TravelTrending

भारतातील सर्वात महागड्या अशा १० हाॅटेल्स

आपला भारत देश हा इतिहास संस्कृती अणि निसर्गाचा एक अद्भुत असा नमुना म्हणून ओळखला जातो.

भारत ह्या देशाकडे आज वैभवाचे प्रतिक म्हणून संपूर्ण जगात बघितले जाते.राजेशाही वास्तुकला अणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या ह्या भारत देशात अनेक अलिशान हाॅटेल्स आपणास पाहावयास मिळतात.

हे हाॅटेल्स आज प्रत्येक पर्यटकांसाठी फार महत्वाचे ठरते.पण ह्या हाॅटेल्स मध्ये जायचे तसेच थांबायचे म्हटले तर आपल्याला तेवढा अधिक खर्च देखील करावा लागणार नाही.

आजच्या लेखात आपण आपल्या भारत देशातील १० सर्वात महागड्या हाॅटेल्स विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

१) ताजमहल

ताजमहल ह्या हाॅटेलची गणना भारतातील सर्वात महागड्या हाॅटेल्स मध्ये केली जाते.भारतातील सर्वात महागड्या हाॅटेल्सच्या यादीत ताजमहल हे हाॅटेल दहाव्या क्रमांकावर आहे.

ताजमहल ह्या हाॅटेलला ताज हॉटेल ह्या नावाने देखील ओळखले जाते.आपल्याला ताजमहल हाॅटेल मुंबई येथील कुलाबा जवळ गेट वे आॅफ इंडियाच्या समोर पाहावयास मिळते.

ताजमहल हे भारतातील सर्वात प्रसिद्ध अणि जुन्या हाॅटेल्स पैकी एक मानले जाते.

ताजमहल ह्या हाॅटेलमध्ये एक दिवस राहण्यासाठी आपल्याला १ लाख ७५ हजार रुपये द्यावे लागतात.

२) फलकनुमा पॅलेस –

भारतातील सर्वात महागड्या हाॅटेल्सच्या यादीत फलकनुमा पॅलेस ह्या हाॅटेलचा नववा क्रमांक लागतो.

हे भारतातील सर्वात महागड्या हाॅटेल्स पैकी एक मानले जाते.फलकनुमा हाॅटेल भारतातील हैदराबाद येथे आहे.

एकेकाळी ह्या हाॅटेलच्या जागेवर हैदराबादच्या निजामाचे निवासस्थान होते.पण आता ही जागा ताज गृप आॅफ हाॅटेल अॅण्ड रिसोर्ट यांना भाड्याने देण्यात आली आहे.

फलकनुमा म्हणजे आकाशाचा आरसा किंवा आकाशासारखा दिसणारा असा होतो.फलकनुमा ह्या पॅलेस मध्ये एक रात्र राहण्यासाठी दोन लाख रुपये द्यावे लागतात.

३) ताज लॅड एंड –

भारतातील सर्वात महागड्या हाॅटेल्सच्या यादीत ताज लॅड एंड ह्या हाॅटेलचा आठवा नंबर लागतो.

ह्या हाॅटेलच्या रूमवरून आपल्याला बांद्रा वरळी सी पाॅईट पाहायला मिळतो.हया हाॅटेल मध्ये स्पा,योगा रूम,बार,शाॅपिंग माॅल इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ह्या हाॅटेल मधील प्रेसिडेन्शिअल स्वीटस मध्ये एक रात्र थांबण्यासाठी २ लाख ५० हजार रुपये द्यावे लागतात.

४) द ओबेरॉय अमरविलास –

द ओबेरॉय अमरविलास हे भारतातील सर्वात महागड्या हाॅटेल्सच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.द ओबेरॉय अमरविलास आग्रा मध्ये आहे.

जगातील सात आश्चर्ये पैकी एक म्हणुन ओळखले जात असलेल्या ताजमहल जवळ हे हाॅटेल आहे.हया हाॅटेलच्या रूममधुन आपल्याला ताजमहाल एकदम स्पष्टपणे दिसुन येईल.

ह्या हाॅटेल मध्ये योगा, स्पा,इत्यादी सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यात येतात.

द ओबेरॉय अमरविलास मध्ये एक रात्र राहण्यासाठी अडीच लाख रुपये द्यावे लागतात.

५) हाॅटेल ओबेरॉय उदयव्हिला –

भारतातील सर्वात महागड्या हाॅटेल्सच्या यादीत सहाव्या क्रमांकावर असलेले ओबेरॉय उदयव्हिला हे एक महत्वाचे हाॅटेल आहे.

हाॅटेल ओबेरॉय उदयव्हिला हे राजस्थान राज्यातील उदयपुर येथे आहे.ह्या हाॅटेल मध्ये ९० खोल्या आहेत अणि ह्या सर्व खोल्यांमध्ये मिनीबार देखील आहेत.

हाॅटेल ओबेरॉय उदयव्हिला इथे एक रात्र राहण्यासाठी आपल्याला अडीच लाख रुपये द्यावे लागतात.

६) ओबेरॉय हॉटेल –

ओबेरॉय हॉटेल भारतातील सर्वात महागड्या हाॅटेल्सच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.ओबेरॉय हॉटेल मुंबई मधील प्रमुख हाॅटेल आहे.

ओबेरॉय हॉटेल मुंबई मधील नरीमन पाॅईट येथे आहे.ओबेराॅय हाॅटेल हे मुंबई मधील सर्वात मोठे हाॅटेल आहे.

ओबेरॉय हॉटेल मध्ये स्पा,बार,योगा रूम, शाॅपिंग काॅम्पलेक्स इत्यादी सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यात येतात.

ओबेरॉय हॉटेल मध्ये एक रात्र राहण्यासाठी तीन लाख रुपये घेतले जातात.

७) द ओबेरॉय गुडगाव –

ओबेरॉय गुडगाव हे भारतातील सर्वात महागड्या हाॅटेल्सच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेले हाॅटेल आहे.

द ओबेरॉय गुडगाव ही ओबेरॉय हॉटेलची दुसरी शाखा आहे.भारतातील सर्वात मोठ्या हाॅटेल मध्ये ह्या हाॅटैलचे नाव समाविष्ट होते.

द ओबेरॉय गुडगाव हाॅटेल मध्ये एक रेस्टॉरंट,एक स्विमिंग पूल, शाॅपिंग माॅल इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.द ओबेरॉय गुडगाव हाॅटेल मध्ये एक रात्र राहण्यासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतात.

८) द लिला पॅलेस –

भारतातील सर्वात महागड्या हाॅटेल्सच्या यादीत द लिला पॅलेस ह्या हाॅटेलचा तिसरा क्रमांक लागतो.द लिला पॅलेस हे दिल्ली मध्ये स्थित असलेले हाॅटेल आहे.

द लिला पॅलेस हे दिल्ली मधील सर्वात मोठ्या हाॅटेल पैकी एक आहे.

दिल्ली मधील सरोजिनी नगरपासुन एक किलोमीटर अणि इंडिया गेट पासुन तीन किलोमीटर इतक्या अंतरावर हे ठिकाण आहे.

द लिला पॅलेस हाॅटेल स्पा,योगा, जिम,शाॅपिंग काॅम्पलेक्स इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.द लिला पॅलेस हे हाॅटेल राजेशाही भारतीय संस्कृतीचे परिपुर्ण मिश्रण मानले जाते.

द लिला पॅलेस हाॅटेल मध्ये एक रात्र राहण्यासाठी चार लाख पन्नास हजार रुपये घेतले जातात.

९) ताज लेक पॅलेस –

ताज लेक पॅलेस हे हाॅटेल भारतातील सर्वात महागड्या हाॅटेल्सच्या यादीत दुसरया क्रमांकावर आहे.

ताज लेक पॅलेस राजस्थान राज्यातील उदयपुर शहरात पिचोला तलावातील जगनिवास बेटावर चार एकरवर बांधण्यात आले आहे.

हे हाॅटेल पाण्याच्या मधोमध बनवलेले असल्याने हे हाॅटेल पाण्यात तरंगत असल्यासारखे वाटते.

ह्या हाॅटेलला पुर्वी जगनिवास म्हणून ओळखले जात असे.ताज लेक पॅलेस हे संपुर्ण हाॅटेल पांढरया दगडात बांधलेले आहे.

पुर्वी हे हाॅटेल मेवाड साम्राज्याचे महल होते.नंतर हे हाॅटेल अलिशान हाॅटेल्स मध्ये रुपांतरीत करण्यात आले होते.

ताज लेक पॅलेस मध्ये ६६ खोल्या अणि सतरा स्वीटस आहेत.हया हाॅटेल मध्ये दोन मोठे हाॅल देखील आहेत जिथे लग्न समारंभ सारखे तसेच इतर कार्यक्रम देखील पार पाडले जाऊ शकतात.

ताज लेक पॅलेस हाॅटेल मध्ये एक रात्र राहण्यासाठी सहा लाख रुपये घेतले जातात.

१०) रामबाग पॅलेस –

रामबाग पॅलेस हे भारतातील सर्वात महागड्या हाॅटेल्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.हे भारतातील सर्वात महागडे हाॅटेल आहे.

रामबाग पॅलेस हे हाॅटेल राजस्थान राज्यातील जयपूर येथे आहे.हे हाॅटेल पुर्वी जयपुरचे राजा रामसिंह दुतीय यांचे निवासस्थान होते.पण सध्या हे हाॅटेल ताज समुहाचे डिलक्स हाॅटेल आहे.

रामबाग पॅलेस हाॅटेल जगातील सर्वोत्कृष्ट हाॅटेल्सच्या यादीत गणले जाते.हया हाॅटेल मध्ये आपण तिकीट घेऊन देखील फिरू शकतो.

ह्या हाॅटेल मध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक लक्झरी सुविधा उपलब्ध आहेत.रामबाग पॅलेस हाॅटेल मध्ये स्पा,बार,योगा स्विमिंग पूल, शाॅपिंग माॅल, गोल्फ ग्राउंड पोलो ग्राऊंड इत्यादी सर्व सुविधा आहेत.

गुलाबी शहर जयपूर मध्ये असलेल्या ह्या हाॅटेलचा लुक शाही प्रकारचा आहे.रामबाग पॅलेस मध्ये एक रात्र राहण्यासाठी सात लाख पन्नास हजार रुपये घेतले जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button