BusinessEntrepreneurshipStartup

केटरींग सर्विस (Catering Service) व्यवसाय कसा सुरु करायचा ?

केटरींग (Catering Service) व्यवसाय कसा सुरु करायचा? हा एक बाजारात अत्याधिक मागणी असलेला व्यवसाय आहे.ज्या व्यक्तींना उत्तम पद्धतीचा स्वयंपाक बनवता येतो.ज्यांना पाककलेचे उत्तम ज्ञान आहे.अशी कुठलीही व्यक्ती आज स्वताचा केटरींगचा व्यवसाय सुरू करू शकते.

आज आपण पाहतो जागोजागी बर्थ डे पार्टी, वेगवेगळे समारंभ,कार्यक्रम सण उत्सव इत्यादी मध्ये लोकांना केटरींग सर्विसची गरज भासते.

कारण आज प्रत्येकाला वाटते की आपल्या लग्न समारंभ कार्यक्रमात,पार्टीत आलेल्या प्रत्येक पाहुण्याला उत्तम अणि दर्जेदार असे अन्न प्राप्त व्हावे.

अणि लग्न समारंभ म्हटले तर आपण इतक्या घाईगडबडीत असतो की आपल्याला पाहुण्यांसाठी स्वयंपाक बनवायला अजिबात वेळ नसतो.

अशा वेळी आपण एखाद्या केटरींग सर्विसचा लाभ घेत असतो ज्यामुळे आपल्याला लग्न समारंभात पार्टीत पाहुण्यांसोबत भरपुर गप्पा गोष्टी करता येतात त्यांचे आदरातिथ्य करता येते.

आपल्या घरातील लग्न समारंभात आलेल्या पाहुणे मंडळींसाठी स्वयंपाक तयार करत बसावे लागत नाही.

जेव्हा आपल्या घरी एखादे लग्न कार्य,समारंभ कार्यक्रम असतो तेव्हा कार्यक्रमात आलेल्या पाहुणे मंडळींसाठी जेवणाची सोय करणे खुप महत्वाचे असते.

समारंभात,कार्यक्रमात पार्टीत पाहुणे मंडळींसाठी कशा प्रकारचे जेवण असायला हवे त्यात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा हे ठरवणे आपल्याला खूप अवघड जात असते.हे ठरवण्यात आपला खुप वेळ वाया जात असतो.

अशावेळी आपण कुठल्याही लग्न समारंभ,कार्यक्रम सण उत्सव बर्थ डे पार्टी इत्यादी मध्ये काय बनवायचे हा आपल्या डोक्याचा ताण कमी करण्यासाठी केटरींग सर्विस घेत असतो.

यात आपल्याला फक्त कोणकोणते पदार्थ बनवायचे आहेत.हे केटरींग सर्विस देत असलेल्या व्यक्तीला सांगावे लागते.मग ते आपल्या पदधतीने पाहुण्यांसाठी स्वयंपाक बनवत असतात.

केटरींगचा व्यवसाय (Catering service) कसा सुरु करायचा?

केटरींग हा एक असा व्यवसाय आहे ज्यात आपल्याला उत्तम दर्जेदार जेवण बनवुन लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे लागते.

केटरींगचा व्यवसाय आपण एखाद्या जागेवरून सुरू करू शकता किंवा जागेसाठी बजेट नसल्यास आपण घरातुन देखील हा व्यवसाय सुरू करू शकतो.

जर आपल्याला छोट्या पातळीवर घरातुन केटरींगचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर यासाठी आपल्याला उत्तम पद्धतीचे जेवण बनवता येणे आवश्यक आहे.

घरात स्वयंपाक बनवत असताना आपल्याला मदत करण्यासाठी किमान एक दोन जण आपल्यासोबत असायला हवे.

यासाठी आपल्याला घरातुनच छोट्या पातळीवर केटरींगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अशा व्यक्तींना कामावर ठेवावे लागेल.ज्यांना उत्तम पद्धतीचा स्वयंपाक बनविण्याचा अनुभव आहे.

आपल्या सोबत केटरींगचे काम करत असलेल्या व्यक्तीला आपल्या जबाबदारीचे पुर्णपणे ज्ञान असणे आवश्यक आहे.

केटरींगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला किचनमध्ये स्वयंपाक बनवायला लागत असणारे सर्व प्रकारचे साहित्य खरेदी करावे लागेल.याचसोबत पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या वस्तुंची देखील आपणास खरेदी करावी लागेल.

केटरींगचा व्यवसाय (Catering service) सुरू करण्यासाठी लागणारे महत्वाचे लायसन –

केटरींगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक लायसन प्राप्त करावे लागेल.

केटरींगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे गुमास्ता रेजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे.याचसोबत ओपीसी वन पर्सन कंपनी रेजिस्ट्रेशन देखील आपणास करावे लागेल.

कुठल्याही जेवणाशी खाण्याच्या पदार्थाशी संबंधित व्यवसायात आपल्याला एका गोष्टीची नेहमी विशेष काळजी घ्यावी लागते ती म्हणजे स्वच्छतेची साफसफाई करण्याची.

कारण आपण जे जेवण बनवुन लोकांना खाऊ घालत असतो त्याचा त्यांच्या आरोग्यावर विशेष परिणाम होत असतो.हा परिणाम चांगला तसेच वाईट देखील असण्याची शक्यता असते.

म्हणुन केटरींगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आरोग्य विभागाकडुन एफ एस एस ए आय कडून फुड लायसन्स प्राप्त करावे लागते.

जेव्हा आपण केटरींग व्यवसाय सुरू करण्यासाठी लायसन प्राप्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडे अर्ज दाखल करतो तेव्हा आरोग्य विभागाचे अधिकारी स्वता येऊन आपल्या व्यवसायाची व्यवस्थितरीत्या पाहणी करतात.

आपण आपल्या केटरींगच्या व्यवसायात स्वयंपाक बनवत असताना किती काटेकोरपणे स्वच्छतेचे पालन करतो हे देखील ते बघतात.आपण स्वयंपाक बनवायला वापरत असलेल्या किचनमध्ये किती साफसफाई स्वच्छता ठेवली जाते हे सुद्धा ते बघतात.

मग तपासणी दरम्यान सर्व गोष्टी ठिक असतील तेव्हा सर्व मापदंडाची चौकशी केल्यानंतर आरोग्य विभाग आपल्याला केटरींगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लायसन्स देत असते.
अन्यथा नाही.

आरोग्य विभागाकडून लायसन्स प्राप्त झाल्यानंतर आपण आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी कायदेशीर रीत्या पुर्णपणे सुरक्षित असतो अणि कायदेशीर पदधतीने आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात देखील करू शकतो.

आपण बनवत असलेले जेवण अणि त्याची पॅकिंग एकदम आकर्षक असायला हवी-

केटरींग व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण एक गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला हवे की आपण बनवलेले जेवण अणि त्याची करण्यात आलेली पॅकिंग कस्टमरला दिसायला एकदम आकर्षक असायला हवी.

कारण आज मार्केट मध्ये अशी परिस्थिती आहे जे लोकांना डोळ्यांना चमकताना दिसते तेच लोक खरेदी करतात म्हणजेच जो दिखता है वही बिकता है अशी परिस्थिती सध्या बाजारात आहे.

म्हणुन आपण देखील आपले बनवलेले जेवण अणि त्याची पॅकिंग दिसायला एकदम आकर्षक वाटेल अशी ठेवणे गरजेचे आहे.

कधी कधी असे होते की आपण तयार केलेले जेवण एकदम चांगले असते पण खराब पॅकिंगमुळे आपले कस्टमर वरचे सर्व इंप्रेशन खराब होत असते.म्हणुन आपण जेवण चांगल्या पद्धतीने पॅकिंग करूनच पाठवायला हवे.

याचसोबत जेवणासोबत आपण पाठवत असलेल्या कटलरी जसे की काटा,चमच इत्यादी देखील दिसायला एकदम आकर्षक असायला हवे.

जेवणात पहिले विशेषतेवर अधिक भर द्यायला हवी –

आपल्या जेवणातील ज्या विशेषतेमुळे कस्टमर आपल्याकडे केटरींग सर्विस घेण्यासाठी येत आहे त्या विशेषतेवर आपण विशेष लक्ष द्यायला हवे.

ती विशेषता आपण गमावता कामा नये कारण त्या विशेषतेमुळेच कस्टमर आपल्याकडे केटरींग सर्विस घेण्यासाठी येत असतात.

केटरींग सर्विस मध्ये जास्त अन्नपदार्थ बनवण्यापेक्षा आपण जे अन्नपदार्थ बनवण्यात एक्स्पर्ट आहात तेच अन्नपदार्थ बनविण्यावर आपण विशेष लक्ष द्यायला हवे.

जोपर्यत आपल्या व्यवसायातील विशेषत ओळखत नाही तोपर्यंत बाजारात आपल्या व्यवसायाचा जम बसायला वेळ लागु शकतो.

किंमतीवर विशेष लक्ष द्यायला हवे –

केटरींगच्या व्यवसायात सध्या स्पर्धा खुपच वाढत चालली आहे त्यामुळे हा व्यवसाय सुरू करताना आपल्याला किंमतीवर देखील विशेष लक्ष द्यावे लागेल.

आपण जर बाजारात सुरूवातीलाच आपल्या इतर प्रतिस्पर्धीपेक्षा जास्त रेट ठेवले तर आपल्याला सुरूवातीला खुप कमी कस्टमर प्राप्त होतील जास्तीत जास्त कस्टमर मिळणार नाही.

पण याचठिकाणी जर आपण आपल्या इतर प्रतिस्पर्धीपेक्षा कमी किंमत ठेवली वाजवी दर आकारले तर आपण जास्तीत जास्त कस्टमर आपल्याकडे वळवू शकतो.

यात आपण सुरूवातीला आपल्या प्रतिस्पर्धीपेक्षा कमी किंमत ठेवून कस्टमरला खाण्याची उत्तम काॅलिटी द्यायला हवी.जसजशी आपल्या जेवणाची काॅलिटी कस्टमरला आवडु लागेल तसतसे आपण आपल्या जेवणाच्या किंमतीत वाढ देखील करू शकतात.

तसेच आपल्या केटरींगच्या व्यवसायाला आपण जास्त भांडवल लावून मोठ्या पातळीवर सुरू करू शकता.अणि त्यानुसार जास्त किंमत देखील ठेवू शकतो.

कस्टमर सोबत चांगले संबंध प्रस्थापित करणे –

केटरींगचा व्यवसाय सुरू केल्यावर आपल्याला आपल्या कस्टमर सोबत चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे.कारण जर आपल्या आधीच्या कस्टमर सोबत चांगले संबंध प्रस्थापित केले.

त्यांना आपली सर्विस आवडली तर ते आपल्या उद्योग व्यवसायाचा प्रचार प्रसार त्यांच्या इतर परिचित लोकांपर्यंत, आप्तेष्ट मित्रपरिवार इत्यादी जवळ करतील जेणे आपल्या उद्योग व्यवसायाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार होईल अणि आपल्या कस्टमर मध्ये देखील अधिक वाढ होईल.

याने आपल्याला जास्तीत जास्त केटरींग सर्विसचे काम प्राप्त होईल.केटरींग हा एक असा व्यवसाय आहे ज्यात आपल्याला मार्केटिंग पेक्षाही अधिक काम प्राप्त होते.

आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करणे –

जर आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायाचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रचार प्रसार करायचा असेल तर आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायाची मार्केटिंग करावी लागेल.

मार्केटिंग मुळे आपला व्यवसाय उद्योग खुप कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.आपण आपल्या केटरींगच्या उद्योग व्यवसायाची वेगवेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करू शकतो.

१) व्हिझिटिंग कार्ड बनवुन –

आपण आपल्या केटरींगच्या उद्योग व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी आपल्या उद्योग व्यवसायाचे एक व्हिझिटिंग कार्ड बनवू शकतो.

आपण आपल्याकडे आॅडर घेऊन येत असलेल्या प्रत्येक कस्टमरला आपले व्हिझिटिंग कार्ड देऊन आपल्या उद्योग व्यवसायाला खुप कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवु शकतो.

२) वर्तमानपत्रात जाहिरात देणे,पॅम्पलेट छापणे –

आपण आपल्या केटरींगच्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी वर्तमानपत्रात आपल्या व्यवसायाची जाहीरात देऊ शकतो.किंवा पॅम्पलेट छापुन घरोघरी वाटु शकतो.

३) सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करणे-

आपण आपल्या फेसबुक,टेलिग्राम,व्हाटस अप,टविटर इंस्टाग्राम इत्यादी सोशल मिडिया अकाऊंट वरून पेज वरून इन्फोग्राफीक्सच्या माध्यमातून आपल्या उद्योग व्यवसायाचा संपूर्ण जगभरात प्रचार प्रसार करू शकतो.

आपण वेगवेगळ्या सोशल मिडिया माध्यमांवर स्वताचे एक आॅफिशिअल पेज तयार करून आपल्या प्रत्येक आॅडर विषयी माहिती देत स्वताच्या उद्योग व्यवसायाचा निःशुल्क देखील प्रचार प्रसार करू शकतो.

आपल्या सोबत काम करत असलेल्या व्यक्तींना अधिक महत्व देणे –

केटरींगच्या व्यवसायात आपल्याला आपल्या सोबत काम करत असलेल्या व्यक्तींना अधिक महत्व द्यावे लागते कारण ह्या व्यवसायात आपल्या सोबत काम करत असलेल्या लोकांना विशेष महत्व आहे.

कारण आज त्यांच्याच सहकार्यामुळे आपण बाजारात आपली स्वताची एक वेगळी ओळख निर्माण केलेली असते.
अणि त्यांनी आपली साथ सोडल्याने ही ओळख नष्ट देखील होऊ शकते.

म्हणुन आपण आपल्या सोबत केटरींगचे काम करत असलेल्या व्यक्तींना अधिक महत्व द्यायला हवे.त्यांच्यावरील मालक बनुन न वावरता आपण त्यांना मित्र बनवून ठेवले पाहिजे.

केटरींगचा व्यवसाय (Catering service) मोठ्या पातळीवर सुरू करण्यासाठी गुंतवणुक करा –

आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायाला जर एका मोठ्या पातळीवर घेऊन जायचे असेल तर यासाठी आपल्याला गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे.

केटरींगचा व्यवसाय मोठ्या पातळीवर सुरू करण्यासाठी सुरूवातीला आपल्याला ५ ते ६ लाखापर्यंत खर्च करावा लागतो.

केटरींगचा व्यवसाय (Catering service) सुरू करण्यासाठी लागणारी किमान गुंतवणूक –

आपण भाड्याने भांडे वगैरे इत्यादी सामग्री घेऊन देखील हा व्यवसाय सुरू केला तर आपल्याला यात किमान ५० हजारापर्यंत गुंतवणुक करावी लागु शकते.कारण यात आपल्याला स्वताचे एक शाॅप घ्यावे लागेल.

केटरींगच्या सर्विस देण्यासाठी एक टीम तयार करावी लागेल.टीम मेंबरला देखील पेमेंट करावे लागेल.

केटरींगच्या व्यवसायातुन किती कमाई होते?

केटरींगच्या व्यवसायातुन आपली किती कमाई होईल हे आपल्याला केटरींगच्या किती आॅडर प्राप्त होतात यावर अवलंबून आहे.

आपल्याकडे सध्या किती कस्टमर आहेत ज्यांच्या आॅडर आपल्याला येता आहेत.किती लोकांकडुन आपल्याला लग्न समारंभ पार्टी इत्यादीची आॅडर आपल्याला मिळत आहे यावर देखील आपली कमाई केटरींगच्या व्यवसायात निर्भर करते.

केटरींगचा व्यवसाय (Catering service) करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टी असणे आवश्यक आहे?

केटरींगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे,

केटरींग टुल्स तसेच केटरींग व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी आवश्यक साधन सामग्री

केटरींगचे काम करण्यासाठी आपल्याकडे योग्य असा स्टाफ देखील असायला हवा.कारण आपल्याकडे प्रोफेशनली ट्रेन प्रशिक्षित असा स्टाफ काम करण्यासाठी असेल तर आपली सर्विस उच्च दर्जाची आहे हे कस्टमरला दिसुन येते.

केटरींगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला लायसन्सची देखील आवश्यकता असते.

केटरींगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला केटरींगच्या कामाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.

केटरींगचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी आपले पब्लिक रिलेशन देखील चांगले असणे आवश्यक आहे.कारण चांगले पब्लिक रिलेशन असेल तेव्हाच आपला केटरींगचा व्यवसाय जोरात चालू शकतो.

केटरींगचा व्यवसाय (Catering service) सुरू केल्यानंतर खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यावी –

कस्टमरने दिलेल्या डेडलाईनच्या आत आपण आॅडर द्यायला हवी कारण कस्टमर हे जास्तीत जास्त लग्न समारंभ महत्वाचा कार्यक्रम समारंभ पार्टी असल्यावरच केटरींगची सर्विस घेत असता म्हणून आपण दिलेल्या डेडलाईनच्या आत आॅडर देणे आवश्यक आहे.

कारण दिलेल्या डेडलाईन नंतर कस्टमरला आॅडर दिल्यास कस्टमर नाराज होईल अणि पुढच्या वेळी आपल्याला केटरींग सर्विस करीता आॅडर देणार नाही.

याचसोबत आपण जेवण बनवताना वापरल्या जात असलेल्या भाज्या,मसाले इत्यादीं सामग्रीकडे अणि जेवणाच्या काॅलिटी कडे देखील विशेष लक्ष द्यायला हवे.

केटरींग सर्विस सुरू करण्यासाठी आपण एखाद्या काॅर्पारेट क्षेत्रात किंवा इंडस्ट्रीअल एरिया मध्ये जागा घ्यायला हवी.कारण अशा ठिकाणी जास्तीत जास्त आॅफिस असतात तिथे २४ तास केटरींग सर्विस देण्याचे काम आपणास मिळत असते.

कारण काही आॅफिस मधील काम करणारे कर्मचारी टिफिन आणत नसतात ज्यामुळे त्यांना केटरींग सर्विस वर अवलंबून राहावे लागते.

अशा ठिकाणी आपण जर आपला केटरींगचा व्यवसाय सुरू केला तर आपल्याला रोज जेवण बनवुन पोहोचवण्याचे काम प्राप्त होईल.याने आपल्याला दरमहा केटरींगच्या व्यवसायातुन कमाई करता येईल.

म्हणुन केटरींगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण काॅर्पारेट क्षेत्रात डेली कस्टमर येतील अशी एखादी जागा बघावी.अणि तिथे आपले केटरींगचे शाॅप टाकुन घ्यायचे.

केटरींगच्या व्यवसायात आपल्याला आपल्या सोबत जेवण बनवण्यासाठी अणि कस्टमर पर्यंत पोहोचवण्यासाठी अणि जेवण बनवण्यासाठी मदत करणारे टीम मेंबर बघावे लागतील.

स्वयंपाक बनवायला आपल्याला काही भांडे विकत घ्यावी लागतील समजा आपले बजेट नसेल तर जेवण बनवण्यासाठी आपण ही भांडी भाड्याने देखील घेऊ शकतो.

यासाठी जेवण बनवण्यासाठी जे लोक भांडे भाडयाने देतात त्यांच्याशी आधीपासून बोलुन घ्यावे लागेल की आवश्यकता भासल्यावर आम्ही जेवण बनवण्यासाठी आपल्याकडुन भाड्याने काही भांडी जेवण बनवण्यासाठी घेऊन जाऊ.

केटरींगचा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण आपल्या केटरींग सर्विस मध्ये कोणकोणत्या वस्तुंची सर्विस कस्टमरला देणार आहे त्याचा मेन्यू आपण तयार करून ठेवायला हवा.

आपले कस्टमर केटरींग सर्विस घेण्यासाठी आपल्याकडे आल्यावर आपण त्याला हा मेन्यू दाखवू शकतो.

केटरींगचा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण जेवढेही काॅर्पारेट क्षेत्र आहे तिथे जाऊन आपल्या केटरींगच्या व्यवसायाची जाहीरात करायला हवी की आम्ही ही केटरींगची सर्विस सुरू केली आहे.आपल्याला आवश्यकता असल्यास आपण आमच्याकडून केटरींग सर्विस घेऊ शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button