BusinessEntrepreneurshipStartup

स्वताचे पेट्रोल पंप कसे सुरू करायचे?

आपल्या दैनंदिन जीवनातील रोजच्या महत्वाच्या मुख्य गरजांमध्ये वाहनाचा देखील समावेश असतो.कारण रोज सकाळी दुर अंतरावर वेळेवर जाॅबवर जाण्यासाठी बाहेरगावी कामानिमित्त ये जा करण्यासाठी आपल्याकडे स्वताचे एक वाहन असावे लागते.

अणि वाहन चालवायचे म्हटले तर त्याला पेट्रोल डिझेलचा खर्च हा रोज आपल्याला प्रत्येकालाच करावाच लागतो.कारण पेट्रोल डिझेल ही प्रत्येक वाहनाची मुख्य गरज असते.

अशात आपण जर स्वताचा एखादा पेट्रोल पंप सुरू केला अणि वाहनचालकांची हीच मुख्य गरज पुर्ण केली तर आपण महिन्याला चांगली कमाई करू शकतो.

आजच्या लेखात आपण स्वताचे पेट्रोल पंप कसे उघडायचे हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

स्वताचा पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी पात्रतेच्या अटी काय ठेवण्यात आल्या आहेत?

स्वताचा पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी काही पात्रतेच्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत ज्या आपणास पुर्ण करणे आवश्यक आहे.

ज्याला पेट्रोल पंप सुरू करायचा आहे ती व्यक्ती भारताची नागरिक असणे आवश्यक आहे.

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी अर्ज करणारया अर्जदाराचे वय 18 ते 55 मध्ये असायला हवे.

गावात राहत असलेल्या जनरल कॅटॅगरी मधील अर्जदाराने कुठल्याही एका शाखेतुन किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तर ओबीसी एससी एसटी कॅटॅगरी मधील अर्जदाराने किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शहरी भागात पेट्रोल पंप सुरू करू इच्छित असलेल्या उमेदवाराचे किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.पण अर्जदार स्वातंत्र्य सेनानी असेल त्यांच्यावर ही शैक्षणिक पात्रता अट लागु होत नाही.

एक अर्जदार फक्त एका लोकेशनसाठी अर्ज करू शकतो.

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी किती जागेची आवश्यकता असते?

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आपल्याकडे एक जागा असणे खुप आवश्यक असते.आपल्या स्वताच्या नावावर जमीन असेल तर आपण तिच्यावर स्वताचा पेट्रोल पंप सुरू करू शकतो.

किंवा आपल्या स्वताच्या नावावर जमीन नसल्यास आपण भाडयाने देखील जमीन घेऊ शकतात.यासाठी आपल्याला त्या जमिनीच्या मालकाकडुन एक एन ओसी म्हणजे नो आॅब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यावे लागेल.

याचा अर्थ असा होतो की त्या जमिनीवर पेट्रोल पंप उघडण्याबाबद त्याचा कुठल्याही ही प्रकारचा विरोध नाहीये.

याचसोबत जमीन आपल्या एखाद्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर असेल तरी देखील आपण पेट्रोल पंप डिलरशीप करण्यासाठी अर्ज करू शकतात.

अणि समजा आपल्याकडे शेतजमीन असेल तर आपल्याला पहिले तिचे रूपांतरण करावे लागेल त्यानंतरच आपण पेट्रोल पंप डिलरशीप करण्यासाठी अर्ज करू शकतात.

ज्यांना राज्य महामार्गावर तसेच राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल पंप सुरू करायचे आहे त्यांच्याकडे कमीत कमी १२०० ते १६०० स्ववेअर मीटर इतकी जमीन असणे आवश्यक आहे.

ज्या व्यक्तींना एखाद्या शहरी भागात स्वताचा पेट्रोल पंप सुरू करायचा आहे त्यांना किमान ८०० स्ववेअर मीटर जमिनीची आवश्यकता असते.

पेट्रोल पंप डिलरशीप घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?

पेट्रोल पंप डिलरशीप घेण्यासाठी अर्ज करायला आपल्याला एका वेबसाईटवर जायचे आहे जिचे नाव पेट्रोल पंप डिलर चयन डाॅट इन असे आहे.

पेट्रोल पंप डिलर चयन डाॅट इन ह्या वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला register now ह्या बटणावर क्लिक करायचे आहे.

रेजिस्टर नाऊ वर क्लिक केल्यावर आपल्याला एक फाॅम प्राप्त होतो ज्यात आपल्याला आपले नाव,आडनाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी,जेंडर, जन्मतारीख,पॅन कार्ड नंबर इत्यादीं माहीती भरायची आहे.

अणि शेवटी दिलेला कॅपच्या कोड जसाच्या तसा भरून खाली दिलेल्या generate otp वर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपण दिलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी सेंड केला जातो.हा ओटीपी इंटर करून सबमिट करून द्यायचा आहे.

यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज येईल ज्यात असे दिलेले असेल की आपण यशस्वीरीत्या नोंदणी केली आहे.अणि आपला पासवर्ड आपल्या ईमेल आयडी वर पाठविण्यात आला आहे.

आता आपल्याला आपला ईमेल आयडी ओपन करून तो पासवर्ड बघावा लागेल अणि आपला ईमेल आयडी पासवर्ड टाकुन खाली दिलेला कॅपच्या कोड जसाच्या तसा भरून खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.

सबमिट बटणावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल.जिथे आपल्याला available advertisement असे एक आॅप्शन दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर कंपनीचे सर्व advertisement दिसुन येतील.यात आपल्याला कंपनी कुठे कुठे पेट्रोल पंप सुरू करू इच्छित आहे हे देखील दिसुन येईल.

ज्या कंपनीचे आपल्याला पेट्रोल पंप सुरू करायचे असेल ती कंपनीचे नाव आपण company ह्या पर्यायावर जाऊन निवडु शकतात.

याचसोबत state वर क्लिक करून ज्या राज्यात आपल्याला पेट्रोल पंप सुरू करायचे आहे ते राज्य निवडायचे आहे.

स्टेट पर्याय निवडल्यानंतर आपल्यासमोर त्याच राज्यातील जाहिराती येतील जिथे आपल्याला पेट्रोल पंप सुरू करायचा आहे.

आपल्याला ज्या कंपनीचे पेट्रोल पंप सुरू करायचे आहे त्या कंपनीच्या नावापुढे दिलेल्या view details पर्यायावर क्लिक करून आपण सर्व माहीती प्राप्त करू शकतो.

त्या कंपनीला आपण निवडलेल्या राज्यात कुठे कुठे पेट्रोल पंप सुरू करायचा आहे.हे देखील आपणास दिसून येते.यात आपल्याला अशाच लोकेशनसाठी अर्ज करायचा आहे जी आपल्या निवडलेल्या लोकेशनच्या आपल्या जमिनीच्या आसपास आहे.

Apple now ह्या बटणावर क्लिक केल्यावर आपल्याला फाॅम भरण्यासाठी ४० मिनिटांचा कालावधी दिला जातो.
View ह्या पर्यायावर क्लिक करून आपण अर्ज करण्याआधी पेट्रोल पंप संबंधित सर्व माहिती प्राप्त करू शकतात.

ज्यात पात्रतेच्या अटी,फी, अर्ज करण्याची प्रक्रिया इत्यादीं माहीती दिलेली असते.

Apply as मध्ये आपल्याला आपण कशापदधतीने अर्ज करतो आहे ते निवडायचे आहे.

समजा आपण एकट्याने पेट्रोल पंप सुरू करत असाल तर individual हा पर्याय निवडायचा अणि पार्टनरशिप मध्ये पेट्रोल पंप सुरू करत असाल तर पार्टनरशिप हा पर्याय निवडायचा आहे.

फाॅम अॅप्लाय करण्यासाठी आपल्याला किती फी लागेल हे देखील इथे आपणास पाहावयास मिळते.इथे आपल्याला आपली काही वैयक्तिक माहिती भरावी लागते.

उदा,आपले वैवाहिक स्टेटस, शैक्षणिक पात्रता,दहावी कुठुन उत्तीर्ण केली आहे इत्यादी माहीती भरावी लागते.

सर्व माहिती भरून झाल्यावर कंपनीच्या सर्व terms and conditions ला agree करायचे आहे ह्या टर्म कंडिशन आपण एकदा वाचुन घ्यायला हव्यात.

खाली स्क्रोल करून आल्यावर आपल्याला आपला फोटो अणि सही अपलोड करायचे आहे.अणि सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर पेमेंटचा पर्याय येईल जिथे आपल्याला निर्धारित फी भरावी लागते ही फी दहा हजार रूपये इतकी असु शकते.

अर्ज फी आपल्याला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तसेच नेटबॅकिंग दवारे देखील भरता येईल.

अशा पद्धतीने आपल्याला पेट्रोल पंप डिलरशीप प्राप्त करण्यासाठी अर्ज करायचा आहे.अर्ज केल्यानंतर पेट्रोल पंपचे अधिकारी आपल्याकडे येतील आपली जमीन अणि तिचे लोकेशन बघतील.

अणि जे काही महत्वाचे कागदपत्रे आहे जसे की एन ओसी,भाडे करार इत्यादीं सारखे महत्वाचे कागदपत्रांची तपासती करतील.मग शेवटी आपली जमीन पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी फेल किंवा पास असल्याचे कळवतील.

एक पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आपल्याला साधारणतः किती खर्च येईल?

पेट्रोल पंप हे दोन प्रकारचे असतात एक कोडो company owned dealer operated अणि दुसरा असतो डोडो dealer owned dealer operated.

कोडो मध्ये फक्त जमीन आपली असते बाकी पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी लागणारा सर्व खर्च पेट्रोल पंप कंपनी करत असतात.

डोडो मध्ये जमीन देखील आपलीच असते अणि पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी लागणारा सर्व खर्च तसेच मशिन खरेदीचा खर्च देखील आपल्यालाच करावा लागतो.

ह्या हिशोबाने विचार करायला गेले तर एक पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी १ करोड रुपये असणे आवश्यक आहे.

ज्यांच्याकडे कमीत कमीत ७० लाख ते १ करोड इतकी रक्कम गुंतवण्यासाठी आहे त्यांनीच पेट्रोल पंप डिलरशीप प्राप्त करण्यासाठी अर्ज करायला हवा.

एक पेट्रोल पंप सुरू करून आपण किती पैसे कमवु शकतो?

पेट्रोल पंप मध्ये आपली जी काही कमाई होत असते ती कमिशनच्या आधारावर होत असते.हया व्यवसायात पेट्रोल पंप कंपनी कडुन आपल्याला कुठलेही मासिक वेतन दिले जात नाही.

जितक्या लीटर पेट्रोल डिझेलची विक्री आपण करत असतो त्यावरच आपल्याला यात कमिशन प्राप्त होत असते.

यातही पेट्रोल अणि डिझेल या दोघांवर वेगवेगळ्या प्रकारचे कमिशन रेट असतात.साधारणत एक लीटर पेट्रोल विक्री केल्यावर आपल्याला ३ रूपये सात पैसे इतके कमिशन प्राप्त होत असते.

याचठिकाणी एक लीटर डिझेलची विक्री केल्यास आपल्याला २ रूपये इतके कमिशन प्राप्त होत असते.

या हिशोबाने समजा एका महिन्यात जर आपण ४० हजार लिटर पेट्रोल विक्री केली तर आपली महिन्याची कमाई १ लाख २२ हजार ८०० रूपये इतकी होती.

अणि एक लाख ५० हजार लीटर डिझेलची दोन रूपये कमिशन प्रमाणे विक्री केल्यास आपल्याला ३ लाखापर्यंतची कमाई ह्या व्यवसायातुन करता येईल.

म्हणजे एकुण पेट्रोल आणि डिझेल दोघांचे मिळुन आपली महिन्याची कमाई ४ लाख २२ हजार आठशे रूपये इतकी होईल.

यात आपल्याला एक लाखापर्यंत मेंटेनन्सचा खर्च करावा लागला तरी देखील आपल्याकडे ३ लाख २२ हजार रुपये शिल्लक राहतात.

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी प्लॅनिंग कशी करायची?

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्लॅनिंग करावी लागेल.समजा आपल्याकडे एकट्याला गुंतवण्यासाठी एक करोड रुपये असतील तर आपण एकट्याने देखील पेट्रोल पंप सुरू करू शकतो.

पण समजा आपल्याकडे एकट्याने भरण्यासाठी एवढी रक्कम नसेल तर आपण पार्टनरशिप मध्ये देखील पेट्रोल पंप सुरू करू शकतो.

समजा आपण पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी तीन पार्टनर सोबत घेतले तर तिघे मिळून दोन करोड रुपये आपण जमवू शकतात.

याचसोबत आपल्याला पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी योग्य ती लोकेशन निवडावी लागेल यासाठी आपल्याला पेट्रोल पंप कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बघावे लागेल की पेट्रोल पंप कंपनीने कोणकोणत्या लोकेशनसाठी डिलरशीपसाठी जाहीराती काढल्या आहेत.

अणि मग त्याच लोकेशनवर आपण जमीन खरेदी करायला हवी किंवा भाड्याने खरेदी करायला हवी.जमीन भाडयावर घेताना जमिनीच्या मालकाकडुन एक एन ओसी लिहुन घ्यायला हवे.

ज्यात असे लिहिलेले असेल की त्याची ही जमीन पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी भाड्याने देण्यास त्याची कुठलीही हरकत नाहीये.

यानंतर आपण पेट्रोल पंप कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पेट्रोल पंप डिलरशीप प्राप्त करण्यासाठी अर्ज करू शकतात.यात आपल्याला दहा हजार रूपये पर्यंत फी देखील भरावी लागते.अर्ज फी भरण्यासोबत आपल्याला ठाराविक लायसन्स फी देखील भरावी लागते.

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आपल्याला जे लायसन्स लागते त्यासाठी आपल्याला आॅनलाईन देखील अर्ज करता येतो.

पेट्रोल पंप डिलरशीप प्राप्त करण्यासाठी अर्ज केल्यानंतर कंपनीकडून काही अधिकारी चौकशी करण्यासाठी आपल्याकडे येतील.

ज्यात ते आपले पेट्रोल पंप सुरू करायचे लोकेशन जमीन तसेच इतर महत्वाचे कागदपत्रे देखील तपासतील.पेट्रोल पंप डिलरशीप प्राप्त करण्यासाठी आपल्याला वरून इतरत्र पैसे देखील द्यावे लागण्याची शक्यता असते.

भारतात डिलरशीप घेण्यासाठी कोणकोणत्या कंपनीचे पेट्रोल पंप उपलब्ध आहेत?

भारतात खाली दिलेल्या काही तेल कंपन्यांचे पेट्रोल पंप डिलरशीप घेण्यासाठी उपलब्ध आहेत.ह्या सर्व कंपन्या आपापली फ्रेंचाइजी देत असतात ज्या विषयी माहिती ते आपल्या अधिकृत संकेतस्थळावर देखील देत असतात.

ह्या सर्व कंपन्या पेट्रोल पंप फ्रेंचाइजी देण्यासाठी त्यांच्या वेबसाईटसवर जाहीरात देत असतात.हया सर्व कंपनीचे पेट्रोल पंप डिलरशीप देण्यासाठी आपापले नियम अटी असतात ज्यांचे आपल्याला पालन करावे लागते.

हे नियम अटी जाणुन घेण्यासाठी आपण प्रत्येक पेट्रोल पंप कंपनीच्या वेबसाइटवर जाऊ शकता किंवा त्यांना त्यांच्या टोल फ्री नंबरवर फोन करून ही सर्व माहिती प्राप्त करता येते.

सर्व पेट्रोल पंप कंपन्या आपापल्या डिलरशीप घेण्यासाठी निर्धारीत केलेल्या अटी नियमांमध्ये वेळोवेळी बदल देखील करत असतात.

इसर

एच पी

भारत पेट्रोलियम

इंडियन आॅईल

रिलायन्स

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे –

जमीनीचे सर्व कायदेशीर कागदपत्रे

भाड्याच्या जमीनीवर पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी रेंट अॅग्रीमेंट

जमीन मालकाचे एन ओसी सर्टिफिकेट

पेट्रोल पंप व्यवसायात येत असलेल्या अडचणी –

कधी कधी असे होते की आपण दुसरीकडुन आपल्या पंपावर विक्रीसाठी पेट्रोल मागवत असतो अणि त्यानंतर पेट्रोलच्या भावात अचानक वाढ होत असते.

अशा वेळी होते असे की आपण कमी दरात पेट्रोल मागविले असते आणि त्यातही अजुन दर कमी झाले तर आपल्याला चांगला नफा प्राप्त होत असतो.कारण आपल्याला चांगला प्राॅफिट मार्जिन प्राप्त होत असतो.

पण काही वेळा असे देखील होते की आपण ज्या किंमतीला पेट्रोल विक्रीसाठी आणले आहे त्यापेक्षा रेट कमी झाले तर आपल्याला कमी पेट्रोल विक्री करावी लागते ज्यामुळे आपल्याला तोटा सहन करावा लागतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button