पाॅलिसी बाजार स्टार्टअपची यशोगाथा
आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण त्रस्त आहे कोणी स्वतासाठी त्रस्त आहे तर कोणी आपल्या कुटुंबासाठी आणि आजच्या ह्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात कधी काय होईल हे आपणास सांगताहि येत नाही म्हणून ह्या अनिश्चितता असलेल्या जीवनात आपण हेल्थ,लाईफ,कार इत्यादी महत्वाचे इन्शुरन्स काढणे खुप आवश्यक आहे.
आज बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या आपल्याला इन्शुरन्स सुविधा उपलब्ध करून देतात पण इन्शुरन्सचे महत्व जाणुन घेतल्यानंतर देखील लोक इन्शुरन्स काढणे टाळत असतात.
याला कारण आहे लोकांच्या डोक्यामध्ये इन्शुरन्स विषयी असलेला गोंधळ, इन्शुरन्स विषयी असलेले अपुरे ज्ञान,अणि मिस सेलिंग.
बाजारातील ह्या मोठ्या समस्येचा अनुभव तीन आयआयटीयन यांना आला, यानंतर त्यांच्या डोक्यात आलेल्या एका छोट्याशा कल्पणेने पाॅलिसी बाजार सारखे यशस्वी युनिकाॅन स्टार्ट अप बाजारात उभे केले.
ही आयडिया होती लोकांना असा एक पारदर्शक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा जिथे ते वेगवेगळ्या कंपन्यांच्या इन्शुरन्स प्लॅन चेक करू शकतील,सर्व कंपनींच्या इन्शुरन्स प्लॅन मध्ये तुलना करू शकतील अणि आपल्या गरजेनुसार योग्य तो इन्शुरन्स प्लॅन खरेदी करू शकतील.
आज इन्शुरन्स काढण्याचे ठरविल्यावर सगळ्यात पहिले आपल्या समोर पाॅलिसी बाजार ह्या इन्शुरन्स कंपनीचे नाव येते.
पाॅलिसी बाजार ही स्टार्ट अप इन्शुरन्स कंपनी यशिश दय्या,आलोक बंसल,अवनीश निरजार ह्या तीन मित्रांनी मिळून सुरू केली होती. पाॅलिसी बाजार कंपनी सुरू करण्याची आधी हे तिघेही एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर चांगले भरघोस वेतन असलेली नोकरी करत होते पण एकेदिवशी यशिश दय्या यांच्या वडिलांसोबत एका विमा कंपनीने इन्शुरन्सच्या नावाखाली एक मोठा फ्राॅड केला. तेव्हाच यशीश दय्या यांच्या डोक्यात ही कल्पणा आली की आपण बाजारात लोकांची फसवणूक न करता प्रामाणिक पद्धतीने आपले काम करणारी विमा कंपनी सुरू करायला हवी.
पण हे यशीश दय्या यांच्यासाठी सोप्पे नव्हते कारण त्यांनी जेव्हा ही कंपनी सुरू केली तेव्हा त्यांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागले होते.
जेव्हा ही कंपनी सुरू करण्यात आली तेव्हा कंपनीत फक्त १४ कर्मचारी कामाला होते.पण आज ह्या कंपनीत ६ हजारपेक्षा अधिक कर्मचारी कामाला आहेत.
पाॅलिसी बाजार आपल्या मार्केटिंगवर खुप अधिक पैसे खर्च करते.अक्षय कुमार,कपिल शर्मा सारखे मोठमोठे सेलिब्रिटी पाॅलिसी बाजारचे ब्रॅड अॅम्बेसेडर आहेत.
आजच्या लेखामध्ये आपण पाॅलिसी बाजार कंपनीचा सुरूवातीपासून यशस्वी होईपर्यंतचा प्रवास जाणुन घेणार आहोत.
पाॅलिसी बाजारचा आतापर्यंतचा प्रवास ( Policy bazaar success journey in Marathi)
पाॅलिसी बाजारची कहाणी २००८ मध्ये सुरू झाली होती अणि याचे सुरू होण्यामागील कारण देखील खुप रोचक आहे.
तेव्हा इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे आजसारखे सुलभ सोपे नव्हते अणि तेव्हा खुप मर्यादित लोकांपर्यंत मोबाईल इंटरनेटची सुविधा पोहोचत असे म्हणून तेव्हा सर्व इन्शुरन्स कंपन्या आपली पाॅलिसी एजंट द्वारे विक्री करत असत.
पण काही पाॅलिसी एजंट कस्टमरला त्यांच्या गरजेनुसार आवश्यक ती पाॅलिसी न विकता ज्यात आपला फायदा अधिक आहे ती पाॅलिसी विकत होते. याचसोबत पाॅलिसी एजंट पाॅलिसी खरेदी करत असलेल्या कस्टमरला पाॅलिसीची योग्य माहिती देखील देत नव्हते अणि एखाद्या कस्टमरने सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला पाॅलिसी मधील अवघड शब्द सांगुन अजुन गोंधळात टाकत होते. ह्याच सर्व धोकेबाजींमुळे अधिकतम लोक इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे टाळत होते.अणि खरेदी केली तरी ७० ते ७५ टक्के लोक पाॅलिसी परिपक्व होण्याच्या आधी सरेंडर करून देत होते.
याचदरम्यान पाॅलिसी बाजारचे संस्थापक याशीश दय्या यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडुन आला ज्यामुळे त्यांना पाॅलिसी बाजार ही स्टार्ट अप कंपनी सुरू करण्याची प्रेरणा प्राप्त झाली.
यशीश दय्या यांचे वडील भारतीय सैन्यात कर्नल होते. यशीश दय्या यांच्या वडिलांनी २० लाख रुपये इतकी रक्कम वेगवेगळ्या इन्शुरन्स पाॅलिसी मध्ये गुंतवली होती. पण २००८ मधील मंदीच्या काळात जेव्हा मार्केट कोसळले तेव्हा यशीश दय्या यांच्या वडिलांचे ७० टक्के रक्कम ह्या क्रॅश दरम्यान बुडाली.
हे ऐकुन यशीश दय्या यांच्या वडिलांना धक्काच बसला कारण त्यांना ह्या गोष्टीची माहिती नव्हती की त्यांनी इन्शुरन्स मध्ये गुंतवलेले पैसे शेअर मार्केट मध्ये गुंतवण्यात आले आहेत.
यानंतर यशीश दय्या विचार करू लागले की भारतात त्यांच्या वडिलांव्यतीरीक्त देखील असे किती लोक असतील ज्यांना इन्शुरन्स एजंट कडुन असे फसविण्यात येत असेल अणि शक्यता हेच कारण आहे की लोक इन्शुरन्स खरेदी करायला घाबरत आहेत अणि इन्शुरन्स एजंटच्या फ्राॅडमुळे जे लोक इन्शुरन्स काढायला घाबरत आहेत. असे व्यक्ती लोन तसेच क्रेडिट कार्ड घेण्याचा कधी विचार देखील करणार नाही.
याने लोकांचे नुकसान तर होईलच सोबत देशाच्या आर्थिक विकासावर देखील याचा मोठा परिणाम होईल.हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. याचनंतर यशीश दय्या यांनी निर्णय घेतला की ते भारतातील सर्वसामान्य जनतेला आर्थिक निर्णय घेणे सोपे करतील.
दय्या यांनी देशातील सर्वसामान्य जनतेला आर्थिक निर्णय घेणे सहज सुलभ करायचे हा निर्णय तर घेतला पण पुढे ते विचार करू लागले की ते त्यांचे हे घेतलेले प्रण कसे पुर्ण करतील.
तसे पाहायला गेले तर त्यांच्यामध्ये हे प्रण पुर्ण करण्यासाठी भरपूर टॅलेंट देखील होते.त्यांनी आय आयटी दिल्ली मधुन बीटेक,आय आय एम अहमदाबाद मधुन डिप्लोमा इन मॅनेजमेंटचे अणि एमबीएचे शिक्षण केले होते.
ज्यानंतर त्यांना १९९६ पासुन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव होता.
प्रत्येक वेळी यशीश दय्या यांच्या मनात एकच विचार सुरू होता की पाॅलिसी क्षेत्रात ते कशा पद्धतीने प्रवेश करू शकतात.यासाठी ते काय काय करू शकतात.
अणि जेव्हा ते एकेदिवशी भाजी मार्केट मध्ये फिरायला जातात तेव्हा तिथे त्यांच्या डोक्यात पाॅलिसी बाजार ह्या स्टार्ट अप व्यवसायाची कल्पणा आली.
तिथे यशीश दय्या बघतात की लोक बाजारात कुठलाही भाजीपाला खरेदी करण्याआधी आधी त्या भाजी पाल्याचा गुणवत्ता दर्जा अणि वजन तपासत होते.अणि मग ठरवत होते की त्यांना काय खरेदी करायचे आहे.
हे सर्व बघुन यशीश दय्या यांच्या डोक्यात कल्पणा आली की आपण असे एखादे आॅनलाईन प्लॅटफॉर्म तयार करू शकतो.ज्यावर लोक वेगवेगळ्या इन्शुरन्स पाॅलिसीची आपापसात तुलना करून जी पाॉलिसी त्यांना आपल्यासाठी योग्य अणि उत्तम वाटेल ती खरेदी करतील.
स्टार्ट अप आयडिया प्राप्त झाल्यानंतर यशीश दय्या यांनी त्यांचे दोन मित्र आलोक बंसल अणि अवनीश निरजार संपर्क साधला हे दोघे देखील आय आयटी,आय आय एम सारख्या प्रतिष्ठित संस्थेत शिकलेले होते.
मग यशीश दय्या यांनी आपली ही कल्पणा आलोक बंसल अणि अवनीश निरजार यांच्या कानावर टाकली त्यांना देखील ही आयडिया उत्तम वाटली अणि मग तिघे मिळुन ही आयडिया अस्तित्वात आणण्यासाठी ते कामाला लागले.
पण ह्या कामात त्यांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागणार हे त्यांना माहीत होते कारण ते एका उच्च नियमित क्षेत्रात काम करणार होते.
याचसोबत बाजारातील इतर इन्शुरन्स कंपन्या ज्या लोकांना मुर्ख बनवून आपल्या फायद्यानुसार पाॅलिसी विकत होते त्या देखील यांच्या कार्यात अडथळा निर्माण करणार होते.
पण ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता जनतेची एक महत्वाची गंभीर समस्या दूर करण्यासाठी हे तिघे कामाला लागतात.
अशा पद्धतीने जुले २००८ मध्ये सुरूवात झाली भारतातील पहिल्या आॅनलाईन इन्शुरन्स अॅग्रीगेटर कंपनी पाॅलिसी बाजार डाॅट काॅमची.
सगळ्यात पहिले त्यांनी आपल्या बचत केलेल्या पैशांतुन तसेच नोकरी डाॅट काॅमकडुन प्राप्त झालेल्या फंडिंग मधुन पाॅलिसी बाजारच्या टीमने बाजारातील एक उत्तम वेबसाईट तयार केली.
ज्यावर येऊन कस्टमर वेगवेगळ्या कंपन्यांच्या इन्शुरन्स प्लॅनला चेक करू शकतील त्यांची आपापसात तुलना करू शकतील.अणि आपल्या गरजेनुसार योग्य ती पाॅलिसी खरेदी करू शकतील.
पण पाॅलिसी बाजारच्या टीमसमोर असलेले सर्वात मोठे आव्हान म्हणजे बाजारातील इन्शुरन्स विक्री करत असलेल्या इन्शुरन्स कंपन्या पाॅलिसी बाजारच्या वेबसाईटवर आपल्या इन्शुरन्स पॉलिसीचे प्लॅन सुचीबदध करण्यास तयार नव्हते.
कारण त्यांचे असे मत होते की भारतामध्ये डिजीटल प्रोडक्ट,डिजीटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना चालणार नाही म्हणून यावर काम करणे एकदम व्यर्थ आहे.
बाजारातील इतर कंपनींच्या विरोधाने यशीश दय्या यांना काही विशेष फरक पडला नाही कारण त्यांना माहित होते बाजारात कुठल्याही नवीन गोष्टीला सहजासहजी स्वीकारले जात नाही.
यशीश दय्या हे सातत्याने फाॅलो अप घेत राहीले.मग शेवटी इन्शुरन्स बाजारातील त्यांचे काही दिग्दज मित्र पाॅलिसी बाजारच्या वेबसाईटवर आपले इन्शुरन्स प्लॅन सुचीबदध करण्यास तयार झाले.
मग शेवटी बाजारातील काही मोजक्याच इन्शुरन्स कंपन्यांच्या इन्शुरन्स प्लॅनसोबत पाॅलिसी बाजारची वेबसाईट लाॅच करण्यात आली.
बाजारात पाॅलिसी बाजारची वेबसाईट लाॅच झाल्यानंतर तिने बाजारात धुमाकूळ घातला.वर्षानुवर्षापासुन पाॅलिसी एजंटच्या फ्राॅडमुळे त्रस्त असलेले कस्टमर पाॅलिसी बाजारचे पारदर्शक प्लॅटफॉर्म बघुन खुपच खुश झाले.
अणि बघता बघता बाजारातील सर्व कंपन्यांच्या इन्शुरन्स प्लॅन मध्ये तुलना करण्यास मदत करणारे पाॅलिसी बाजार कस्टमरचे आवडते प्लॅटफॉर्म बनले.
सुरूवातीला पाॅलिसी बाजारच्या वेबसाईटवर कस्टमरला इन्शुरन्स पॉलिसी मध्ये तुलना करणे,अणि लोकांना इन्शुरन्स विषयी जागृत करण्याचे काम करत होते.
पण हळुहळू पाॅलिसी बाजारने आपल्या वेबसाईटवर इतरही फिचर्स समाविष्ट करायला सुरुवात केली.ज्यामुळे कस्टमर पाॅलिसीची फक्त किंमतीच्या आधारावर नव्हे तर प्रिमियम, फिचर्स,बेनिफिट इत्यादीच्या आधारावर देखील तुलना करू शकत होते.
पाॅलिसी बाजार आपल्या फिचर्स मध्ये वाढ करत आपल्या कार्यात अधिक सुधारणा घडवून आणत होते अणि जस जसा बाजारातील कस्टमरचा विश्वास पाॅलिसी बाजारवर वाढत गेला.
पाॅलिसी बाजारच्या टीममध्ये देखील अधिक वाढ होत गेली.याशिश दय्या यांच्या डोक्यात वेगळीच कल्पणा होती.
त्यांना फक्त पाॅलिसी अॅग्रीगेटर पर्यंत सीमित राहायचे नव्हते तर पाॅलिसी फॅसिलिटेटर्स देखील बनायचे होते.
अणि आपले हेच ध्येय साध्य करण्यासाठी २०१३ मध्ये त्यांनी इन्फो एज,इंटर कॅपिटल कडुन प्राप्त झालेला सर्व निधी पाॅलिसी बाजारच्या वेबसाईटमध्ये सुधारणा करण्यासाठी खर्च केला.
याचे परिणामस्वरूप कस्टमरला पाॅलिसी बाजारच्या वेबसाईटवर फक्त पाॅलिसीची तुलनाच करता येणार नव्हती तर त्यांना हवी असलेली पाॅलिसी खरेदी देखील करता येऊ लागली.
वर्ष २०१४ पाॅलिसी बाजारने आपल्या ह्या स्टार्ट अप व्यवसायाला अधिक वैविध्यपूर्ण बनवण्याचे ठरवले.कारण यशीश दय्या यांचे ध्येय फक्त टर्म किंवा हेल्थ इन्शुरन्सच्या व्याप्तीच्या बंधनामध्ये राहुन काम करणे हे नव्हते.
याव्यतिरिक्त त्यांना टु व्हिलर,फोर व्हीलर, ट्रॅव्हल इन्शुरन्स,हाऊस तसेच पेट इन्शुरन्स सोबत बिझनेस संबंधित असलेले सर्व प्रकारच्या इन्शुरन्सला देखील त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये समाविष्ट करायचे होते.
पण यासाठी भरपुर फंडची आवश्यकता होती जो पाॅलिसी बाजारकडे उपलब्ध नव्हता.पण तेव्हा देखील कस्टमर पाॅलिसी बाजारच्या सेवेने खुश होते अणि तेव्हा बाजारात पाॅलिसी बाजारच्या विरोधात कोणी भक्कम प्रतिस्पर्धी देखील नव्हता.
पण बाजारात हा सुवर्णकाळ पाॅलिसी बाजार करीता जास्त काळासाठी टिकला नाही.कारण जसजसे मोबाईल नेट वर्क अणि इंटरनेटच्या सुविधेत सुधारणा होऊ लागली तसतसे वेबसाईटच्या तुलनेत मोबाईल अॅपचा अधिक वापर लोक करू लागले.
तेव्हाच २०१५ मध्ये रिलायन्स जिओ बाजारात उतरले.तेव्हा यशीश दय्या यांच्या टीमने भविष्य ओळखुन आपले स्वताचे मोबाईल अॅप बनवायला सुरुवात केली.
पाॅलिसी बाजारच्या टीमचे हे ध्येय पुर्ण करण्यात टायगर ग्लोबल,इंफो एज सारख्या फर्मने आर्थिक मदत देखील केली.
पाॅलिसी बाजारचे मोबाईल अॅप लाॅच झाल्यानंतर कस्टमरमध्ये ते खूप लोकप्रिय बनले.कारण पाॅलिसी बाजारच्या अॅपमध्ये कस्टमरला पाॅलिसी सर्च, कंपेअर अणि खरेदी करण्याव्यतिरिक्त देखील अनेक फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले होते.
मग वर्ष २०१८ मध्ये जेव्हा पाॅलिसी बाजार एका मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचणार होते.मोबाईल अॅप लाॅच केल्यानंतर पाॅलिसी बाजार महिन्याला १५ हजारपेक्षा अधिक पाॅलिसी विक्री करू लागले होते.
हा आकडा वर्षोनुवर्षे वाढतच होता.२०१८ येईपर्यंत कंपनींचे मुल्य १ बिलियन डॉलर पेक्षा अधिक झाले.यानंतर पाॅलिसी बाजार पेटीएम नंतरचे भारतातील दुसरे फिनटेक युनिकाॅन स्टार्ट अप कंपनी बनले.
पण यशाच्या ह्या प्रवासात अनेक अडीअडचणींना अडथळ्यांना देखील पाॅलिसी बाजारच्या टीमला सामोरे जावे लागले.
कंपनीच्या वेगाने होत असलेल्या प्रगतीमुळे आय आर डीए आयचे लक्ष पाॅलिसी बाजारकडे वेधले गेले.अणि त्यांनी कस्टमरच्या डेटा प्रोटेक्शन संबंधित चौकशी करणे सुरू केले.
आय आर डीए आयच्या मार्गदर्शक तत्वानुसार काम करणे हे पाॅलिसी बाजार करीता एक अत्यंत आव्हानात्मक कार्य होते.
पण ह्या वाईट वेळेला देखील यशीश दय्या यांच्या टीमने बाजारात विश्वास संपादन करण्यासाठी मिळालेली एक सुवर्णसंधी म्हणून स्वीकारले.
यानंतर पाॅलिसी बाजारने त्यांच्या सायबर सिक्युरिटी अणि डेटा प्रायव्हेसी प्रोटेक्शन सिस्टमला अधिक मजबूत बनवले.याचसोबत त्यांनी कस्टमर मध्ये डेटा सिक्युरिटी विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अभियान देखील राबवले.
यानंतर पाॅलिसी बाजारचा व्यवसाय पुन्हा जोरात पुर्वपदावर येऊ लागला.पण तरी देखील कंपनीपुढे दोन महत्त्वाची आव्हाने होती.ज्याने कंपनीचा प्रगतीचा वेग कमी केला होता.
यात कस्टमरचा एक हिस्सा असा होता ज्यांनी आॅनलाईन इन्शुरन्स माॅडेलचा स्वीकार केलेला नव्हता.त्यामुळे ते अद्यापही इन्शुरन्स एजंटच्या माध्यमातूनच पाॅलिसी खरेदी करत होते.
कस्टमरचा हा हिस्सा आपल्याकडे वळवण्यासाठी पाॅलिसी बाजारने अनेक आॅफर लाॅच केल्या.ज्यात त्यांनी आॅनलाईन इन्शुरन्स खरेदी केल्यावर प्रत्येक प्रोडक्टची खरेदी केल्यावर डिस्काउंट जारी केला.तसेच कस्टमरला २४*७ कस्टमर सपोर्ट देखील दिला.
ज्यामुळे लाखो आॅफलाईन कस्टमर देखील पाॅलिसी बाजार सोबत जोडले गेले.
पाॅलिसी बाजार समोरची दुसरी सर्वात मोठी समस्या अशी होती भारतातील अधिकतम इन्शुरन्स खरेदी कर्ते इन्शुरन्सकडे गरज म्हणून नव्हे तर टॅक्स वाचविण्याचे माध्यम म्हणून पाहत होते.
म्हणून ते फक्त आर्थिक वर्षाच्या शेवटी इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करत होते.आर्थिक वर्षांच्या शेवटी इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करत असलेल्या कस्टमरला हे समजणे आवश्यक आहे की इन्शुरन्स केवळ करकपातीचे माध्यम नसुन आपल्या मानवी जीवनातील एक महत्वाचा घटक आहे.
कारण घरात कुटुंबातील सदस्यातील एक जण जरी आजारी पडला तरी त्याच्या आजारपणाचा,दवाखान्याचा खर्च आपणास सर्वसामान्य व्यक्तीस वाढत्या महागाईमुळे करता येत नाही.
पण लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव तसेच कोणती पाॅलिसी खरेदी करावी याबाबत संभ्रम देखील असतो की आपल्या आवश्यकतेनुसार आपण कोणती पाॅलिसी खरेदी करायला हवी म्हणून ते पाॅलिसी खरेदी करणे टाळत असतात.
आज १४ हजार कर्मचारींसोबत पाॅलिसी बाजारने २ करोडपेक्षा अधिक पाॅलिसी विक्री करण्यात यश प्राप्त केले आहे.
अशा पद्धतीने बाजारात इन्शुरन्स एजंट कडुन लोकांची जी फसवणूक केली जात होती त्या फसवणुकीला आळा घालण्याच्या चांगल्या हेतुने सुरू केलेली ही कंपनी आज इन्शुरन्स क्षेत्रातील मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते.