स्विगी (Swiggy) ह्या स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा
आजच्या काळात आपला भारत देश खुप वेगाने डिजीटल होत चालला आहे.ज्यामुळे येथील लोकांच्या सवयी देखील पुर्णतः बदलत आहेत.
एकेकाळी आपल्याला कुठलेही सामान खरेदी करण्यासाठी मैलोनमैल पायी चालत बाजारात जावे लागत असे.
पण आज देश पुर्णतः डिजीटल झाल्यामुळे आपण तेच सामान आॅनलाईन घरबसल्या मोबाईल अॅपवर आॅडर करून मागवू शकतो.
आज कित्येक तरूण तरूणी तसेच वृद्ध व्यक्ती देखील हाॅटेलात जेवण करण्यासाठी न जाता घरबसल्या झोमॅटो स्वीगी सारख्या अॅप्सवरून आॅनलाईन पद्धतीने कुठलेही खाद्यपदार्थ मागवत असतात.
आज ग्राहक वेगवेगळ्या रेस्टाॅरंट किंवा हाॅटेल मधुन घरबसल्या आपल्या आवडीचे अन्नपदार्थ खाण्यासाठी मागवू शकतात.
आजच्या लेखामध्ये आपण आॅनलाईन फुड डिलीव्हर करत असलेल्या भारतातील लोकप्रिय फुड टेक कंपनी स्वीगी कंपनीच्या यशोगाथे विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
वारंवार अपयश प्राप्त झाल्यानंतर देखील कशी उभी केली देशातील सर्वात मोठी फुड डिलीव्हरी कंपनी?
स्वीगी कंपनीची सुरूवात राहुल जामिनी,श्री हर्ष मडेटी अणि नंदन रेडडी ह्या तिघांनी मिळून केली होती.
श्री हर्ष अणि नंदन हया दोघांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स ह्या एकाच महाविद्यालयात आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पुर्ण करत असताना ह्या दोघांच्या मनात आपला स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा विचार सुरूच असायचा.
आपले पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्री हर्ष यांनी लंडन मधील एका बॅकेत नोकरी देखील केली.पण त्या कामात जास्त रूची नसल्याने काही काळाने त्यांनी ती नोकरी सोडून दिली.
मग आपले वर्गमित्र सहकारी नंदन रेडडी यांच्यासोबत ते व्यवसायाच्या वेगवेगळ्या कल्पणांविषयी देखील चर्चा केली.
मग खुप संशोधन करून झाल्यावर दोघांनी मिळून लाॅजिस्टिक उपायासाठी एक व्यवसाय सुरू केला.हयाचे नाव बंडल असे होते.
वर्षभर ह्या प्रकल्पावर काम करताना त्यांना आपल्या ह्या स्टार्ट अप व्यवसायाच्या संकल्पनेत अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागले.अणि पुढे त्यांना अपयश देखील प्राप्त झाले.
यानंतर २०१४ मध्ये त्यांना ही कंपनी बंद करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला.कंपनी बंद करायची म्हटल्यावर नंदन रेडडी अणि श्री हर्ष दोघे खूप निराश झाले.
पण त्यांनी हार न मानता ह्याच संकल्पनेशी निगडीत दुसरा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.आपल्या जुन्या चुकांपासुन शिकवण घेत दोघांनी खूप रिसर्च करून फुड सेक्टर मध्ये प्रवेश घेण्याचे ठरवले.
मग आॅगस्ट २०१४ मध्ये स्वीगीचा पाया रचण्यात आला.पण इथे कोडिंग संबंधित महत्वाचे कामकाज करण्यासाठी श्री हर्ष अणि नंदन रेडडी ह्या दोघांना एका अशा व्यक्तीची आवश्यकता भासु लागली.ज्याला कोडिंगचे चांगले ज्ञान आहे.
म्हणून त्यांनी राहुल जामिनी यांना देखील आपल्या टीममध्ये समाविष्ट करून घेतले.राहूल यांनी देखील आय आयटी खरगपुर मधुन आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते.
स्वीगी कंपनीची सुरूवात बंगलौर येथे असलेल्या कोरबंगला नावाच्या जागी करण्यात आली होती.जिथे त्यांच्याकडे सुरूवातीला फक्त सहा डिलीव्हरी बाॅय उपलब्ध होते.
तसेच त्यांच्या पोर्टलवर देखील फक्त २५ रेस्टाॅरंटला समाविष्ट करण्यात आले होते.पण २०१५ पर्यंत स्वीगीच्या संकल्पनेला गुंतवणूक दारांनी चांगली पसंती दर्शविली.
अणि स्वीगीला दोन मिलियन डॉलर इतकी फंडिग प्राप्त झाली.अणि पुढे जाऊन स्वीगी सोबत अजुन पाच हजार रेस्टॉरंट जोडले गेले.ही संख्या २०१९ मध्ये ४० हजाराच्या वर पोहचली.
बंगलौर शहरातील छोट्याशा क्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या ह्या व्यवसायाने आज आपल्या भारतातील प्रत्येक ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
स्वीगी कंपनीला टक्कर देण्यासाठी आजपर्यंत अनेक कंपन्या बाजारात उभ्या राहिल्या आहेत पण तरी देखील स्वीगीला जे काही यश प्राप्त झाले ते इतर कंपनींना प्राप्त करता आले नाही.
असे सांगितले जाते की स्वीगीला मिळालेल्या ह्या भरघोस यशाचे कारण आहे स्वीगी कंपनीला याआधी वारंवार मिळालेले अपयश.कारण ह्या अपयशातुनच त्यांना आपल्या उद्योग व्यवसायात काय करायचे?काय नाही करायचे हे समजले होते.
आज स्वीगी कंपनीमुळे देशातील कित्येक बेरोजगार तरूणांना रोजगार प्राप्त झाला आहे.