BusinessEntrepreneurshipStartup

पाणीपुरीचा व्यवसाय कसा सुरु करायचा?

रोज संध्याकाळी पाच वाजेनंतर रस्त्यावरुन आपल्याला पाणीपुरीची गाडी ठिकठिकाणी उभी असलेली दिसत असते.

आज जवळजवळ आपल्याला प्रत्येकालाच रस्त्यावरील पाणी पुरी खायला खुप आवडते. रस्त्यावर पाणीपुरीची गाडी पाहिल्यावर पाणी पुरी खाण्यासाठी आपल्या तोंडाला अक्षरश पाणी सुटत असते.

आज जागोजागी पाणीपुरीची मागणी ही दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. आज हजारो तसेच लाखो लोक पाणीपुरी खाण्यासाठी पाणीपुरीच्या गाडीवर अक्षरश नंबर लावून उभे असतात.

पाणीपुरी हा असा खाद्य पदार्थ आहे जो खाऊन आपले पोट तर भरून जाते पण मन भरता भरत नसते. पाणी पुरी हया वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. ज्यात गोड पाणीपुरी,तिखट पाणीपुरी इत्यादींचा समावेश होतो.

रस्त्यावर विक्री करण्यात येत असलेल्या महत्वाच्या खाद्य पदार्थांमध्ये पाणीपुरी हा एक असा महत्वाचा पदार्थ आहे ज्याला स्ट्रीट फूड असे देखील म्हटले जाते.

पाणीपुरी हा एक असा व्यवसाय आहे जो दीर्घकालीन चालतो ज्यात आपण फक्त १० हजाराची गुंतवणूक करून महिन्याला ३० हजारांपर्यंत कमवू शकतो.

पाणीपुरी हा आपल्याला दिसायला एक छोटासा व्यवसाय वाटतो पण हा व्यवसाय आपण कमी भांडवलाची गुंतवणूक करून करू शकतो अणि यात खुप कमी वेळात आपण जास्त नफा प्राप्त करू शकतो.यामुळे जास्तीत जास्त व्यक्ती हा व्यवसाय करण्याकडे वळत आहेत.

पाणीपुरी व्यवसायाची लोकप्रियता बघता आज अनेक मोठमोठ्या ब्रँडेड कंपन्या ह्या व्यवसायात उतरताना आपणास दिसुन येत आहे.

पाणीपुरी हा व्यवसाय आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. आपण पाणीपुरीचे फुलके तयार करण्याचा होलसेल व्यवसाय करू शकतो.

किंवा आपण पाणीपुरीचे फुलके होलसेलर कडुन खरेदी करून रिटेलरला विकु शकतो. याचसोबत आपण बाजारात पाणीपुरीचा एखादा स्टाॅल देखील लावू शकतो.

पाणीपुरीला आपण अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखतो उदा पाणीपुरी,गोलगप्पे,फुलका इत्यादी.

आपल्या भारत देशात असे कुठलेही ठिकाण नाही जिथे हा व्यवसाय केला जात नाही.आज शहर गावातील रस्ते गल्लीबोळात तसेच मोठमोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये देखील हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

पाणीपुरी हा व्यवसाय आज कोणीही सुरू करू शकते.कारण हा व्यवसाय करण्यासाठी कुठल्याही डिग्रीची तसेच जास्त मोठ्या जागेची आवश्यकता नसते.

पाणीपुरीचा व्यवसाय सुरू करताना आपण काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.पाणीपुरी मध्ये सगळ्यात महत्वाचे असते पाणीपुरी मधील चविष्ट पाणी.

ज्या व्यक्तींना पाणीपुरीसाठी चविष्ट पाणी बनवता येत असेल अशा व्यक्तींचा व्यवसाय खुप मोठ्या प्रमाणात चालतो.

सध्या आपल्या व्यवसायात नवीनपणा आणण्यासाठी पाणीपुरी विक्रेते वेगवेगळ्या चवीचे पाणी तयार करताना दिसुन येतात.

यात लसुनचे पाणी,जिरयाचे पाणी,तिखट मिरची,गोड चटणी,खारट गोड चटणी इत्यादींचे पाणीचा वापर पाणीपुरी विक्रेते पाणीपुरी मध्ये करत असतात.

पाणीपुरी बनवण्यासाठी लागणारे मशिन

पाणीपुरीचे फुलके तयार करण्यासाठी आपल्याला दोन प्रकारच्या मशिनची आवश्यकता असते.यात एक मशिन असते आटा मिक्सर ज्यात पीठ अणि मैदयाला मिळून मळुन घेतले जाते.

अणि दुसरे मशिन असते पाणीपुरी बनवण्याचे मशिन.पाणीपुरी मेकिंग मशिनद्वारे पाणीपुरी बनवण्याचे काम केले जाते.

पाणीपुरी बनवण्यासाठी लागणारे पाणीपुरी मेकिंग मशिन आपल्याला बाजारात आज सहजरीत्या उपलब्ध होत असते.आज शहरात ह्या मशिनचे अनेक होलसेल विक्रेते आहेत.

ह्या सर्व पाणीपरी मेकिंग मशिनच्या होलसेल विक्रेत्यांकडून आपण हे मशिन खरेदी करू शकतो.किंवा पाणीपुरी मेकिंग मशिनची मॅन्युफॅक्चरींग करत असलेल्या कंपनीकडून देखील आपण हे मशिन खरेदी करू शकता.

पाणीपुरी मेकिंग मशिन आपणास अॅमेझाॅन इंडिया मार्ट सारख्या वेबसाईटवर आॅनलाईन देखील सर्च करू शकतो.यात आपल्याला आपल्या बजेटनुसार जे मशिन योग्य वाटेल त्याची खरेदी आपणास करता येईल.

पाणीपुरी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल

पाणीपुरी बनवण्यासाठी आपल्याला काही कच्च्या मालाची देखील आवश्यकता असते.

पाणीपुरी तयार करण्याच्या कच्च्या मालामध्ये पीठ,मैदा,रवा अणि पाण्याची आवश्यकता असते.याचसोबत पाणीपुरी बनवण्यासाठी कमर्शियल इलेक्ट्रिक कनेक्शन अणि पाणीपुरी बनवण्यासाठी दोन तीन कर्मचारी वर्गाची देखील आवश्यकता असते.

पाणीपुरी हा व्यवसाय ज्यांना पाणीपुरीचा स्टाॅल लावून सुरू करायचा आहे.त्यांना पाणीपुरीच्या फुलक्यांचे पॅकेज,बटाटा, पाणीपुरी मसाला,कांदे,हिरवी मिरची,चिंच,मीठ इत्यादींची आवश्यकता असेल.

याचसोबत आपल्याला ज्या प्रकारचे पाणीपुरीचे पाणी बनवायचे आहे.त्याप्रकारच्या सामग्रीची आवश्यकता आहे.

पाणी मेकिंग बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा एकुण खर्च

पाणी पुरी बनवण्याचा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू करण्यासाठी आपल्याला साधारणतः ५० हजारांची आवश्यकता आपल्याला आहे.

यात आपल्याला छोट्या आकाराचे पाणीपुरी मेकिंग मशिन,आटा मिक्सर मशिन खरेदी करता येईल.

याचठिकाणी पाणीपुरीचा व्यवसाय मोठ्या पातळीवर सुरू करण्यासाठी आपल्याला मोठ्या आकाराचे जास्त किंमत असलेले पाणीपुरी मेकिंग मशिन,आटा मिक्सर मशिन खरेदी करावे लागेल.

याचसोबत पाणी पुरी व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतलेल्या जागेचे भाडे अणि वीजेचे बील देखील आपणास भरावे लागते.

पाणीपुरी हा व्यवसाय सुरूवातीला स्टाॅल लावून सुरू करण्यासाठी आपल्याला सुरूवातीलाच पैशांची आवश्यकता भासते.याचसोबत रोज माल तयार करण्यासाठी लागत असलेल्या आवश्यक वस्तुंची खरेदी करायला अजुन थोडे पैसे लागु शकतात.

पाणीपुरी हा व्यवसाय करण्यासाठी आपण जेवढा माल खरेदी करतो ज्या दिवशी आपण माल खरेदी केला त्याचदिवशी आपण गुंतवलेले पैसे यात वसुल देखील होऊन जातात.

पाणी पुरी व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य जागेची निवड

आपला पाणीपुरीचा व्यवसाय अधिक जोरात चालावा अणि आपली जास्तीत जास्त कमाई व्हावी म्हणून आपण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अशा जागेची निवड करायला हवी जिथे आपला जास्तीत जास्त धंदा होऊन कमाई देखील होईल.

पाणी पुरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण रेल्वे स्टेशन,बस स्थानक,मार्केट परिसर,शाळा महाविद्यालय सिनेमा गृह परिसर अशा जास्तीत जास्त गर्दी होत असलेल्या ठिकाणांची निवड करायला हवी.

कारण ह्या व्यवसायात आपल्याला होणारा नफा दिवसभरात आपली किती पाणीपुरीची विक्री होते यावर अवलंबून असतो.

पाणीपुरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स :

पाणीपुरी बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण होलसेल मार्केट मधून कच्चा मालाची ठोक भावात खरेदी करायला हवी.याने आपल्या पैशांची बचत होत असते.

ज्या व्यक्तींना पाणीपुरीचा स्टाॅल लावून हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी पाणीपुरीचे फुलके घरीच तयार न करता मार्केट मधील रेडीमेड फुलके खरेदी करायला हवे.

फक्त ह्या फुलक्यांचे पॅकेज खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी एकाचवेळी खुप जास्त पॅकेट खरेदी करणे टाळावे कारण जास्त काळ पडुन राहील्याने यातुन वास यायला सुरुवात होऊ शकते.शिवाय पाणीपुरीची चव देखील खराब लागते.

पाणीपुरीचे पाणी तयार करण्यासाठी आपल्याला चिंचेच्या पाण्याची विशेष आवश्यकता असते.आॅफ सिजन मध्ये चिंच उपलब्ध होत नसल्याने सिजन मध्ये जास्तीत जास्त चिंच खरेदी करून ठेवावे.म्हणजे ऐनवेळी आपली चिंचेसाठी फसगत होत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button