JobSocial

जगातील सर्वात जास्त वेतन देणारे ५ देश

आज आपण प्रत्येकजण चांगला अभ्यास करून आपले करीअर सुरक्षित करण्यासाठी एक चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करत असतो.जेणेकरून आपल्याला देखील महिन्याला लाखोंचे वेतन प्राप्त करता येईल.

आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे की जगात सर्वात जास्त पगार हा परदेशात नोकरी करताना प्राप्त होत असतो.

आपल्या मनात नेहमी हा प्रश्न निर्माण होत असतो की जगात सर्वात जास्त पगार कोणत्या देशातील नोकरदारांना दिला जातो.

महात्मा फुले यांच्याविषयी कोणालाही माहीत नसलेल्या १० महत्वाच्या गोष्टी

आपल्यातील अनेक जणांना वाटते की जगात फक्त सर्वात जास्त पगार देणारा देश अमेरिका युएस हाच आहे.पण असे नाहीये संपूर्ण जगभरात नोकरदारांना अमेरिका पेक्षाही अधिक वेतन देणारे अनेक देश आहेत.

आज जगात असे काही देश आहेत जिथे नोकरी केल्यावर आपल्याला महिन्याला लाखो रुपये कमवता येतात.हया देशांमध्ये नोकरी करत असलेल्या व्यक्तींचा पगार जाणुन घेतल्यावर आपण एकदम थक्क होऊन जातो.

आजच्या लेखात आपण नोकरदारांना जगातील सर्वात जास्त पगार देणारे देश कोणकोणते आहेत?हे जाणुन घेणार आहोत.

लक्झेंबर्ग (highest paying countries in world )-

जगातील सर्वात जास्त पगार देत असलेल्या देशांच्या (5 highest paying countries in world)यादीत लक्झेंबर्ग ह्या देशाचा पहिला क्रमांक लागतो.

लक्झेंबर्ग हा युरोप मधील एक छोटासा देश आहे जिथे नोकरदारांना सर्वात जास्त पगार दिला जातो हा देश २५८६ वर्ग किलोमीटर मध्ये विस्तारलेला आहे.

लक्झेंबर्ग मध्ये फक्त ६ लाख ५४ हजार ७६८ लोक वास्तव्यास आहेत.हया देशात वर्षाला ७८ हजार ३१० डाॅलर (६४ लाख २० हजार)इतका पगार दिला जातो.

म्हणजे ह्या देशातील लोक दरमहा पाच लाख ३५ हजार रुपये वेतन प्राप्त करतात.यातील ३८ टक्के त्यांना कर भरावा लागतो.

लक्झेंबर्ग देशात फायनानशिअल सर्विस, स्टील उद्योग,रबर, मशनरी उद्योग इत्यादी साठी ओळखला जाणारा देश आहे.हया देशातील सर्वात महत्वाचा आहे कारण येथील व्हिजा वर आपल्याला इतर १८६ देशात फिरता येते.

अमेरिका

जगातील सर्वात जास्त पगार देणारे देशांच्या यादीत अमेरिका हा देश दुसरया क्रमांकावर आहे.हा देश संपूर्ण जगभरातील एक ताकदवान देश म्हणून प्रचलित आहे.

अमेरिका ह्या देशात ३४ करोड लोक वास्तव्यास आहेत.हा जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखला जातो पण इथे काम करत असलेल्या नोकरदारांना जास्त वेतन दिले जात नाही.

अमेरिका हा देश येथील हायफाय लाईफस्टाईल,पर कॅपिटा इन्कम, लक्झरीअस जीवनशैली यामुळे ओळखला जातो.

अमेरिका ह्या देशातील कर्मचारी दर आठवड्याला ४४ तास काम करतात.त्यांना त्यांच्या उत्पन्नातील ३१.६ टक्के इतका हिस्सा शासनाला द्यावा लागतो.

अमेरिका ह्या देशात कर्मचारींना वार्षिक ७७ हजार ४६३ डाॅलर (६४ लाख) इतके वेतन दिले जाते.म्हणजे येथील लोक दरमहा पाच लाख ३३ हजार रुपये महिन्याला कमाई करतात.

अमेरिका ह्या देशात मोठ्या प्रमाणात वित्तीय सेवा, बॅकिंग सेवा,ह्या क्षेत्रात नोकरी प्राप्त होत असतात.अॅमेझाॅन गुगल सारख्या जगातील अनेक दिग्गज कंपन्या ह्याच देशात आहेत.

स्वित्झर्लंड

जगातील सर्वाधिक पगार देत असलेल्या देशांच्या यादीत स्वित्झर्लंड हा देश एकुण तिसरया क्रमांकावर आहे.

स्वित्झर्लंड हा देश येथील उत्कृष्ट तंत्रज्ञान अणि सुंदर पर्यटन स्थळ ह्या दोन्ही गोष्टींसाठी अधिक प्रसिद्ध आहे.इथल्या सुंदर पर्यटन स्थळांमुळे स्वित्झर्लंड हा देश पृथ्वीवरील स्वर्ग म्हणुन देखील ओळखला जातो.

दरवर्षी कित्येक लोक येथील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी तसेच इथे नोकरी करण्यासाठी येतात.स्वित्झलॅड हा जगातील सर्वात स्वच्छ देश म्हणून ओळखला जातो.

स्वित्झर्लंड ह्या देशाचे एकूण क्षेत्रफळ ४१ हजार २८५ वर्ग किलोमीटर इतके आहे.इथे वास्तव्यास असलेल्या लोकांजवळ महागड्या कार अणि आलिशान जीवन शैली आहे.

स्वित्झर्लंड देशात नोकरी करत असलेल्या व्यक्तींंचे वार्षिक वेतन ७२ हजार ९९३ डाॅलर म्हणजेच ६० लाख रुपये इतके आहे.

म्हणजे येथील लोकांना महिन्याला ५ लाख रुपये इतके मासिक वेतन प्राप्त होत असते.हया देशातील राहण्याचा खर्च खूप जास्त आहे.

ह्या देशात एका दिवसाचे १५६० डाॅलर म्हणजे १ लाख २८ हजार इतका आहे.

डेन्मार्क

जगातील सर्वात जास्त पगार देत असलेल्या देशांच्या यादीत डेन्मार्क ह्या देशाचा चौथा क्रमांक लागतो.युरोपमध्ये असलेल्या ह्या देशाचा विस्तार ४२ हजार ९४० वर्ग किलोमीटर इतका आहे.

ह्या देशाची सीमा जर्मनी, स्वीडन अणि नाॅर्वे ह्या देशाला लागुन आहेत.हया देशातील लोकांची जीवनशैली अगदी हायफाय आहे.

ह्या देशातील लोक टॅक्स देखील मोठ्या प्रमाणात भरत असतात.पण ह्या घेतलेल्या करातुन येथील शासन लोकांना आरोग्य विषयक तसेच शैक्षणिक सुविधा पुरवत असते.

डेन्मार्क ह्या देशात व्यक्तीचे वय ५५ ते ६५ पुर्ण होण्यासाठी फक्त तीन वर्ष बाकी असले तरी येथील सरकार त्या व्यक्तीला जीवंत असेपर्यंत पेंशनची सुविधा उपलब्ध करून देते.

डेन्मार्क ह्या देशात नोकरी करत असलेल्या व्यक्तीला वर्षाला ६४ हजार १२७ डाॅलर इतके वेतन दिले जाते.म्हणजे तब्बल ५२.५ लाख रुपये इतके वेतन दिले जाते.

म्हणजे महिन्याला येथील लोकांना ४ लाख ३७ हजार इतके वेतन प्राप्त होत असते.

नाॅर्वे

नोकरदारांना जगातील सर्वात जास्त पगार देणारया देशांमध्ये नाॅर्वे ह्या देशाचा एकुण पाचवा क्रमांक लागतो.

नाॅर्वे हा देश मध्यरात्रीचा सुर्य म्हणून देखील ओळखला जातो.

नाॅर्वे ह्या देशात दरवर्षी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते.हया देशाचे एकुण क्षेत्रफळ ३ लाख ८७ हजार २०५ वर्ग किलोमीटर इतके आहे.हया देशातील लोकसंख्या ५५ लाखापेक्षा अधिक आहे.

नाॅर्वे ह्या देशात मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांकडून कर वसूल केला जातो.येथील नागरीक हा कर भरतात देखील कारण ह्या देशातील सरकार येथील नागरिकांना मोफत शिक्षण,अणि आरोग्य विषयक सुविधा ह्या करामध्ये आकारलेल्या पैशात उपलब्ध करून देत असते.

नाॅर्वे ह्या देशातील लोक आठवड्याला सरासरी ३० तास इतका कालावधी काम करतात.इथल्या नोकरी करत असलेल्या व्यक्तींना वर्षाला ५३ हजार ७५६ डाॅलर (४४ लाख) इतका आहे.

म्हणजे ह्या देशातील लोकांना दरमहा ३ लाख ६६ हजार रुपये (5 highest paying countries in world)इतके वेतन प्राप्त होत असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button