म्हैसमाळ महाराष्टातील एक महत्वाचे अणि लोकप्रिय पर्यटनस्थळ

म्हैसमाळ हे ठिकाण आपल्या महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख अणि आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते.
याचसोबत म्हैसमाळ हे ठिकाण महाराष्ट् राज्यातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण म्हणून देखील प्रचलित आहे.
महाराष्ट्रातील अनेक पर्यटक तसेच निसर्गप्रेमी आवर्जून ह्या ठिकाणाला भेट देण्यासाठी इथे येतात.
म्हैसमाळ हे ठिकाण आपल्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात स्थित आहे.हे ठिकाण निसर्ग पर्यटन स्थळांचा आनंद घेण्यासाठी एक उत्तम स्थळ आहे.
म्हैसमाळ ठिकाण हे निसर्ग अणि ऐतिहासिक वास्तुंचा सुंदर मिलाफ आहे.वनस्पती शास्त्राची ह्या ठिकाणी जणू प्रयोगशाळाच बसलेली आपणास दिसून येते.
म्हैसमाळ हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण महाठवाडयाचे महाबळेश्वर ह्या नावाने देखील संबोधित केले जाते.वर्षभर इथे आपणास समतोष्ण हवामान दिसुन येते.
म्हैसमाळ ह्या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची प्रचंड गर्दी आपणास पाहावयास मिळते.एका आकडेवारीनुसार असे सांगितले जाते की म्हैसमाळ ह्या ठिकाणचे कमाल तापमान ३४ डिग्री सेल्सिअस अणि किमान तापमान हे ७ डिग्री सेल्सिअस इतके असते.
त्यामुळे पर्यटक वर्षभरात कधीही ह्या ठिकाणाला भेट देण्यासाठी येऊ शकतात.
येथे असलेले मनमोहक निसर्गरम्य वातावरण अनुभवायला संपूर्ण महाराष्टातील पर्यटक ह्या ठिकाणाला भेट देण्यासाठी येतात.
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद शहरापासून ३६ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
म्हैसमाळ ह्या ठिकाणाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की हे ठिकाण शिवाच्या एका जुन्या मंदिराच्या अवशेषाचे ठिकाण आहे.त्यामुळे ह्या ठिकाणाचे मुळ महेश्माळ असे असल्याचे सांगितले जाते.
पुढे याचा अपभ्रंश झाला अणि ह्या ठिकाणाला म्हैसमाळ ह्या नावाने ओळखले जाऊ लागले.म्हैसमाळ येथील परिसराच्या मध्यभागी आपणास गिरीजादेवीचे मंदिर दिसुन येते.
गिरीजादेवीचे हे मंदिर महाराष्टातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.हे मंदिर श्रद्धास्थान औरंगाबादचे कुलदैवत म्हणून देखील ओळखले जाते.
खुलताबाद येथील ह्याच पठारावर बालाजी मंदिर देखील स्थापित करण्यात आले आहे.बालाजी मंदिराच्या प्रवेशद्वारावरच आपणास सुरूवातीलाच काळ्या पाषाणाची मूर्ती दिसुन येते.
बालाजी मंदिर हे दक्षिण भारतीय द्रविड शैलीत बांधण्यात आलेले मंदीर आहे.मंदिराच्या समोरील बाजूस आपल्याला भव्य असे एक महाद्वार दिसुन येते.
मंदिराच्या महादारातुन आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला आपणास प्रसादालय अणि डाव्या यत्रकुंड पाहायला मिळते.
जसजसे आपण मंदिराच्या जवळ जातो तसतसे मंदिर अधिक भव्य असल्याचे दिसून येते.येथील मंदिरात बसवण्यात आलेली मुर्ती अतिशय मनमोहक अशी आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ह्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते.
म्हैसमाळ ह्या ठिकाणी पर्यटकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती तसेच फुलांचे प्रकार देखील पाहायला मिळतात.पावसाळा अणि हिवाळा ह्या दोन्ही त्रतुंमध्ये हे ठिकाण जणु स्वर्गच जमिनीवर उतरल्यासारखे वाटते.
मान्सुन मध्ये तर ह्या ठिकाणच्या डोंगरदरींमध्ये पसरलेला हिरवागार गालिचा अणि पायाशी लोळणारे ढग आपल्या डोळ्यांचे जणु पारणेच फेडतात.
म्हैसमाळ ह्या ठिकाणी असलेले व्युव्ह पाॅईट हे ह्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे.
पर्यटकांच्या जीविताला धोका पोहोचू नये यासाठी प्रत्येक व्युव्ह पाॅईट वर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लोखंडी कडे बसविण्यात आले आहेत.
म्हैसमाळ हे ठिकाण सुट्टीच्या दिवशी भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण मानले जाते.इथे जाण्यासाठी पर्यटकांना विमान,रेल्वे अणि बस तिन्ही प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत.औरंगाबाद ते म्हैसमाळ पर्यंतचे अंतर साधारणतः ३६ किलोमीटर इतके आहे.
म्हैसमाळ ह्या ठिकाणी येण्यासाठी पर्यटकांना सर्वप्रथम औरंगाबाद वरून खुलताबाद येथे यावे लागेल.खुलताबाद इथून म्हैसमाळ हे ठिकाण साधारणतः बारा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
खुलताबाद ह्या ठिकाणी देश तसेच विदेशातील लाखो भाविक पर्यटकांचे श्रद्धास्थान असलेले भद्रा मारुतीचे विशाल असे मंदीर आपणास पाहावयास मिळते.
खुलताबाद ह्याच ठिकाणी मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी मोहम्मद पैगंबर यांच्या मिशीचा केस ठेवलेला असल्याचे सांगितले जाते
त्यामुळे खुलताबाद येथील मुस्लिम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र श्रद्धास्थान म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
याचसोबत जगप्रसिद्ध अशी वेरूळ लेणी,बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर मंदिर दौलताबाद किल्ला ह्या ठिकाणापासून अवघ्या १५ किलोमीटर इतक्या अंतरावर स्थित आहे.
म्हैसमाळ ह्या ठिकाणी पोहचण्यासाठी बस किंवा टॅक्सीची सोय होऊ शकते.
म्हैसमाळ हे ठिकाण पुणे शहरापासून २६५ किलोमीटर अणि मुंबई शहरापासून ३४३ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.म्हैसमाळ हे ठिकाण सह्याद्री पर्वत रांगेच्या सर्वात पुर्वेकडील भाग म्हणून ओळखला जातो.
ह्या परिसरास सुंदर अणि विलक्षण अशी पर्वतरांग देखील लाभल्याने आपणास दिसून येते.मराठवाडयातील हे छोटे महाबळेश्वर एका उंच पठारावर चहुकडे सर्वत्र पसरलेले आपणास दिसून येतात.
पावसाळ्यात अधुन मधुन सतत कोसळत असलेल्या मुसळधार अणि रिमझिम अशा पावसाच्या सरी,हिरव्यागार खोल दरया,
येथे असलेला मनमोहक असा व्युव्ह पाॅईट अणि मनाला प्रसन्न करणारी हवा,आजुबाजुला असलेल्या घनदाट झाडी, जागोजागी असलेल्या चढ उताराच्या पाऊलवाटा त्यांच्या मधोमध असलेला गिरीजा तलाव हे दृश्य अक्षरश डोळयांचे पारणे फेडतात.
इथे असलेल्या व्युव्ह पाॅईट वरून ३० किलोमीटर इतका दिसणारा आसमंत जणु एखाद्या चित्रासारखाच भासतो.
दरी खोरयात असलेल्या रेखीव अशा शेती,मध्ये असलेली लहान लहान घरे, जागोजागी आढळणारे जंगलाचे बुंजके इथे भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या मनात घर करून जातात.
वनविभागाच्या वतीने आधीपासूनच वन पर्यटनाचा मुख्य हेतु लक्षात घेत ह्या ठिकाणचा विकास घडवून आणला आहे.त्यामुळे म्हैसमाळ ह्या ठिकाणाच्या अवतीभवती आपणास अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे उदयास आली असल्याचे दिसून येते.
येथील दुरदर्शनाच्या मनोरयापासुन दिसणारा अप्रतिम देखावा अजिबात चुकवु नये असा आहे.छोटे छोटे तलाव तसेच जंगल दरींनी नटलेले हे विस्तीर्ण अशा पठाराला पर्यटकांनी निसर्ग प्रेमींनी एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी.