पुण्यातील टाॅप १० पाॅश सोसायटी
पुणे हे शहर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एक अत्यंत महत्वाचे प्रमुख शहर म्हणून ओळखले जाते.
पुणे शहरात असलेल्या उच्च शैक्षणिक संस्थेमुळे पुणे ह्या शहरास पूर्वीचे आॅक्सफर्ड ह्या नावाने ओळखले जाते.
मुंबई शहरानंतर महाराष्टातील दुसरे सर्वांत महत्वाचे विकसित अणि धोरणात्मक दृष्टया महत्वपूर्ण शहर म्हणून पुणे ह्या शहराला ओळखले जाते.
पुणे ह्या शहराला पुर्वीपासुन विद्येचे माहेरघर ह्या नावाने ओळखले जात असे.पण आता पुणे ह्या शहराला आयटी हब ह्या नावाने देखील ओळखले जाते.
दिवसेंदिवस पुणे शहर आयटी हब म्हणून अधिकाधिक विस्तारत आहे.हयाच पार्श्वभूमीवर पुणे ह्या शहरात एकापेक्षा एक सरस अशा सोसायटयांचा उदय देखील होतो आहे.
आजच्या लेखात आपण पुणे शहरातील सर्वात टाॅप अणि पाॅश १० सोसायटी कोणकोणत्या आहेत हे जाणून घेणार आहोत.
विदर्भ, मराठवाडा,खानदेश तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जण चांगली नोकरी प्राप्त करण्यासाठी पुणे ह्या शहरात कायमचे स्थायिक झालेले आपणास दिसून येतात.
कित्येक मध्यमवर्गीय गरीब व्यक्ती पुण्यात त्यांच्या खिशाला परवडेल असे फ्लॅट विकत घेऊन किंवा भाड्याने घेऊन पुणे ह्या शहरात नोकरी करत आपल्या संसाराची सुरुवात करतात.
पण याचसोबत पुणे ह्या शहरात काही अशा पाॅश सोसायट्या देखील आपणास पाहावयास मिळतात जिथे सर्वसामान्य गरीब व्यक्ती वास्तव्य करू शकत नाही.
तिथे फक्त उद्योजक तसेच उच्च वेतन असलेले नोकरदार श्रीमंत व्यक्तींच राहु शकतात.हया सोसायटी मध्ये आपल्याला देखील फ्लॅट प्राप्त व्हावा असे अनेक पुण्यातील अनेक लोकांचे स्वप्न आहे.
Amanora गेट वे टाॅवर्स –
पुणे शहरातील सर्वात पाॅश सोसायटी म्हणून अॅमानोरा गेट वे टाॅवर हे ठिकाण प्रसिद्ध आहे.अॅमानोरा पार्क टाऊनशिप मध्ये असलेली ही एक प्रसिद्ध सोसायटी आहे.
ह्या ठिकाणी आपल्याला दोन टाॅवर्स दिसुन येतात जे स्काय ब्रिजने जोडलेले आहे.इथे असलेल्या प्रत्येक अपार्टमेंटला स्वताची एक खाजगी बालकनी देखील आहे.
येथील सोसायटी मध्ये स्विमिंग पूल,मंदिर, गार्डन,जिम इत्यादी अशा अनेक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अॅमानोरा गेट वे टाॅवर मध्ये असलेल्या फ्लॅटच्या किंमती देखील खुप जास्त आहेत.येथे कमीत कमी २.४० कोटी रुपये मध्ये फ्लॅट विकत घेता येईल.
इथे असलेल्या सर्वाधिक महागड्या फ्लॅटची किंमत ८ कोटी इतकी आहे.हया सोसायटी मध्ये भाडयाने राहण्यासाठी ४० ते ४५ हजार रुपये इतके मासिक भाडे भरावे लागते.
कोलते पाटील २४ के स्टारगेज बाऊडन –
ही सोसायटी पुणे शहरातील सर्वात नवीन आणि लोकप्रिय अशी सोसायटी आहे.शहरातील अत्यंत पाॅश भागात हे ठिकाण वसलेले आहे.
ह्या सोसायटी मध्ये तीन,चार,पाच अणि सहा बीएचके फ्लॅट उपलब्ध आहेत.हया फ्लॅटची किंमत ९० लाखाच्या आसपास आहे.
ह्या सोसायटी मध्ये असलेले सर्व फ्लॅट खुपच प्रशस्त असे आहे अणि यात अनेक आधुनिक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पुण्यातील टाॅप पाॅश सोसायट्यांच्या यादीत हा एक परवडेल असा एक चांगला पर्याय आपल्यासाठी आहे.
कोलते पाटील २४ के सोसायटी मध्ये फ्लॅटची किंमत ११ हजार ८४५ प्रति चौरस फुट इतकी आहे.इथे साधारणतः ९० लाख ते ४ कोटी ५० लाखांपर्यंतचे फ्लॅट ह्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
कोलते पाटील २४ के यांच्याकडे ५० टक्के इतकी मालमत्ता भाड्याने देखील उपलब्ध आहेत.भाडयाची सरासरी किंमत २० हजार ते २५ हजार रुपये इतकी आहे.
ब्लु बर्ड सोसायटी –
पुण्यातील अनेक मोठे कलाकार,व्यवसायिक, राजकीय कार्यकर्ते ह्या ब्लु बर्ड सोसायटी मध्ये राहतात.
ब्लु बर्ड सोसायटी मध्ये स्विमिंग पूल, गार्डन,जिम,हाॅल इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी नगर ह्या भागात ही सोसायटी आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असल्याने ह्या सोसायटीचा एक मोठा दबदबा असल्याचे आपणास पाहावयास मिळते.
माॅडन काॅलनी शिवाजी नगर पुणे ह्या ठिकाणी ही ब्लु बर्ड सोसायटी आहे.साधारणतः २ कोटी २५ लाखापासुन ३ कोटी ४० लाखापर्यंत येथील फ्लॅटच्या किंमती देखील आहेत.
ब्लु बर्ड सोसायटी मध्ये भाडयाची कुठलीही मालमत्ता उपलब्ध नाहीये.
लोढा बेलमोंडो –
लोढा बेलमोंडो ही पुणे शहरातील सर्वात सुंदर अणि पाॅश सोसायटींपैकी एक मानली जाते.ही लोढा गृपने विकसित केलेली सोसायटी आहे.
लोढा बेलमोंडो ही सोसायटी पुणे मुंबई महामार्गावर वसलेली आहे.येथील रहिवाशींना अनेक जागतिक पातळीवरील सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
लोढा बेलमोंडो मुंबई पुणे एमसीए क्रिकेट स्टेडियम समोर जवळपास साडेपाच हजार रुपये ते साडे नऊ हजार प्रति चौरस फूट इतकी आहे.
दरमहा १४ हजार पासुन ७० हजार पर्यंतचे येथे भाड्याने फ्लॅट उपलब्ध करून दिले जातात.
मंजुश्री अपार्टमेंट –
मंजुश्री अपार्टमेंट पुणे शहरातील प्रसिद्ध सारस बागजवळ वसलेली आहे.शुक्रवार पेठेत असलेले मंजुश्री अपार्टमेंट हे ठिकाण पुणे शहरातील सर्वात पाॅश सोसायटींपैकी एक मानले जाते.
मंजुश्री अपार्टमेंट मध्ये क्लब हाऊस, जिमनॅशिअम इत्यादी सारख्या प्रिमियम सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
याचसोबत इथे २४ तास सुरक्षा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.५९२ सुभाष नगर शुक्रवार पेठ पुणे ह्या ठिकाणी ही सोसायटी आहे.
११ हजार ९७७ रूपये प्रति चौरस फुटाने इथे फ्लॅटची किंमत आहे.मंजुश्री अपार्टमेंट ह्या ठिकाणी भाड्याने देण्यासाठी कोणतीही मालमत्ता उपलब्ध नाहीये.
विस्डम पार्क सोसायटी –
साई श्रद्धा असोसिएटस अणि चंद्रारंग गृपने विकसित केलेली ही पुण्यातील सर्वात पाॅश सोसायटी म्हणून ओळखली जाते.
विस्डम पार्क सोसायटी पुणे शहरातील बालेवाडी ह्या ठिकाणी आहे.विस्डम पार्क सोसायटी मध्ये व्यायाम शाळा, क्लब हाऊस, स्विमिंग पूल गार्डन,चोवीस तास सुरक्षा इंटरकाॅम पावरबॅक अप सुविधा अणि मुलांना खेळण्यासाठी पटांगण देखील आहे.
मार्वल जेफिर सोसायटी –
मार्वल जेफिर ही पुणे शहरातील सर्वात अलिशान सोसायटींपैकी एक मानली जाते.खराडी पुण्याच्या प्राईम लोकेशन मध्ये स्थित असलेले हे ठिकाण आहे.
येथील २२ एकर एवढ्या परिसरात ३६५ अपार्टमेंट येथे आपण पाहावयास मिळतात.हे एक निवासी संकुल आहे जिथे आपणास उच्च प्रतीचे बांधकाम पाहण्यास मिळते.
परांजपे ब्लु रीज सोसायटी –
चिंचवडीपैकी हा सर्वात अलिशान गेटस समुदायांपैकी एक मानला जातो.परांजपे ब्लु रीज सोसायटी हे पुण्यातील काही श्रीमंत कुटुंबाचे घर देखील आहे.
अपार्टमेंट मध्ये खाजगी थिएटर,स्विमिंग पूल क्लब हाऊस जिम इत्यादी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
येथील रहिवाशांना दारपाल अणि चोवीस तास सुरक्षा सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गोदरेज इन्फिनिटी सोसायटी –
पुणे शहरातील सर्वात लक्षणीय बदलांपैकी एक गोदरेज इन्फिनिटी टावर आहे.
येथील रहिवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.इनफिनिटी सोसायटी मध्ये अत्याधुनिक व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, स्पा सलुन अणि एक कॅफे देखील आहे.
प्राइड वल्ड सिटी सोसायटी –
प्राइड वल्ड सिटी सोसायटी पुण्यातील सर्वात लोकप्रिय अणि पाॅश सोसायटींपैकी एक मानली जाते.ह्या मेगा प्रोजेक्ट मध्ये लक्झरी निवासी अणि आदरातिथ्य इत्यादीचा समावेश आहे.
प्राइड वल्ड सिटी सोसायटी मध्ये असलेल्या सुविधांमध्ये इंडोअर गेम्स, लॅड स्केप गार्डन इत्यादी बरेच काही समाविष्ट करण्यात आले आहे.