पाचगणी मधील महत्वाची १० पर्यटनस्थळे

पाचगणी हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात असलेले एक महत्वाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते ह्या ठिकाणाला महाबळेश्वर सारखेच निसर्गसौंदर्य लाभलेले आपणास दिसून येते.
लोणावळा अणि खंडाळा ही पर्यटनस्थळ जशी जवळ आहेत एकदम तसाच प्रकार महाबळेश्वर अणि पाचगणी ह्या दोन्ही थंड हवेच्या ठिकाणांच्या बाबतीत देखील आहे.
आजच्या लेखात आपण महाराष्ट् राज्यातील पाचगणी ह्या ठिकाणी असलेली १० महत्वाची पर्यटनस्थळे कोणकोणती आहेत हे जाणून घेणार आहोत.
टेबल लॅड पाॅईट
टेबल लॅड पाॅईट हे पाचगणी अत्यंत लोकप्रिय अणि प्रसिद्ध असे ठिकाण म्हणून ओळखले जाते टेबल लॅड पाॅईट हे पाचगणी मधील सर्वात उंच ठिकाण आहे.
टेबल लॅड पाॅईट समुद्र सपाटीपासुन सुमारे ४५५० फुट इतक्या उंचीवर स्थित आहे हा पाॅईट डोंगरांनी वेढलेला लॅटराईट खडकाचा एक विस्तीर्ण भाग आहे.
ह्या ठिकाणावरून पर्यटकांना पाचगणी,जवळपास असलेल्या इतर खोरे यांचा मनसोक्त आनंद घेता येतो.
टेबल लॅड ह्या ठिकाणी घोडेस्वारी,मेरीगो राऊंड,मिनी ट्रेन,फुल स्टाॅल,गेम काऊंटर इत्यादी उपक्रमांचा मनमुराद आनंद घेता येतो.
टेबल लॅड पाॅईटला बाॅलीवुडचे लोकप्रिय शुटिंग स्पाॅट देखील म्हणतात.हया ठिकाणी राजा हिंदुस्तानी, मेला,हम तुम्हारे हे सनम, यांसारख्या अनेक चित्रपटांची शुटींग येथे करण्यात आली आहे.
पाचगणी पासुन टेबल लॅड पाॅईट हे ठिकाण अवघ्या तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
महाबळेश्वर
महाबळेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय अणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.
महाबळेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील थंड हवेचे ठिकाण आहे ज्याला हिल स्टेशनची राणी देखील म्हणतात.हे हिल स्टेशन १३५३ मीटर इतक्या उंचीवर स्थित आहे.
येथील मनमोहक दृश्य अणि आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटक इथे भेट देण्यासाठी येतात.महाबळेश्वर मध्ये किल्ले मंदिरे तलाव अणि इतर देखील अनेक पर्यटन स्थळ आहेत.
याचसोबत इथे आपणास प्रतापगड किल्ला, वेण्णा तलाव,लिंगमळा धबधबा, पाचगणी इत्यादी महत्वाची ठिकाणे पाहावयास मिळतात.
पाचगणी पासुन महाबळेश्वर हे ठिकाण १९ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
कास पठार
कास पठार हे महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात वसलेले महत्वाचे अणि लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.हे एक विशाल ज्वालामुखी लॅटरीक पठार आहे.
फुलांचे पठार म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण महाराष्ट् तसेच भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.
कास पठार हे १ हजार हेक्टर इतक्या मोठ्या परिसरात विस्तारलेले दिसुन येते.कास नावाच्या वृक्षापासुन ह्या पठाराला कास पठार असे नाव देण्यात आले आहे.
कास पठार हे ठिकाण महाराष्ट् राज्यातील तसेच भारतातील अनेक पर्यटक निसर्गप्रेमी यांना आकर्षित करते.
सातारा शहरापासून हे ठिकाण २४ किलोमीटर,महाबळेश्वर पासुन ३७ किलोमीटर अणि पाचगणी पासुन ५० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
सिडनी पाॅईट
सिडनी पाॅईट हे कृष्णा नदीच्या खोऱ्यात वसलेले एक रमणीय अणि लोकप्रिय ठिकाण आहे.
कृष्णा व्हॅलीच्या समोर असलेल्या टेकडीवर सिडनी पाॅईट आहे.सर सिडनी बॅकवर्थ यांच्या नावावरून ह्या ठिकाणाला सिडनी पाॅईट हे नाव देण्यात आले होते.
इसवी सन १८३० मध्ये सिडनी बॅकवर्थ हे बाॅमबे मधील गर्व्हनर होते.
सिडनी पाॅईट वरून पर्यटकांना कृष्णा खोरे, धोम धरण, कमळगड किल्ला,वाई शहराचे मनमोहक असे दृश्य पाहता येईल.
याचसोबत सिडनी पाॅईट वरून पर्यटकांना पांडवगड अणि मांढरदेवाच्या डोंगराचे सुंदर असे दृश्य देखील दिसुन येते.पाचगणी पासुन सिडनी पाॅईट हे साधारणतः दोन तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
पारसी पाॅईट
पारसी पाॅईट हे पाचगणी मधील अत्यंत प्रसिद्ध अणि लोकप्रिय ठिकाण मानले जाते.
पारसी पाॅईट हे निसर्गसंपन्न वातावरणाने बहरलेले एक सुंदर ठिकाण आहे.हया ठिकाणाहुन आपणास कृष्णा दरी,धोम धरणाच्या बॅक वॉटरचे विहंगम दृश्य दिसते.
पारसी पाॅईट हे ठिकाण पुर्वीच्या काळी पारशी समुदायातील लोकांचे आवडते ठिकाण होते.म्हणुन ह्या पारशी पाॅईट हे नाव दिले गेले आहे.सुर्योदय सुर्यास्त पाहण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे.
पाचगणी ह्या ठिकाणाला भेट देण्यासाठी आलेले बरेच पर्यटक आवर्जून ह्या ठिकाणाला भेट देण्यासाठी येतात.
पाचगणी पासुन हे ठिकाण दोन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
राजापुरी लेणी
पाचगणी मधील असलेल्या पर्यटनस्थळांमध्ये राजापुरी लेणी देखील समाविष्ट आहे.राजापुरी लेण्या आपल्या धार्मिक महत्वासाठी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या लेण्या आहेत.
ह्या लेण्या अनेक पाण्याच्या तलावांनी वेढलेल्या आपणास दिसून येतात.हया ठिकाणी चार गुफा आहेत ज्यांच्याभोवती आपणास अनेक जलकुंड पाहायला मिळतात.
इथे असलेल्या चार गुहांपैकी एक गुहा इतर गुहांपेक्षा अत्यंत वेगळी दिसते.ह्याच ठिकाणी आपल्याला भगवान कार्तिकेयन यांची जुनी प्रतिमा देखील आपणास दिसून येते.
दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जाणारा हायपोयम उत्सव इथे भेट देण्यासाठी येणारया पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
पाचगणी पासुन राजापुरी लेण्या सात ते आठ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
मॅपरो गार्डन
मॅपरो गार्डन हे पाचगणी मधील सर्वात प्रसिद्ध अणि लोकप्रिय ठिकाण आहे.मॅपरो गार्डन हे बगीचा नसून फळांचे उत्पादन केले जाणारे ठिकाण आहे.
स्ट्राॅबेरी टेल अणि उत्कृष्ट चाॅकलेट फॅक्टरी मॅपरो गार्डन मधील महत्वाचे आकर्षण मानले जाते.हया गार्डनचे कॅम्पस दोन एकरपेक्षा मोठ्या परिसरात पसरलेले आहे.
मॅपरो गार्डन हे ठिकाण पाचगणी मधील एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे.कुटुंबासमवेत तसेच मित्रांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
पाचगणी शहरापासून मॅपरो गार्डन ७ ते ८ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
देवराई आर्ट व्हिलेज
देवराई आर्ट व्हिलेज हे ठिकाण शहरी राहणीमान अणि दुर्गम आदिवासी ठिकाण यांच्यातील जणु दुवाच आहे.
देवराई ह्या गावात स्वदेशी कला अणि हस्तकला टिकवून ठेवलेल्या दिसुन येतील.हया कलाकृतींमध्ये उपयुक्त वास्तु अणि दैनंदिन जीवनात असलेल्या कलेचा समावेश आहे.
आधुनिक डिझाईनची संवेदनशीलता,पारंपरिक कला ही ह्याच हस्तकलेतुन परावर्तित होताना दिसुन येते.ही खुपच दर्जेदार कलाकृती मानण्यात येते.
देवराई आर्ट व्हिलेज हे एक आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे.पाचगणी पासुन देवराई आर्ट व्हिलेज अवघ्या तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
कमळगड किल्ला
कमळगड किल्ला आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक मानला जातो.
ह्या किल्ल्याला कमालगड ह्या नावाने देखील ओळखले जाते.कमळगड हा एक गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी जावळी मोहिमेच्या आधी ह्या किल्ल्याला स्वराज्यात सामील करून घेतले होते.
कमळगड किल्ला साधारणतः ४८११ फुट इतक्या उंचीवर स्थित आहे.महाराष्ट राज्यातील बरेच पर्यटक इतिहास प्रेमी ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी इथे येतात.
पाचगणी पासुन कमळगड किल्ला ४० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
धोम धरण
धोम धरण हे पाचगणी मधील सर्वात प्रसिद्ध अणि लोकप्रिय ठिकाण आहे.हे धरण सातारा जिल्ह्यातील धोम गावाजवळ आहे.
धोम धरण महाराष्ट् राज्यातील कृष्णा नदीवर बांधण्यात आले आहे.एक दिवसाची सहल म्हणुन भेट देण्यासाठी हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.
निसर्गरम्य परिसर अणि नौकाविहार उपक्रम यामुळे हे धरण पर्यटकांना आकर्षित करते.ज्यांना पाण्यातील उपक्रमांचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी धरणाच्या जवळच सह्याद्री बोट क्लब आहे.
ह्या बोट क्लब मधुन वाॅटर स्कुटर, स्पीड बोट,बनाना बोट राईडिंग इत्यादी अशा अनेक खेळांचा आपणास मनसोक्त आनंद घेता येईल.बोट क्लब कडुन पर्यटकांना घोडेस्वारी अणि कॅम्पिंग सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते.