नाश्त्याचे दुकान कसे सुरू करायचे?

कमी शिक्षण झालेल्या उच्च शिक्षण प्राप्त न केलेल्या व्यक्तींमध्ये नेहमी आपल्याला एक समस्या पाहावयास मिळते.
कमी शिक्षण झालेले असल्यामुळे त्यांच्याकडे कुठलीही डिग्री नसते अणि जवळ डिग्री नसल्याने त्यांना नोकरी प्राप्त होत नसते.
अशावेळी असे व्यक्ती पैसे कमविण्याचे एक असे साधन तसेच माध्यम शोधत असतात ज्याद्वारे ते आपला उदरनिर्वाह करू शकतात.
आज आम्ही तुम्हाला एक अशा व्यवसायाविषयी माहिती देणार आहोत ज्याची बाजारात मागणी अधिक आहे अणि ज्याच्या दवारे आपण कमी शिक्षण असताना जवळ कुठलीही डिग्री नसताना देखील भरपूर पैसे कमवू शकता.
अणि हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला जास्त गुंतवणूक करण्याची देखील आवश्यकता नसते.ह्या कमी गुंतवणूक करून जास्त नफा प्राप्त करून देत असलेल्या व्यवसायाचे नाव आहे नाश्त्याचे दुकान.
आज आपल्याला प्रत्येकाला सकाळी झोपेतून उठल्यावर अंघोळ वगैरे करून फ्रेश कपडे परिधान करून झाल्यावर चहा नाश्ता करण्याची सवय आहे.
एका अहवालानुसार असे समोर आले आहे की भारत देशातील ९० टक्के लोकांना रोज सकाळी नाश्ता करण्याची सवय आहे.
सकाळच्या वेळी आपल्याला प्रत्येकाला नोकरीवर जाण्याची घाई असते आॅफिसात रोज सकाळी लवकर पोहोचण्याच्या लगबगीत कित्येक नोकरदार व्यक्तींना घरून नाश्ता करायला देखील वेळ मिळत नाही.
काही नोकरदार व्यक्ती असे देखील असतात जे बाहेरगावी नोकरी करत असतात,गावाकडुन शहरी भागात नोकरी करण्यासाठी आलेले असतात.ते रूम करून राहत असतात अणि त्यांना स्वयंपाक येत नसल्याने स्वतासाठी सकाळी नाश्ता देखील बनवता येत नसतो.
अशा गरजु नोकरदार व्यक्तींसाठी शासकीय कार्यालयाच्या, कंपनीच्या आवारात म्हणजेच नोकरदार लोकांची भरपूर गर्दी असते.
अशा ठिकाणी आपण एखादे नाश्ता सेंटर सुरू करू शकता.अणि सकाळी नाश्ता करू शकत नसलेल्या नोकरदार व्यक्तींना वाजवी दरात सकाळच्या वेळी उत्तम दर्जाचा नाश्ता उपलब्ध करून देऊ शकतात.
सगळ्यात पहिले नाश्ता सेंटर सुरू करण्यासाठी योग्य जागा निवडा :
नाश्ता सेंटर सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एका योग्य जागेची निवड करावी लागेल.आपण नाश्ता सेंटर सुरू करण्यासाठी अशा जागेची निवड करायला हवी जिथे जास्तीत जास्त लोक जमत असतात.
नाश्ता सेंटर सुरू करण्यासाठी आपण बस स्थानक, रेल्वे स्टेशन,नाका,चौक,शाळा महाविद्यालय दवाखाना परिसर,इत्यादी सार्वजनिक जागांची निवड करू शकतात.कारण ह्या जागांवर जास्तीत जास्त लोक सकाळी सकाळी जमत असतात.
मेन्यू कार्ड तयार करणे –
नाश्ता सेंटर सुरू करण्यासाठी आपल्याला एका मेन्यू कार्डची देखील निवड करणे आवश्यक आहे.म्हणुन नाश्ता सेंटर सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक मेन्यू कार्ड तयार करून घ्यावे लागेल.
कारण कुठलाही ग्राहक दुकानात आल्यानंतर नाश्त्यासाठी आपल्याकडे कोणकोणते अन्न पदार्थ आहेत हे मेन्यू कार्ड वाचुन चेक करत असतो.
आपण आपल्या मेन्यू कार्ड मध्ये अशा वस्तू समाविष्ट करायला हव्यात ज्या इतर नाश्ता सेंटर मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या नाहीयेत.
यासाठी आपल्याला याचा तपास करावा लागेल की आपल्या आजुबाजुच्या नाश्ता सेंटर मध्ये असलेल्या मेन्यू कार्ड मध्ये कोणकोणते पदार्थ समाविष्ट करण्यात आले आहेत अणि कोणते पदार्थ त्यांनी समाविष्ट केलेले नाहीयेत.
मग त्यानुसार आपण आपल्या मेन्यू कार्ड मध्ये असे पदार्थ समाविष्ट करायचे ज्यांचा समावेश इतर नाश्ता सेंटर मधील मेन्यू कार्ड मध्ये करण्यात आलेला नाहीये.
नाश्त्याची संबंधित सर्व अन्नपदार्थ मेन्यू कार्ड मध्ये समाविष्ट करणे :
आपल्या ग्राहकांना सकाळी नाश्ता करण्यासाठी जे अन्न पदार्थ हवे असतात असे सर्व अन्नपदार्थ आपण आपल्या मेन्यू कार्ड मध्ये समाविष्ट करायला हवेत.
याने जास्तीत जास्त कस्टमर आपल्या नाश्ता सेंटर वर नाश्ता करण्यासाठी येतील.
आपण आपल्या नाश्ता सेंटर मध्ये दहीवडे,आलु पराठे, लस्सी,पोहे,डोसा,सांबर,उपमा,कचोरी,समोसा अशा सर्व पदार्थांचा समावेश करायला हवा.
नाश्ता सेंटर सुरू करण्यासाठी लागणारा आवश्यक परवाना :
नाश्ता सेंटर सुरू करण्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या लायसन्सची देखील आवश्यकता असते.
नाश्त्याचे दुकान हे एक खाण्याशी संबंधित व्यवसाय आहे.याचकरीता हा व्यवसाय करण्यासाठी food and safety standards authority of India कडुन एक लायसन प्राप्त करावे लागेल.
याचसोबत आपल्याला महापालिकेकडून आरोग्य व सुरक्षा प्रमाणपत्र घेणे देखील आवश्यक आहे.असे न केल्यास आपल्याला काही शुल्क भरावे लागेल.
नाश्ता सेंटर सुरू करण्यासाठी आपल्याला शाॅप अॅक्ट लायसन्स प्राप्त करावे लागेल.
जर आपण हा व्यवसाय फूड व्हॅन म्हणून सुरू केला असेल तर त्यासाठी आरटीओची परवानगी घेणे आवश्यक आहे. आणि पार्किंगची जागा आणि भाडे भरणे इत्यादींच्या परवानगीसाठी आपल्याला आपल्या महापालिका संस्थेशी संपर्क साधावा लागेल.
नाश्ता दुकान व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला जीएसटी नंबर देखील घ्यावा लागतो.हा जीएसटी नंबर आपण सीएच्या मदतीने देखील प्राप्त करू शकतो.
नाश्त्याचे दुकान सुरू करण्यासाठी खर्च किती येईल?
नाश्त्याचे दुकान सुरू करण्यासाठी आपल्याला किमान १० ते १५ हजार रुपये इतका खर्च लागतो.
नाश्ता दुकान हा व्यवसाय सुरू केल्यावर नफा किती होईल?
१० हजार रूपयांची गुंतवणूक करून नाश्ता दुकान हा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्याला रोज ह्यातुन ८ ते १० हजार रुपये इतकी कमाई करता येईल.
म्हणजे नाश्ता दुकान ह्या व्यवसायातुन आपण महिन्याला दोन लाखाच्या आसपास कमाई करू शकता.यावरून आपणास लक्षात येईल की हा व्यवसाय खुप कमी गुंतवणूक करून सुरू केल्यावर देखील आपण महिन्याला लाखोची कमाई करू शकतो.
नाश्ता दुकान ह्या व्यवसायाची मार्केटिंग कशी करायची?
कुठलाही व्यवसाय सुरू केल्यानंतर जास्तीत जास्त कस्टमर आपल्यापर्यंत यावे म्हणून आपण आपल्या व्यवसायाची वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर मार्केटिंग करायला हवी.
आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी आपण इंस्टाग्राम,व्हाटस अप,फेसबुक,टेलिग्राम इत्यादी सारख्या सामाजिक प्रसार माध्यमांची मदत घेऊ शकतात.
यावर आपण आपल्या व्यवसायाशी संबंधित माहीती इन्फो ग्राफिक्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो.
याचसोबत आपण आपल्या व्यवसायाशी संबंधित पाॅपलेट छापुन आपल्या आसपासच्या परिसरात वाटुन आपल्या व्यवसायाची आॅफलाईन पद्धतीने देखील मार्केटिंग देखील करू शकतो.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठल्याही विशिष्ट योग्यतेची आवश्यकता देखील नसते.हा व्यवसाय कमी शिक्षण झालेली व्यक्ती देखील करू शकते.
नाश्त्याचे दुकानाला बाजारात असलेली मागणी :
बाजारात असे अनेक व्यवसाय आहेत ज्यात तेजी तसेच मंदी येताना आपणास दिसून येते.
पण नाश्ता दुकान हा एक असा व्यवसाय आहे जो नेहमी जोरात चालतो यात कधीही मंदी येण्याची शक्यता नसते.हया व्यवसायाला बाजारात प्रचंड मागणी आहे.
कारण आज लाखो लोक रोज सकाळी नोकरीला जाण्याआधी घरी नाश्ता करता न आल्यावर बाहेर एखाद्या नाश्ता सेंटरवर नाश्ता करत असतात.
तसेच बाहेरगावी नोकरी करत असलेले व्यक्ती देखील कामावर जाण्याआधी एखाद्या नाश्ता सेंटरवर जाऊन नाश्ता करत असतात
ज्यामुळे रोज सकाळी आठ वाजेनंतर नाश्त्याच्या दुकानावर खुप जास्त प्रमाणात नोकरदार वर्गाची नाश्ता करण्यासाठी गर्दी पाहायला मिळते.
नाश्त्याचे दुकान कसे सुरू करायचे?
नाश्त्याचे दुकान सुरू करण्याआधी आपण एक व्यवस्थापन निती तयार करून घ्यायला हवी.ही व्यवस्थापन नीती तयार करण्याआधी आपले एकुण बजेट किती आहे हे देखील बघायला हवे.
ज्यांचे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी बजेट आहे ते व्यक्ती नाश्त्याचे दुकान एका छोट्या दुकानातुन देखील सुरू करू शकता.किंवा नाश्त्याचे दुकान सुरू करण्यासाठी आपण भाड्याने एखादे दुकान घेऊ शकता.
पण ज्यांचे बजेट जास्त आहे अणि त्यांना हा व्यवसाय एका मोठ्या पातळीवर सुरू करायचा आहे त्यांनी स्वताचा फुड ट्रक व्यवसाय सुरू करायला हवा.फक्त यासाठी आपल्याला थोडी जास्त पैशांची गुंतवणूक करावी लागेल.
हा व्यवसाय दिसायला जरी एक छोटा व्यवसाय आहे पण यात आपण अत्यंत मेहनतीने कार्य केले तर आपण ह्या व्यवसायातुन महिन्याला लाखोची कमाई करू शकतो.
आपल्या दुकानातील वस्तूंचे योग्य ते रेट निर्धारित करा :
आपल्या दुकानातील कुठली वस्तू किती रूपयांमध्ये विकायची याबाबत आपण रेट निर्धारित करून घ्यायचे आहे.
उदा,पोहे २० रूपये प्लेट,एक समोसा १० रूपयाला,एक कचोरी १० रूपयाला इत्यादी.
दुकानातील वस्तुंचे रेट ठरवताना आपण आपल्या प्रतिस्पर्धी व्यक्ती़ंनी त्यांच्या दुकानात काय रेट ठेवले आहे हे देखील एकदा बघून घ्यावे.
कारण आपण आपल्या इतर प्रतिस्पर्धीपेक्षा जास्त रेट ठेवले तर कस्टमर आपल्याकडे नाश्ता करण्यासाठी न येता त्यांच्याकडे जाणे अधिक पसंत का करतील.
म्हणुन आपल्या प्रतिस्पर्धी व्यक्ती़ंपेक्षा कमी रेटमध्ये उत्तम नाश्ता ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण आपल्या नाश्ता सेंटर मधुन करायला हवा.
नाश्त्याचा उत्तम दर्जा अणि स्वच्छता :
आपण आपल्या नाश्ता सेंटर वर नाश्ता करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गरम गरम बनवलेला नाश्ता खायला द्यायला हवा.कारण थंड नाश्ता खायला कोणालाच आवडत नसते.
याचसोबत आपण ग्राहकांना खायला देत असलेल्या नाश्त्याची काॅलिटी देखील उत्तम दर्जाची असायला हवी.आपण ग्राहकांसाठी आपल्या दुकानात स्वच्छ पाणी पिण्यासाठी ठेवायला हवे.
ग्राहकांना नाश्ता वाढण्यासाठी चांगले स्वच्छ थाट वापरायला हवे.
दुकानात काम करण्यासाठी कर्मचारी वर्गाची निवड :
नाश्ता दुकान सुरू केल्यावर दुकानात बिल गोळा करण्याचे काम करण्यासाठी,ग्राहकांसाठी नाश्ता बनवायला,ग्राहकांना नाश्ता वाढण्यासाठी आपल्याला दोन तीन कर्मचारी वर्गाची आवश्यकता देखील भासेल.
नाश्ता दुकान सुरू करताना लक्षात ठेवायच्या काही महत्वाच्या बाबी :
नाश्ता दुकान सुरू केल्यावर आपल्याला आपल्या दुकानातील नाश्त्याचा दर्जा उत्तम ठेवणे आवश्यक आहे.
कारण आपण नाश्त्याचा दर्जा उत्तम नसल्यास आपल्या दुकानावर खुप कमी ग्राहक येतील.याने आपल्याला मोठा तोटा होण्याची शक्यता असते.