महाराष्ट्रातील सर्वात उष्ण १० जिल्हे

आपल्या महाराष्ट्र राज्यात उन्हाळा हा त्रतु प्रामुख्याने फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो.पण उन्हाळ्यात एप्रिल अणि मे ह्या दोन महिन्यात सर्वात जास्त उन पडताना आपणास दिसून येते.
आपल्या महाराष्ट्र राज्यात आज एकूण ३६ जिल्हे आहेत ह्यापैकी कोणत्या राज्यात उन्हाळ्यात सर्वात जास्त उष्णता असते.हे आपल्यापैकी कित्येक जणांना माहीत देखील नाही.
महाराष्ट्र राज्यातील काही जिल्हे असे आहेत की उन्हाळ्यात ह्या ठिकाणी सुर्य अक्षरश आग ओकत असतो.
याचकरीता आजच्या लेखात आपण महाराष्ट् राज्यातील सर्वात जास्त उष्णता असलेल्या १० जिल्ह्यांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.
नांदेड –
नांदेड हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक सर्वात उष्ण जिल्हा म्हणून ओळखले जाते.महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेस अणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगत हा जिल्हा आहे.
२०२३ मधील एप्रिल महिन्यात नांदेड ह्या जिल्ह्यात आय एमडीबीच्या आकडेवारीनुसार ४०.२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले होते.
जळगाव –
महाराष्ट्रातील सर्वात जास्त उष्णता असलेल्या जिल्ह्यांच्या यादीत जळगाव ह्या जिल्ह्याचा देखील समावेश होतो.
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्यातील उत्तर पश्चिम क्षेत्रात स्थित आहे.जळगाव जिल्हा उत्तर सातपुडा पर्वत रांगेत अजिंठा पर्वतरांगेवर दक्षिणेकडे वसलेला आहे.
२०२३ मधील एप्रिल महिन्यात आय एमडीबीच्या आकडेवारीनुसार जळगाव ह्या जिल्ह्यात साधारणतः ४८.३ अंश इतके तापमान नोंदविण्यात आले होते.
अकोला –
महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त उष्णता असलेल्या जिल्ह्यांच्या यादीत अकोला जिल्हा देखील समाविष्ट आहे.
अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मध्य पुर्वेला स्थित आहे.२०२३ मधील एप्रिल महिन्यात आय एमडीबीच्या आकडेवारीनुसार अकोला ह्या जिल्ह्यात ४०.५ अंश सेल्सिअस इतके तापमान होते.
यवतमाळ–
यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्ह्यांपैकी एक आहे.
यवतमाळ जिल्हा वर्धा,पैनगंगा,वैनगंगा ह्या खोरयांच्या दक्षिण तसेच पश्चिम भागात वसलेला आहे.
२०२३ मधील एप्रिल महिन्यात आय एमडीबीच्या आकडेवारीनुसार यवतमाळ ह्या जिल्ह्यात ४०.५ अंश सेल्सिअस इतके तापमान होते.
परभणी –
महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्ह्यांपैकी परभणी हा देखील एक महत्वाचा जिल्हा आहे.
परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो.याच्या उत्तरेस हिंगोली, पूर्वेस नांदेड जिल्हा दक्षिणेस लातूर जिल्हा अणि पश्चिमेस बीड व जालना जिल्हा आहे.
२०२३ मधील एप्रिल महिन्यात आय एमडीबीच्या आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यात ४०.८ अंश सेल्सिअस इतके तापमान होते.
नागपूर –
महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त उष्ण जिल्ह्यांच्या यादीत नागपुर देखील समाविष्ट आहे.
नागपूर जिल्हा भारताच्या जवळपास मध्यभागी आहे भारतातील शुन्य मैलाचा दगड देखील ह्याच नागपूर शहरात स्थित आहे.
२०२३ मधील एप्रिल महिन्यात आय एमडीबीच्या आकडेवारीनुसार नागपुर जिल्ह्यात ४८ डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले होते.
सोलापूर –
महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्ह्यांच्या यादीत सोलापूर ह्या जिल्ह्याचा देखील समावेश होतो.
सोलापूर हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो.हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण भागात वसलेला आहे.
२०२३ मधील एप्रिल महिन्यात आय एमडीबीच्या आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात ४१.४ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले होते.
२०२४ मध्ये ह्या जिल्ह्यातील तापमान जवळपास ४३ अंश सेल्सिअस इतके आहे.
अमरावती –
महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्ह्यांपैकी अमरावती हा सुद्धा एक महत्वाचा जिल्हा आहे.
अमरावती ह्या जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा भारत देशातील मध्य प्रदेश ह्या राज्यास लागुन आहे.
२०२३ मधील एप्रिल महिन्यात आय एमडीबीच्या आकडेवारीनुसार अमरावती ह्या जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले होते.
वर्धा –
महाराष्ट्रातील सर्वात जास्त उष्णता असलेल्या जिल्ह्यांच्या यादीत वर्धा हा जिल्हा देखील समाविष्ट आहे.वर्धा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे
वर्धा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ ह्या विभागात येतो.२०२३ मधील एप्रिल महिन्यात आय एमडीबीच्या आकडेवारीनुसार वर्धा ह्या जिल्ह्यात ४२.२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले होते.
चंद्रपूर –
महाराष्ट्रातील सर्वात जास्त उष्णता असलेल्या जिल्ह्यांच्या यादीत चंद्रपूर ह्या जिल्ह्याचा देखील समावेश होतो.
चंद्रपूर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे.हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ ह्या विभागात येतो.
२०२३ मधील एप्रिल महिन्यात आय एमडीबीच्या आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात ४९ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले होते.