मुख्यमंत्री योजनादुत भरती कार्यक्रम २०२४

सरकारी योजनांना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने आता एक नवीन योजना आणली आहे.हया योजनेचे नाव मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रम असे आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार अणि उद्योजकता ह्या विभागाच्या मार्फत ह्या योजनेची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे.
याकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ५० हजार योजनादुतांची नेमणूक देखील करण्यात येणार आहे.हे योजनादुत दारोदारी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार प्रसार करण्याचे काम करतील.
योजनादुतांची नियुक्ती सहा महिने इतक्या कालावधीकरीता करण्यात येणार आहे.प्रत्येक योजनादुताला ह्या कार्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये इतके मानधन देखील देण्यात येणार आहे.
सरकारी योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे साहित्य देखील योजनादुतांना ह्या कार्यक्रमाअंतर्गत वितरीत करण्यात येणार आहे.
आजच्या लेखामध्ये आपण मुख्यमंत्री योजनादुत भरती कार्यक्रम याविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
ज्यात आपण मुख्यमंत्री योजनादुत पदाच्या भरतीकरीता पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतील?वेतन किती दिले जाईल? आपणास काय काम करायचे आहे? योजनादुतांची निवड कशी केली जाईल इत्यादी सर्व महत्वाच्या बाबी जाणुन घेणार आहोत.
मुख्यमंत्री योजनादुत भरती कार्यक्रम काय आहे?
मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रमाअंतर्गत सरकारने एक नवीन पदासाठी भरती सुरू केली आहे ह्या पदाचे नाव योजनादुत असे आहे.
योजनादुत ह्या पदाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण ५० हजार जागांची भरती करण्यात येणार आहे.सरकारच्या ह्या नवीन योजनेमुळे तरूणांना आपल्याच गाव तसेच शहरात नोकरी प्राप्त करता येईल.योजनादुत म्हणून काम करता येईल.
मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रमाअंतर्गत नियुक्ती करण्यात आलेल्या योजनादुतांना काय काम करायचे आहे?
मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रमाअंतर्गत नियुक्ती करण्यात आलेल्या योजनादुतांना आपल्या गाव शहरातील प्रत्येक घरोघरी जाऊन महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करायचा आहे.
शासनाकडून नियुक्ती करण्यात आलेल्या योजनादुतांना महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्ध करायची आहे.तसेच ह्या योजनांची जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहीती पोहचवुन त्यांना ह्या योजनांचा लाभ प्राप्त करून द्यायचा आहे.
निवड झालेल्या योजनादुतांना जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून योजनांची माहिती प्राप्त करावी लागेल अणि ही माहीती गावपातळीवर शहरात लोकांपर्यंत पोहचवायची आहे.
दरवर्षी योजनादुतांना केलेल्या कामाचा तपशील आॅनलाईन पद्धतीने अपलोड करावा लागेल.
मुख्यमंत्री योजनादुत भरती कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट
मुख्यमंत्री योजनादुत भरती कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट हे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा गाव शहरात प्रचार प्रसार प्रसिध्दी करणे,
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या योजनांचा लाभ गाव, शहरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे हे ह्या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रमाची रूपरेषा
महाराष्ट्र शासनाच्या माहीती व जनसंपर्क महासंचालनालय अणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तरीत्या मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
राज्यातील कार्यरत असलेल्या प्रशासकीय यंत्रणेस मदत करण्यासाठी प्रत्येक गाव तसेच शहरात योजनादुतांची निवड केली जाणार आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत करीता १ अणि शहरी भागात ५ हजार लोकसंख्येसाठी १ अशा पद्धतीने मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रमाअंतर्गत एकुण ५० हजार योजनादुतांची नेमणूक करण्यात येत आहे.
योजनादुतांना दरमहा प्रत्येकी दहा हजार रुपये इतके ठोक मानधन देखील देण्यात येणार आहे ज्यात प्रवासखर्च अणि इतर सर्व भत्ते समावेशित खर्च देखील समाविष्ट असणार आहेत.
निवड करण्यात आलेल्या योजनादुतांसमवेत सहा महिने इतक्या कालावधीकरीता एक करार केला जाईल पण ह्या कराराच्या कालावधीत कुठल्याही परिस्थितीत वाढ करण्यात येणार नाही.
योजनादुतांच्या निवडीसाठी ठेवण्यात आलेले पात्रतेचे निकष
योजनादुत पदाच्या भरतीकरीता फक्त १८ ते ३५ ह्या वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येईल.
उमेदवार कुठल्याही एका शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
उमेदवारास कंप्यूटरचे नाॅलेज असणे आवश्यक आहे.
उमेदवाराकडे लेटेस्ट अपडेटेड मोबाइल असणे आवश्यक आहे.
उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
उमेदवाराकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे तसेच त्यांचे बॅक खाते आधारशी जोडलेले असावे.
योजनादुत पदाच्या भरतीकरीता सादर करावयाची कागदपत्रे
- मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रमाकरीता विहित नमुन्यात केलेला आॅनलाईन अर्ज.
- उमेदवाराचे आधार कार्ड
- पदवी उत्तीर्ण असल्याचा पुरावा म्हणून पदवी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- वैयक्तिक बॅक खाते तपशील
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- हमीपत्र (आॅनलाईन अर्जासोबत असलेल्या नमुन्यातील)
योजनादुतांची निवड कशी केली जाईल?
योजनादुत पदाच्या भरतीकरीता अर्ज केलेल्या उमेदवाराच्या अर्जाची सर्वप्रथम चौकशी केली जाईल.ही छाननी माहीती व जनसंपर्क महासंचालनालयनादवारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थेमार्फत आॅनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
ही छाननी उपरोक्त परिच्छेदात नमुद करण्यात आलेल्या पात्रतेच्या निकषानुसार केली जाईल.
आॅनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्ज तसेच उमेदवाराच्या अर्जाची छाननी करतील.ज्यात उमेदवाराची शैक्षणिक तसेच वयोमर्यादा विषयक महत्वाची कागदपत्रे तपासली जातील.
यानंतर सर्व निवड करण्यात आलेल्या योजनादुतांबरोबर सहा महिने इतक्या कालावधीकरीता करार केला जाईल.हा कराराचा कालावधी कुठल्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही.
योजनेअंतर्गत उमेदवारांना देण्यात आलेले काम हे शासकीय सेवा म्हणून गृहित धरले जाणार नाही.म्हणुन ह्या नेमणुकीच्या आधारावर उमेदवार भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी करू शकणार नाहीत तसेच तसा हक्क सांगु शकणार नाहीत.याबाबतचे एक हमीपत्र देखील निवड झालेल्या उमेदवारांना लिहुन द्यावे लागेल.
पदाच्या भरतीकरीता ठेवण्यात आलेल्या अटी
योजनादुतांना सोपविण्यात आलेल्या जबाबदारीचा स्वताच्या स्वार्थासाठी नियमांमध्ये उपयोग करता येणार नाही.उमेदवाराने आपल्या जबाबदारीचा नियमबाह्य कामासाठी उपयोग केल्यास त्याच्यासोबत केलेला करार संपुष्टात आणुन त्याला जबाबदारीतुन मुक्त करण्यात येईल.
योजनादुत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास त्यांना वेतन दिले जाणार नाही.
प्रशिक्षित योजनादुतांना नेमुन दिलेल्या ठिकाणी जाऊन दिलेले काम व्यवस्थित पार पाडणे बंधनकारक करण्यात आले आहे.
योजनादुत यांना दिवसभरात केलेल्या सर्व कामाचा रिपोर्ट आॅनलाईन अपलोड करावा लागेल.