Social

राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वात जास्त देणगी देणारे ५ भारतीय व्यक्ती

मागील तीन महिन्यांपूर्वी भारतातील उत्तर प्रदेश ह्या राज्यात भव्य अशा उभारण्यात आलेल्या राम मंदिराचे उद्घाटन (5 indian donors to ram mandir)करण्यात आले होते.

असे सांगितले जाते आहे की राम मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे अकराशे कोटी पेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे.

जगातील सर्वात खतरनाक १५ नोकरया 15 most dangerous jobs in world

अणि ह्या मंदिराच्या पुढील कामासाठी अजुन ३०० कोटी लागतील असा अंदाज राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे खजिनदार गोविंद देवगिरी यांनी वर्तवला आहे.

राम मंदिर बांधण्यासाठी खुप जणांनी आपापल्या परीने आपल्या आर्थिक क्षमतेनुसार देणगी देखील दिली आहे.

आजच्या लेखात आपण राम मंदिर उभारणीसाठी भारतातील कोणत्या व्यक्तींनी सर्वात जास्त देणगी दिली आहे हे जाणून घेणार आहोत.

दिलीप कुमार लाखी –

दिलीप कुमार लाखी हे राम मंदिराला सर्वात जास्त देणगी देणारया भारतीयांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेले भारतीय व्यक्ती आहेत.

दिलीप कुमार लाखी हे एक प्रसिद्ध व्यावसायिक आहेत.दिलीप कुमार लाखी यांनी राम मंदिरासाठी तब्बल १०१ किलो इतके सोने दान केले आहे.

ह्या सोन्याची किंमत ६८ कोटी असल्याचे सांगितले जात आहे.(5 indian donors to ram mandir)दिलीप कुमार लाखी यांनी दान दिलेल्या ह्या सोन्याचा मंदिरांचा दरवाजा मंदिरातील त्रिशुळ इत्यादी मध्ये करण्यात आल्याचे सांगितले जाते.

महात्मा फुले यांच्याविषयी कोणालाही माहीत नसलेल्या १० महत्वाच्या गोष्टी

मोरारी बापु –

मोरारी बापु हे अध्यात्मिक गुरू तसेच कथाकार म्हणून ओळखले जातात.

राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वात जास्त देणगी देणारे भारतीय व्यक्तींच्या यादीत मोरारजी बापु हे दुसरया क्रमांकावर आहेत.

मोरारी बापु (5 indian donors to ram mandir)यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी तब्बल ११.३ कोटी रुपये इतकी देणगी दिली आहे.

गोविंदभाई ढोलकिया –

गोविंदभाई ढोलकिया हे राम मंदिराला सर्वात जास्त देणगी देणारे तिसरे भारतीय व्यक्ती आहेत.

गोविंदभाई ढोलकिया हे हिरा हया कंपनीचे संस्थापक आहेत.गोविंदभाई ढोलकिया हे गुजरात मधील मोठे हिरा कारोबारी आहेत.

गोविंदभाई ढोलकिया(5 indian donors to ram mandir) यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी तब्बल ११ कोटी रुपये इतकी देणगी दिली आहे.

अक्षय कुमार –

अक्षय कुमार हे बाॅलीवुड जगतातील एक प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते आहेत.

राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वात जास्त देणगी देणारे भारतीय व्यक्तींच्या यादीत अक्षय कुमार हे चौथ्या क्रमांकावर आहेत.

अक्षय कुमार यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी तब्बल १० कोटी रुपये इतकी देणगी दिली आहे.आयोध्येत राम मंदिराच्या कामाला सुरुवात झाल्यावर अक्षय कुमार यांनी ही देणगीची रक्कम दिली होती.

कंगणा राणावत –

कंगणा राणावत ह्या बाॅलीवुड जगतातील एक उत्कृष्ट हिंदी चित्रपट अभिनेत्री आहेत.

राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वात जास्त देणगी देणारे भारतीय व्यक्तींच्या यादीत कंगणा राणावत यांचा पाचवा क्रमांक लागतो. कंगणा राणावत यांनी राम मंदिर उभारणीसाठी २ कोटी रुपये इतकी देणगी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button