घरगुती कॅन्टीनचा व्यवसाय कसा सुरु करायचा?

आजच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करत असलेल्या व्यक्तींना आपल्या कामामुळे स्वतासाठी जेवण बनवायला देखील वेळ मिळत नाही.
एवढेच नव्हे तर कामाचा व्याप जास्त असल्याने दुपारच्या सुट्टीत स्वताच्या घरी जाऊन जेवण करण्याची तसेच एखाद्या रेस्टाॅरंट मध्ये जाऊन जेवण करण्या इतका वेळ देखील त्यांना मिळत नाही.
अशा गरजु नोकरदार व्यक्तींसाठी आपण होम कॅन्टीनची सर्विस उपलब्ध करून देऊ शकतो.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला एखाद्या गर्दीच्या ठिकाणी दुकान देखील उघडण्याची आवश्यकता नसते.
कारण ह्या व्यवसायात आपण आपल्या सर्व कस्टमरला त्यांच्या राहत्या ठिकाणी आॅफिसात जाऊन जेवणाचा डबा पोहचवत असतो.
ह्या व्यवसायात आपल्याला आपल्या सर्व कस्टमरला त्यांच्या राहत्या ठिकाणी आॅफिस कंपनी मध्ये जाऊन डबे पोहोचवण्यासाठी काही डिलीव्हरी बाॅयची आवश्यकता भासु शकते.
सुरूवातीला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण एक दोन स्टाफला कामावर चालेल जसजशी आपल्या कमाई मध्ये कस्टमरच्या संख्येत वाढ होईल तसतसे आपण आपल्या स्टाफ मध्ये देखील वाढ करू शकतो.
ह्या व्यवसायात आपल्याला कस्टमर शोधण्याची आवश्यकता देखील नसते.कारण यात टार्गेट कस्टमर आधीपासूनच आपल्याकडे उपलब्ध असतात.
होम कॅन्टीनचा व्यवसाय आपण आपल्या घरातुन देखील सुरू करू शकतात.यात कमाई देखील चांगली होते.
होम कॅन्टीनचा व्यवसाय कसा सुरु करायचा?
होम कॅन्टीनचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या शहरातील आजुबाजुच्या परिसरातील कार्यालयांची माहीती प्राप्त करावी लागेल.
ह्या सर्व आॅफिसेसला आपण आपल्या व्हाटस अप वरून आपल्या होम कॅन्टीन सर्विस विषयी माहिती देऊ शकतो.
आपण आपल्या आजुबाजुच्या परिसरातील आॅफिसेसला होम कॅन्टीन सर्विसचे एक प्रपोजल देऊ शकतो.
किंवा मोकळ्या वेळात आॅफिसात जाऊन आपण याविषयी बोलू शकतो की जेव्हा तुमच्या आॅफिस मधील कर्मचारींना घरगुती जेवणाची आवश्यकता असेल आपण आमच्याशी संपर्क साधु शकतात.आमच्याकडे होम कॅन्टीनची सर्विस दिली जाते.
आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी वेगवेगळ्या सोशल मिडिया नेटवर्क वर आपल्या होम कॅन्टीन सर्विसेसचे प्रमोशन करू शकतो.आपल्या होम कॅन्टीन सर्विसेसचे पॅम्पलेट छापुन आपल्या आसपासच्या परिसरातील सर्व आॅफिस मध्ये वाटु शकतो
जेव्हा एखाद्या आॅफिस मधील काम करणारया कर्मचारींना कामाच्या अधिक व्यापामुळे घरी तसेच एखाद्या रेस्टाॅरंट मध्ये जेवणासाठी जाता येणार नाही.तेव्हा ते कर्मचारी घरगुती स्वरुपाचे जेवण प्राप्त करण्यासाठी होम कॅन्टीन सर्विस घेण्याकरीता आपल्याशी संपर्क साधतील.
सुरूवातीला आपण आपल्या होम कॅन्टीनचे रेट कमी ठेवायला हवे जेणेकरून प्रत्येक सर्वसामान्य नोकरदार व्यक्तींना आपली सर्विस घेता येईल.
पुढे जाऊन आपल्या व्यवसायात वाढ झाल्यावर आपण आपल्या रेटमध्ये वाढ देखील करू शकतो.
होम कॅन्टीनचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते?
होम कॅन्टीनचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला आपला टार्गेट कस्टमर कोण आहे त्याची मागणी काय आहे हे समजून घ्यावे लागेल मग त्यानुसार आपला मेन्यु ठरवावा लागेल.
आपल्याला कोणकोणते अन्नपदार्थ उत्तम बनवता येतात.आपण आपल्या कस्टमरला ब्रेक फास्ट,लंच, डिनर मध्ये कोणकोणते अन्न पदार्थ खाऊ घालतो.
हे सर्व काही आपल्याला आपल्या मेन्यु मध्ये मेंशन करणे आवश्यक आहे.
याचसोबत आपल्या होम कॅन्टीन मधील आयटम्स मध्ये काॅलिटी असायला हवी.कारण आपल्या खाण्यात काॅलिटी असेल तर लोक लांब अंतरावरून देखील आपल्या खाण्याची चव घेण्यासाठी येतात.
आपण आपल्या व्यवसायाला डिजीटली घेऊन जाण्यासाठी आपल्या व्यवसायाची एक आॅफिशिअल वेबसाईट तसेच अॅप बनवू शकतो.
आपण आपल्या होम कॅन्टीन दवारे आॅफिस मधील कर्मचारींना सकाळचा नाश्ता दुपारचे रात्रीचे जेवण उपलब्ध करून देऊ शकतात.
होम कॅन्टीनची सर्विस कोणाला देता येईल?
ज्या आॅफिस मधील काम करणारया कर्मचारींना कामाच्या अधिक व्यापामुळे घरी जेवायला जाण्यासाठी वेळ मिळत नाही.रेस्टाॅरंट मध्ये देखील जेवायला जाता येत नाही.
तसेच सकाळी नोकरीवर जाण्याच्या घाई गडबडीत वेळेच्या अभावामुळे स्वतासाठी नाश्ता देखील बनवता येत नाही अशा गरजु नोकरदार व्यक्तींसाठी आपण होम कॅन्टीनची सर्विस देऊ शकतात.
ज्या व्यक्तींना कामाच्या अधिक व्यापामुळे घरचे जेवण खायला मिळत नाही अशा व्यक्तींना आपण घरगुती स्वरूपाचे जेवण उपलब्ध करून देऊन चांगली कमाई करू शकतो.
होम कॅन्टीनच्या व्यवसायात किती कमाई होते?
छोट्या पातळीवर सुरू केल्यावर होम कॅन्टीनच्या व्यवसायात आपण सुरूवातीला महिन्याला २५ ते ३० हजार रुपये इतकी कमाई करू शकतो.
याचठिकाणी आपण जर हा व्यवसाय मोठ्या पातळीवर सुरू केला तर आपण महिन्याला दोन ते तीन लाखापर्यंत दरमहिन्याला कमाई करू शकतो.
आपण आपल्या क्लाईंटला कोणत्या प्रकारची सर्विस देत आहोत यावर देखील आपली कमाई ह्या व्यवसायात अवलंबून असते.