Travel

हिंगोली जिल्ह्यातील महत्वाची १० पर्यटनस्थळे

हिंगोली जिल्हा महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे.हिंगोली हा परभणी ह्या जिल्ह्यातुन विभागण्यात आलेला जिल्हा आहे.

हिंगोली जिल्ह्यात अनेक महत्वाची धार्मिक पर्यटनस्थळे आहेत ज्यांना भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील कित्येक भाविक,पर्यटक येतात.

हिंगोली ह्या जिल्ह्यामध्ये गोंधळ,शायरी,कलगीतुरा,पोतराज इत्यादी लोककला अत्यंत प्रसिद्ध आहेत.हिंगोली हा एक कृषीप्रधान जिल्हा आहे जिथे मोठ्या प्रमाणात शेतकरी वास्तव्यास आहेत.ज्वारी हे हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख अन्न पीक आहे.हे पीक दोन्ही हंगामात घेतले जाते.

हिंगोली जिल्ह्यात एकूण पाच तालुके समाविष्ट होतात.हिंगोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ ४ हजार ५२७ वर्ग किलोमीटर इतके पसरलेले आहे.

आजच्या लेखात आपण हिंगोली जिल्ह्यातील महत्वाची पर्यटनस्थळे कोणकोणती आहेत हे जाणून घेणार आहोत.

श्री क्षेत्र औंढा नागनाथ –

श्री क्षेत्र औंढा नागनाथ हे मंदिर संपुर्ण महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते.

श्री क्षेत्र औंढा नागनाथ हे मंदिर बारा ज्योतिर्लिंग पैकी आठवे ज्योतिर्लिंग आहे.औंढा नागनाथ मंदीर हे नागेश्वरम ह्या नावाने देखील ओळखले जाते.

महादेवाचे आठवे ज्योतिर्लिंग असलेले हे मंदिर अत्यंत भव्य आहे.हया मंदिरावर कोरण्यात आलेल्या मुर्ती देखील खुप छान आहेत.

औंढा नागनाथ मंदिरात भुयारात पिंड आहे जिला हात लावून नमस्कार देखील करता येतो.हिंगोली शहरापासून औंढा नागनाथ हे ठिकाण साधारणतः २५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

औंढा नागनाथ हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आलेले मंदीर आहे.हया मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिरातील पुढे नसुन मागील बाजूस आहे.

औंढा नागनाथ मंदिराच्या चारही बाजूंना इतर छोटी मंदिरे आहेत.जी इतर ज्योर्तीलिंग दर्शवण्याचे काम करतात.

विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर –

विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर हे हिंगोली जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे.दरमहिन्याला चिंतामणी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते.

चिंतामणी गणपती भाविकांच्या हाकेला धावून जातो त्यांच्यावर आलेले सर्व संकट दुर करतो नवस पुर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.

हिंगोली शहरापासून विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर हे फक्त दोन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

तुळजाभवानी संस्थान –

तुळजाभवानी संस्थान हे ठिकाण हिंगोली जिल्ह्यात असलेल्या प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे.

तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील एक मोठे हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.तुळजा भवानी मंदिरातील गाभाऱ्यात तुळजाभवानी मातेची ३ फुट इतक्या उंचीची ग्रॅनाईटची मुर्ती सुशोभित केलेली आहे.

ह्या मुर्तींचे आठ हात आहेत ह्या आठही हातांमध्ये प्रत्येकी वेगवेगळे वैशिष्ट्य पाहायला मिळते.तुळजाभवानी मातेला देवी अंबा ह्या नावाने देखील संबोधित केले जाते.

सिद्धेश्वर धरण –

हिंगोली जिल्ह्यातील ओंढा नागनाथ तालुक्यातील पुर्णा नदीवर सिद्धेश्वर धरण वसलेले आहे.येथील परिसर आता एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून विकसित देखील होत आहे.

हिंगोली जिल्ह्यातील अनेक निसर्गप्रेमी पर्यटक ह्या धरणाला भेट देण्यासाठी इथे येतात.हिंगोली शहरापासून सिद्धेश्वर धरण साधारणतः ३० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

सिद्धेश्वर धरणाची निर्मिती यशवंतराव चव्हाण यांच्या काळात करण्यात आली होती.

खटकाळी मारूती मंदिर –

खटकाळी मारूती मंदिर हे हिंगोली जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.हिंगोली शहरातील प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिर म्हणून देखील हे मंदिर प्रसिद्ध आहे.

हिंगोली जिल्ह्यातील अनेक पर्यटक भाविक आवर्जून ह्या मंदिराला भेट देण्यासाठी इथे येतात.खटकाळी मारूती मंदिर हे हिंगोली शहरापासून साधारणतः ५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

हिंगोली दसरा महोत्सव –

हिंगोली ह्या शहरात मानदास बाबा यांनी १५१ वर्ष पुर्वी दसरा महोत्सव साजरा करण्यास आरंभ केला होता.

दसरा महोत्सव निमित्ताने हिंगोली शहरात सांस्कृतिक, सामाजिक,तसेच रावण दहन इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येत असतात.

हिंगोली शहरातील दसरा महोत्सव संपूर्ण शहर वासियांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनला आहे.९ ते १० दिवसांच्या कालावधीसाठी चालणारा हा उत्सव हिंगोली शहरातील लोकांसाठी एकात्मतेचे प्रमुख उदाहरण बनला आहे.

चिरागशहा दर्गा हिंगोली –

चिराग शहा दर्गा हे ठिकाण हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे.चिरागशहा दर्गा हे हिंगोली शहरातील निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखले जाते.

चिरागशहा दर्गाच्या बाजुला एक तळे आहे ज्याच्या बाजुला पर्यटकांना फेरफटका मारायला उत्तम सोय करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील अनेक हिंदू तसेच मुस्लिम भाविक भक्तजण ह्या दर्गाला भेट देण्यासाठी येतात.

भगवान शांतीनाथ जीनालय –

भगवान शांतीनाथ जीनालय हे हिंगोली जिल्ह्यातील शिरठ शहापूर गावात असलेले प्रसिद्ध जैन मंदिर आहे.

भगवान शांतीनाथ जीनालय मध्ये ३ गर्भगृह,पाच प्रवेश द्वार,सहा शिखरे अणि सात दरवाजे पाहावयास मिळतात.

जिनालयाचा सोहळा प्रत्येक फाल्गुन महिन्यात साजरा केला जातो.

ह्या मंदिरात पुजा प्रार्थना करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्तजण येताना दिसुन येतात.

मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर –

मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर हे हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते.

हिंगोली जिल्ह्यातील ओंढा नागनाथ तालुक्यातील शिरठ शहापूर ह्या गावात हे जैन मंदिर स्थित आहे.हे मंदिर जैन धर्मियांचे एक महत्वाचे धार्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते.

मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर हे भगवान मल्लिनाथ यांना समर्पित करण्यात आलेले मंदिर आहे.हया मंदिराला भेट देण्यासाठी भारतातील मोठ्या संख्येने जैन यात्रेकरू येतात.

ह्या मंदिरात भगवान मल्लिनाथ दिगंबर जैन यांची ३०० वर्ष पुर्वी इतकी जुनी मुर्ती देखील पाहावयास मिळते.हिंगोली शहरापासून मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर ७० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

श्री संत नामदेव संस्थान –

श्री संत नामदेव यांचे जन्मस्थळ हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे.

हिंगोली जिल्ह्यातील नरसी ह्या गावात श्री संत नामदेव यांचा जन्म झाला होता.संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक म्हणून ओळखले जात.

श्री संत नामदेव यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील नरसी गावात १२७० मध्ये झाला होता.आज संत नामदेव यांच्या नावानेच हे गाव नरसी नामदेव म्हणून प्रसिद्ध आहे.

भाविकांसोबत अनेक महाराष्टातील अनेक पर्यटक ह्या ठिकाणाला भेट देण्यासाठी इथे येतात.हिंगोली शहरापासून नरसिंह नामदेव हे ठिकाण १८ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button