फिजिक्स वाला स्टार्टअप व्यवसायाची यशोगाथा
आपण जर जीवनात कठोर परिश्रम घेतले तर आपल्या कठोर परिश्रमापुढे मोठमोठी संकटे देखील नांगी टाकत असतात.
याचे एक उत्तम उदाहरण आहे प्रसिद्ध एडोटेक कंपनी फिजिक्स वालाचे संस्थापक अलख पांडे.1.1 बिलियन डॉलर्सची कंपनी उभी केलेल्या अलख पांडेचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते.
अलख पांडे अवघ्या सहाव्या इयत्तेत शिकत असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.
घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली.ज्यामुळे अलख पांडे यांनी आठव्या इयत्तेत शिकत असतानाच घर चालवण्यासाठी टयुशन घेणे सुरू केले.
2010 मध्ये बिशाॅप जाॅन्सन ह्या शाळेतुन बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कानपूर येथील इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश घेतला.
पण अलख पांडे यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडून दिले अणि ते पुन्हा आपल्या मातृभुमीत प्रयाग राज येथे आले.
अणि फक्त पाच हजार रुपये इतके मासिक वेतन घेऊन एका खासगी कोचिंग क्लास मध्ये मुलांना शिकवण्यास त्यांनी सुरुवात केली.
पुढे 2016 मध्ये त्यांनी फिजिक्स वाला नावाने स्वताचे एक युटयुब चॅनल सुरू केले.हया चॅनलवर त्यांनी आपल्या लेक्चरचे व्हिडिओ अपलोड केले.पुढे कोरोना काळात आॅनलाईन शिक्षणाची मागणी लक्षात घेऊन त्यांनी स्वताचे एक अॅप लाॅच केले.
अलख पांडे यांनी जेव्हा त्यांचे युट्यूब चॅनल सुरू केले तेव्हा त्यांच्या व्हिडिओला फक्त एक दोन लाईक्स प्राप्त होत होते.
पण आज अलख पांडे यांच्या फिजिक्स वाला अॅपला प्ले स्टोअर वरून एक करोड पेक्षा जास्त युझर्सने डाऊनलोड केले आहे.
फिजिक्स वाला युनिकाॅन स्टार्ट अप कसे बनले ? (How physics wallah become unicorn start-up business )
2014 जेव्हा भारतात आय आयटी अणि पीएमटीची पुर्वतयारी आॅफलाईन पद्धतीने केली जात होती.ज्यासाठी कोचिंग इन्स्टिट्यूट जवळपास एक दोन लाख रुपये इतकी अवाढव्य फी आकारत असत.
कोचिंग इन्स्टिट्यूटची एवढी भरमसाठ फी भरणे सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांना परवडत नव्हते.
तेव्हाच अन अकॅडमी,बायजु ह्या दिग्दज कोचिंग इन्स्टिट्यूट बाजारात आल्या ज्या विद्यार्थ्यांना परवडेल अशा दरात ३० ते ५० हजारात आय आयटी,पीएमटीचे उत्तम कोर्सेस भारतीय बाजारात लाॅच करत होते.
त्याचवेळी अलख पांडे यांनी आपल्या कोचिंगची सुरूवात इलाहाबाद मधुन केली.अलख पांडे हे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व्यक्ती होते.
त्यामुळे त्यांना माहीत होते की भारतातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणासाठी कोचिंग क्लासेस लावण्यासाठी एवढा भरमसाठ खर्च करू शकत नाही त्यांची तेवढी आर्थिक परिस्थिती नाहीये.
म्हणून २०१६ मध्ये अलख पांडे सरांनी स्वताचे एक युटयुब चॅनल सुरू केले.अणि त्या युट्यूब चॅनल वरून त्यांनी विद्यार्थ्यांना मोफत शिकवणे सुरू केले.
२०१७ पर्यंत अलख पांडे सरांच्या युट्यूब चॅनलवर फक्त चार हजार सबस्क्राईबर होते.पुढे विद्यार्थ्यांना अलख पांडे सरांची शिकवण्याची शैली अधिक आवडु लागली त्यामुळे २०१८ संपेपर्यंत त्यांच्या युट्यूब चॅनलवर २२ लाख सबस्क्राईबर झाले होते.
विद्यार्थ्यांना अलख पांडे सरांचे विद्यार्थ्यांना शिकवताना चेहर्यावरील हावभाव, मिमिक्री करणे,स्वरनियमन,स्वरभेद इत्यादी फार आवडत असत.
अलख पांडे सरांच्या शिकवण्यातुन विद्यार्थ्यांना मुद्द्याच्या संकल्पना एकदम सहजरीत्या स्पष्टपणे लक्षात येत होत्या.
२०१९ पर्यंत विद्यार्थ्यांनी अलख पांडे सरांची शिकवण्याच्या शैलीची नक्कल करणे देखील सुरू केले.पुढे २०२१ मध्ये जेव्हा कोचिंगचे पॅटर्न पुर्णपणे आॅनलाईन झाले होते, देशातील सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.
तेव्हा अलख पांडे यांना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे भारतामध्ये जेवढेही आॅनलाईन क्लासेस सुरू होते ते प्रिमियम सेक्शनला अधिकतम टार्गेट करत होते.ज्याची फी जवळपास ३० ते ५० हजारांपर्यंत होती.
याचसोबत अलख पांडे सरांना ही एक गोष्ट देखील लक्षात आली जे काही आॅनलाईन युट्यूबवर क्लासेस सुरू आहेत ते विद्यार्थ्यांसाठी पुर्णतः उपाय नाहीये.
आॅनलाईन क्लासेस केल्यावर देखील विद्यार्थ्यांना रोजचे सराव प्रश्नपत्रिका हव्या असतात, तसेच काही डाऊट क्लासेस,टेस्ट देखील द्याव्या लागतात.
तिसरी गोष्ट अलख पांडे सरांनी ही बघितली की भारतामध्ये एड टेकचे स्टार्ट अप वाढत होते.अणि सर्व स्टार्ट अप आॅनलाईन फंडिंग प्राप्त करण्यासाठी आले आहे.
त्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याशी काही देणेघेणे नव्हते.
यानंतर अलख पांडे सरांनी आपले एक अॅप लाॅच केले फिजिक्स वाला.इथे त्यांनी विद्यार्थ्यांना परवडेल अशा दरात कोर्सेस उपलब्ध करून देणे सुरू केले.
ज्यात फक्त ९९९ रूपयात विद्यार्थ्यांला इंजिनिअरिंगची पुर्वतयारी करता येत होती.यानंतर हे अॅप खुप प्रसिद्ध झाले अणि दोन लाखापेक्षा अधिक विद्यार्थी ह्या अॅपवर अभ्यास करण्यासाठी येऊ लागले.
यानंतर २०२० च्या अखेरपर्यंत फिजिक्स वालाचे जवळपास ४२ लाख सबस्क्राईबर झाले होते.अलख पांडे सरांच्या अॅपवर तेव्हा मंथली अॅक्टिव्ह युझर १३ लाखापेक्षा अधिक झाले होते.
यानंतर अलख पांडे सरांकडे एक मोठी आॅफर येते एक मोठी एडटेक जाॅईण्ट कंपनी पांडे सरांच्या कंपनीत ७५ करोड रूपये देऊन १० टक्के भागभांडवल मागते.पण अलख पांडे सर ह्या आॅफरला नकार देतात.
मग बाजारात असलेल्या इतर मोठमोठ्या एडटेक जाॅईण्ट कंपन्या अलख पांडे सरांच्या कंपनीला संपवू पाहतात.
यासाठी ते अलख पांडे सरांच्या कंपनीतील शिक्षकांना करोडो रुपये इतकी आॅफर देऊन आपल्याकडे वळवु लागले.
अलख पांडे सरांजवळील एकही शिक्षक टिकत नव्हता कारण बाजारात असलेल्या इतर एडटेक जाॅईण्ट कंपन्या सर्व शिक्षकांना जास्त पैसे देऊन आपल्याकडे वळवत होते.
यामुळे अलख पांडे खुप त्रस्त होतात.
यातच अलख पांडे सरांना विद्यार्थ्यांना मुलांचे ईमेल येऊ लागले की टीचर्स उपलब्ध नसतील तर आम्ही आमचे कोर्सेस कसे पुर्ण करणार.
अशा परिस्थितीत ९० टक्के स्टार्ट अप उद्धवस्त होऊन जातात कारण अशा वेळी बाजारातील एखाद्या मोठ्या कंपनीला त्या कंपनीने आपले भागभांडवल दिले नाही तर ज्या कंपनीला आपल्या कंपनीने भागभांडवल देण्यास नकार दिला आहे ती कंपनी आपले सर्व पैसे लावून आपल्या कंपनीला उद्धवस्त करू पाहत असते.
हेच अलख पांडे सरांच्या कंपनीसोबत देखील घडत होते.मग २१ फेब्रुवारी २०२१ रोजी अलख पांडे युट्यूबवर लाईव्ह येतात.
युटयुबवर लाईव्ह येत अलख पांडे सर आपल्या बाजारातील प्रतिस्पर्धी कंपन्यांना उद्देशून बोलतात की तुम्ही एक अलख पांडे संपवशाल तरी आम्ही शंभर अलख पांडे उभे करेल.आम्ही माघार घेणार नाही, आम्ही जाणार नाही अशा घोषणा देतात.
अलख पांडे त्यांच्या कंपनीला संपवु पाहत असलेल्या बाजारातील इतर एडटेक जाॅईण्ट कंपन्यांना उद्देशून हे बोलत असतात.
याने विद्यार्थ्यांपर्यंत चांगला संदेश पोहोचला यामुळे भारतातील ज्या एड टेक जाॅईण्ट कंपन्या होत्या ज्या विद्यार्थ्यांना फसवू बघत होत्या.त्यांना विद्यार्थी त्यांच्या ट्विटर तसेच इतर अधिकृत संकेतस्थळावर संदेश पाठवू लागतात.
यानंतर विद्यार्थ्यांना फसवू बघत असलेल्या बाजारातील मोठ्या कंपन्या माघार घेऊ लागतात.कारण बाजारातील त्यांचे वर्चस्व कमी होण्याची भीती त्यांना वाटु लागली.
यानंतर अलख पांडे सर एक नवीन टीम लाॅच करतात.अणि पुर्ण भारतात प्रगती करू लागले.फिजिक्स वालाने १८ शहरांमध्ये आपले २० पेक्षा अधिक आॅफलाईन सेंटर उभारले.
ज्यात दिल्ली,पटणा, वाराणसी, नोएडा, इत्यादी शहरांचा समावेश होता.
अलख पांडे सरांच्या अॅपवर आज रोजचे अॅक्टिव्ह युझर ६ लाखापेक्षा अधिक आहेत.अणि मंथली अॅक्टिव्ह युझर २८ लाखापेक्षा अधिक आहेत.
अणि प्रत्येक विद्यार्थी ९० मिनिटांपेक्षा अधिक कालावधी ह्या अॅपवरील डेटा वापरतात.
अलख पांडे सरांनी जवळपास १० युट्यूब चॅनल सुरू केले आहेत ज्यावर जवळपास ११ मिलियनपेक्षा अधिक सबस्क्राईबर आहेत.
फिजिक्स वालाची कमाई (Operating Revenue of physics wallah)
आर्थिक वर्ष २०२१ मध्ये फिजिक्स वाला ह्या स्टार्ट अप व्यवसायाची कमाई फक्त २९ करोड इतकी होती.
पुढे आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ह्या कमाईत वाढ झाली अणि फिजिक्स वालाची कमाई २७० करोडपर्यत जाऊन पोहचली.आज फिजिक्स वालाची किंमत १.१ बिलियन डॉलर पेक्षा अधिक झाली आहे.
आपले ध्येय मोठे असेल तर आपण बाजारातील मोठमोठ्या प्रतिस्पर्धी कंपन्यांसोबत संघर्ष करून देखील पुढे जाऊ शकतो हे फिजिक्स वालाचे संस्थापक अलख पांडे सरांच्या यशोगाथेतुन आपणास शिकायला मिळते.