आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे की आत्ताच्या काळात शिक्षणाला (countries with zero education fees)किती महत्व आहे.
आपले जर चांगले उच्च शिक्षण झालेले असेल तर आपल्याला आपल्या देशातील तसेच संपूर्ण जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या वेतनासोबत चांगल्या पदावरची नोकरी प्राप्त होते.
याचकरीता चांगले उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी अधिकतम भारतीय तरूण परदेशात जाणे अधिक पसंत करतात.
पण परदेशात उच्च शिक्षण करायचे म्हटले तर तिथले उत्तम दर्जाचे शिक्षण प्राप्त करण्यासाठी आपल्याला खुप जास्त पैसा लागणार ही चिंता परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छित असलेल्या प्रत्येक तरूण तरूणींना सतावत असते.
पण आज आम्ही तुम्हाला परदेशातील काही अशा युनिव्हर्सिटी विषयी माहिती देणार आहोत जिथे गरीब तसेच मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोफत मध्ये उच्च दर्जाचे उच्च शिक्षण प्राप्त करू शकतात.
जगातील सर्वात खतरनाक १५ नोकरया 15 most dangerous jobs in world
जर्मनी
जर्मनी हा एक असा देश आहे जिथे विदेशातुन उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी(countries with zero education fees) आलेल्या विद्यार्थ्यांना मोफत मध्ये शिक्षण उपलब्ध करून दिले जाते.
एवढेच नव्हे तर परदेशातील इथे शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जर्मनी मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत म्हणून स्काॅलरशीप देखील ह्या देशातील सरकार देत असते.
जेणेकरून विद्यार्थ्यांना इथे राहत असताना आपला दैनंदिन खर्च देखील भागवता येईल.जर्मनी जितका अधिक सुंदर देश आहे तितकीच प्रगत अणि उच्च दर्जाची येथील शिक्षणव्यवस्था देखील आहे.
याचमुळे आपल्या भारत देशातील तसेच अनेक देशांतील विद्यार्थी जर्मनी मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणे अधिक पसंत करतात.
जर्मनी हा देश आधीपासूनच आविष्कारांचा देश म्हणून ओळखला जातो इथे प्रिंटिंग प्रेस,आॅटो मोबाईल,एमपी ३ इत्यादी स्वरुपाचे आविष्कार झालेले आपणास दिसून येते.
येथील ८० पेक्षा अधिक जर्मन वैज्ञानिकांना आपल्या संशोधन क्षेत्रातील अमुल्य योगदानाबद्दल नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
वलड इकोनाॅमिक फोरमच्या एका अहवालात असे दिले आहे की जर्मनी हा जगातील सर्वात इनोव्हेटिव्ह देश आहे.
ज्यात येथील महाविद्यालय अणि विद्यापीठ आपली प्रमुख भुमिका बजावताना दिसून येतात.
जर्मनी ह्या देशामध्ये रिसर्च लेव्हल अत्यंत मजबूत आहे इथे आपल्याला एकापेक्षा एक विद्यापीठ आपणास पाहावयास मिळते.
ज्यात ल्युड विलड मॅक्स मेलिअन युनिव्हर्सिटी,मयुनिक के टेक्निकल काॅलेज,हंबलट युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन,इत्यादी विश्वविद्यालयांचा समावेश आहे.
जर्मनी मध्ये असलेल्या झिरो शैक्षणिक फी अणि उत्तम शैक्षणिक सुविधेमुळे जर्मनी ह्या देशात आपले उच्च शिक्षण करण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी इथे येतात.
जगभरातील कानाकोपऱ्यातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी जर्मनी ही एक खुली रंगबेरंगी सोसायटी आहे.आंतरराष्ट्रीय विद्यार्थींसाठी जर्मनी हा देश आधीपासूनच हाॅट स्पाॅट बनलेला आहे.
जर्मनी मध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची एकुण संख्या सध्या ३.६० लाख इतकी झाली आहे.
जर्मनी मध्ये उच्च शिक्षण घेण्याची अनेक कारणे आहेत ज्यामुळे इथे परदेशातुन विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी येतात.
पहिले कारण म्हणजे इथे परदेशातील विद्यार्थ्यांना मोफत मध्ये शिक्षण उपलब्ध करून दिले जाते.अणि हे शिक्षण अत्यंत उत्तम अणि दर्जेदार स्वरुपाचे असते.
जर्मनी मध्ये परदेशातील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ट्युशन फी मध्ये उत्तम सुट दिली जाते.याचसोबत करीअर मध्ये उत्तम प्रकारच्या संधी उपलब्ध होतात.
याचसोबत विद्यार्थ्यांना इथे फ्री कोर्स, आंतरराष्ट्रीय पदवी अभ्यासक्रम देखील उपलब्ध करून दिले जातात.जर्मनी मधील युनिव्हर्सिटीचे संपूर्ण जगभरात खूप नाव आहे.
टाईम्स हायर एज्युकेशन वल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग मध्ये जर्मनी ह्या देशामधील ४६ युनिव्हर्सिटी जगातील सर्वात उत्तम युनिव्हर्सिटी मध्ये समाविष्ट आहेत.
जर्मनी मध्ये परदेशातील शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या दोन हजार कोर्स पैकी कुठलाही एक असा कोर्स निवडता येईल जो कोर्स इंग्रजी भाषेत शिकविण्यात येईल.
म्हणजे इथे शिक्षण घेण्यासाठी आपल्याला जर्मन भाषा शिकण्याची देखील आवश्यकता नाहीये.पण ही भाषा शिकुन घेतली तर जर्मनी मध्ये राहायला आपल्याला अधिक सोपे जाईल.
जर्मनी मधील युनिव्हर्सिटी मधुन आपले उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अठरा महिने इतका कालावधी नोकरी शोधण्यासाठी थांबु देखील शकतात.
जर्मनी हा देश इंडस्ट्रिअल,मॅन्युफॅक्चरींग अणि इनोव्हेशन जगाचा लीडर आहे.याचमुळे इथे इंजिनिअरची खुप कमी आहे.
जर्मनी ह्या देशात अनेक अशी शहरे देखील आहेत जिथे होळी दिवाळी सारखे सण उत्सव साजरा केले जातात.यामुळे भारतातुन जर्मनीत शिक्षणासाठी आलेल्या व्यक्तींसाठी हीज्ञएक उत्तम जागा आहे.
जर्मनी ह्याच देशात जगातील सर्वात पहिले मासिक प्रकाशित करण्यात आले होते.जगातील सर्वात मोठा तानाशाह क्रूर सत्ताधीश हिटलर देखील ह्याच जर्मनी ह्या देशातील होता.
जगातील सर्वात जुने प्राची संग्रहालय देखील ह्याच जर्मनी देशात आपल्याला पाहायला मिळते.जगातील सर्वात प्रसिद्ध कोल्ड्रिंक्स फॅनटा देखील ह्याच देशात बनविण्यात आली होती.
जगातील सर्वात मोठ्या कार कंपनी देखील ह्याच देशात आहेत.
महात्मा फुले यांच्याविषयी कोणालाही माहीत नसलेल्या १० महत्वाच्या गोष्टी
२) नाॅर्वे
नाॅर्वे हा देश देखील इतर देशातुन इथे शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण (countries with zero education fees)उपलब्ध करून देतो.मोफत शिक्षण उपलब्ध करून देत असलेल्या देशांच्या यादीत नाॅर्वे ह्या देशाचा दुसरा क्रमांक लागतो.
नाॅर्वे ह्या देशात शिक्षणाला खुप अधिक प्रमाणात महत्व दिले जाते.हया देशात परदेशातीलच नव्हे तर नाॅर्वे ह्या देशातील स्थानिक विद्यार्थ्यांना देखील मोफत शिक्षणाची सुविधा दिली जाते.
नाॅर्वे ह्या देशातील शिक्षणव्यवस्था अत्यंत उत्तम दर्जाची आहे त्यामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी परदेशातुन येत असतात.
नाॅर्वे ह्या देशात नोंदणीकृत पब्लिक युनिव्हर्सिटी देखील आहे जिथे कुठल्याही देशातील, कुठल्याही जाती धर्मातील विद्यार्थीना मोफत मध्ये उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते.
पण नाॅर्वे ह्या देशातील कुठल्याही युनिव्हर्सिटी मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी आपल्याला थोड्याफार प्रमाणात का होईना नाॅर्वेअन भाषा येणे आवश्यक आहे.
कारण ह्या देशातील अधिकतम शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच कोर्सेस नाॅर्वेअन ह्या भाषेत उपलब्ध करून देण्यात आले आहेत म्हणून हे कोर्स करण्यासाठी आपल्याला नाॅर्वेअन भाषा शिकणे आवश्यक असणार आहे.
फक्त पोस्ट ग्रॅज्युएशन अणि डाॅक्टरेट साठी अशी कुठलीही अट नाहीये.हे अभ्यासक्रम आपल्याला नाॅर्वेअन भाषा येत नसेल तरी देखील इंग्रजी मध्ये समजुन घेता येतील.
नाॅर्वे ह्या देशात काही कोर्सेस करण्यासाठी दुसरया देशातील विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रानुसार ३० ते ६० यूरो द्यावे लागतात.
बाकी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डाॅक्टरेट हे शिक्षण घेण्यासाठी आपल्याला कुठलीही फी द्यावी लागत नाही.
नाॅर्वे ह्या देशातील पब्लिक युनिव्हर्सिटी मध्ये बर्गन युनिव्हर्सिटी, आर्कीटेक्ट युनिव्हर्सिटी,आॅसलो युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इत्यादीचा समावेश होतो.
नाॅर्वे हा उजेडाचा देश म्हणून ओळखला जातो कारण इथे आपल्याला अर्ध्या रात्री देखील सुर्याचा प्रकाश दिसु शकतो.
३) स्वीडन
जिथे विद्यार्थ्यांना मोफत (countries with zero education fees)शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते अशा पाच देशांच्या यादीत स्वीडन ह्या देशाचा तिसरा क्रमांक लागतो.
स्वीडन ह्या देशात देखील शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी हजारो विद्यार्थी परदेशातुन इथे येतात.कारण इथली शिक्षण प्रणाली सर्वात उत्तम स्वस्त मानली जाते.
स्वीडन मधील अनेक युनिव्हर्सिटी मध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देखील उपलब्ध करून दिले जाते.यात विद्यार्थी अनेक विषयांमध्ये उच्च शिक्षण प्राप्त करू शकतात.
ज्यात इंडस्ट्रिअल डिझाईन, कंप्यूटर सायन्स,आॅटोमोटीव इंजिनिअरींग,अॅरोनोटीक्स, पर्यावरण शास्त्र इत्यादी विषयांचा समावेश होतो.
स्वीडन ह्या देशात सर्व मास्टर प्रोग्राम हे विद्यार्थ्यांना इंग्रजी ह्या भाषेत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.इथे असलेल्या अनेक युनिव्हर्सिटी इंडियन क्लब तसेच सोसायटी देखील आहे.
स्वीडन मधील अधिकतम युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांकडे शिक्षणासाठी फी मागत नाही.
ह्या मोफत शिक्षण देत असलेल्या युनिव्हर्सिटी मध्ये अॅपसाला युनिव्हर्सिटी,स्टाॅक हाॅम युनिव्हर्सिटी,गोदेनबर्ग इत्यादी स्वीडन मधील नामांकित युनिव्हर्सिटीचा समावेश होतो.
स्वीडन ह्या देशात शिक्षणासाठी आलेल्या परदेशातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच काम करण्याची देखील परवानगी असते.
इथे आपल्याला पाहीजे तितक्या तास काम करता येईल पण आपले मुख्य प्राधान्य आपल्या शिक्षणाला देणे गरजेचे आहे.
स्वीडन ह्या देशातील अनेक युनिव्हर्सिटी मध्ये करीअर सर्विसची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासोबत पार्ट टाइम जॉब देखील शोधता येईल.
ज्या विद्यार्थ्यांना स्वीडन मधील आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काम करण्यासाठी ह्या देशात राहायचे आहे ते विद्यार्थी ६ महिने रेसिडेन्स परमिटचा कालावधी वाढवून घेण्यासाठी देखील अर्ज करू शकतात.
ह्या कालावधीत काम प्राप्त झाल्यास आपल्याला वर्क परमिट साठी देखील अर्ज करता येतो.म्हणजे शिक्षण करून त्यानंतर नोकरी प्राप्त करण्यासाठी स्वीडन हा एक उत्तम देश आहे.
स्वीडन ह्या देशातील,७० टक्के इतकी जमीन जंगलाने व्यापलेली आहे.स्वीडनचा अशा देशांमध्ये समावेश होतो जिथे शंभर दिवस रात्र होत नाही.
४) ऑस्ट्रिया
परदेशातील शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देत असलेल्या देशांच्या यादीत ह्या देशाचा एकुण चौथा क्रमांक लागतो.
कुठल्या विद्यार्थ्यांचे करीअर घडवण्यासाठी त्याला कशापदधतीने सपोर्ट करायचे आहे हे उत्तमरीत्या इथल्या शिक्षण व्यवस्थेला माहीत आहे.
आॅस्ट्रिया ह्या देशात जे विद्यार्थी आपले उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात त्यांना नोकरीची प्लेसमेंटची कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नसते.
इथल्या युनिव्हर्सिटी मधुन घेतलेल्या डिग्री वर आपल्याला आॅस्ट्रिया मध्ये कुठेही सहज जाॅब प्राप्त होऊ शकतो.इथल्या युनिव्हर्सिटी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देखील उपलब्ध करून देतात.
जेणेकरून विद्यार्थ्यांना नोकरीसाठी शोधाशोध करत बसावी लागत नाही.
युके अणि यूएस ह्या देशानंतर आॅस्ट्रिया ह्या देशात परदेशातुन शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक पाहायला मिळते.कारण इथली शिक्षण व्यवस्था एकदम उत्तम अशी आहे.
इथे प्राप्त केलेले गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण आपल्या उच्च शिक्षणाच्या चांगला पाठ्यक्रम पुर्ण करते ज्याला अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पसंत करतात.
आॅस्ट्रिया हा जगातील अशा देश आहे जो त्यांच्या कमी शैक्षणिक फी, उत्तम शैक्षणिक सुविधा अणि विद्यार्थ्यांना इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ओळखला जातो.
आॅस्ट्रिया ह्या देशात शिक्षणासाठी आलेल्या परदेशातील विद्यार्थ्यांना एका सेमीस्टर करीता फक्त ६२ हजार १८१ रूपये इतकी फी भरावी लागते.
आॅस्ट्रिया सारख्या इतक्या मोठ्या यशस्वी तसेच उच्च वेतन असलेल्या देशात ही किरकोळ फी भरून आपण परदेशात उच्च शिक्षण करण्याचे आपले स्वप्न पुर्ण करू शकतो.
पण ज्यांना ही किरकोळ फी देखील इथे उच्च शिक्षण करण्यासाठी प्रवेश घ्यायला भरता येत नसेल त्यांना इथे मोफत मध्ये उच्च शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
एवढेच नव्हे तर इथे उच्च शिक्षण करताना आपल्याला आपला शैक्षणिक खर्च करण्यासाठी स्काॅलरशीप देखील दिली जाणार आहे अणि येथील अनेक युनिव्हर्सिटी मध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुस्तके देखील मोफत मध्ये दिली जाणार आहेत.
जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर इथे पदवीचे शिक्षण घेण्यासाठी येऊ पाहत आहेत ते युनिव्हर्सिटी ऑफ विअरा,साजबर्ग ह्या युनिव्हर्सिटी मध्ये आपल्याला ज्या कोर्स साठी प्रवेश घ्यायचा आहे तो कोर्स इथे उपलब्ध आहे का हे चेक करू शकतात.
इथे मोफत तसेच कमी पैशात उच्च शिक्षण पुर्ण करण्यासाठी विद्यार्थी विअना युनिव्हर्सिटी आॅफ टेक्नॉलॉजी,ग्राजु मेडिकल काॅलेज, इत्यादी मध्ये प्रवेश घेता येईल.
५) फ्रान्स
परदेशातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देत असलेल्या देशांच्या यादीत फ्रान्स हा देश पाचव्या क्रमांकावर आहे.
फ्रान्स ह्या देशाचा मोफत शिक्षण देणारया तसेच अधिकतम फी आकारून शिक्षा उपलब्ध करून देणारा देश देखील आहे. पण फ्रान्स ह्या देशातील काही मोजक्या युनिव्हर्सिटी वगळण्यात आल्या तर येथील अधिकतम युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देतात.