BusinessEntrepreneurshipStartup

बेबीसिटरचा व्यवसाय (Babysitting Business) कसा सुरु करायचा ?

आज आपणास सर्व स्त्रिया पुरुष पैसे कमविण्यासाठी बाहेर कंपनीत कामाला जाताना दिसुन येतात पण जेव्हा सर्व पुरूष वर्ग अणि स्त्रिया देखील नोकरीला जात असतात.

तेव्हा त्यांच्यापुढे एकच महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे आपण बाहेर नोकरीला गेल्यावर आपल्या मुलाबाळांची काळजी कोण घेणार?

म्हणजे जेव्हा सर्व घरातील पुरुष तसेच स्त्रिया बाहेर कामाला जात असतात.तेव्हा त्यांना आपल्या पाठीमागे आपल्या लेकरांची काळजी कोण घेणार?त्यांचा व्यवस्थित सांभाळ कोण करणार? ही काळजी सतावत असते.

अशा परिस्थितीत आपल्या गैरहजेरीत देखील आपल्या मुलाबाळांचा व्यवस्थित सांभाळ व्हावा त्यांना कुठल्याही प्रकारची तसदी होऊ नये यासाठी शहरी भागातील नोकरदार पालकवर्ग आपल्या मुलांचा व्यवस्थित सांभाळ करण्यासाठी बेबीसिटर ठेवत असतात.

बेबीसिटर एक अशी प्रोफेशनल व्यक्ती असते जी आपण नोकरीला गेल्यावर दिवसभर आपल्या मुलाबाळांचा व्यवस्थित सांभाळ करते,त्यांना जेऊ घालते,त्यांच्यासोबत खेळते त्यांचा अभ्यास देखील घेते.

बेबीसिटरचा हा व्यवसाय हा शहरी भागात खुप प्रसिद्ध आहे.बेबीसीटर हा आपणास भरपूर कमाई करून देणारा व्यवसाय आहे.

विशेषत महिलांसाठी बेबी सिटींग हा एक अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे.ज्यात फक्त मुलांचा सांभाळ करून महिला महिन्याला चांगली कमाई करू शकतात.

ज्या महिलांना तसेच मुलींना लहान मुलांचा सांभाळ करायला आवडते.त्यांच्यासोबत राहुन त्यांची काळजी घ्यायला आवडते अशा सर्व महिला मुली हा व्यवसाय सुरू करू शकतात.

ज्या शहरी भागातील आईवडिलांना रोज नोकरीला जावे लागत असल्याने दिवसभर आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करता येत नाही.असे आईवडील आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्या सुरक्षेच्या हेतुने बेबीसिटर ठेवतात.

बेबीसिटरचा व्यवसाय (Babysitting Business) म्हणजे काय?

आजच्या ह्या माॅडर्न युगात शहरी भागात प्रत्येक ठिकाणी घर चालवण्यासाठी पती आणि पत्नी हे दोघेही मिळुन कामाला जाताना आपणास दिसून येतात.

अशातच त्या दांपत्याला एखादे मुलबाळ असेल तर नोकरीच्या ठिकाणी ते आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन जाऊ शकत नसतात.अणि नोकरी सोडुन आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी घरीही बसुन राहु शकत नाही.

अशा परिस्थितीत असे नोकरदार दांपत्य आपण नोकरीवर जात असताना दिवसभर आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी बेबीसिटींगचा पर्याय निवडत असतात.

बेबीसिटींगचा व्यवसाय (Babysitting Business) कोण सुरू करू शकते?

बेबीसिटींगचा व्यवसाय अशीच व्यक्ती सुरू करू शकते ज्याला लहान मुलांचा लळा आहे.त्यांच्याप्रती जिच्या मनात जिव्हाळा प्रेम आहे.

ज्या महिलांना,मुलींना लहान मुलांचा सांभाळ करायला अजिबात आवडत नाही,त्यांच्यासोबत खेळायला वेळ व्यतीत करायला आवडत नाही त्यांचा अभ्यास घ्यायला आवडत नाही अशा महिला मुली हा व्यवसाय करू शकत नाही.

कारण कधी कधी लहान मुलांच्या आरडाओरड केल्याने दंगामस्ती केल्याने आपण त्रस्त देखील होऊ शकता अणि रागाच्या भरात लहानमुलांसोबत उद्धटपणे देखील वागु शकतात.

म्हणून ज्यांना लहान मुलांना व्यवस्थित हाताळता येते अशाच व्यक्तींनी हा व्यवसाय करायला हवा.

पण ज्या महिलांना,मुलींना लहान मुलबाळांसोबत वेळ व्यतीत करायला आवडते.त्यांच्यासोबत खेळायला,त्यांची काळजी घ्यायला,सांभाळ करायला आवडते अशा सर्व महिला मुली घरगृहिणी बेबीसिटींगचा व्यवसाय सुरू करू शकतात.

बेबीसिटींगचा व्यवसाय (Babysitting Business) कुठे अणि कसा सुरू करायचा?

जर बेबीसिटींगचा व्यवसाय आपण एखाद्या सर्वसामान्य नाॅरमल शहरात सुरू केला तर आपल्याला पाहिजे तसा नफा प्राप्त होत नाही.

पण याचठिकाणी बेबीसिटींगचा व्यवसाय आपण एखाद्या मोठ्या शहरात एखाद्या चांगल्या परिसरात ठिकाणी सुरू केला तर ह्या व्यवसायातुन आपण भरपुर कमाई करू शकतो.

कारण मोठ्या शहरात आपल्याला ह्या व्यवसायासाठी असे ग्राहक प्राप्त होतील जे आपल्याला त्यांच्या लहान मुल बाळांचा दिवसभर सांभाळ करण्यासाठी चांगली रक्कम देण्यासाठी तयार असतात.

आपण बेबीसिटींगचा व्यवसाय अशा परिसरात सुरू करायला हवा जिथे घर चालवण्यासाठी पुरूष अणि महिला हे दोघेही दिवसभर नोकरी,कामाला जात असतात.

कारण अशा ठिकाणी आपल्याला चांगले पे करणारे जास्तीत जास्त ग्राहक प्राप्त होतील.

काॅर्पारेट क्षेत्रात देखील हा व्यवसाय केल्यास आपल्याला अधिक फायदेशीर ठरते.बेबी सिटींगचा व्यवसाय आपण आपल्या घरातुन देखील सुरू करू शकता.

किंवा एखादी भाड्याची जागा घेऊन तिथे देखील आपण हा व्यवसाय सुरू करू शकता.सुरूवातीला आपण मर्यादित संसाधनांचा वापर करून छोट्या पातळीवर ह्या व्यवसायाला ५० हजारापर्यत सुरुवात करू शकतो.

नंतर जसजसे आपल्याकडे मुलांची संख्या वाढु लागेल तसतसे आपण ह्या व्यवसायाला मोठ्या पातळीवर चार पाच लाखाची गुंतवणूक करून सुरू करू शकता.

बेबी सिटींगचा व्यवसाय (Babysitting Business) सुरू करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या मुलभूत सामग्रीची आवश्यकता असते?

बेबी सिटींग हा व्यवसाय आपल्या घरातुन सुरू केल्यास आपल्याला लहान मुलेबाळे यांच्यासाठी काही बेसिक सामग्रीची आवश्यकता आहे.

लहान बाळांना दिवसभर झोपण्याची सवय असते म्हणून त्यांना झोपण्यासाठी छोटे छोटे कंफर्टेबल असे बेड आणावे लागतील.त्यावर चादर पिलो इत्यादींचा बंदोबस्त देखील आपणास करावा लागेल.

लहान बाळांना मुलांना बसण्यासाठी खेळण्यासाठी झोका तसेच दिवसभर खेळण्यासाठी छोटछोटया खेळणी वगैरे आणाव्या लागतील.

जर आपण सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत लहान मुलांना सांभाळत असाल तर आपणास लहान मुलांना नाश्ता तसेच जेवणाची सुविधा देखील द्यावी लागेल.

लहान मुलांसाठी नाश्ता जेवण तयार करण्यासाठी लागत असलेल्या सामग्रीचा खर्च देखील आपल्याला करावा लागेल.

लहान मुलांना भुक लागल्यावर जेवायला वाढण्यासाठी लहान मुलांच्या छोटछोटया ताटल्या ताट लागतील.ज्यात लहान मुलांना व्यवस्थित जेवण वगैरे करता येईल.

लहान मुलांना वाचण करण्यासाठी पुस्तके लिहिण्यासाठी वहया ड्राॅईग वगैरे करण्यासाठी ड्राॅईंग बुक मनोरंजनासाठी टिव्ही गेम्स इत्यादींचा बंदोबस्त आपणास करावा लागेल.

बेबीसिटींगचा व्यवसाय (Babysitting Business) आपण एकट्याने सुरू करू शकतो का?

बेबीसिटींगचा व्यवसाय आपण एकट्याने सुरू करू शकत नाही.कारण ह्या व्यवसायात मुलांचा सांभाळ करण्यापासून, त्यांच्यासोबत खेळणे,त्यांच्यासाठी जेवायला बनवणे त्यांचा अभ्यास घेणे अशी सर्व प्रकारची वेगवेगळे काम आपल्याला करावे लागते.

म्हणुन बेबीसिटींगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी दोन तीन जणांची टीम असणे आवश्यक आहे.

म्हणजे समजा एक व्यक्ती जेवण बनवत असेल तर दुसरी व्यक्ती लहान मुलांकडे तोपर्यंत लक्ष देईल त्यांच्यासोबत खेळेल त्यांची काळजी घेईन.

बेबीसिटींगच्या व्यवसायात आपल्याला खेळता खेळता लहान मुलांचा अभ्यास देखील घेता यायला हवा.त्यांना खेळता-खेळता लिहायला वाचायला देखील शिकवता आले पाहिजे.

म्हणजे समजा मुले खेळत असतील तर खेळता त्यांना एक दोन (वन टु थ्री) म्हणायला लावणे, त्याच्या कडुन खेळता खेळता पाढे पाठ करून घेणे,त्याला एबीसीडी म्हणायला लावणे

लहान मुलांना आपण एखादी गोष्ट आपण अत्यंत कठोर होऊन कडक शिस्तीने बळजबरीने करण्यास सांगितली तर ते ती करत नसतात.पण तीच गोष्ट जर त्यांना आपण खेळता खेळता करायला लावली तर ते आवडीने करत असतात.

म्हणुन आपल्याला हसत खेळत त्यांच्याकडुन अभ्यास करवून घेता आला पाहिजे.

बेबिसिटींगच्या व्यवसायात आपण मुलांची काळजी घेण्याबाबत हसत खेळत त्यांचा अभ्यास देखील घेतला तर पालकांना देखील वाटते की ह्या ठिकाणी आपल्या मुलाची व्यवस्थित काळजी घेण्यासोबत त्याचा अभ्यास देखील घेतला जात आहे.आपल्या मुलांना ज्ञान प्राप्त होत आहे.

ज्याने जास्तीत जास्त पालक आपल्या मुलांचा सांभाळ करण्याचे काम आपल्याला देतील अणि आपल्या कस्टमर मध्ये देखील वाढ होते.

बेबिसिटींगचा व्यवसाय (Babysitting Business) सुरू करण्यासाठी लागणारे महत्वाचे लायसन्स –

बेबीसिटींगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला एक काऊंसिलिंग लायसन देखील घ्यावे लागेल.

काऊंसिलिंग लायसन घेऊन हा व्यवसाय सुरू केल्यानंतर काही अधिकारी आपल्या व्यवसायाचे निरीक्षण करण्यासाठी येतात.अणि बघतात की लहान मुलबाळांची काळजी घेण्यासाठी आपण योग्य व्यवस्थापन केले आहे किंवा नाही.

निरीक्षण करून झाल्यावर आपण लहान मुलबाळांची काळजी घ्यायला योग्य व्यवस्थापन केले आहे हे सिदध झाले तर आपल्याला हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली जाते.अन्यथा नाही.

बेबी सिटींगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन पद्धतीने आपल्याला लायसन घेता येईल.

समजा आपण बेबी सिटींगचा व्यवसाय आपल्या राहत्या परिसरात सुरू करायचा आहे तर यासाठी आपल्याला लोकल क्षेत्रातील आॅथरीटी कडुन हा व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते.

समजा आपण हा व्यवसाय आपण एखाद्या कंपनीची फ्रेंचाइजी घेऊन सुरू करत असाल तेव्हा देखील आपल्याला कुठल्याही प्रकारच्या लायसन्सची आवश्यकता नसेल.

कारण जेव्हा आपण एखाद्या कंपनीची फ्रेंचाइजी घेतो तेव्हा ते सर्व कायदेशीर कारवाई करून फ्रेंचाइजी देत असतात.

बेबीसिटींगचा व्यवसाय (Babysitting Business) सुरू करण्यासाठी साधारणतः किती गुंतवणुक करावी लागेल?

बेबीसिटींगचा व्यवसाय घरातुन सुरू करण्यासाठी आपल्याला साधारणतः ४० ते ५० हजारापर्यत आपल्याला गुंतवणुक करावी लागु शकते.

यात आपल्याला लहान मुलांसाठी झोपायला लागणारे छोटे छोटे कंफर्टेबल असे बेड आणता येतील,झोपण्यासाठी झोके खेळण्यासाठी खेळणी जेवण करण्यासाठी लहान मुलांच्या थाळया वगैरे आणावे लागतील.

पण समजा आपल्याला बेबीसिटींगचा व्यवसाय एखाद्या सेटंरमधून सुरू करायचा असेल तर आपल्याला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन चार लाखापर्यंत गुंतवणूक करावी लागेल.

बेबी सिटींगच्या व्यवसायातुन (Babysitting Business) आपण किती कमाई करू शकतो?

बेबी सिटींगच्या व्यवसायातुन आपण प्रत्येक जण फिक्स इन्कम प्राप्त करू शकत नाही कारण ह्या व्यवसायातुन वेगवेगळ्या शहरातुन वेगवेगळ्या प्रकारे चार्ज करून कमाई होते.

बेबी सिटींगच्या व्यवसायातुन मुले सांभाळण्यासाठी कोणी दिवसाप्रमाणे तर कोणी महिन्याप्रमाणे देखील चार्ज करत असते.

बेबी सिटींग,बेबी डे केअर व्यवसाय सुरू करण्याचे फायदे –

बेबी सिटींगचा व्यवसाय सुरू केल्यावर आपण लहान मुलबाळांच्या पालकांकडून शाळेप्रमाणे त्यांचा दिवसभर सांभाळ करण्यासाठी,त्यांच्यासोबत खेळण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी,त्यांचा रोज अभ्यास घेण्यासाठी चार्ज घेऊ शकतो.

ह्या व्यवसायात आपल्याला किमान दोन तास जास्तीत जास्त ८ तास सांभाळ करावा लागतो.यात आपण आपल्या मुलांच्या देखभालीतील क्रियाकलाप करीता फी चार्ज करता येते.

समजा आपण चार तासाचे पाच हजार रुपये चार्ज करत असाल तर यात आपल्याला लहान मुलांना सेंटरमध्ये घेऊन जाणे,घरी सोडुन देणे, त्यांचे डायपर बदलणे इत्यादी गोष्टींचा चार्ज आपण घेऊ शकतात.

समजा एखाद्या लहान मुलाचा सांभाळ आपण ८ तास करत असाल तर आपण त्यासाठी दहा हजार रुपये इतका चार्ज घेऊ शकता.यात मुलांना दोन वेळचे जेवण देणे साफसफाई सुविधा देखील आपणास द्यावी लागते.

एखाद्या पालकाने आपल्या मुलाबाळाला आपल्याकडे दोन तासांसाठी ठेवले तर आपण दोन ते तीन हजार रुपये पर्यंत चार्ज करू शकतो.

बेबी सिटींगचा व्यवसाय (Babysitting Business) सुरू करताना लक्षात ठेवायच्या काही महत्वाच्या बाबी –

बेबी सिटींग बेबी केअरचा व्यवसाय सुरू केल्यावर आपण ह्या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी की आपल्या सेंटर मध्ये लहान मुलांची व्यवस्थित काळजी घेतली जावी.

याकरीता आपण दोन तीन महिला देखील आपल्या हाताखाली कामासाठी ठेवू शकतात.

बेबी सिटींगचा व्यवसाय (Babysitting Business) सुरू करण्यासाठी आपल्या अंगी कोणकोणते कौशल्य असणे आवश्यक आहे?

कुठलाही उद्योग व्यवसाय सुरू करायचे म्हटले तर तो उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे कला कौशल्य आपल्याला आत्मसात करावे लागते.

बेबीसिटींग हा एक अत्यंत जबाबदारीचा उद्योग व्यवसाय आहे कारण यात पालक आपल्या लहान बाळाला मुलाला त्याचा व्यवस्थित सांभाळ व्हावा तो सुरक्षित असावा म्हणून आपल्याकडे पाठवत असतात.

हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याअंगी लहान मुलांसोबत कसे वागायचे हे कौशल्य असणे आवश्यक आहे.

१) मुलांच्या विकासाचे उत्तम ज्ञान –

बेबी सिटींग ह्या व्यवसायामध्ये आपल्याला एका विशिष्ट वयोगटातील नव्हे तर वेगवेगळ्या वयोगटातील लहान मुलांचा सांभाळ करावा लागतो.त्यांना हाताळावे लागते.

त्यामुळे ह्या व्यवसायात आपल्याला सर्वप्रथम सर्व वयोगटातील मुलांच्या स्वभावाचा व्यवस्थित अभ्यास करावा लागेल.मग त्यानुसार प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी योग्य अणि आवश्यक ते धोरण तयार करावे लागेल.

जेणेकरून आपण त्या मुलांना सांभाळू देखील शकतो अणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा देखील पुर्ण करू शकतो.

२) लहान मुलांची समजुन काढणे त्यांचे मन रमवण्यासाठी मनोरंजन करणे –

बेबी सिटींग ह्या व्यवसायामध्ये आपल्याला लहानमुलांसोबत दिवसभर वेळ व्यतीत करायचा असतो.

म्हणुन ह्या व्यवसायात यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला लहान मुलांसोबत वेळ व्यतीत करून त्यांचे व्यवस्थित मनोरंजन करता यायला हवे.

त्यांना एखाद्या कामात,अभ्यासात दिवसभर व्यस्त ठेवता आले पाहिजे.यासाठी लहान मुलांचे मनोरंजन करण्याचे अणि त्यांना अभ्यासात व्यस्त ठेवण्याचे कौशल्य तसेच क्षमता आपल्या अंगी असणे आवश्यक आहे.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला लहान मुलांसोबत खेळता आले पाहिजे,त्यांना बोधकथा वाचुन दाखवता आल्या पाहिजेत.त्यांच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करता आले पाहिजे.

३) आजारी मुलांचा सांभाळ करण्याची क्षमता –

बेबीसिटरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला आजारी लहान मुलांची देखील काळजी घेता यायला हवी.कारण लहान मुले ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने आजारी पडत असतात.

अशा परिस्थितीत जेव्हा एखादे लहानमुल आजारी असेल अशा वेळेस जर आपल्याला त्या लहान मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली तर आपल्याला त्याची व्यवस्थित काळजी घेता आली पाहिजे.

म्हणुन आजारपणात लहान मुलांना सांभाळण्याची वेळ आपल्यावर आली तर आजारपणात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी हे देखील आपणास माहीत असायला हवे.

४) लहान मुलांना शिस्त लावणे –

बेबीसिटींगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या अंगी लहान मुलांना शिस्त लावण्याचे कौशल्य असायला हवे.

आपल्याला लहान मुलांचा स्वभाव तसेच भावना समजुन घेता यायला हव्यात.काय योग्य आहे काय अयोग्य आहे या दोघांमधील फरक त्यांना समजावून सांगता आला पाहिजे.असे करण्यात जर आपण यशस्वी ठरलात तर आपल्या व्यवसायाकरीता हे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

कारण आपल्या मुलाला चांगली शिस्त लागते आहे बघुन सर्व पालक आपल्यालाच त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी देणे अधिक पसंद करतील याने आपल्या कमाई मध्ये ग्राहक संख्येत देखील चांगली वाढ होण्यास मदत होईल.

५) कुठल्याही घटना प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी –

बेबी सिटींगच्या व्यवसायामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या मुलांचा सांभाळ करावा लागतो त्यात काही मुले हट्टी, आपापसात भांडण करणारी भांडकुदळ अणि जेवण न करणारी अशा विविध स्वभावाची असतात.

अशा सर्व प्रकारच्या लहान मुलांसोबत आपल्याला व्यवस्थित डील करता यायला हवे.काही वेळा मुलामुलांमध्ये भांडण होत असते.मुले काहीही ऐकून घेत नाही,जेवण करत नाही,अशा सर्व प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी आपली असायला हवी.

६) संयम,कुठल्याही समस्या सोडविण्याची कला –

बेबीसिटींगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या अंगी भरपुर संयम अणि कुठलीही समस्या सोडविण्याचे कौशल्य असायला हवे.

कारण बेबीसिटींगच्या व्यवसायात आपल्याला कधी कधी लहान मुले खूप जास्त त्रास देत असतात ज्यामुळे कधीकधी आपण अक्षरश कंटाळून जात असतो.

अणि मुलांना मारझोड करणे रागावणे असे एखादे चुकीचे कठोर पाऊल उचलत असतो.असे होऊ नये म्हणून आपल्या अंगी भरपुर संयम असणे आवश्यक आहे.

याचसोबत कुठल्याही समस्येचे निवारण करण्याचे कौशल्य देखील आपल्यात असायला हवे.सर्व परिस्थितींना तोंड देण्याची तयारी आपल्यात असायला हवी.

७) बालप्रेरणा अणि नेतृत्व क्षमता गुण –

प्रत्येक वयोगटातील मुलांना प्रेरित करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या धोरणांचा अवलंब करावा लागेल.त्यांनी हे काम का करायला हवे हे आपण त्यांना व्यवस्थित समजावून सांगायला हवे.तेव्हाच लहान मुले आपल्या मताशी सहमत होत असतात.

आपल्याला लहान मुलांमध्ये कुठल्याही गोष्टींबद्दल आत्मविश्वास निर्माण करता आला पाहिजे.वेगवेगळया उदाहरणादवारे व्यवस्थित समजावून सांगता आले पाहिजे.जेणेकरून ते आपला मुद्दा समजून घेतील अणि स्वीकारतीलही.

बेबी सिटींग ह्या व्यवसायाची मार्केटिंग कशी करायची?

आपण जर नवीनच बेबी सिटींगचा व्यवसाय सुरू केला असेल तर आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करणे खुप आवश्यक आहे कारण मार्केटिंग केल्याने आपल्या उद्योग व्यवसायात वाढ होईल.आपल्या कस्टमर मध्ये वाढ होईल.

१) माऊथ पब्लिसिटी –

आपल्या बेबी सिटींगच्या व्यवसायाची मार्केटिंग करण्याचा माऊथ पब्लिसिटी हा एक उत्तम मार्ग,पर्याय आहे.यात आपल्याला आपल्या परिचयातील लोकांना भेटुन आपण असा अमूक असा नवीन उद्योग व्यवसाय सुरू केला आहे असे सांगावे लागेल.

त्या विषयी लोकांना माहिती द्यावी लागेल.मग आपल्या परिचयातील व्यक्ती त्यांच्या परिचयातील इतर व्यक्तींना आपल्या व्यवसायाची माहिती देतील असे करत करत आपल्या व्यवसायाची मार्केटिंग होईल.

अशा पद्धतीने एक रूपया देखील न खर्च करता आपण फक्त माउथ पब्लिसिटी करून देखील आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकतो.आपल्या उद्योग व्यवसायाचा प्रचार प्रसार करू शकतो.

२) वर्तमानपत्रात तसेच टीव्हीवर जाहीरात देणे –

आपल्या उद्योग व्यवसायाचा प्रचार प्रसार करण्याचा दुसरा उत्तम मार्ग म्हणजे वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर जाहीरात देणे हा आहे.

आपल्या नवीन उद्योग व्यवसायाविषयी जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहीती पोहोचावी म्हणून आपण पेपरमध्ये टिव्हीवर त्याची जाहीरात देऊ शकतो.

३) जुन्या ग्राहकांच्या माध्यमातुन नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचणे –

जर आपल्याला आपल्या जुन्या ग्राहकांच्या माध्यमातुन नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचायचे असेल तर आपल्याला चांगले कस्टमर रिलेशनशिप ठेवणे आवश्यक आहे.

याने आपले जुने कस्टमर हेच आपल्या उद्योग व्यवसायाचा मार्केट मध्ये प्रचार प्रसार करतील.

४) आपल्या व्यवसायाची अधिकृत वेबसाईट तयार करणे –

जेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीची माहिती हवी असते तेव्हा आपण त्याची माहिती सर्वप्रथम इंटरनेटवर आॅनलाईन पदधतीने सर्च करत असतो.

म्हणून आपल्या व्यवसायाची मार्केटिंग प्रमोशन करण्यासाठी आपण आपल्या व्यवसायाची एक आॅफिशिअल वेबसाईट तयार करून घ्यायला हवी.याने देखील आपल्या कस्टमरच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल.

५) आॅनलाईन जाहीरात तसेच सोशल मिडिया वर प्रमोशन –

आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी आपण फेसबुक टेलिग्राम व्हाटस अप इंस्टाग्राम इत्यादी सारख्या सामाजिक प्रसार माध्यमांचा वापर करू शकतो.

आपल्या वेगवेगळ्या सोशल मिडिया अकाऊंट वरून आपण आपल्या व्यवसायाचा प्रचार प्रसार करू शकतो.

याचसोबत आपल्या उद्योग व्यवसायांची मार्केटिंग करण्यासाठी आपण आॅनलाईन जाहीरात देखील देऊ शकतो.

6) बेबी सिटींगच्या व्यवसायामध्ये (Babysitting Business) असलेल्या जोखिम –

बेबी सिटींगच्या व्यवसायामध्ये आपल्याला लहान मुला बाळांची काळजी घ्यावी लागते.म्हणून‌ आपल्या घरात तसेच बेबी केअर सेंटर मध्ये लहान मुलांना इजा होईल अशी कुठलीही वस्तू ठेवू नये.

घरात वर जाण्यासाठी शिडया जिन्याच्या पायरया वगैरे असतील तर आपल्याला अशा ठिकाणी लहानमुलांची विशेष काळजी घ्यावी लागेल.कारण अशा ठिकाणी लहान मुले जिन्यावर चढताना पाय सटकुन पडण्याची अणि त्यांना दुखापत होण्याची अधिक भीती असते.

जर लहान मुलांना घरी घ्यायला जाण्याची अणि त्यांना सुखरूप घरी सोडण्याची जबाबदारी देखील आपली असेल तर आपण मुलांना घेऊन येताना घरी सोडताना अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी.

बेबी सिटींगच्या व्यवसायामध्ये जर आपण मुलांसाठी जेवण बनवण्याची त्यांना जेऊ घालण्याची देखील जबाबदारी घेत असाल तर आपण लहान मुलांना जेवणाला वाढताना विशेष काळजी घ्यावी.

एखाद्या लहान मुलाला एखाद्या वस्तुची अन्नपदार्थाची अॅलर्जी असेल तर त्याला तो अन्नपदार्थ देणे टाळायला हवे.

याचसोबत आपल्याला आपल्या बेबी केअर सेंटर मध्ये स्वच्छतेचे पालन करायला हवे.असे न केल्यास आपले लायसन रद्द होऊ शकते.

बेबी सिटींग (Babysitting Business) ह्या व्यवसायाचे महत्व तसेच आवश्यकता –

आज शहरी भागात प्रत्येक घरात आईवडील दोघेही कामाला जात असतात.अशावेळी त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मुलांची काळजी कोण घेईल हा एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होत असतो.

प्रत्येक आईवडिलांना वाटते की आपण दिवसभर बाहेर नोकरीला कामाला गेल्यावर आपल्या अनुपस्थितीत देखील आपल्या लहान मुलांना चांगले सुरक्षित अणि घरगुती शिस्तप्रिय वातावरण प्राप्त व्हावे.त्यांचा कोणीतरी हसत खेळत का होईना व्यवस्थित अभ्यास घ्यावा.त्यांची मनापासून काळजी घ्यावी.

याचकरीता शहरी भागातील आईवडील आपल्या मुलाबाळांचा व्यवस्थित सांभाळ करण्यासाठी त्यांच्या सुरक्षेच्या मुख्य हेतुने बेबीसिटींगचा पर्याय निवडत असतात.

Subscribe करा आपल्या YouTube channel ला : YouTube

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button