BusinessEntrepreneurshipStartup

कार भाड्याने देण्याचा व्यवसाय कसा सुरु करायचा ?

कार भाड्याने देणे हा व्यवसाय आज मोठ्या शहरांपासून छोट्या शहरांपर्यंत पोहोचलेला आपणास दिसून येत आहे.कारण सध्या प्रत्येकाला सुखवस्तू जीवन जगण्याची सवय झाली आहे. याआधी जेव्हा लोकांना कुठे जायचे असायचे लोक बस टॅक्सी किंवा ऑटो करायचे.पण आता जेव्हा लोकांना कुटुंबासमवेत किंवा मित्रांसोबत कुठे बाहेर फिरायला जायचे असेल तेव्हा ते बसने टॅक्सीने न जाता कार भाड्याने घेणे अधिक पसंद करतात.हेच कारण आहे की दिवसेंदिवस कार भाड्याने घेत असलेल्या ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस अधिक वाढ होताना दिसुन येत आहे.कारने प्रवास करणे हे इतर वाहनांच्या तुलनेत प्रवास करण्यापेक्षा अधिक सोयीस्कर अणि आरामदायी ठरते.अणि कारने प्रवास करण्याचा अजुन एक फायदा आहे तो म्हणजे आपल्याला आरामात एसी मध्ये बसुन आपल्या गंतव्य स्थानी थेट सुखरूप पोहोचता देखील येते.

कारण इतर वाहनांने बसने,टॅक्सीने,रिक्षाने प्रवास केल्यास ते आपल्याला फक्त बस स्टॅड, रिक्षा स्टँड तसेच शहरातील चौकापर्यंत सोडत असतात अणि सोडुन निघून जात असतात. यानंतर आपल्याला काही अंतर पायी चालत जावे लागते.पण कारचे तसे नसते कार भाड्याने घेतल्यास आपल्याला जिथे जायचे तिथे आपण कारमध्ये थेट आरामात बसुन जाऊ शकतो अणि आपली कामे आटोपून पुन्हा नातलग वगैरेंना भेटुन त्याच कारने बसुन आपल्या घरी वापस येऊ शकतो.जे लोक एका ठिकाणाहून शहरातुन दुसऱ्या शहरात,ठिकाणी पर्यटनासाठी आलेले असतात असे लोक देखील फिरण्यासाठी कार भाड्याने घेत असतात.

कार भाड्याने देण्याचा व्यवसाय म्हणजे नेमकी काय?

ज्या व्यक्तींना एका शहरातुन दुसऱ्या शहरात काही शासकीय कामानिमित्त जायचे असते किंवा कुटुंबासमवेत नातलगांना भेटायला, एखाद्या पर्यटन स्थळी फिरायला जायचे असते असे व्यक्ती कार भाड्याने घेत असतात. साधारणतः कार आपण तेव्हाच भाड्याने घेत असतो जेव्हा आपल्याला आपल्या फॅमिली सोबत कुठे बाहेर फिरायला जायचे असते. आज विविध कंपन्या आपल्या कंपनीत काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाला ऑफिस मधुन पिक अप तसेच ड्राॅप करण्यासाठी कार भाड्याने घेत असतात. आज आपण ओला उबर (ola , uber )सारख्या कार भाड्याने देत असलेल्या कंपनीच्या माध्यमातून देखील आपली कार इतरांना चालवण्यासाठी भाड्याने देऊन कार रेंटलचा व्यवसाय करू शकतो. आज वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आलेले पर्यटक देखील ड्राईव्हरची सुविधा न घेता पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी स्वता चालवता यावी म्हणून कार भाड्याने घेत असतात.

कार भाड्याने देण्याचा व्यवसाय बाजारात चालण्याची शक्यता

कार भाड्याने देण्याच्या व्यवसायात आज दिवसेंदिवस स्पर्धा वाढताना आपणास दिसून येते आहे. पण असे असुनही ज्या शहरी भागात लोकांची अधिक वर्दळ असते अशा ठिकाणी हा व्यवसाय जोरात चालण्याची शक्यता आहे अणि शहरी भागातील मोठमोठ्या कंपनीत काम करून उच्च वेतन प्राप्त करत असलेल्या नोकरदार व्यक्तींना आपल्या वाढत्या उपन्नामुळे तसेच उच्च राहणीमानामुळे घर कार नोकरचाकर इत्यादी अशा सुखवस्तूंची सवय झाली असल्याने ते प्रवास करण्यासाठी टॅक्सी रिक्षा बस इत्यादी सार्वजनिक,मध्यमवर्गीय लोक वापरत असलेल्या वाहनांचा वापर न करता जास्त भीडभाड नसलेल्या खाजगी वाहनांचा म्हणजे कारचा वापर करणे अधिक पसंत करतात.

आज आपण ओला,उबर सारख्या कार भाड्याने घेत असलेल्या कंपनीच्या माध्यमातून आपला कार भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू करू शकतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण सुरूवातीला एक दोन कार भाड्याने दिल्या तरी चालेल.

कार भाड्याने देण्याचा व्यवसाय कसा सुरु करायचा?

कार भाड्याने देण्याचा व्यवसाय आपण सुरूवातीला एक किंवा दोन कार भाड्याने देऊन सुद्धा सुरू करू शकतो.

१) सर्वप्रथम आपल्या बिझनेस माॅडेलची निवड करावी

कार भाड्याने देण्याच्या व्यवसायात व्यवसायाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत यात आपण स्वताच्या दोन तीन कार खरेदी करू शकतो अणि एखाद्या चांगल्या ड्राईव्हरला कार चालविण्यासाठी नियुक्त करून उबर ओला सारख्या कार भाड्याने देत असलेल्या कंपनीकडे भाड्याने चालविण्यासाठी आपली खरेदी केलेली कार देऊ शकतो. किंवा कार भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण स्वताची कार भाड्याने देणारी एखादी कंपनी सुरू करून योग्य तो स्टाफ कामासाठी निवडुन आपले स्वताचे बिझनेस रेजिस्ट्रेशन करू शकतो. याचसोबत कार भाड्याने देण्याच्या व्यवसायात आपण स्वताच्या कंपनीच्या नावाने रेजिस्ट्रेशन करू शकतो.अणि इतर कार मालकांच्या कार आपल्या कंपनीसोबत जोडुन कमिशनच्या माध्यमातून चांगले उत्पन्न प्राप्त करू शकतो. कार भाड्याने देण्याचा व्यवसाय आपण एखाद्या पर्यटन स्थळी देखील सुरू करू शकतो. यात आपण बाहेर गावाहून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना कार भाड्याने उपलब्ध करून देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या बिझनेस माॅडेलचा वापर करून कार भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू करू शकतो.यात आपल्याला कोणते बिझनेस मॉडेल निवडुन आपला उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे हे आपल्यावर अवलंबून असते.

२) कार भाड्याने देण्याच्या व्यवसायाकरीता एक बिझनेस प्लॅन तयार करणे

कुठल्याही व्यवसायात अधिक यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्या व्यवसायाचे बिझनेस प्लॅनिंग करणे खुप आवश्यक असते. यात आपल्याला कशा पद्धतीने कार भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू करावयाचा आहे?त्यासाठी आपल्याला किती भांडवलाची आवश्यकता आहे?ह्या व्यवसायातुन आपण साधारणतः‌ किती कमाई करू शकतो ह्या सर्व गोष्टींचे एक नियोजन करावे लागेल.

३) व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा खर्च जमवणे वित्त प्रबंधन करणे

जेव्हा आपण आपल्या कार भाड्याने देण्याच्या व्यवसायाकरीता एक प्रभावी योजना तयार करत असतो तेव्हा त्या योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालाच्या माध्यमातून आपल्याला त्या व्यवसायाची अंदाजे किंमत समजु शकते. म्हणुन ह्या प्रकल्प अहवालाच्या नुसार आपल्याला आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी वित्त व्यवस्थापन करावे लागेल. अणि समजा आपण वित्त व्यवस्थापन करण्यासाठी एखाद्या फायनान्स कंपनी कडुन बिझनेस लोन घेत असाल तर त्या बॅकेत लोनसाठी अर्ज करण्याअगोदर आपण सदर बॅक उद्योजकांसाठी कोणकोणत्या योजना राबवते आहे याची माहिती काढायला हवी.कारण उद्योजकतेला अधिक चालना प्राप्त व्हावी म्हणून लोकांना प्रोत्साहन प्राप्त करून देण्यासाठी शासनाकडून काही अनुदान देखील दिले जात आहे.

याचसोबत आपण आपल्या उद्योग व्यवसायाकरीता देवदुत गुंतवणूकदार,उद्यम भांडवलदार,इत्यादींची निवड करू शकतो किंवा क्राऊड फंडिग दवारे देखील व्यवसायासाठी आवश्यक तो निधी गोळा करू शकतात.

४) कार रेंटलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक ऑफिस भाडयाने घेणे

कार रेंटलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला एखादे ऑफिस देखील भाडयावर घ्यावे लागेल जेणेकरून ग्राहकांना आपल्याशी आपल्या कार्यालयात येऊन थेट संपर्क साधता येईल.याचसोबत आपल्या ह्याच व्यवसायाच्या कार्यालयाचा पत्ता आपण लायसन्स तसेच नोंदणीसाठी अर्ज करायला देखील वापरू शकतो.आपल्या व्यवसायाचे एक अधिकृत कार्यालय असल्याने लोक फोन करून केव्हाही कार भाड्याने घेण्यासाठी बुकिंग करू शकतात.अणि कार रेंटलचा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपले स्वताचे एक कार्यालय असल्यास ग्राहकांचा आपल्यावरील आपल्या व्यवसाया बद्दल विश्वास अधिकाधिक वाढतो.

५) कार रेंटलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक लायसन्स अणि रेजिस्ट्रेशन

कार रेंटलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला आपल्या बिझनेस मॉडेल नुसार आवश्यक ते लायसन्स प्राप्त करावे लागेल तसेच आपल्या व्यवसायाचे रेजिस्ट्रेशन देखील करावे लागणार आहे. कार रेंटलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे वाहनाशी संबंधित सर्व महत्वाची कागदपत्रे असावी लागतात. ज्यात नोंदणी प्रमाणपत्र,विमा,प्रदुषण,टॅक्स इत्यादी महत्वाची कागदपत्रांचा समावेश होत असतो.याचसोबत आपण सर्व वाहनांची व्यावसायिक नोंदणी देखील केलेली असावी. आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायाची महानगरपालिका, नगरपालिका इत्यादी सारख्या स्थानिक प्राधिकरणाकडे नोंदणी देखील करावी लागते.कर नियमानुसार कर नोंदणी करावी लागु शकते.

६) कार भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कार खरेदी करणे

कार भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम किमान दोन तीन नवीन कार खरेदी कराव्या लागतील.किंवा आपण ह्या व्यवसायासाठी चांगल्या स्थितीत असलेल्या जुन्या कार देखील कमी किंमतीत खरेदी करू शकतो.

७) आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करणे

आपल्याकडे कार भाड्याने दिली जाते हे लोकांना कळावे म्हणून आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायाचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माऊथ पब्लिसिटी करून तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातुन प्रचार करावा लागेल.याचसोबत आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात देखील वर्तमानपत्रात टिव्ही इत्यादी वर देऊ शकतो.

८) स्वताची एखादी वेबसाइट किंवा अँप लाॅच करणे

आपल्याकडे जास्तीत जास्त लोकांनी कार बुक केली पाहिजे यासाठी आपल्याला एक बुकिंग सिस्टम तयार करणे आवश्यक आहे.

लोकांना घरबसल्या मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याकडे कार भाड्याने बुक करता यावी यासाठी आपण एखादी वेबसाइट किंवा अॅप लाॅच करू शकतो.ज्यादवारे लोक आपल्याकडे कार बुक करू शकतात.आपण वेगवेगळ्या सोशल मीडियावर कार बुकिंगसाठी कस्टमरला आपल्या वेबसाईटची अॅपची कार बुकिंग लिंक उपलब्ध करून देऊ शकतो.ग्राहकाने कार बुक केल्यानंतर किती वेळात कार त्यांच्यापर्यंत पोहोचेल,किती तास कार भाड्याने घेतल्यास ग्राहकाला किती पैसे भरावे लागणार ह्या सर्व गोष्टी आपण कस्टमरला आपल्या व्यवसायातील नियमांदवारे आधीपासून कळवणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button