Trending

जगातील सर्वात श्रीमंत १० देश

संपुर्ण जगभरात एकुण ३६० देश आहेत ज्यात काही विकसित अणि विकसनशील अशा दोन्ही प्रकारच्या देशांचा समावेश होतो.

आपल्याला जर कोणी विचारले की जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे तर आपण लगेच अमेरिका किंवा युके असे सांगून मोकळे होतो.

पण आपले हे उत्तर एकदम चुकीचे आहे.युके हा देश श्रीमंत देश नक्कीच आहे पण जगातील सर्वात श्रीमंत देश हा नाहीये.यापेक्षा देखील अधिक श्रीमंत देश जगात अस्तित्वात आहेत.ज्यांच्या विषयी आपणास माहीत नाही.

आपण हे उत्तर ह्या करीता देतो कारण जगातील सर्वात श्रीमंत देश कोणकोणते आहेत हेच आपल्याला मुळात माहीत नसते.

याचकरीता आजच्या लेखात आपण जगातील सर्वात श्रीमंत अशा १० देशांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत ज्यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत अशा टाॅप १० देशांच्या यादीत केली जाते.

१) स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंड हा जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत समाविष्ट असलेला एक महत्वाचा देश आहे.

स्वित्झर्लंड हा देश बॅकिंग,विमा अणि पर्यटन इत्यादी सेवेसाठी ओळखला जातो.कारण ह्या क्षेत्रात महत्वाची सेवा बजावण्याचे काम स्वित्झर्लंड हा देश करतो.

ह्या देशात आपल्याला जगातील सर्वाधिक करोडपती लोक वास्तव्यास असल्याचे दिसून येईल.स्वित्झर्लंड ह्या देशाचा जीडीपी ७० हजार २०० डाॅलर इतका आहे.

स्वित्झर्लंड हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर असलेला देश आहे.

२) कुवेत-

कुवेत हा देश जगातील अत्यंत प्रगत अणि श्रीमंत असा देश आहे.कुवेत ह्या देशाचा एकुण जीडीपी साधारणतः ७० हजार ८०० डाॅलर इतका आहे.

कुवेत हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत नवव्या क्रमांकावर असलेला महत्वाचा देश आहे.

३) संयुक्त अरब अमिराती –

संयुक्त अरब अमिराती ह्या देशाची अर्थव्यवस्था सुरूवातीला शेती,मासेमारी,मोत्यांचा व्यापार ह्या तिन्ही गोष्टींवर ह्या देशाची अर्थव्यवस्था एकेकाळी चालत असे.

पुढे तेलाचा शोध लागल्यानंतर सर्व काही बदलले.तेव्हापासून हया देशाच्या अर्थव्यवस्थेत आपणास दिवसेंदिवस अधिक वाढ होताना दिसुन येत आहे.

संयुक्त अरब अमिराती ह्या देशाचा एकुण जीडीपी ७१ हजार ४६० डाॅलर इतका आहे.जगातील सर्वात श्रीमंत अशा देशांच्या यादीत संयुक्त अरब अमिराती ह्या देशाचा जगात आठवा क्रमांक लागतो.

४) नाॅर्वे

नाॅर्वे हा जगातील अत्यंत विकसित अणि समृदध असलेला देश म्हणून ओळखला जातो.

दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत हा देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जातो.अणि जीडीपीच्या बाबतीत ह्या देशाचा संपूर्ण जगभरात सातवा क्रमांक लागतो.

नाॅर्वे हा जगातील पाचव्या क्रमांकावर असलेला एक खनिज उत्पादक देश आहे.हया देशाचा मानवी विकास निर्देशांक सर्वाधिक आहे.

नाॅर्वे ह्या देशाचा सध्याचा एकुण जीडीपी ७६ हजार ८५ डाॅलर इतका आहे.

५) आयर्लंड

आयर्लंड हा देश उत्तर युरोपातील एक महत्वाचा देश आहे.हा देश जगातील एक वेगवान तसेच विकसित देश म्हणून प्रसिद्ध आहे.

आयर्लंड हा देश जगातील सर्वात मोठा काॅर्पोरेट टॅक्स असलेला देश आहे.हया देशाचा एकुण जीडीपी ८३ हजार ३९९ डाॅलर पेक्षा अधिक आहे.

आयर्लंड ह्या देशाचा जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत सहावा क्रमांक लागतो.

६) बेरणुई दारूसलाम –

बेरणुई दारूसलाम हा जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर असलेला एक महत्वाचा देश आहे.

तेलाचे साठे अणि नैसर्गिक वायूच्या अफाट साठयातुन ह्या देशाची अर्थव्यवस्था चालते.जेव्हा संपूर्ण जगाला कोरोनाने वेढले तेव्हा ह्या देशाच्या जीडीपी मध्ये २.४ टक्के इतका वाढला होता.

बेरणुई दारूसलाम ह्या देशाचा सध्याचा एकुण जीडीपी ८५ हजार ४०० डाॅलर इतका आहे.

७) सिंगापूर

सिंगापूर हा एक आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेला आश्रय स्थान म्हणुन ओळखले जाते जिथे भांडवली नफा लाभांश करमुक्त आहे.

जगातील सर्वात जास्त व्यावसायिक आपल्याला सिंगापूर ह्याच देशात दिसुन येतात.

सिंगापुर ह्या देशाचा एकुण जीडीपी १ लाख ३ हजार १८१ डाॅलर इतका आहे.जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत सिंगापुर ह्या देशाचा चौथा क्रमांक लागतो.

८) लक्झेंबर्ग

लक्झेंबर्ग ह्या देशाचा जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत तिसरा क्रमांक लागतो.

ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेत लोकांच्या संपत्तीचा प्रमुख वाटा असल्याने येथील लोकांना समान राहणीमान,समान वागणूक, समान शिक्षण आरोग्य विषयक सुविधा देण्यात येतात.

सध्या ह्या देशाचा एकुण जीडीपी १ लाख ८ हजार ९५० डाॅलर इतका असल्याचे आपणास दिसून येते.

९) मकाऊ

मकाऊ हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत दुसरया क्रमांकावर असलेला देश आहे.

वल्ड इकोनाॅमिक फोरमच्या एका रिपोर्ट नुसार असे सांगितले जाते की मकाऊ हा लवकरच जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button