Best vegetarian hotels in Pune
आज आपल्यातील कित्येक जणांना पुणे शहरात नाॅन व्हेज थाळी कुठे भेटतात हे माहीत आहे.
पण आपल्यातील अनेक व्यक्ती जे शुद्ध शाकाहारी आहेत त्यांना पुणे शहरात उत्तम व्हेजिटेरीयन थाळी कोणत्या ठिकाणी भेटते हे माहीतच नसते.
याचकरीता ज्या व्यक्तींना पुणे शहरात व्हेजिटेरीयन थाळीचा आस्वाद घ्यायचा आहे.अशा व्यक्तींसाठी पुण्यात व्हेजिटेरीयन थाळीचा आस्वाद घेण्यासाठी आपण काही उत्तम अशा हाॅटेल्सची नावे सांगणार आहोत.
सुकांता हाॅटेल
सुकांता हाॅटेल ह्या ठिकाणी शुद्ध शाकाहारी प्रकारचे जेवण उपलब्ध आहे.शिवाय ह्या हाॅटेल मध्ये गुजराती,नाॅर्थ इंडियन,महाराष्ट्रीयन अशा सर्व प्रकारचे जेवण ह्या ठिकाणी आपणास प्राप्त होते.
इथे गेल्यावर आपण आॅर्डर करायलाच हवी असे अनेक विविध प्रकारचे स्वादिष्ट चवदार अन्नपदार्थ इथे खायला मिळतात.उदा चुरमा,रबडी,जलेभी, राजस्थानी थाळी इत्यादी.
सुकांता हाॅटेल ह्या ठिकाणी आपणास साधारणतः ५०० ते १००० रूपयात पोटभर जेवण करता येते.पुण्यातील डेक्कन जिमखाना अणि झेड ब्रीज जवळ हे हाॅटेल आहे.
दुर्वाकुर डायनिंग हॉल
पुणे शहरातील सदाशिव पेठेत टिळक रोडला दुर्वाकुर डायनिंग हॉल आहे.
दुर्वाकुर डायनिंग हॉल मध्ये शाळकरी मुले,महाविद्यालयात शिकत असलेले तरूणी,तरूणी तसेच आॅफिसला जाणारे नोकरदार व्यक्ती,सेवानिवृत्त वृदध व्यक्ती असे सर्व वयोगटातील व्यक्ती आवडीने जेवण करायला जातात.
दुर्वाकुर डायनिंग हॉल मधील महाराष्ट्रीयन पदार्थ सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत.ज्यात दहीवडा,बटाटयाची भाजी,मुंगाची खिचडी,ढोकळा,कोशिंबीर,मसाले भात, श्रीखंड, थालीपीठ इत्यादी पदार्थांचा समावेश होतो.
देविका प्युअर वेज
देविका प्युअर वेज हाॅटेल जंगली महाराज रोडजवळ आहे.हे हाॅटेल गुजराती अणि महाराष्ट्रीयन जेवणासाठी अधिक प्रसिद्ध आहे.
ह्या हाॅटेल मधील गुजराती थाळी येथील इथे जेवणासाठी येत असलेल्या लोकांच्या जास्त पसंतीची आहे.
हया हाॅटेलात जेवणासाठी गेल्यावर ह्या ठिकाणचा दाल वाटी चुरमा,महाराजा थाळी आपण एकदा नक्की खायला हवी.ह्या हाॅटेलात जेवणासाठी मिळणारे सर्व अन्न पदार्थ सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशाला परवडेल असे आहेत.
बादशाही बोर्डिंग हाऊस
बादशाही बोर्डिंग हाऊस हे हाॅटेल मधील सदाशिव पेठेत असलेल्या टिळक रोडवर असलेल्या हाॅटेलात देखील अवघ्या शंभर रूपयात लोकांना पोटभर जेऊ घातले जाते आहे.
बादशाही बोर्डिंग हाऊस इथे मिळत असलेल्या थाळीची किंमत दर दिवशी ज्या प्रमाणात भाजी असेल त्या प्रमाणात बदलते अर्थात कमी जास्त होत असते.
बादशाही बोर्डिंग हाऊस हाॅटेलात पातळ भाजी खुपच छान मिळते.अणि जेवणासोबत उत्कृष्ट असा ताक देखील मिळतो.
जेवण झाल्यावर हाॅटेलातुन निघताना हा ताक पिल्यावर अगदी मन पुर्णतः तृप्त झाल्यासारखे वाटते.
मुरलीधर हाॅटेल
मुरलीधर हाॅटेल पुण्यातील नारायण पेठेत आहे.१९६१ साली मुरलीधर थाळी ह्या हाॅटेलची सुरूवात करण्यात आली होती.
तेव्हापासून कायमच पुणेकरांची विशेष पसंती ह्या थाळीला प्राप्त झाली आहे.इथे दोन व्यक्ती अवघ्या अडीचशे ते तीनशे रुपयात पोटभर जेवण करू शकतात.
मुरलीधर हाॅटेल मध्ये गुजराती राजस्थानी अणि महाराष्ट्रीयन थाळी प्राप्त होतात याचशिवाय इथला आमरस,कढी खिचडी,दाल वाटी चुरमा देखील आवर्जून खावा असा आहे.
आशा डायनिंग हॉल
आशा डायनिंग हॉल हे पुणे शहरातील एक खूप जुने अणि नावाजलेले हाॅटेल आहे.हे डेक्कन जिमखाना येथे आपटे रोडवर आहे.
इथल्या व्हेज थाळी सोबत गोड पदार्थ देखील खुप खास आहेत.सीताफळ,रबडी,उकडीचे मोदक हे इथे आवर्जून खाल्ले जाणारे गोड पदार्थ आहेत.
आशा डायनिंग हॉल ह्या ठिकाणी ३०० रूपयात दोन व्यक्ती आरामशीर पोटभर जेवण करू शकतात.
पुना गेस्ट हाऊस
पुना गेस्ट हाऊस हे लक्ष्मी रोडवरील नावाजलेले गेस्ट हाऊस आहे.हया गेस्ट हाऊसला ८५ पेक्षा अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत.
पुणेकरांच्या सणासुदीच्या पदार्थांची सोय पुना गेस्ट हाऊस ८५ वर्षांपासून करत आले आहे.आत्ताच्या पिढीत हे हाॅटेल किशोर सरपोतदार अणि त्यांचा मुलगा सनद सरपोतदार हे दोघे चालवत आहेत.
पुना गेस्ट हाऊस ह्या ठिकाणी आपल्याला एकदम पारंपरिक अणि आॅथेंटिक पद्धतीचे महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण इथे उपलब्ध होते.
सण उत्सवाच्या वेळी ह्या ठिकाणी अत्यंत परवडेल अशा किमतीत मिठाई देखील उपलब्ध होते.इथे ग्रामीण थाळी झूनका भाकर युक्त थाळी आपणास उपलब्ध होते.
ह्या अशा प्रकारची थाळी आपणास पुण्यात ह्या एकाच ठिकाणी प्राप्त होते.पोटभर जेवण झाल्यावर आपल्याला इथे सुजाता मस्तानी दिली जाते.
आर्शिवाद डायनिंग हॉल
आशिर्वाद डायनिंग हॉल हे हाॅटेल कोथरूड येथे शिवाजी पुतळ्याजवळ आहे.
आशिर्वाद डायनिंग हॉल हे हाॅटेल दिसायला एकदम छोटे आहे पण ह्या हाॅटेल मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मेनयु पाहायला मिळतात.
आशिर्वाद डायनिंग हॉल मध्ये वेज थाळी सोबत खमंग उपवास थाळी देखील प्राप्त होते.इथे प्रत्येक पदार्थाची विशेष चव जपली जाते.
घरगुती पद्धतीने बनविण्यात आलेली भाजी,आमटी कोशिंबीर चाखायला आपण एकदा नक्की ह्या आशिर्वाद डायनिंग हॉलला भेट द्यायला हवी.
महाराजा भोग
महाराजा भोग थाळी पुण्यात तर आहेच शिवाय यांचे आऊटलेटस मुंबई ह्या शहरात देखील पाहायला मिळतात.महाराजा भोग थाळी एसबी रोडच्या पेवेलियन माॅलमध्ये उपलब्ध होते.
इथे विशेषत राजस्थानी अणि गुजराती थाळया उत्तम प्रकारच्या मिळतात.इथला गुजराती पत्रा अणि पनीर लिफाफा ह्या दोन आवर्जून खावेत असे अन्न पदार्थ आहेत.
गुजराती पत्रामध्ये आळु वडी इथे एकदम खास मिळते.सफरचंद पासुन बनविण्यात आलेले येथील गोड पदार्थ खुप भारी असतात.
येथील एवढ्या राॅयल ट्रीट नंतर मसाला पान देखील खाण्याचा आनंद घेता येतो.
गिरीजा हाॅटेल
थाळी शिवाय ह्या हाॅटेल मध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ देखील मिळतात.
इथले मेथी पिठले, वांग्याचे भरीत,मटकीची भाजी, मसाला वांगी, आळुच्या वडया भाकरी येथील आवर्जून खाल्ले पाहिजे असे काही पदार्थ आहेत.
याचसोबत इथे आपल्याला फास्ट फूड नाॅर्थ इंडियन पद्धतीचे जेवण देखील प्राप्त होते.हया हाॅटेरलच्या पुणे शहरातच पाच शाखा आहेत.
गिरीजा हाॅटेल रात्री उशिरा पर्यंत सुरू असते म्हणून रात्री उशिरा देखील इथे जेवणाची उत्तम सोय होते.