गणपतीपुळे महाराष्टातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ
गणपतीपुळे हे महाराष्ट्र राज्यातील एक अत्यंत प्रसिद्ध अणि लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.गणपतीपुळे येथील गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्तजण आपल्या नवसपुर्तीसाठी ह्या ठिकाणी येत असतात.
गणपतीपुळे हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय धार्मिक पर्यटन स्थळ रत्नागिरी जिल्ह्यात स्थित आहे.रत्नागिरी शहरापासून गणपतीपुळे हे ठिकाण साधारणतः २५ ते ३० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
गणपतीपुळे हे मंदिर सुमारे पाचशे वर्षांपेक्षा अधिक जुने मंदिर आहे.हया मंदिराविषयी असे सांगितले जाते की ह्या मंदिरात गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती तर प्रत्यक्ष गणपतीच ह्या मंदिरात अवतरले होते.
गणपतीपुळे येथील मंदिरात पांढरया रंगाची गणपतीची मूर्ती आहे.ही मुर्ती इथे दर्शनासाठी आलेल्या भाविक पर्यटकांना आकर्षित करते.
गणपतीपुळे ह्या मंदिराचे बांधकाम करण्यासाठी रेड आगरा नावाच्या एका खास दगडाचा वापर करण्यात आला होता.हया दगडाचा वापर करून ह्या मंदिराचे बांधकाम पुर्ण करण्यात आले होते.
गणपतीपुळे येथील गणपतीचे मंदिर समुद्र किनारी असल्यामुळे पावसाळ्यात ह्या मंदिरापर्यंत समुद्राच्या लाटा येताना दिसुन येतात.
गणपतीपुळे हे ठिकाण महाराष्ट् राज्यातील एक महत्वाचे धार्मिक पर्यटनस्थळ तीर्थक्षेत्र म्हणून आज ओळखले जाते.
दरवर्षी महाराष्ट् राज्यातील तसेच भारतातील अनेक पर्यटक भाविक गणपतीपुळे येथील मंदिरात दर्शनासाठी तसेच ह्या ह्या मंदिरालगत असलेल्या समुद्र किनारयाचा अनुभव घेण्यासाठी इथे येतात.
गणपतीपुळे येथील समुद्र किनारी बसल्यावर पाण्याच्या लाटांच्या आवाजाने मन अगदी प्रसन्न होऊन जाते.इथे असलेल्या समुद्राच्या सान्निध्यात वेळ व्यतीत केल्यास मन अगदी शांत होऊन जाते.
गणपतीपुळे ह्या मंदिराच्या आजुबाजुला देखील भेट देण्यासारखी अनेक पर्यटन स्थळे आहेत ज्यांना भाविक पर्यटक भेट देऊ शकतात.
मराठी कवी केशवसुत यांचे जन्मस्थान असलेले मालगुंड तसेच लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान असलेले गाव गणपती पुळे पासुन अवघ्या २० ते २५ किलोमीटर इतक्या काही अंतरावर स्थित आहे.
गणपतीपुळे ह्या ठिकाणचा समुद्र किनारा कोकण किनारपट्टीवर असलेला सर्वात प्रेक्षणीय समुद्र किनारा आहे.
एक किलोमीटर इतक्या अंतरावर पसरलेला येथील समुद्र किनारा नारळ आणि पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय असा दिसुन येतो.
गणपतीपुळे ह्या पर्यटन स्थळाला भेट देण्याचे भाविकांचे मुख्य आकर्षण येथील समुद्र किनारी असलेले प्राचीन गणपती मंदिर आहे.येथे असलेल्या समुद्र किनारा मुळे मंदिराच्या शोभेत नैसर्गिक सौंदर्यात अधिक भर पडताना दिसुन येते.
गणपतीपुळे येथील मंदिराच्या आजुबाजुचा परिसर अत्यंत आकर्षक असल्याने इथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण देखील करण्यात आले आहे.
नवरा माझा नवसाचा तसेच फुल ३ धमाल ह्या दोन्ही मराठी चित्रपटांचे चित्रीकरण ह्याच ठिकाणी करण्यात आले होते.
गणपतीपुळे ह्या महाराष्टातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळी अनेक प्रकारचे सण उत्सव देखील साजरे करण्यात येत असतात.
गणपतीपुळे ह्या ठिकाणी पर्यटक भाविक गणपतीपुळे येथील गणपतीचे मंदिर, मंदिराच्या लगत असलेला समुद्र किनारा,भिडे समाधी,चंडिका मंदिर,शेपिकरांचा मठ इत्यादी पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतात.
गणपतीपुळे ह्या मंदिराला भेट देण्यासाठी पर्यटक भाविक हवाई मार्गाने देखील येऊ शकतात.इथे हवाई मार्गाने पोहचण्यासाठी रत्नागिरी हे सर्वात जवळचे ठिकाण आहे.
भाविक ह्या ठिकाणी रेल्वे मार्गाने देखील प्रवास करत येऊ शकतात.गणपतीपुळे पासुन रत्नागिरी रेल्वे स्टेशन अवघ्या ५० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
याचसोबत पर्यटक भाविक बस किंवा टॅक्सी दवारे देखील बाय रोड गणपती पुळे ह्या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी जाऊ शकतात.
गणपतीपुळे हे ठिकाण मुंबई शहरापासून ३४० किलोमीटर अणि पुणे शहरापासून ३२२ किलोमीटर इतक्या अंतरावर स्थित आहे.
गणपतीपुळे येथे मंदिराच्या जवळच पर्यटकांच्या राहण्याची खाण्याची देखील उत्तम सोय तिथे जवळपास असलेल्या हाॅटेल्स मध्ये केली जाते.
इथे पर्यटकांना ८०० रूपये इतक्या किंमतीत चांगला नाॅन एसी रूम बुक करता येईल.अणि १२०० रूपयांपर्यत पर्यटक इथे एसी रूम बुक करून देखील राहू शकतात.
गणपतीपुळे मंदिराच्या नजीकच येथे पर्यटकांना आपली वाहने लावण्यासाठी पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच येथे एक रिसोर्ट देखील आहे.
खोल निळा समुद्र, खारफुटी अणि नारळाच्या झाडाच्या हिरव्यागार हिरवईमध्ये व डोंगराच्या कुशीत वसलेले हे गणपतीपुळे हे कोकणातील सर्वांचे आवडते स्थान म्हणून ओळखले जाते.
भाविक ह्या ठिकाणी आल्यावर देवदर्शनाचा आनंद तर घेताच शिवाय पर्यटनाचा देखील आनंद येथे प्राप्त होतो.
असे सांगितले जाते की गणपतीपुळे येथील गावात फारशी वस्ती नव्हती जी काही वस्ती होती ती गावाच्या बाहेर उत्तरेस होती.
ह्या गावाच्या पश्चिमेस उतरण असुन येथील बराचसा भाग वनवाट आहे.समुद्रापुढे पुळणीचे म्हणजे वाळुच्या मैदानात गणपतीचे महास्थान आहे त्यामुळे ह्या गावास गणपती पुळे असे म्हटले जाते.
मंदीरात दर्शनासाठी जाताना मोबाईल तसेच कॅमेरा घेऊन जाण्याची परवानगी नाहीये.
असे म्हटले जाते की गणपतीपुळे येथील मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी भाविकांना गणपती मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या डोंगराला देखील प्रदक्षिणा घालावी लागते.कारण येथील गणपतीचे स्थान डोंगराच्या काताळात आहे.
मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी बनवण्यात आलेल्या प्रदक्षिणा मार्गात उत्तम सोय केली आहे ह्या मार्गात आपणास भरपूर स्वच्छता देखील पाहायला मिळते.
प्रदक्षिणा घालत असताना रस्त्यातच आपणास पाण्याचे सुंदर असे कुंड दिसुन येतात.
मंदिराची प्रदक्षिणा एक ते सव्वा किलोमीटर इतकी असते ही प्रदक्षिणा भाविक साधारणतः दहा ते पंधरा मिनिटे इतक्या कालावधीत पुर्ण करू शकतील.
अणि अगदी निवांतात प्रदक्षिणा मारल्या तर जास्तीत जास्त आपणास २० मिनिटे इतका कालावधी प्रदक्षिणा पुर्ण करण्यासाठी लागतो.
गणपतीपुळे मंदिर इतिहास –
मोगलाईंच्या काळात इसवी सन सोळाशे पुर्वी आज जिथे आपल्याला स्वयंभु गणेश मंदिर दिसुन येते त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवडयाचे वन होते.
त्या ठिकाणी बाळणपडजी भिडे नावाचे एक ब्राह्मण राहत होते.ते ह्या गावाचे खोत होते.
मोगलाईंच्या काळात भिडे यांच्यावर एक संकट कोसळले आलेले संकट दुर झाले तरच अन्न ग्रहण करेल असा निश्चय भिडे यांनी केला.
अणि भीडे यांनी मंगलमूर्ती यांची आराधना उपासना करण्यासाठी ह्या केवड्याच्या वनात तपश्चर्या करण्यासाठी मुक्काम केला.
अन्न पाणी वज्र केलेल्या भिडे यांना एकेदिवशी दृष्टांत झाला की मंगलमूर्ती गणपती बाप्पा भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रगट झाले आहेत.
यात गणपती बाप्पाने भिडे यांना दृष्टांत देताना सांगितले की इथे माझी पुजा अर्चा केल्यास तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण होतील.याच कालखंडात भिडे यांची गाय सतत काही दिवस दुध देत नव्हती.
त्यामुळे गुराख्याने बारकाईने लक्ष ठेवले तेव्हा त्याच्या लक्षात आले की सध्याच्या मुर्तीच्या जागी डोंगरावर असलेल्या एका शिळेवर गाईच्या स्थनातुन सतत दुधाचा अभिषेक होतो आहे.
हा प्रकार गुराख्याने खोतांना सांगितला मग त्यांनी लगेच तेथील सर्व परिसर स्वच्छ केला ज्यात त्यांना दृष्टांत झाला त्यातील गणेशाची मूर्ती दिसुन आली.मग त्या ठिकाणी भिडे यांनी एक छोटेसे मंदिर बांधले.
तेव्हापासून गणपतीपुळे येथील गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रचलित आहे.