पाळीव प्राण्यांचे खाद्य स्टोअर व्यवसाय कसा सुरु करायचा?
बाजारात पाळीव प्राण्यांना भुक लागल्यावर खाऊ घालण्यासाठी जे काही खाद्य विकले जाते त्यालाच पेट फुड असे म्हटले जाते.
पाळीव प्राण्यांचे खाद्य स्टोअर हा व्यवसाय हा बाजारात एक सध्या अधिक मागणी असलेला व्यवसाय आहे.
कारण आज भारतात प्रत्येक व्यक्तीला कुत्रा मांजर गाय म्हैस इत्यादी असे विविध प्रकारचे पाळीव प्राणी पाळायला आवडते.ते ह्या जनावरांची व्यवस्थित देखभाल देखील करीत असतात.
अधिकतम लोक आपल्या पाळलेल्या पाळीव प्राण्यांना,जनावरा़ंना खाऊ घालण्यासाठी बाजारातुन पेट फुड खरेदी करत असतात.म्हणुन दिवसेंदिवस ह्या व्यवसायाची मागणी अधिक वाढत आहे.
पाळीव प्राण्यांचे खाद्य स्टोअर हा व्यवसाय आपल्याला भरपुर नफा प्राप्त करून देणारा व्यवसाय आहे.
पेट फुडचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती पैसे लागतील?
पेट फुडचा हा व्यवसाय आपण फक्त पन्नास हजार ते एक लाखात देखील सुरू करू शकतो.
पेट फुडच्या व्यवसायातुन किती कमाई होते?
पेट फुडच्या व्यवसायातुन सुरूवातीला आपण दरमहा वीस ते पंचवीस हजार रुपये इतकी कमाई करू शकतो.
पुढे जसजशी आपल्या व्यवसायात वाढ होईल प्रगती होईल तसतशी आपल्या कमाई मध्ये देखील वाढ होण्यास सुरुवात होईल.ह्या व्यवसायात आपल्याला चाळीस ते पन्नास टक्के इतका प्राॅफिट मार्जिन प्राप्त होतो.
पेट फुडचा व्यवसाय कसा करायचा?
पेट फुडचा व्यवसाय आपण आॅफलाईन पद्धतीने पेट फुडचे दुकान टाकून तसेच आॅनलाईन देखील सुरू करू शकता.किंवा दोघे पद्धतीने आपण हा व्यवसाय करू शकतात.
ज्या लोकांना आॅनलाईन कुठल्याही वस्तुची प्रोडक्टची खरेदी,शाॅपिंग करायला आवडते.
अशा व्यक्तींसाठी आपण आॅनलाईन आपल्या आॅफिशिअल वेबसाईट वरून देखील पेट फुड प्रोडक्ट उपलब्ध करून देऊ शकतात.
याचसोबत आपण अॅमेझाॅन,फ्लिपकार्ट सारख्या शाॅपिंग वेबसाईटच्या माध्यमातून देखील आपल्या प्रोडक्टची विक्री करू शकतो.
सर्वप्रथम जनावरांच्या खाद्याविषयी माहीती प्राप्त करणे –
पाळीव प्राण्यांचे खाद्य स्टोअर सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पाळीव प्राण्यांच्या खाद्याविषयी माहीती प्राप्त करावी लागेल.
कोणत्या प्रकारच्या प्राण्यांना कोणते खाद्य दिले जाते हे देखील आपणास हा व्यवसाय सुरू करण्याआधी नीट व्यवस्थित जाणुन घेणे आवश्यक आहे.
कोणत्या प्राण्यांना कोणत्या प्रकारचे खाद्य दिले जाते हे जाणुन घेण्यासाठी आपण आपल्या शहर परिसरातील हा व्यवसाय करत असलेल्या इतर जुन्या दुकानदारांना भेट द्यायला हवी.त्यांच्याकडुन ही सर्व माहिती प्राप्त करायला हवी.
आज भारतात पेट फुडचा फक्त एक ब्रँड नसुन वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड आज बाजारात उपलब्ध आहेत.हया सर्व ब्रॅड विषयी आपणास माहिती प्राप्त असणे आवश्यक आहे.
ह्या व्यवसायात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जनावरांशी संबंधित बेसिक मेडिसिनचे नाॅलेज देखील असणे आवश्यक आहे.कारण ह्या व्यवसायात आपल्याला जनावरांशी संबंधित मुलभुत गोळ्या औषधे देखील आपल्या स्टोअर मध्ये विक्रीसाठी ठेवावी लागणार आहे.
याचसोबत ही गोळ्या औषधे कुठल्या जनावराला कधी द्यायला हवी हे देखील आपणास माहीत असणे गरजेचे आहे
हया सर्व गोष्टी जाणुन घेण्यासाठी आपण सुरूवातीला एक दोन वर्ष एखाद्या पेट फुड स्टोअर मध्ये कामाला लागु शकतात.
याचसोबत होलसेलर डिस्ट्रीबयुटर आपल्याला कोणत्या रेटमध्ये पेट फुड देतील तसेच समजा आपण मॅन्युफॅक्चरर कडुन हे प्रोडक्ट खरेदी केले तर तिथे काय रेट मध्ये प्रोडक्ट आपणास मिळतील.हे देखील आपणास जाणुन घ्यायला हवे.
एरियाची तसेच जागेची निवड –
पेट फुड शाॅपसाठी आपल्याकडे एरिया कमी असला तरी देखील चालेल.
पेट शाॅप आपण एखाद्या ग्रामीण परिसरात सुरू करायचे म्हटले तर आपल्याला पाहिजे तसा नफा प्राप्त करता येणार नाही.कारण ग्रामीण भागातील अधिकतम लोक जनावरांना दुकानातील खाद्य खाऊ घालणे विशेष पसंत करत नाही.
म्हणुन हा व्यवसाय आपण एखाद्या शहरी भागात जिथे लोक जास्तीत जास्त प्रमाणात पाळीव प्राणी पाळतात अशा परिसरात आपण हा व्यवसाय सुरू करायला हवा.
म्हणजे जास्तीत जास्त कस्टमर आपल्या पाळीव प्राण्यांसाठी खाद्य विकत घेण्यासाठी आपल्या शाॅपवर येतील.अणि आपली चांगली कमाई देखील होईल.
इंटेरिअर डिझायनिंग करणे-
पेट फुड शाॅपचा व्यवसाय सुरू केल्यावर आपल्याला आपल्या शाॅपसाठी इंटेरियर परफेक्ट करावे लागेल.शाॅपमध्ये प्रोडक्ट ठेवण्यासाठी कपाट तसेच वेगवेगळे कप्पे तयार करावे लागतील.यासाठी आपण एखाद्या कारपेंटरची मदत घेऊ शकतात.
व्यवसायाचे लायसन्स प्राप्त करणे,व्यवसायाचे रेजिस्ट्रेशन करणे-
जनावरांचे खाद्य विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याआधी आपण आपल्या दुकानाची कायदेशीर रीत्या नोंदणी करून घ्यायला हवी.आपण आपल्या दुकानाचे लायसन्स देखील बनवून घ्यायला हवे.
आपण आपल्या व्यवसायाचा जीएसटी नंबर देखील प्राप्त केलेला असावा.जनावरांच्या खाद्य प्रोडक्टच्या काॅलिटीची गॅरंटी प्राप्त करण्यासाठी आय एस ओ सर्टिफिकेशन देखील प्राप्त करणे गरजेचे असते.
आपल्या ब्रँडच्या सुरक्षेसाठी आपण ट्रेडमार्क देखील घेऊन ठेवायला हवा.
होलसेलर मॅन्युफॅक्चरर सोबत संपर्क साधणे –
पेट फुड प्रोडक्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपल्या परिसरातील होलसेलर तसेच मॅन्युफॅक्चररशी संपर्क साधावा लागेल.
पेट फुड खरेदी करण्यासाठी आपण आपल्या परिसरातील इतर पेट फुड होलसेल मध्ये विकत असलेल्या होलसेलरशी बोलु शकतो.जिथुन आपल्याला चांगला नफा प्राप्त होईल अशाच ठिकाणाहुन आपण माल खरेदी करायला हवा.
कस्टमर बेस वाढवणे –
मार्केट मधील एक नियम आहे.तुम्ही आम्हाला कस्टमर मिळवून द्या.याबदल्यात आम्ही तुम्हाला कस्टमर प्राप्त करून देऊ.
आपण आपल्या पेट फुड दुकानाच्या परिसरातील अशा सर्व ठिकाणांशी संपर्क साधायला हवा जिथे पाळीव प्राणी विकले जातात.
अणि त्यांना सांगायला हवे की आपल्याकडे कोणी जनावर खरेदी केले अणि त्यांना जनावरांसाठी खाद्य हवे असेल तर आपण आमच्या शाॅपचे नाव सांगा.याबदल्यात आम्ही तुम्हाला काही टक्के कमिशन देखील देऊ.
किंवा आपण त्यांना असे देखील म्हणु शकतात की आमच्याकडे एखादा असा कस्टमर आला ज्याला जनावर खरेदी करायचे आहे तर त्याला आम्ही तुमच्याकडे पाठवू अणि तुम्ही देखील तुमच्याकडे कोणी जनावर खरेदी करण्यासाठी आले अणि त्यांना जनावरांसाठी खाद्य हवे असेल तर त्याला आमच्या शाॅपवर पाठवा.
याचसोबत आपण आपल्या शाॅपच्या नावाने सोशल मिडिया वर आपले एक आॅफिशिअल पेज बनवू शकतो.
मार्केटिंग करणे –
आपण आपल्या नवीनतम व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी पेट फुडचे पोस्टर पॅम्पलेट छापुन वाटु शकतो.वर्तमानपत्रात जाहीरात देऊ शकतो.
फेसबुक,गुगल अॅड इत्यादी वेगवेगळया आॅनलाईन सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या व्यवसायाची जाहिरात देऊ शकतो.