कार देखो(Car Dekho) स्टार्टअप यशोगाथा
कार देखो ह्या कंपनीचे संस्थापक अमित जैन आहेत.आज भलेही कार देखो ही करोडोंची कंपनी आहे.
पण एकवेळ अशी होती की अमित जैन यांच्या ह्या करोडोंच्या कंपनीकडे कार देखोकडे आपल्या ५० कर्मचारींना वेतन देण्यासाठी देखील पुरेसे पैसे उपलब्ध नव्हते.
कार देखो कंपनीचे मालक अमित जैन यांचा जन्म १९७७ मध्ये जयपूर येथे झाला होता.त्यांचे वडील मणी तसेच रत्न विकण्याचा व्यवसाय करायचे.
अमित जैन यांचे सर्व कुटुंब व्यवसाय क्षेत्रातील होते पण त्यांच्या वडिलांचा ज्योतिष शास्त्रावर देखील अधिक विश्वास होता.अमित जैन यांच्या वडिलांचा ज्योतिषी हा देखील व्यवसाय होता.
अमित जैन यांच्या वडिलांमुळे घरात सर्व कुटुंबियांकडुन ज्योतिष शास्त्रावर विश्वास केला जात असे.पण अमित जैन अणि त्यांचे बंधू यांचा ज्योतिष शास्त्रावर अजिबात विश्वास नव्हता.अमित जैन अणि त्यांचे बंधू यांना ज्योतिष शास्त्राचा पुर्ण व्यवसायच फसवेगिरीचा वाटत असे.
अमित जैन यांनी जयपूर मधील सेंट जेव्हीअर स्कुल मध्ये आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्यानंतर ते दिल्ली येथे गेले.
१९९९ मध्ये अमित जैन यांनी आय आयटी दिल्ली मधुन त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले.पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी टीसीएस कंपनीमध्ये साॅफ्टवेअर इंजिनीअरच्या पदावर काम केले.
यानंतर वर्ष २००० मध्ये अमित जैन टेक्सास येथे गेले.तिथे आॅस्टिन येथे ट्रायोलाॅजी नावाच्या एका कंपनीत त्यांनी सिनिअर असोसिएटचे काम केले.
पुढे प्रगती करत २००४ मध्ये ते डिलिव्हरी मॅनेजर अणि २००५ मध्ये प्रोडक्ट मॅनेजर बनले.पण २००६ मध्ये त्यांच्या वडिलांना कर्करोग झाल्याची बातमी कानावर ऐकू आल्याने त्यांना भारतात परत यावे लागले.
कर्करोगात अमित जैन यांचे वडील दगावले त्यांच्या वडिलानंतर त्यांच्या सर्व कुटुबांची जबाबदारी अमित जैन यांच्यावर येऊन ठेपली.
जयपूरला परत आल्यावर अमित जैन यांनी तिथे एक आयटी आऊट सोर्सिग कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
मग त्यांनी अणि त्यांच्या भावाने अनुराग जैन यांनी मिळुन २००७ मध्ये गिरणार साॅफ्ट नावाची एक आयटी सर्विस कंपनी सुरू केली.
अमित जैन यांच्या प्रमाणेच त्यांचे बंधू अनुराग जैन यांचे शिक्षण सेंट जेव्हीअर स्कुल मध्ये झाले होते.तसेच त्यांनी देखील आय आयटी दिल्ली मधुन पदवी प्राप्त केली होती.
प्रारंभी दोघे भावांनी आपल्या ह्या कंपनीची सुरूवात एका छोट्याशा गॅरेज मधुन केली होती.सुरूवातीला त्यांनी २० जणांची टीम देखील तयार केली.
पूढे ही कंपनी जोरात चालू लागली अणि गॅरेज मधुन शिफ्ट होऊन एका आॅफिस मध्ये शिफ्ट झाली.कंपनी व्यवस्थित चालत होती.
वर्ष २००९ मध्ये अमित जैन,अनुराग जैन दोघे भावांचे पैसे एक करोडच्या स्टाॅक मध्ये बुडाले.यात कंपनीला इतका मोठा तोटा झाला होता की त्यांच्याकडे आपल्या कंपनी मध्ये काम करत असलेल्या कर्मचारींना वेतन देण्यासाठी देखील पुरेसे पैसे उपलब्ध नव्हते.
पण एवढ्या मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागुनही दोघे भावांनी हार पत्कारली नाही.याच दरम्यान अमित जैन दिल्ली मधील आॅटो एक्स पो येथे गेले होते.जिथे लोक कारची खरेदी विक्री करत होते.
ज्यात देखील त्यांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत होते.तेव्हा अमित जैन यांच्या डोक्यात विचार आला की आपण एक अशी वेबसाईट बनवु शकतो जिथे लोक सहजरीत्या कारची खरेदी विक्री करू शकतील.
आपल्या ह्या आॅनलाईन वेबसाईट बनविण्याच्या व्यवसाय कल्पणेवर त्यांनी लगेच काम देखील केले.कारण त्यांना आपल्या नुकसानात असलेल्या कंपनीमधील कर्मचारी वर्गाला वेतन देखील द्यायचे होते.
फक्त दोन आठवड्यात अमित जैन, अनुराग जैन ह्या दोघे भावांनी मिळुन कार देखो नावाची एक आॅनलाईन वेबसाईट लाॅच केली.
आत्ताचा काळ हा इंटरनेट बिझनेसचा असल्याने अणि भारतात स्टार्ट अप इको सिस्टम बनायला सुरूवात झाली होती.
अशा काळात आॅटो मोबाईल सारख्या प्रतिस्पर्धी बाजारात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना बाजारातील प्रतिस्पर्धींपेक्षा काहीतरी युनिक करणे आवश्यक होते.
म्हणुन अमित जैन यांनी आपल्या उद्योजक बुदधीला कामाला लावले अणि बाजारात वेगळे करायचे याचा विचार करायला सुरुवात केली.
अमित जैन यांना आठवले की जेव्हा ते लहान होते तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या वडिलांनी सफेद रंग असलेली वापरलेली अॅम्बेसेडर कार खरेदी केली होती.
अमित जैन यांना माहीत होते की सर्वसामान्य व्यक्तीसाठी कार खरेदी करणे किती महत्वाची बाब आहे.हया क्षेत्राविषयी त्यांनी जवळून माहीती प्राप्त केली.
तेव्हा त्यांना लक्षात आले की वापरलेल्या कारची खरेदी विक्री करण्यासाठी सर्वात जास्त आवश्यक असतो विश्वास कारण कुठलीही कार खरेदी करण्याआधी लोक दहावेळा विचार करत असतात तेव्हा तिची खरेदी करत असतात.
अमित जैन यांना माहीत होते ग्राहकांना कार खरेदी विक्री मध्ये चांगला अनुभव प्राप्त झाला तेव्हाच ते आपल्या परिचयातील इतर व्यक्तींना याविषयी सांगतील.
त्यामुळे अमित जैन यांनी ग्राहकांना उत्तम सर्विस देऊन बाजारात विश्वास संपादन करायला सुरुवात केली.ज्यामुळे पुढे अमित जैन यांचा व्यवसाय जोरात चालू लागला.
आता ह्या कंपनीकडून लोक कार मालकाकडून कारची खरेदी करतात अणि कार डिलर्सला विकत असतात.समजा एखादा डिलर कार देखो प्लॅटफॉर्मवरून त्याची कार ग्राहकांना विकतो.त्यावर देखील कार देखो कंपनीला चांगले कमिशन प्राप्त होते.
सर्व ग्राहक कार देखो कंपनीवर विश्वास ठेवून कुठलीही कार खरेदी करतात त्यामुळे कार देखो ग्राहकांना इन्शुरन्स देखील विकण्याचे काम करते.यातुन देखील कंपनीला चांगली कमाई प्राप्त होते.
याचसोबत जाहीरात, डिजीटल मार्केटिंग तसेच साॅफ्टवेअर डेव्हलपमेंट दवारे देखील कंपनीची भरघोस कमाई होते.
सुप्रसिद्ध बाॅलीवूड अभिनेता अक्षय कुमार हे कार देखो कंपनीचे अॅम्बेसेडर आहेत.कार देखो कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर सध्या 11.6 लाख सबस्क्राईबर आहेत.
कार देखो कंपनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर आॅटो मोबाईल जगताशी संबंधित माहीती देण्याचे काम करते.
उदा,कारची वैशिष्ट्ये,कारचे वर्गीकरण,कार विषयी रिव्ह्ययुव्ह, नुकत्याच लाॅच झालेल्या कार, कारच्या किंमती त्यांच्यातील तुलना,नवीन अपडेट इत्यादी विषयांवर त्यांच्या युट्यूब चॅनलवर माहीती दिली होती.
अमित जैन यांनी कार देखो कंपनी सुरू केली तेव्हा त्यांना बाजारातुन चांगला प्रतिसाद देखील प्राप्त झाला.कंपनीला पुढे नेण्यासाठी अमित जैन यांनी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीचा वापर केला.
अमित जैन यांनी कार देखो कंपनीचा विस्तार कसा केला?
एका अभ्यासातून समोर आले आहे की ७५ टक्के खरेदीकर्ते कार खरेदी करण्याच्या आधी पहिले संशोधन करतात.ज्यासाठी ६६ टक्के लोक आपल्या मोबाईलचा वापर करत असतात.
कुठलीही व्यक्ती कार खरेदी करण्याआधी त्या कार विषयी रिसर्च करतो मग रिसर्च करून झाल्यावर आपल्या आवडीची कार तो खरेदी करत असतो.
हा कंटेट इंटरनेट द्वारे कस्टमर पर्यंत पोहोचवण्यासाठी अमित भरपूर ट्रॅफिक त्यांच्या वेबसाइटवर प्राप्त करू शकत होते.
पण याने त्यांचा customer acquisition cost सीएससी अधिक वाढला असता.अमित जैन यांना माहीत होते की फक्त जाहीरात अणि मार्केटिंग करून त्यांना दीर्घकाळासाठी कस्टमर एंगेजमेंट प्राप्त होणार नाही.
म्हणुन त्यांनी त्यांच्या कंपनीच्या कंटेटला आॅरगॅनिक पद्धतीने मार्केट केले.यामुळे अधिकतम लोक ह्या कंपनीशी जोडले जाऊ लागले.
२००९ पासुन २०१३ पर्यंत कार देखो कंपनीने बाजारात बाजारात टिकेल असे बिझनेस मॉडेल वापरले.हया कालावधीत बाजारातुन निधी प्राप्त करणे सोपे नव्हते.
पण आपल्या ह्या बिझनेस मॉडेलमुळे कंपनीला बाजारात टिकुन राहता आले.२०१३ मध्ये कार देखो कंपनीने भारतातील टाॅप बीसी फर्म सिक्वा कॅपिटल कडुन पहिल्यांदा फंडिंग प्राप्त केली.
आपल्या बाजारातील प्रगती मधुन जो पैसा येत होता तो अमित जैन यांनी वेळोवेळी व्यवसायात गुंतवला.ज्यामुळे त्यांना बाजारातुन फंडिंग प्राप्त होत नव्हती तेव्हा देखील तग धरून टिकुन राहता आले.
बाजारातील आपल्या टार्गेट कस्टमरला प्राप्त करण्यासाठी त्यांच्याकडे एकच साधन होते ते इनोव्हेशन.
आॅनलाईन बुकिंग, क्लाउड सोल्युशन, लाईव्ह चॅट सारख्या अनेक डिजीटल सोल्युशन द्वारे त्यांनी सातत्याने इनोव्हेशन केले.ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला नफा प्राप्त करण्यासाठी सात वर्षे इतका कालावधी लागला.
पुढे कालांतराने त्यांची कंपनी युनिकाॅन स्टार्ट अप बनली.आज ह्या कार देखोची १.२ बिलियन डॉलर्स इतक्या किंमतीची कंपनी आहे.
कार देखो कंपनीची गणना भारतातील टाॅप १० डिजीटल डिजीटल आॅटोमोटिव्ह सोल्युशन पुरवित असलेल्या कंपनींच्या यादीत केली जाते.
आज हे कंपनी भारतातच नव्हे तर इंडोनेशिया, मलेशिया फिलिपाईन्स मध्ये देखील उपलब्ध आहे.आज ही कंपनी बाईक देखो, काॅलेज देखो, इन्शुरन्स देखो,प्राईज देखो, इत्यादी सारख्या अनेक कंपन्या देखील चालवत आहेत.