भारतातील सर्वात खतरनाक ११ किल्ले
आपल्या संपूर्ण भारत देशात आपल्याला अनेक आकर्षक अणि सुंदर गड किल्ले(most dangerous forts in india) पाहायला मिळतात.
आपल्या भारतात असलेल्या प्रत्येक किल्ल्याच्या मागे काही ना काही इतिहास दडलेला असल्याचे आपणास दिसून येते.
भारतातील काही किल्ले दिसायला जेवढे आकर्षक अणि सुंदर आहेत.तेवढ्याच अधिक प्रमाणात हे किल्ले धोकादायक देखील आहेत.
अशा धोकादायक जीवघेण्या किल्ल्यांवर कोणालाही सोबत न घेऊन जाता एकटे भ्रमंती करण्यासाठी जाणे म्हणजे स्वताहून आगीत उडी टाकण्यासारखेच आहे.
आजच्या लेखात आपण आपल्या भारतातील सर्वात खतरनाक अशा १० किल्लयांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.
महात्मा फुले यांच्याविषयी कोणालाही माहीत नसलेल्या १० महत्वाच्या गोष्टी
भानगड किल्ला –
भानगड किल्ला(most dangerous forts in india) हा राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यातील अरवली पायथ्याशी आहे.
भानगड हा भारतातील एक भुतिया तसेच रहस्यमय किल्ला म्हणून ओळखला जातो.असे सांगितले जाते की संध्याकाळ झाल्यानंतर ह्या किल्ल्यावर भुत पिशाच्च यांचा वास असतो.
याबाबद अनेक प्रात्यक्षिक अनुभव देखील लोकांना आले आहेत.
येथील स्थानिक लोकांकडून असे सांगितले जाते की ह्या किल्ल्यावर रात्रीच्या वेळी हसण्याचे रडण्याचे इत्यादी वेगवेगळे आवाज ऐकू येतात.
म्हणून भारत सरकारने स्वता ह्या किल्ल्यावर संध्याकाळ झाल्यानंतर प्रवेश करण्यास सक्त मनाई केली आहे.
गडकुंडार किल्ला –
गडकुंडार हा किल्ला भारतातील खतरनाक अणि रहस्यमय किल्ल्यांपैकी एक महत्वाचा(most dangerous forts in india) किल्ला आहे.हया किलल्यावर चंदेल बुंदेल खंदाल अशा अनेक शासकांनी एकेकाळी राज्य केले होते.
गडकुंडार ह्या किल्ल्याला पुर्वी जिनागड महाल ह्या नावाने ओळखले जात असे.
असे म्हटले जाते की हा किल्ला येथे येणारया लोकांना भ्रमित करत असतो.किलयाची बनावट अशी करण्यात आली आहे की हा किल्ला चार ते पाच किलोमीटर अंतरावरून सहज दिसून येईल.पण जवळ आल्यावर हा किल्ला गायब होतो.
येथील स्थानिक लोकांकडून असे सांगितले जाते की बरयाच वर्षापुर्वी ह्या किल्ल्यावर एका जवळच्या गावातुन एक वरात आली होती.
ही सर्व वरात ह्या किल्ल्यावर गायब झाली ही वरात अचानक कुठे गायब झाली याचा आजपर्यंत कोणालाही पत्ता लागलेला नाहीये.
असे सांगितले जाते की संध्याकाळ झाल्यानंतर जो व्यक्ती ह्या किल्ल्याच्या आत प्रवेश करतो तो परत येत नसतो.म्हणुन ह्या किल्ल्यावर संध्याकाळ झाल्यानंतर प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
शनिवार वाडा-
शनिवार वाडा हा किल्ला भारतातील सर्वात खतरनाक किल्ला(most dangerous forts in india) म्हणून ओळखला जातो.हा किल्ला महाराष्ट् राज्याची सांस्कृतिक राजधानी तसेच विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जात असलेल्या पुणे ह्या शहरात आहे.
येथील स्थानिक लोकांकडून असे सांगितले जाते की संध्याकाळ झाल्यानंतर ह्या किलल्यातुन काका मला वाचवा अशी हाक ऐकू येते.
नाहरगड किल्ला –
नाहरगड हा किल्ला राजस्थान राज्यातील पिंक सिटी गुलाबी शहर म्हणून ओळखले जाणारे जयपुर मध्ये आहे.
नाहरगड किल्ला येथे असलेल्या रहस्यमय ठिकाणांकरीता अधिक प्रचलित आहे.महाराजा सवाई जयसिंग यांनी इसवी सन १७३४ मध्ये ह्या किल्ल्याची बांधणी केली होती.
नाहरगड हा भारतातील एकमेव असा किल्ला आहे ज्या किल्ल्यावर कधीही हल्ला करण्यात आला नाहीये.
येथील स्थानिक रहिवासींकडून असे सांगितले जाते की महाराजा सवाई जयसिंग यांच्या मृत्यूनंतर आज देखील ह्या किल्ल्यावर त्यांचा आत्मा भटकतो आहे.
अणि अनेक व्यक्तींचा ह्या किल्ल्यावर रहस्यमय पद्धतीने मृत्यू देखील झाल्याचे दिसून आले आहे.तेव्हापासून संध्याकाळ झाल्यानंतर ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.
गोलकोंडा किल्ला –
गोलकोंडा किल्ला हा आपल्या भारत देशातील सर्वात खतरनाक किल्ल्यांपैकी एक मानला जातो.गोलकोंडा किल्ला तेलंगणा ह्या राज्यातील हैदराबाद ह्या ठिकाणी स्थित आहे.
हे ठिकाण हैदराबाद शहरातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून देखील प्रचलित आहे.
गोलकोंडा हा किल्ला दिवसा खुप सुंदर अणि आकर्षक असल्याचे दिसून येते.पण दिवसा हा किल्ला जितका अधिक सुंदर अणि आकर्षक दिसुन येतो तितकाच अधिक खतरनाक हा किल्ला रात्रीच्या वेळी झालेला असतो.
असे सांगितले जाते की गोलकोंडा ह्या किल्ल्यात राजाची एक प्रिय प्रेमिका वास्तव्यास होती.ही प्रेमिका जेव्हापासून मरण पावली तेव्हापासून संध्याकाळी ह्या किल्ल्यावर एका स्त्रीच्या नृत्याचे दृश्य पाहायला मिळते.
म्हणून संध्याकाळ झाल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला ह्या किल्ल्यावर प्रवेश दिला जात नाही.
हरिहर किल्ला –
हरिहर किल्ला महाराष्ट् राज्यातील नाशिक जिल्ह्यात स्थित असलेला एक महत्वाचा किल्ला आहे.हरिहर हा किल्ला आपल्या भारतातील सर्वात खतरनाक किल्ल्यांपैकी एक आहे.
हरिहर किल्ल्याला हर्षगड किल्ला ह्या नावाने देखील ओळखले जाते.हया किलल्यावर चढाई करताना उभी चढाई करावी लागते.
ह्या किल्ल्यावर दोनशे पेक्षा अधिक पायरया आहेत ज्या ८० डिग्री इतक्या झुकलेल्या आहेत.हा किल्ला १७० मीटर इतक्या उंचीवर स्थित आहे.
म्हणून ह्या किल्ल्यावर चढाई करताना केलेल्या एका चुकीमुळे आपल्याला आपला जीव गमवावा लागु शकतो.हा किल्ला चढाई करण्यासाठी अत्यंत धोकादायक असुन देखील भारतातील कानाकोपऱ्यातून अनेक ट्रॅकर्स मोठ्या कुतूहलाने ह्या किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यासाठी येतात.
फिरोजशहा कोटला किल्ला –
फिरोजशहा कोटला हा किल्ला भारत देशाची राजधानी म्हणून ओळखले जात असलेल्या दिल्ली ह्या शहरात आहे.
फिरोजशहा कोटला किल्ला दिवसा फिरण्यासाठी खुपच सुंदर आहे पण संध्याकाळ झाल्यानंतर हा किल्ला अत्यंत धोकादायक असतो.
असे सांगितले जाते की संध्याकाळ झाल्यानंतर ह्या ठिकाणी जीन आढळून येतात जे लहान मुले मुली यांचा शिकार करतात.
प्रबळगड किल्ला –
प्रबळगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात स्थित आहे.हा भारतातील एक खतरनाक किल्ला म्हणून प्रचलित आहे.
पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत वसलेल्या ह्या किल्ल्याची समुद्र सपाटीपासुनची उंची ७०० मीटर इतकी आहे.
ह्या किल्ल्यावर चढाईची श्रेणी अवघड आहे त्यामुळे ह्या किल्ल्यावर सर्वसाधारण ट्रेकर्सना ट्रेकिंग करण्यासाठी जाता येत नाही.
ह्या किल्ल्याच्या शेवटच्या शिखरावर पोहचण्यासाठी ट्रेकर्सला जीवावर उदार होत खुप कसरत घ्यावी लागते.ह्या किल्ल्यावर चढाई करताना केलेल्या एका चुकीमुळे आपण हजारो फुट खोल इतक्या दरीत जाऊन कोसळू शकतो.
ग्वाल्हेर किल्ला –
ग्वाल्हेर हा किल्ला आपल्या भारत देशातील सर्वात खतरनाक किल्ल्यांपैकी एक मानला जातो.ग्वाल्हेर हा किल्ला आपल्या भारत देशातील सर्वात मोठा अणि महत्वपूर्ण असा किल्ला आहे.
ग्वाल्हेर किल्ला मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर ह्या शहराच्या टेकडीवर वसलेला आहे.हा किल्ला पाहायला अतिशय सुंदर आणि आकर्षक असा आहे.
ग्वाल्हेर किल्ला पाहायला जितका सुंदर अणि आकर्षक दिसुन येतो तितकाच हा किल्ला जीवघेणा अणि खतरनाक देखील आहे.
येथील स्थानिक लोकांकडून असे सांगितले जाते की हा किल्ला फक्त एका दिवसात एका जीनने निर्माण केले होते.तसेच ह्या किल्ल्यात अनेक गुफा आहेत ज्यात खजिना दडलेला आहे.
पण हा खजिना कोणालाही लुटता येत नाही कारण ह्या खजिन्याचे रक्षण आज देखील हा जीन करतो आहे असे सांगितले जाते.
म्हणून संध्याकाळ नंतर ह्या किल्ल्यावर कोणीही प्रवेश करत नाही.
जगातील सर्वात खतरनाक १५ नोकरया 15 most dangerous jobs in world
कलावंतीण दुर्ग –
कलावंतीण दुर्ग हा किल्ला चढाई करण्यासाठी देशातील सर्वात धोकादायक किलल्यांपैकी एक मानला जातो.
कलावंतीण दुर्ग दिसायला एकदम सुंदर अणि आकर्षक आहे पण याचसोबत हा किल्ला धोकादायक देखील आहे.
ह्या किल्ल्याची चढाई पुर्णतः उभी आहे त्यामुळे गडावर चढताना तोल जाण्याची शक्यता असते.अणि किल्ल्याच्या दोन्ही बाजूला खोल दरी असल्याने चढाई करताना आपला थोडाही तोल गेला किंवा पाय निसटला तर आपण हजारो फुट खोल इतक्या दरीत कोसळण्याची शक्यता आहे.
म्हणून कलावंतीण दुर्ग हा किल्ला भारतातील सर्वात खतरनाक किल्ला म्हणून ओळखला जातो.
भैरवगड किल्ला –
भेरवगड किल्ला हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक थरारक किल्ला आहे.
हा किल्ला साधारणतः १५०० मीटर उंचीवर बनविण्यात आला आहे.हा किल्ला बुर्ज खलिफा पेक्षा दोन पटीने अधिक उंच मानला जातो. ह्या किल्ल्यावर असलेल्या काही पायरी तुटलेल्या आहेत त्यामुळे पायरी तुटलेल्या अवस्थेत असलेल्या ह्या किल्ल्यावर चढाई करणे अत्यंत अवघड मानले जाते.