिक जोखिमदायी असते की यात काम करताना कामगाराचा मृत्यू देखील होऊ शकतो.हया कामात आपल्याला विषारी वायु असलेल्या खोल खडडा असलेल्या ठिकाणी देखील उतरावे लागते.
हे एवढे जोखिमदायी काम करण्यासाठी भारतात महिन्याला फक्त 12 हजार रुपये द्यावे लागतात.
विंड टरबाईन टेक्निशियन –
विंड टरबाईन टेक्निशियन हे हवेच्या दवारे वीज निर्मिती केल्या जात असलेल्या मोठमोठया विंड मध्ये काही बिघाड झाल्यास त्यावर चढुन त्याची दुरुस्ती करत असतात.
इथे हवेचा दबाव इतका अधिक प्रमाणात असतो की टेक्निशियन याला दुरुस्ती करताना स्वताला दोन तीन ठिकाणी बांधुन ठेवावे लागते.
कारण इथुन जर कामगाराचा पाय सरकला तर तो हजार फुट इतक्या खोल जाऊन पडु शकतो.ज्यात त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो.
हे धोकादायक जीवघेणे काम करण्यासाठी भारतात टेक्निशियनला फक्त पंधरा ते वीस हजार महिन्याला वेतन दिले जाते.