GlobalSocial

जगातील सर्वात जास्त हिंदू लोकसंख्या असणारे ५ देश

हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन अणि पृथ्वीवर सर्वात प्रथम अस्तित्वात असलेला एक पवित्र धर्म आहे.आपल्याला प्रत्येकाला वाटते की भारत देशात सर्वात जास्त हिंदू धर्मियांची (Hindu populated countries in world)लोकसंख्या आहे.

पण असे नाहीये आपला भारत देश वगळला तर जगात इतरही असे देश आहेत जिथे हिंदू धर्मियांची लोकसंख्या अधिक प्रमाणात आढळून येते.

संपुर्ण जगभरात वेगवेगळे धर्म अस्तित्वात असल्याचे आपणास दिसून येते.जगात असा कुठलाही असा ठाराविक देश नाही जिथे फक्त हिंदुच लोक राहतात

कारण सर्व देशात आपल्याला सर्व धर्मांचे लोक वास्तव्यास असल्याचे दिसून येते.

हिंदू राष्ट्र असलेला जगात कुठलाही असा विशिष्ट देश अस्तित्वात नसला तरी देखील जगात काही असे देश आहेत जिथे आपल्याला हिंदू धर्मियांची संख्या अधिक प्रमाणात पाहायला मिळते.

आजच्या लेखात आपण जगातील सर्वात जास्त प्रमाणात हिंदू धर्मियांची लोकसंख्या असलेल्या देशांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

ह्या देशातील लोक आजही हिंदू धर्मातील परंपरेचे नित्य नियमाने पालन करत आहेत.अणि परदेशात वास्तव्यास असताना देखील हिंदू सभ्यतेचे पालन देखील करत आहेत.

महात्मा फुले यांच्याविषयी कोणालाही माहीत नसलेल्या १० महत्वाच्या गोष्टी

नेपाळ

हिंदू धर्माला(Hindu populated countries in world) मानत असलेल्या देशांच्या यादीत नेपाळ ह्या देशाचा पहिला क्रमांक लागतो.

नेपाळ हा जगातील असा देश आहे जिथे आपणास हिंदू धर्मियांची लोकसंख्या अधिक प्रमाणात आढळून येते.एकेकाळी नेपाळ हा देश हिंदु राष्ट्र म्हणून ओळखला जात असे.

पण २००६ मध्ये सुरू झालेल्या आंदोलनानंतर नेपाळ हा देश २००८ मध्ये  धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले होते.

नेपाळ हा देश धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर देखील इथे हिंदू धर्म मानणारे लोक अधिक प्रमाणात आढळून येतात.अणि आज देखील हिंदू धर्म नेपाळ मधील सर्वात मोठा धर्म आहे.

२०११ मधील जनगणनेनुसार नेपाळ मधील हिंदु धर्म मानत असलेल्या जनगणनेत ८१.३ टक्के इतके लोक आपणास हिंदू असल्याचे दिसून आले होते.

२०११ मधील जनगणनेनुसार नेपाळ मधील हिंदु धर्माला मानत असलेल्या लोकांची संख्या २ करोड १५ लाख ५१ हजार ४९२ इतकी आहे.ही संख्या नेपाळ देशाच्या लोकसंख्येच्या ८१.३ टक्के इतकी आहे.

हिंदू धर्मातील सर्वात पवित्र पशुपतीनाथाचे मंदीर नेपाळ देशातील काठमांडू ह्या शहरात बागमती नदीच्या तीरावर वसलेले आहे.

हे भगवान शंकराला समर्पित करण्यात आलेले मंदीर आहे जिथे लाखोंच्या संख्येने हिंदू भाविक दर्शनासाठी येतात.

याचसोबत मुक्तीनाथ मंदिर, मनोकामना मंदीर यासारखी मोठमोठे प्रचलित हिंदु मंदीर देखील ह्या नेपाळ ह्या देशात पाहायला मिळतात.

नेपाळ मधील हिंदू धर्मातील लोक हिंदू धर्माचे पालन करत मुर्तीपुजा करण्यावर विश्वास ठेवतात.नेपाळ मधील हिंदु सर्व हिंदू धर्मातील सण उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतात.

नेपाळ मधील हिंदु लोक भारतीय संस्कृतीचे अनुकरण करतात त्यामुळे येथील लोक प्रेम विवाहपेक्षा अरेंज मॅरेज करण्याला अधिक महत्व देतात.

म्हणून नेपाळ मधील ९० टक्के विवाह लव्ह मॅरेज नाही तर अरेंज मॅरेज पद्धतीने केले जातात.

भारत

जगभरात हिंदू धर्माचे पालन करत असलेल्या देशांच्या यादीत (Hindu populated countries in world)आपला भारत देश दुसरया क्रमांकावर आहे.

हिंदू धर्म हा भारतातील सर्वात मोठा अणि महत्वपूर्ण धर्म आहे.

भारताच्या लोकसंख्येतील अधिकतम लोक हे हिंदू धर्माला मानतात.

२०११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार भारतात ८० टक्के लोक हे हिंदू धर्मातील आहेत.म्हणजे ९६.८ टक्के लोक हे हिंदू धर्माला मानतात.

हिंदू धर्माला मानणारे व्यक्ती हिंदू धर्माला सनातन धर्म असे देखील म्हणतात.हे नाव महात्मा गांधी यांनी हिंदू धर्मातील लोकांमध्ये अधिक प्रचलित केले होते.

हिंदू धर्मातील पवित्र धर्मग्रंथ रामायण अणि भगवतगीता हे आहेत.हिंदु धर्मातील लोक अनेक वर्षांपासून हिंदू धर्मातील वेद उपनिषदे मधील सिदधांताचे पालन करत आहेत.

हिंदू धर्मातील पुजास्थळाला मंदीर तसेच देवस्थान असे म्हटले जाते.हिंदु धर्मातील लोक देवी देवतांच्या मूर्तीची पूजा करतात.

पण भारतातील आर्य समाजातील हिंदू लोक मुर्तीपुजा करण्यावर विश्वास ठेवत नाही.हिंदु धर्मातील स्वास्तिक चिन्ह हे शुभ गोष्टीचे प्रतीक मानले जाते.कुठल्याही शुभ कार्यात हे स्वस्तिक चिन्ह काढले जात असते.

याचसोबत हिंदू धर्मात ओम हे चिन्ह ब्रह्माचे प्रतीक मानले जाते.

जगातील सर्वात खतरनाक १५ नोकरया 15 most dangerous jobs in world

माॅरीशस –

हिंदू धर्मातील लोकांची सर्वात जास्त संख्या (Hindu populated countries in world)असलेल्या देशांच्या यादीत माॅशिशस ह्या देशाचा तिसरा क्रमांक लागतो.

माॅरिशस ह्या देशाला मिनी इंडिया ह्या नावाने देखील ओळखले जाते.कारण येथील स्थानिक स्त्री पुरुष एकदम तसाच पेहराव परिधान करतात जसे आपल्या भारत देशातील स्त्री पुरुष परिधान करतात.

इथे हिंदू धर्मातील सुंदर अशी मंदीरे देखील आहेत.ह्या मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी जगभरातील लोक इथे येतात.

१८१० मध्ये माॅरीशस हा देश ब्रिटीश साम्राज्याचा एक महत्वाचा घटक बनला होता.अणि तेव्हा ह्या देशाची अर्थव्यवस्था कृषी उत्पादनावर अवलंबून होती.

म्हणून ह्या देशातील उसाच्या मळ्यात काम करण्यासाठी भरपुर प्रमाणात भारतातील मजदुरांना आणण्यात आले होते.अणि हेच उसाच्या शेतात काम करण्यासाठी गेलेले मजदुर इथे कायमस्वरूपी वास्तव्य करू लागले.

माॅरीशस मध्ये असलेल्या १४ लाख एवढ्या लोकसंख्येतील ४४ टक्के पेक्षा अधिक लोक हिंदू धर्माचे पालन करतात.

माॅरीशस ह्या देशात देखील भारताप्रमाणे सर्व हिंदू धर्मातील सण उत्सव जसे की दिवाळी दिवे पणत्या लावून साजरी केली जाते.

माॅरीशस ह्या देशातील राष्ट्रीय भाषा ही इंग्रजी आहे अणि ह्या देशात इंग्रजी हीच भाषा अधिक प्रमाणात बोलली जाते.पण इथे वास्तव्यास असलेल्या हिंदू धर्मातील लोकांकडुन आजही एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आपल्या मातृभाषेचा उपयोग केला जातो.

फिजी

नेपाळ,भारत अणि माॅरीशस नंतर हिंदू धर्माचे पालन करत असलेल्या देशांमध्ये फिजी हा देश चौथ्या क्रमांकावर आहे.

हिंदू धर्माचे पालन करत असलेल्या लोकांमध्ये फिजी ह्या देशाचा चौथा क्रमांक लागतो.

ब्रिटीश सरकार कडुन करण्यात आलेल्या शोषणानंतर देखील इथल्या लोकांनी हिंदू धर्माचे पालन करत हिंदू धर्माला जिवंत ठेवले आहे.

फिजी ह्या देशातील धर्मामध्ये हिंदू धर्म हा दुसरया क्रमांकावर असलेला देश म्हणून ओळखला जातो.हया देशातील लोकसंख्येतील २७.९ टक्के इतकी लोकसंख्या हिंदू धर्मियांची आहे.

येथील हिंदू धर्मातील फिजी लोकांना इंडो फिजियन म्हणून ओळखले जाते.इंडो फिजीयन लोक रामनवमी दिवाळी होळी इत्यादी हिंदू धर्मातील सण उत्सव अत्यंत जल्लोषात साजरा करतात.

फिजी ह्या देशात दिवाळीच्या दिवशी सरकारी सुटटी देखील असते.

२० व्या शतकापर्यंत होळी हा येथील प्रमुख सण उत्सव मानला जायचा पण विसाव्या शतकानंतर इथे दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मुख्य सण उत्सव मानला जातो.हा सण उत्सव दरवर्षी मोठ्या आनंदात अणि उत्साहात साजरा देखील केला जातो.

फिजी ह्या देशात हिंदू धर्मीयांचे अनेक मंदिर पाहावयास मिळतात.ज्यातील भगवान शंकराचे सुब्रमण्यम हिंदू मंदिर हे मुख्य हिंदू मंदिर आहे.

आज देखील फिजी ह्या देशातील लोक श्रीमद्भभगवतगीता रामायण यांचे पठन आपल्या घरात करताना दिसतात.इथे रामलीला प्रदर्शनाचे देखील मोठ्या पातळीवर आयोजन केले जाते.हे रामलीला प्रदर्शन बघण्यासाठी दुर दुरचे लोक इथे येतात.

गुयाना

हिंदू धर्मातील लोकांची सर्वात जास्त संख्या असलेल्या देशांच्या यादीत गुयाना हा देश पाचव्या क्रमांकावर आहे.

ह्या देशात हिंदूंची संख्या २५ टक्के इतकी आहे.पण सुरूवातीपासून ह्या देशात हिंदू धर्मातील लोक वास्तव्यास नव्हते.

हिंदू धर्मातील लोक ह्या देशात कसे पोहचले हे सांगायचे झाले तर ब्रिटीश सरकारने १८३३ मध्ये आपल्या साम्राज्यात दास प्रथेला संपुष्टात आणण्यासाठी एक कायदा तयार केला.

ह्या कायद्याला slavery abolition act असे म्हटले गेले ही प्रथा संपुष्टात आल्यावर देखील ब्रिटीश व्यापारी यांना काम करण्यासाठी मजदुरांची आवश्यकता भासत होती.

म्हणून एक परवाना सिस्टीम सुरू करण्यात आली ज्याच्या दवारे एका देशातील लोक दुसरया देशात कामासाठी आणता येत होते.

हा एक प्रकारचा मजदुरी करार होता ज्यात पाच वर्षांसाठी मजदुरांना भरती केले जात होते.हयामुळे अनेक मजदुर परदेशात काम करण्यासाठी गेले पण पाच वर्षांनंतर पुन्हा आपल्या देशात न जाता तिथेच स्थायिक झाले.

ह्या मजदुरांमध्ये अधिकतम लोक हिंदू होते.पण परदेशात स्थायी झाल्यानंतर देखील ह्या हिंदुंनी आपल्या धर्माचे पालन करणे सोडले नाही.

याचमुळे आजही गुयाना ह्या देशात हिंदुची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button