BusinessEntrepreneurshipStartup

ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय कसा सुरु करायचा ?

आज अधिकतम लोक दुकानात पायी चालत जाऊन शाॅपिंग तसेच कुठल्याही वस्तुची खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन शाॅपिंग करणे अधिक पसंत करतात.

जेव्हापासून भारतात कोरोनाने थैमान घातले होते तेव्हा लाॅकडाउनच्या काळापासून अधिकतम लोक आपली सर्व शाॅपिंग ऑनलाईन पदधतीने करायला लागले आहेत.
ड्राॅप शिपिंग हा ऑनलाईन शाॅपिंगशीच संबंधित एक अत्यंत महत्वाचा शब्द आहे.

आजच्या लेखात आपण ड्राॅप शिपिंग म्हणजे काय?आपण स्वताचा ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय कसा सुरु करायचा हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

ड्राॅप शिपिंग व्यवसाय म्हणजे काय?

जेव्हा आपण एखाद्या ऑनलाईन ई काॅमर्स तसेच शाॅपिंग वेबसाईटवरून सामान खरेदी करण्यासाठी आॅडर देत असतो.

तेव्हा आपल्याला वाटते की आपण ज्या वेबसाईटसवरून ऑनलाईन आॅडर दिली आहे जसे की अॅमेझाॅन, फ्लिपकार्ट,तीच कंपनी आपल्या आॅडर केलेल्या सर्व वस्तुंना स्वता खरेदी करून ठेवते.

पण असे नसते जेव्हा कधी आपण एखाद्या ऑनलाईन शाॅपिंग वेबसाईटवरून एखादी वस्तू आॅडर करत असतो.

तेव्हा ती कंपनी आपल्या सहयोगी दुकानदार,होलसेलर तसेच रिटेलरला आॅडर पाठवत असते.

मग त्या ऑनलाईन शाॅपिंग वेबसाईटशी संबंधित असलेला,जोडलेला सहयोगी दुकानदार,होलसेलर,रिटेलर त्या ऑनलाईन शाॅपिंग वेबसाईटवरून आपल्या दिलेल्या आॅडरला आपल्यापर्यंत आपण आॅडर करताना दिलेल्या आपल्या पत्यावर घरपोहोच पोहोचवण्याचे काम करत असतो.

त्या ऑनलाईन शाॅपिंग वेबसाईटशी जोडला गेलेला हा जो थर्ड पार्टी सप्लायर आहे जो आपण ऑनलाईन केलेल्या आॅडरला आपल्या घरापर्यंत पोहोचवतो त्यालाच ड्राॅप शिपर असे म्हणतात.अणि वरील ह्या सर्व संपुर्ण प्रक्रियेलाच ड्राॅप शिपिंग व्यवसाय असे म्हणतात.

ड्राॅप शिपिंग हा एक असा व्यवसाय आहे ज्यात आपण कुठल्याही वस्तुला,प्रोडक्टला प्रत्यक्ष खरेदी करून आपल्याजवळ संग्रहित करून न ठेवता कमी किंमतीतील वस्तु जास्त किंमतीत ऑनलाईन पदधतीने विकु शकतो.

ऑनलाईन पदधतीने केल्या जात असलेल्या ह्या ड्राॅप शिपिंगच्या व्यवसायात आपल्याला कुठल्याही प्रकारच्या मालाची यादी मेटेंन करण्याची गरज नसते.

याचसोबत ह्या व्यवसायात आपल्याला कुठलीही वस्तू प्रोडक्ट खरेदी करून त्याला प्रत्यक्ष आपल्या स्टोअर रुम मध्ये जमा करून ठेवण्याची गरज नसते.

ड्राॅप शिपिंगच्या ह्या व्यवसायात कस्टमरने ऑनलाईन पदधतीने आॅडर केलेल्या वस्तुला कस्टमरने दिलेल्या पत्यावर घरपोहोच पोहोचवण्याची जबाबदारी ही ऑनलाईन वेबसाईटचीही नसते.अणि ड्राप शिपिंगचा व्यवसाय चालवणारया कंपनीची देखील नसते.

ड्राॅप शिपिंगच्या व्यवसायात कस्टमरने शाॅपिंग वेबसाईटवरून ऑनलाईन आॅडर केलेल्या वस्तुला त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम त्या शाॅपिंग वेबसाईटशी जोडलेले दुकानदार होलसेलर रिटेलर इत्यादीं करीत असतात.जे ह्या आॅनलाईन शाॅपिंग वेबसाईटदवारे आपल्या दुकानातील प्रोडक्ट वस्तु विकत असतात.

कुठलीही ईकाॅमर्स शाॅपिंग वेबसाईट जसे की अॅमेझाॅन,फ्लिपकार्ट,नायका,मिंत्रा ह्या आपल्या वेबसाईटवर दिलेल्या कुठल्याही प्रोडक्ट,वस्तूचे मालक नसतात.

ह्या शाॅपिंग वेबसाईट फक्त ह्या वस्तुंना कस्टमरला आपल्या वेबसाईटवर दाखवण्यासाठी लिस्ट करीत असतात.

हया सर्व ऑनलाईन शाॅपिंग वेबसाईटचा त्यांच्याशी जोडलेल्या इतर दुकानदार,होलसेलर,रिटेलर प्रोडक्ट सप्लायर यांच्याशी टाय अप झालेला असतो.

ऑनलाईन वेबसाईट ज्या दुकानदार होलसेलर रिटेलर सप्लायरला आपले प्रोडक्ट विकायचे आहे त्यांना आपले ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्यांचे प्रोडक्ट सेल करण्यासाठी उपलब्ध करून देत असतात.

ड्राॅप शिपिंग ह्या व्यवसायात वेबसाईटला आपल्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रोडक्ट विक्री करण्यासाठी चांगला नफा प्राप्त होतो.

ड्राॅप शिपिंग व्यवसायातुन कमाई कशी होते?

ड्राॅप शिपिंगच्या व्यवसायात कस्टमरने ऑनलाईन शाॅपिंग वेबसाईटवरून ज्या प्रोडक्टची खरेदी केली आहे त्याच प्रोडक्ट मधून आपल्याला आपला नफा प्राप्त होत असतो.

ड्राॅप शिपिंगच्या व्यवसायात समजा एखादे प्रोडक्ट शंभर रूपयाचे असेल तर आपण ते दोनशे रूपयात आपल्या कस्टमरला विकुन एका प्रोडक्ट मागे शंभर रूपये इतका नफा प्राप्त करू शकतो.

ड्राॅप शिपिंगच्या व्यवसायात आपण जे प्रोडक्ट वेबसाईट द्वारे विकतो आहे.त्याची होलसेल किंमत ही विक्री किंमतीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे तेव्हाच आपण जास्तीत जास्त कस्टमरला जास्त किंमतीत प्रोडक्ट सेल करून ड्राॅप शिपिंगच्या व्यवसायात चांगली कमाई करू शकतो.

ड्राॅप शिपिंग मध्ये काही कंपन्या आपल्या होलसेल किंमतीत शिपिंग चार्ज देखील जोडत असतात.तर काही कंपन्या वेगळा शिपिंग चार्ज घेत असतात.हा शिपिंग चार्ज ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय करत असलेल्या व्यक्तींना आपल्या वैयक्तिक नफ्यातुन द्यावा लागतो.

म्हणुन ह्या ड्राॅप शिपिंगच्या व्यवसायात अधिकतम व्यक्ती नफा प्राप्त व्हावा म्हणून प्रोडक्टच्या सेलिंग किंमतीमध्ये शिपिंग चार्ज देखील जोडुन ठेवतात.

ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय कसा सुरु करायचा?

ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका प्रोडक्टची निवड करावी लागते जे आपण ह्या ड्राॅप शिपिंगच्या व्यवसायादवारे विकणार आहे.

मग ह्या निवडलेल्या सर्व सामानाला ड्राॅप शिपर सप्लायर द्वारे मागवायचे असते.

ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला एका ड्राॅप शिपिंग सप्लायरची आवश्यकता असते.कारण कुठलाही व्यवसाय हा मागणी अणि पुरवठा ह्याच आधारावर चालत असतो.

ड्राॅप शिपिंग सप्लायर हा तो व्यक्ती असतो ज्याचे सामान आपण ड्राॅप शिपिंगच्या व्यवसायात आॅनलाईन वेबसाईटदवारे विकत असतो.

ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण स्वताची एखादी आॅनलाईन वेबसाईट देखील सुरू करू शकतो.किंवा आपण ह्या व्यवसायात आॅनलाईन वेबसाईट अणि सप्लायर यांच्यामध्ये मेडीएटरचे म्हणजे मध्यस्थीचे काम देखील करू शकतात.

आपण ज्या सप्लायरची निवड केली आहे त्याला प्रत्यक्षात भेटुन आपल्याला हे ठरवावे लागेल की आपल्या प्रोडक्टची किंमत किती असणार आहे?कस्टमर कडुन ऑनलाईन आॅडर आलेल्या प्रोडक्टला कशापदधतीने अणि कधीपर्यंत त्या टार्गेट कस्टमर पर्यंत पोहोचवण्यात येईल.

ड्राॅप शिपर सप्लायर सोबत करार झाल्यानंतर तो ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या वेबसाईटवर किंवा इतर कुठल्याही वेबसाईटवर प्रोडक्ट विकण्याची परवानगी देत असतो.

यानंतर ड्राॅप शिपिंग करत असलेली व्यक्ती त्या प्रोडक्टचा फोटो आपल्या स्वताच्या किंवा इतर कुठल्याही वेबसाईटवर लावून त्याची आॅनलाईन विक्री करू‌ शकतो.

ड्राॅप शिपिंग व्यवसाय करत असलेल्या व्यक्तीने त्या विक्रीसाठी निवडलेल्या प्रोडक्टचा फोटो आपल्या किंवा इतर कुठल्याही वेबसाईटवर लावल्यावर जेव्हा एखादी आॅडर कस्टमर कडुन येत असते.

तेव्हा ती आॅडर आपण ड्राॅप शिपर सप्लायर कडे पाठवत असतो.मग तो ड्राॅप शिपिंग सप्लायर ते प्रोडक्ट कस्टमरने दिलेल्या पत्यावर घरपोहोच पोहोचवण्याचे काम करत असतो.

ड्राॅप शिपिंगच्या व्यवसायात कधीकधी कस्टमरला ड्राॅप शिपर द्वारे खराब निकृष्ट दर्जाचे सामान देखील पाठवले जाते.म्हणुन आपण ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय सुरू करत असताना विचारविनिमय करूनच एखाद्या चांगल्या ड्राॅप शिपरची निवड करायला हवी.

जो कस्टमरपर्यत चांगले अणि उत्कृष्ट दर्जाचे प्रोडक्ट पोहोचवण्याचे काम करेल.

कारण ड्राॅप शिपिंगच्या व्यवसायात आॅनलाईन वेबसाईटदवारे खरेदी तसेच शाॅपिंग करताना कधी कधी कस्टमर मोबाईलची आॅडर करत असतात अणि त्यांना त्यांच्या दिलेल्या पत्यावर दुसरीच एखादी वस्तु पाठवली जाते.

याने ज्या वेबसाईटवरून कस्टमरने प्रोडक्टची आॅडर दिली त्या आॅनलाईन वेबसाईट तसेच कंपनीचा मार्केट मधील दर्जा खालावला जात असतो.अणि मग ती कंपनी ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय करत असलेल्या व्यक्तीला दोष देत असते.

ज्यांनी स्वताची वेबसाईट आहे अणि त्यांना त्या वेबसाईट द्वारे ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय करायचा आहे.ते व्यक्ती स्वता ठरवू शकतात की त्यांना आपल्या वेबसाइटवर कोणत्या प्रोडक्टची विक्री करायची आहे.

आपण आपल्या वेबसाईटवर प्रोडक्ट विकायला सुरुवात करण्याअगोदर मार्केट रिसर्च करायला हवा कशा प्रकारचे प्रोडक्ट मार्केट मध्ये सध्या कशा पद्धतीच्या प्रोडक्टची खरेदी विक्री केली जात आहे.

ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय करण्यासाठी आपण आपल्या वेबसाईटवर मोबाईल,स्पोर्ट्स वस्तु सामग्री, पुस्तके, इलेक्ट्रॉनिक वस्तु,कपडे,ज्वेलरी,बुट, काॅस्मॅटिक वस्तु इत्यादीं वस्तु आपण आपल्या वेबसाईटवर विक्रीसाठी लिस्ट करू शकतो.

फक्त हे सर्व सामान कस्टमर पर्यंत घरपोहोच पोहोचवण्यासाठी आपल्याला ड्राॅप शिपर सप्लायरची आवश्यकता भासणार आहे.

जो आपल्याला रिटेल मार्केट पेक्षा स्वस्त दरात वरील सर्व प्रोडक्ट आॅनलाईन वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध करून देईल.

ड्राॅप शिपर सप्लायरची निवड करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?

ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय करताना ड्राॅप शिपरची निवड करताना तो ड्राॅप शिपर सप्लायर सर्टिफाईड आहे किंवा नाही हे पाहायला हवे.

ड्राॅप शिपरच्या प्रोडक्टची आपण स्वता पडताळणी करायला हवी जेणेकरून आपल्या प्रत्येक कस्टमरला घरपोहोच उत्तम दर्जाचे प्रोडक्ट मिळेल.

कुठल्याही एका ड्राॅप शिपरवर अवलंबून न राहता आपण वेगवेगळ्या ड्राॅप शिपरशी वस्तुंच्या सप्लायसाठी बोलणे करायला हवे याने आपल्याला सगळ्यांच्या किंमत अणि काॅलिटी मध्ये तुलना करून योग्य त्या ड्राॅप शिपरची निवड करता येईल.

ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय आपण सोल प्रोपराईटरशिप लिमिटेड लायबिलीटी कंपनी तसेच एल एलपी काॅपारेशन माॅडेल वर देखील करू शकतो.

ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे लायसन-

कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला एका ट्रेड लायसन्सची आवश्यकता असते.म्हणुन ह्या व्यवसायाला सुरुवात करण्याआधी आपण ट्रेड लायसन्स बनवायला हवे.

ज्यांना यातील कुठलेही ज्ञान नाही ते व्यक्ती एखाद्या वकिलाची किंवा सीएची लिगल कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत देखील घेऊ शकतात.

ड्राॅप शिपिंगच्या व्यवसायात आपली रिटर्न पाॅलिसी ही सहज सोपी असणे आवश्यक आहे कारण कित्येकदा कस्टमरला पाठवलेली वस्तु आवडत नाही.म्हणुन कस्टमर ती वस्तु रिटर्न करण्याचा विचार करत असतात.

म्हणुन आपण निवडलेल्या ड्राॅप शिपर सप्लायरची रिटर्न पाॅलिसी ही अगदी सहज अणि सोपी असायला हवी.

याने ड्राॅप शिपिंगच्या व्यवसायात कस्टमरला न आवडलेले प्रोडक्ट परत करायला आपल्याला अणि आपल्या कस्टमरला देखील कुठलीच अडचण येणार नाही.

ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय करण्याचे मुख्य फायदे –

इतर व्यवसायांच्या तुलनेत ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय करणे अधिक सोपे आहे.

ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक शिक्षण घेण्याची तसेच डिग्री वगैरे प्राप्त करण्याची आवश्यकता नसते.

ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय आपण खुप कमी गुंतवणूक करून देखील सुरू करू शकतो.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला फक्त एक वेबसाईट बनविण्याचा खर्च करावा लागतो.

ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला फक्त रिटेलर होलसेलर मॅन्युफॅक्चरर यांच्यासोबत एक करार करावा लागतो.अणि त्यांचे बनवलेले प्रोडक्ट त्यांच्याकडुन खरेदी न करता आॅनलाईन विकायचे असते.

ह्या व्यवसायात गुंतवणुक कमी असल्याने व्यवसाय अपयशी ठरला तरी देखील आपल्याला जास्त नुकसानाला सामोरे जावे लागत नाही.

ड्राॅप शिपिंगचा व्यवसाय आपल्याला कोणाचीही मदत न घेता एकट्याने सुरू करता येईल.यात आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मजदुर वर्गाची कर्मचारी वर्गाची आवश्यकता नसते.म्हणुन यात आपल्याला दरमहा कर्मचारी वर्गाचे वेतन देखील देण्याची चिंता नसते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button