कमी बजेटमध्ये सुरू करता येतील अशा ९५ व्यवसाय कल्पणा
जेव्हा आपण स्वताचा एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचे ठरवतो तेव्हा सर्वात पहिली समस्या जी आपल्यासमोर उभी राहते ती आहे भांडवलाची.
कारण आपल्याला जो उद्योग व्यवसाय सुरू करायचा असतो त्यासाठी जास्त भांडवल लागणार असते अणि आपल्याकडे खूप कमी भांडवल उपलब्ध असते.
ज्यामुळे आपल्याला स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करता येत नसतो.पण आज आम्ही तुम्हाला काही अशा १०१ व्यवसायाच्या कल्पणा सुचवणार आहोत.
ज्या व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी आपल्याला खुप जास्त भांडवलाची आवश्यकता नसते खुप कमी भांडवलात देखील आपण हे व्यवसाय सुरू करू शकता.
कमी बजेटमध्ये सुरू करता येतील असे १०१ व्यवसाय उद्योग कोणकोणते आहेत?
कुठल्याही उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छित असलेल्या व्यक्तीला सुरू करता येतील असे कमी बजेट मधील उद्योग व्यवसाय पुढीलप्रमाणे आहेत-
१) डिजीटल मार्केटिंगचा व्यवसाय – (Digital Marketing Business)
डिजीटल मार्केटिंग ही आपल्या प्रोडक्ट सर्विसची व्यवसाय उद्योगाची मार्केटिंग करण्याची एक नवीन पदधत आहे.यात मोबाईल लॅपटॉप कंप्यूटर इत्यादी डिजीटल उपकरणांच्या माध्यमातून टार्गेट कस्टमर पर्यंत आपले प्रोडक्ट पोहचवले जाते.
यात आपण जेवढे निर्मितीशील असाल, नवनवीन कल्पणांवर काम करू तितकी आपण जास्त ह्या क्षेत्रात कमाई करू शकतो.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम डिजीटल मार्केटिंगचा कोर्स करावा लागेल हा कोर्स आपण आॅनलाईन किंवा आॅफलाईन देखील करू शकतात.
गुगल अॅड, इंस्टाग्राम अॅड, फेसबुक अॅड इत्यादी सोशल मिडिया वरून अॅड पाठवायला आपणास शिकावे लागेल.
डिजीटल मार्केटिंग कोर्स करून झाल्यावर शिकल्यानंतर आपण सुरूवातीला आॅफिस न घेता,कुठलाही कर्मचारी कामावर न लावता घरातुनच स्वताची डिजीटल मार्केटिंग एजन्सी एकट्याने सुरू करू शकतात.
सुरूवातीच्या काळात आपल्या क्लाईंटसाठी आपण फ्री मध्ये काम करू शकतात क्लाईंटचा विश्वास संपादीत केल्यानंतर आपण चार्ज करणे सुरू करायला हवे.
पुढे जाऊन आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आपण टीम देखील तयार करू शकता.
२) स्वताचा ब्लाँग सुरू करणे (Blogging Business)
स्वताचा ब्लाँग सुरू करणे ही एक उत्तम व्यवसाय कल्पणा आहे यात आपल्याला लेखनाची आवड असणे आवश्यक आहे.
अणि थोडेफार एस ईओ तसेच इतर टेक्निकल बाबींचे नाॅलेज असणे गरजेचे आहे.स्वताचा ब्लाँग सुरू करण्यासाठी आपल्याला फक्त डोमेन होस्टिंग खरेदी करण्यासाठी १० ते २० हजार इतका खर्च करावा लागतो.
अॅडसेन्स अॅपरूव्हल घेतल्यानंतर ब्लाॅगिंग मधून ट्ॅफिक येणे सुरू होऊन इन्कम सुरू व्हायला सुरूवातीचे तीन चार महिने आपल्याला साधारणतः लागु शकतात.
३) स्वताचे युटयुब चॅनल सुरू करणे (YouTube Channel Business )
स्वताचे युटयुब चॅनल सुरू करणे ही एक उत्तम व्यवसाय कल्पणा आहे.आज कित्येक जण फक्त युटयुब चॅनल चालवून महिन्याला लाखोची कमाई करत आहेत.
आपण देखील आपल्याला ज्या विषयाचे उत्तम नाॅलेज आहे अशा कुठल्याही एका विषयावर स्वताचे एक युटयुब चॅनल सुरू करू शकतात.अणि जाहिरातींच्या माध्यमातून कमाई करू शकता.
युटयुब चॅनल सुरू करण्यासाठी आपल्याला कुठल्याही गुंतवणकीची आवश्यकता नसते.
४) ऑनलाईन मार्केटिंगचा व्यवसाय (Online Marketing Business)
सोशल मिडिया हे आॅनलाईन मार्केटींग करण्याचे उत्तम ठिकाण आहे.आज आपण फेसबुक,इंस्टाग्राम,व्हाटस अप इत्यादी माध्यमांद्वारे उद्योग व्यवसायाची जाहिरात देऊन आपल्या उद्योग व्यवसायाची आॅनलाईन मार्केटींग करू शकतो.
५) फ्रिलान्सिंग सर्विस देण्याचा व्यवसाय (Freelancing Services Business)
फ्रिलान्सिंग सर्विस हा एक आॅनलाईन पैसे कमविण्याचा उत्तम मार्ग आहे.
यात आपल्याला आपल्या अंगी जे काही मार्केट मध्ये लोकांना आवश्यकता असलेले कला कौशल्य आहे त्याचा वापर करून आपल्या क्लाईंटसाठी काम करावे लागते ज्याबदल्यात आपला क्लाईंट आपल्याला आपल्या चार्जेस नुसार पे करत असतो.
फ्रिलान्सिंग मध्ये आपण वेब डेव्हलपमेंट,वेब डिझायनिंग, कंटेट रायटिंग,ग्राफिक डिझायनिंग,साॅफ्टवेअर डेव्हलपमेंट, व्हिडिओ तसेच फोटो एडिटिंग इत्यादी कामे आपल्या क्लाईंटसाठी करू शकतो.
फ्रिलान्सिंगची सर्विस देण्याचे हे काम आपण आॅनलाईन तसेच आॅफलाईन देखील करता येते.फ्रिलान्सिंग सर्विस देण्याचा हा व्यवसाय आपल्याला पार्ट टाइम तसेच फुलटाईम देखील करता येईल.
अपवर्क,फायवर, फ्रिलान्सिंग ह्या काही अशा दिग्दज वेबसाईटस आहेत जिथे आपल्याला आपल्या कला कौशल्यानुसार फ्रिलान्सिंगची कामे मिळु शकतात.
६) रिअल इस्टेट सल्लागार बनणे (Real Estate Consulting Business)
रिअल इस्टेट सल्लागार बनणे हा देखील व्यवसायाचा एक उत्तम पर्याय आहे.
जमिनीची खरेदी विक्री करणे,हे सर्व रिअल इस्टेट मध्ये येत असते.रिअल इस्टेट सल्लागार हा कुठली प्राॅपर्टी खरेदी करावी कुठली खरेदी करू नये याविषयी सल्ला देण्याचे काम करतात.
रिअल इस्टेट कन्सल्टन्सी बिझनेस मध्ये आपल्याला लाखोची कमाई करता येते.
कारण आज कुठल्याही शहरात घर किंवा जमीन खरेदी करावयाची असल्यास लोक प्राॅपर्टी कन्सल्टंटचा सर्वप्रथम सल्ला घेत असतात.मग कुठलेही घर किंवा जमीन खरेदी करत असतात.
आज प्राॅपर्टी कन्सल्टंटमुळे सर्वसामान्य लोकांना कुठल्याही मालमत्तेचा बाजारभाव कळण्यास मदत होते.अणि त्यांना योग्य मालमत्तेची खरेदी देखील करता येते.
आपल्याला देखील सर्वसामान्य व्यक्तींना आपल्या स्वप्नातील घर घेण्यासाठी मदत करायची असेल,ग्राहकांना बिल्डर पर्यंत पोहोचवायचे असेल तर आपण हा उद्योग व्यवसाय सुरू करू शकता.
ह्या व्यवसायाची सुरूवात लाख दीड लाखापासुन देखील करू शकतो.हया व्यवसायात आपल्याला मार्केट एरीया मध्ये आपल्या बजेट नुसार स्वताचे एखादे आॅफिस उभारावे लागेल.
सुरूवातीला कमी बजेट असल्यास कामासाठी कमी स्टाफ ठेवला तरी चालेल.किंवा आपण स्वता देखील हे काम करू शकतात.
आपल्या कन्सल्टन्सी व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी आपण वर्तमानपत्रात जाहिरात देखील देऊ शकतो.जेणेकरून आपला उद्योग व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.
७) कपडे धूवून इस्त्री करण्याचा व्यवसाय (Washing and Ironing Business)
लाॅण्ड्री सर्विस मध्ये आपल्याला घरोघरी जाऊन कपडे आणावे लागतात अणि कपडे धूवून अणि त्याला व्यवस्थित इस्त्री करून प्रत्येक घरी पोहोचवावे लागतात.
लाॅण्ड्री सर्विस बिझनेस मध्ये आपण जवळपास एक ते दीड लाख इतकी कमाई करू शकतो.
शहरी भागात पुरूषांसमवेत महिला देखील नोकरी करत असतात.त्यामुळे महिलांना कपडे धूवून इस्त्री करायला अजिबात वेळ मिळत नाही.अशा महिलांना आपण ही सर्विस देऊ शकतात.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ह्या क्षेत्राचा अनुभव प्राप्त करावा लागेल.आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य लोकेशन निवडावी लागते.दुकान भाडयावर घेऊन आवश्यक ती यंत्र सामग्री आणावी लागेल.
आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करणे, कामासाठी कर्मचारी वर्गाची नियुक्ती करावी लागेल साधारणत दोन ते तीन लाखाची गुंतवणूक करून आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो.
८) स्वताचे भरती फर्म सुरू करणे (Start Recruitment Firm Business)
रिक्रुटमेंट फर्म ही एक नोकरी भरती संस्था असते जी गरजु लोकांना नोकरी मिळवून देण्याचे काम करते.
यात आपल्याला बेरोजगार तरुणांची कंपनीसोबत अणि कंपनीची कर्मचारी वर्गासोबत भेट करून द्यावी लागते.यात कंपनीला देखील आपल्या कामानुसार कर्मचारी प्राप्त होतो अणि बेरोजगार तरुणांना देखील रोजगार प्राप्त होतो.
रिक्रुटमेंट फर्म दवारे बेरोजगारांना नोकरी शोधणे अणि कंपनीला आपल्या आवश्यकता नुसार कर्मचारी प्राप्त करणे अधिक सोपे होऊन जाते.
रिक्रुटमेंट फर्म याबदल्यात ज्या कंपनीला कामासाठी कर्मचारी मिळत आहे तिच्याकडुन तसेच ज्या बेरोजगार तरुणाला कंपनीत नोकरी प्राप्त होत आहे त्याच्याकडुन देखील काही कमिशन घेत असते.
९) कार्यक्रम व्यवस्थापन फर्म सुरू करणे (Event Management Firm Business)
आपण वेगवेगळ्या पार्ट्या, सार्वजनिक समारंभ,कार्यक्रम वाढदिवसाची पार्टी,आॅफिस पार्टी यांचे व्यवस्थापन करण्याचे म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करू शकतात.
आज मोठमोठ्या कंपन्या आपल्या कार्यक्रमाला आयोजित करण्यासाठी त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट फर्मची मदत घेत असतात.
१०) इलेक्ट्राॅनिक दुकान व्यवसाय (Electronic Shop Business)
भारतात तेलानंतर कशाची आयात सर्वात जास्त केली जाते तर ती इलेक्ट्राॅनिक प्रोडक्टची आहे.आज सर्वसामान्य गरीब व्यक्तीपासुन श्रीमंत व्यक्तींपर्यत सर्वांनाच इलेक्ट्राॅनिक वस्तुंची आवश्यकता असते.
ज्यात मोबाईल,टिव्ही, फ्रीज,वाॅशिंग मशिन, मिक्सर इत्यादी आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जात असलेल्या घरगुती वापरातील वस्तूंचा समावेश होतो.
जर आपण इलेक्ट्राॅनिक वस्तुंचे दुकान सुरू केले तर वेगवेगळ्या कंपन्यांच्या इलेक्ट्राॅनिक वस्तुंची विक्री करून चांगली कमाई करू शकतो.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला साधारणतः एक लाखापर्यंतची गुंतवणुक करावी लागु शकते.
भारतात दिवसेंदिवस इलेक्ट्राॅनिक वस्तुंची मागणी देखील वाढु लागली आहे.अशातच इलेक्ट्राॅनिक वस्तुंचे दुकान सुरू करणे ही एक उत्तम व्यवसाय कल्पणा ठरू शकते.
११) घरगुती कॅटिन सुरू करणे (Home Canteen Business)
आजच्या ह्या धावपळीच्या जीवनात नोकरदार व्यक्तींना आपल्या कामामुळे स्वतासाठी जेवण बनवायला अणि जेवण करण्यासाठी घरी तसेच रेस्टाॅरंट मध्ये जायला देखील वेळ नसतो.
अशा व्यक्तींना होम कॅन्टीनची सर्विस देऊन आपण घरबसल्या त्यांना जेवण पोहचवण्याचे काम करू शकतो.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी आपले दुकान उघडण्याची आवश्यकता नसते.
कारण ह्यात आपल्याला कस्टमरच्या घरी जाऊन त्याला सर्विस द्यायची असते.आपल्या हया व्यवसायाची बाजारात मार्केटिंग करण्यासाठी,आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पॅम्पलेट छापुन वाटु शकतो.
किंवा सोशल मिडिया दवारे आॅनलाईन देखील आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकतो.
यात आपल्याला घरोघरी जाऊन कस्टमर पर्यंत खाण्याचा डबा पोहोचवण्यासाठी काही डिलीव्हरी बाॅयची आवश्यकता भासु शकते.
१२) मसाला चहाचा व्यवसाय (Masala Tea Business)
आज आपल्या भारत देशातील ८० टक्के लोक चहा पिण्याचे शौकीन आहेत.ज्यामुळे बाजारात चहाविक्रीच्या व्यवसायाला अधिक मागणी आहे.
अशातच आपण लोकांना स्वादिष्ट मसाला चहा आपल्याकडे उपलब्ध करून दिला तर जास्तीत जास्त ग्राहक आपल्या दुकानात चहाचा आस्वाद घेण्यासाठी येतील.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला साधारणतः ५ ते १० हजारांपर्यंत गुंतवणुक करावी लागेल अणि यात महिन्याला १ लाखापर्यंत कमाई करता येते.यापेक्षाही अधिक गुंतवणूक केली तर आपण अजुन जास्त कमाई करू शकतो.
चहाच्या काॅलिटी नुसार आपण त्याची किंमत ठेवू शकतो.जास्तीत जास्त मसाला चहाची विक्री व्हावी म्हणून आपण होलसेलरला आपला चहा विकु शकतो.
मसाला चहा बनवण्याचा व्यवसाय हा आपण घरातुनच खुप कमी गुंतवणूक करून देखील सुरू करू शकतो.
१३) प्रशिक्षण संस्था (Training Institute)
ट्रेनिंग सेंटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्यासाठी साधारणतः एक लाखापर्यंत खर्च येऊ शकतो.
पण सरकार सोबत एन एस डी सी (national skill development corporation) दवारे जोडले जाऊन आपण किमान १० ते २० हजार इतकी गुंतवणुक करून देखील आपण स्वताचे ट्रेनिंग सेंटर तसेच इन्स्टिट्यूट सुरू करू शकता.
१४) मेणबत्या उदबत्ती बनविण्याचा व्यवसाय (Incense and Candle Making Business)
मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे ज्याची मागणी कधीही कमी होणार नाही कारण आज वाढदिवस,घरगुती सजावट असो किंवा कुठलेही धार्मिक कार्य असो मेणबत्तीचा वापर हा प्रत्येक ठिकाणी मेणबत्तीची आवश्यकता असते.
मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय हा आपल्याला १० ते ५० हजारांपर्यंतची गुंतवणुक करून देखील सुरू करता येईल.
हा व्यवसाय सुरू केल्यावर आपल्याला लोकांपर्यंत याला सर्वप्रथम मार्केटिंग करून पोहोचवा लागेल जेणेकरून जास्तीत जास्त कस्टमर आपल्यापर्यंत येतील.अणि आपल्या मेणबत्तीची अधिक विक्री होईल.
१५) पापड लोणची सारखी घरगुती उत्पादन तयार करणे (Manufacturing of Household Products Papad and Pickle)
लोणचे अणि पापड ही दोन अशी घरगुती उत्पादने आहेत ज्यांचा समावेश नेहमी आहारात केला जातो.
प्रत्येक हंगामात ह्या दोन्ही वस्तुंना खुपच मागणी असते.कारण यांचे कुठलेही विशिष्ट सीजन नसते.घराघरात जेवणासोबत आज स्वाद येण्यासाठी लोणचे वापरले जाते.आहारात पापडाचा देखील वापर केला जातो.
यावरून आपणास लक्षात येईल की पापड लोणची बनविण्याचा व्यवसायात आपण किती भरघोस कमाई करू शकतो.
पापड लोणची बनविण्याचा हा व्यवसाय आपण खुप कमी भांडवल लावून देखील सुरू करू शकतो.
ज्यांच्याकडे खुप कमी भांडवल उपलब्ध आहे अशा महिला घरातुन देखील लोणचे पापड बनविण्याचा व्यवसाय सुरू शकतात.
हा व्यवसाय करण्यासाठी फक्त आपल्याला स्वादिष्ट लोणचे अणि उत्तम प्रकारचे पापड बनविण्याचा विधी माहीत असणे आवश्यक आहे.
किंवा आपण दुसरया उत्पादकांकडून लोणचे पापड बनवून घेऊन आपला प्राॅफिट मार्जिन समाविष्ट करून देखील लोणचे पापडची विक्री करू शकतो.
१६) नाश्त्याचे दुकान (Breakfast Shop Business)
आज आपण सर्वच जण सकाळच्या वेळी चहा नाश्ता करतच असतो.८० टक्के लोकांना रोज सकाळी नाश्ता करण्याची सवय असते.
पण सकाळच्या वेळी कित्येक नोकरदार वर्गाला लवकर आॅफिस जाण्याच्या घाईत नाश्ता देखील करता येत नाही.तसेच काही व्यक्ती असे देखील असतात जे बाहेरगावी नोकरीला आहेत अणि त्यांना नाश्ता बनवता येत नाही.
अशा गरजु व्यक्तींसाठी आपण सर्व नोकरदार व्यक्ती जमतील अशा ठिकाणी एखादे नाश्ता सेंटर सुरू करून सकाळच्या वेळी त्यांना नाश्ता उपलब्ध करून देऊ शकतो अणि चांगला प्राप्त करू शकतो.
१७) किराणा दुकान (Grocery Shop Business)
किराणा दुकान सुरू करणे ही एक उत्तम व्यवसाय कल्पणा आहे.किराणा दुकानात आपण दैनंदिन जीवनात रोज आवश्यक असणारया जीवनावश्यक किराणा वस्तू विक्रीसाठी ठेवू शकतो.
पण सध्या ह्या क्षेत्रात देखील स्पर्धा वाढत आहे.म्हणुन स्पर्धेच्या ह्या युगात टिकुन राहण्यासाठी आपल्याला आपल्या इतर प्रतिस्पर्धीपेक्षा एक पाऊल पुढे असणे आवश्यक आहे.
यासाठी आपल्या ग्राहकांना आपल्या दुकानाकडे आकर्षित करण्यासाठी आपणास नवनवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा देखील वापर करावा लागेल.
१८) स्टेशनरीचे दुकान (Stationery shop business)
स्टेशनरीचे दुकान हा व्यवसाय भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात कुठेही चालेल असा आहे.हा एक शिक्षणाशी संबंधित व्यवसाय आहे.
स्टेशनरीच्या दुकानात आपण शालेय महाविद्यालयीन जीवनात लेखन वाचण करताना विदयार्थ्या़ना उपयोगी पडणारे पेन,पेन्सिल,पाटी,शाॅपनर,खोडरबर,एफोर साईज पेपर,पॅड,वहया,इत्यादी प्रत्येक साहित्य विक्रीसाठी ठेवले जाते.
आपल्या शहरात ज्या ठिकाणी शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालये आहेत अशा ठिकाणी आपण स्टेशनरीचे दुकान सुरू करू शकतो.
स्टेशनरीच्या साहित्याची नेहमी मागणी असते.जसजसे शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होत जाईल शिक्षण क्षेत्रावर अधिक जोर दिला जाईल तसतसे हया स्टेशनरी साहित्याला भविष्यात अधिक मागणी वाढणार आहे.
फक्त हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला अशा ठिकाणी स्टेशनरीचे दुकान टाकावे लागेल जिथे आपली जास्तीत जास्त विक्री होईल.जिथे जास्तीत जास्त विद्यार्थी असतात.
उदा,शाळा महाविद्यालयांच्या आवारात,सरकारी तसेच खासगी कार्यालयांच्या परिसरात.
१९) दागिने बनविण्याचा व्यवसाय (Jewelry making business)
आजच्या ह्या फॅशनच्या दुनियेत सर्व महिला वर्गाला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालायला अधिक आवडते.
जर आपल्याला देखील ज्वेलरी बनवता येत असेल तर आपण हाताने बनविल्या जाणाऱ्या दागिन्यांचा व्यवसाय सुरू करू शकता.
यात ज्वेलरी तयार करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मशिनचा वापर केला जात नसतो.यात सर्व दागिने हाताने बनविले जातात.
हा एक फायदेशीर व्यवसाय आहे जो आपण कमी भांडवलात देखील सुरू करू शकतो.
हा व्यवसाय सुरू करण्याआधी आपल्याला कशा प्रकारचे दागिने लोकांना हवे आहेत कोणत्या डिझाईनचे दागिने लोकांना पाहीजे आहे हे मार्केट रिसर्च करून जाणुन घ्यावे लागेल.
अणि मग रिसर्च वगैरे करून आपले प्रोडक्ट कस्टमर साठी लाॅच करावे लागेल.हा व्यवसाय आपण आपल्या घरातुन देखील सुरू करू शकतो.
घरातुनच ज्वेलरी बनवून भाड्याच्या दुकानात, किंवा स्वताच्या दुकानात ज्वेलरी विकण्याचा व्यवसाय आपण करू शकतो.
छोट्या पातळीवर आपण हा व्यवसाय सुरू केल्यास आपल्याला कुठल्याही कर्मचारीची आवश्यकता पडणार नाही पण मोठ्या पातळीवर हा व्यवसाय सुरू करायचे म्हटले तर आपण शिल्पकाराला आपल्या हाताखाली कामासाठी ठेवू शकतात.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला जास्त गुंतवणकीची आवश्यकता देखील नसते.हा व्यवसाय आपण पाच ते दहा हजाराची गुंतवणूक करून देखील सुरू करू शकतो.
२०) आर्थिक नियोजन व्यवसाय (financial planning business)
फायनान्शिअल प्लॅनर हा एक प्रोफेशनल व्यक्ती असतो.जो वेगवेगळ्या कंपन्यांना तसेच लोकांना वैयक्तिकरीत्या आपले दीर्घकालीन आर्थिक ध्येय गाठण्यासाठी मदत करत असतो.
आपल्याला देखील इतरांना त्यांचे आर्थिक ध्येय प्राप्त करण्यासाठी मदत करायची आहे तर आपण देखील फायनान्शिअल प्लॅनिंगचा व्यवसाय सुरू करू शकता.
२१) डीजे सेवा देण्याचा व्यवसाय (DJ service business)
ज्या व्यक्तींना संगीताची आवड प्रेम आहे त्यांना माहीत आहे की कोणत्या वेळी कोणते गाणे लोकांसाठी वाजवायला हवे जेणेकरून त्यांना ते आवडेल.
असे व्यक्ती लग्न समारंभात डिजे सर्विस देण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात.सध्या युवा वर्गाला ह्या व्यवसायाची क्रेझ लागली असल्याने हा व्यवसाय करण्याला युवा वर्ग अधिक प्राधान्य देत आहेत.
ज्या व्यक्तींना लग्न समारंभात पार्टीत डिजे सर्विस हवी आहे अशा व्यक्तींना डिजे सर्विस देण्याचे काम आपण करू शकतात.
डिजे सर्विस बुक करण्यासाठी १० ते २० हजार रुपये बुकिंग चार्ज द्यावा लागत असतो.समजा एखाद्या व्यक्तीने १० हजार प्रमाणे १५ दिवसांसाठी डिजे बुक केला तरी देखील दीड लाखापर्यंत आपणास कमाई करता येते.
२२) चटपटीत नमकीन पदार्थ बनविण्याचा व्यवसाय (Namkeen making business)
चटपटीत पदार्थाची प्रत्येक ठिकाणी मागणी असते.आपल्याला प्रत्येकाला चहासोबत काहीतरी चटपटीत पदार्थ खाऊ वाटत असते.
त्यामुळे हा एक उच्च मागणी असलेला व्यवसाय आहे.हा व्यवसाय आपण फुलटाईम किंवा नोकरी वगैरे करून देखील करू शकतो.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला काही यंत्रसामग्रीची आवश्यकता असते.जसे की मिक्सिंग मशीन, फ्रायर मशिन,सेव मेकिंग मशिन,पॅकेजिंग मशिन वजन करणारी मशिन इत्यादी.
चटपटीत पदार्थ बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला दोन लाखापर्यंतची गुंतवणुक करावी लागु शकते.
२३) फळ अणि भाजीपाला यांचे सॅलड बनविण्याचा व्यवसाय (fruit and vegetable salad making business)
आज जेवणात प्रत्येक ठिकाणी सलादचा समावेश केला जातो.कारण सलाद चविष्ट तर असतेच शिवाय आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले असते.
हा व्यवसाय आपण फक्त दहा हजाराची गुंतवणूक करून देखील सुरू करू शकता.हा व्यवसाय आपण घरातुन सुरू करू शकतो किंवा फळ भाजीपाला याचे सलाद बनविण्याचे स्वताचे एखादे दुकान देखील सुरू करू शकतो.
सलाद बनविण्यासाठी आपल्याला फळांची,शाकाहारी भाज्यांची अणि मसाल्याची आवश्यकता असते.
२४) मसाल्याचा उद्योग व्यवसाय सुरू करणे (masala business)
आपल्या स्वयंपाकघरात मसाल्याचा वापर आपण नेहमी करत असतो.यावरून आपणास कळुन जाईल की बाजारात मसाल्याला किती अधिक प्रमाणात मागणी आहे.
मसाल्याचा व्यवसाय हा आपल्याला दोन तीन लाखापर्यंत गुंतवणूक करून देखील सुरू करता येईल.
हा व्यवसाय सुरू करायला आपल्याला सर्वप्रथम लोकल मार्केटला समजुन घेणे आवश्यक आहे.लोकल मार्केटची डिमांड काय आहे हे समजून घ्यावे लागेल.त्यानंतरच आपण मसाला उत्पादनाचा हा व्यवसाय सुरू करू शकता.
२५) कोचिंग संस्था सुरू करणे (coaching institute business)
स्वताचे कोचिंग संस्था सुरू करणे ही शिक्षण क्षेत्रातील एक सुवर्णसंधी आहे.आज आपण स्वताचे कोचिंग सेंटर सुरू करून शाळा महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना कोचिंग देऊन चांगली कमाई करू शकतो.
यात आपण पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय शिकवू शकतो.याचसोबत अकरावी बारावी तसेच काॅमर्सचे विद्यार्थी प्रायमरी शाळेत शिकणारे विद्यार्थी यांना कोचिंग देऊ शकतो.
आपल्या शहरातील ज्या भागात शाळा महाविद्यालय आहेत त्या विभागात आपले कोचिंग सेंटर करू शकतो.
२६) मॅट्रिमोनियल सर्विस देण्याचा व्यवसाय (matrimonial service business)
आज जागोजागी लव मॅरेज लिव्ह इन रिलेशनशिपचे प्रकार वाढत असले तरी आजही प्रत्येक आईवडिलांना वाटते की आपल्या मुलामुलींचे लग्न आपल्या जातीतील आपल्या बरोबरीच्या चांगल्या मुला मुलीशीच व्हावे.
म्हणजे आजही मुलामुलीचे लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने केले जाते आहे.ज्यामुळे आईवडील आपल्या मुलासाठी आपल्याच जातीतील योग्य वधु शोधत असतात.पण कामाच्या वाढत्या व्यापामुळे आपल्याला योग्य वधु वर शोधणे फार कठिण जात असते.
अशावेळी प्रत्येक व्यक्ती विवाह जुळवणी करणारया संस्थांची मॅरेज ब्युरोची मदत घेत असते.
आपल्याला देखील हा व्यवसाय करायचा असेल तर आपल्यासाठी ही एक उत्तम संधी आहे कारण हा दिर्घकाळासाठी चालणारा व्यवसाय आहे ज्याला बाजारात अधिक मागणी देखील आहे.
२७) दुग्ध व्यवसाय (milk business)
आपणा सर्वांना माहीत आहे की आपला देश हा एक कृषीप्रधान देश आहे पण आपल्या भारत देशात २८ टक्के पेक्षा अधिक लोक दुधाचा व्यवसाय करताना दिसुन येतात.
हा एक असा व्यवसाय आहे ज्यात खुप कमी गुंतवणूक करून देखील आपण चांगला नफा प्राप्त करू शकतो.
दुधाचा व्यवसाय हा आपण आपल्या घरातुन देखील सुरू करू शकता.हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला मोठी जागा तसेच यंत्रांची आवश्यकता नसते.
फक्त आपल्याला गायी म्हशी यांचे व्यवस्थित पालनपोषण करून त्यांच्यापासून दुध प्राप्त करावे लागते.
दुधाच्या व्यवसायाला मार्केट मध्ये अधिक मागणी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे आज बाजारात चहाला अधिक मागणी तर आहेच शिवाय दुधापासून तयार करण्यात आलेले विविध पदार्थ डेअरी मध्ये तयार करून विकले जातात.
२८) आॅनलाईन किराणा दुकान सुरू करणे (online grocery shop business)
आॅनलाईन किराणा दुकान सुरू करणे ही देखील एक उत्तम व्यवसाय कल्पणा आहे.यात आपण किराणा माल लोकांपर्यंत आॅनलाईन पदधतीने घरबसल्या पोहोचवू शकतो.
आधी आपण कुठलीही वस्तू खरेदी करण्यासाठी पायी दूरवर चालत जाऊन दुकानात जात होतो.पण जेव्हापासून डिजीटल क्रांतीला सुरूवात झाली तेव्हापासून आता सर्व काही आॅनलाईन खरेदी करून घरबसल्या मागवता येत आहे.
आपल्याला देखील आॅनलाईन किराणा दुकान सुरू करायचे असल्यास आपण एक लाखापर्यंत गुंतवणुक छोट्या स्तरावर का होईना स्वताचे आॅनलाईन किराणा दुकान सुरू करू शकतात.
हा एक दिर्घकाळ चालणारा व्यवसाय आहे कारण किराण्याची मागणी ही कधीच संपत नसते.पण ह्या क्षेत्रात सध्या स्पर्धा देखील खुप पाहायला मिळते आहे.
२९) विमा एजन्सी सुरू करणे (insurance agency business)
सध्या प्रत्येकाला आपल्या अणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आपला इन्शुरन्स करून घ्यायचा असतो.अशात आपण स्वताची विमा एजन्सी सुरू करून लोकांना इन्शुरन्स उपलब्ध करून देऊन चांगली कमाई करू शकतात.
३०) योगा क्लासेस घेणे (yoga classes business)
आज प्रत्येक जण आपल्या फिटनेसच्या बाबतीत जागृत झाले आहे.त्यामुळे शहरातच नव्हे तर गावाखेडयात देखील योगा क्लासेस करणे सुरू झाले आहे.
कारण आज प्रत्येकाला निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे आहे.ज्यामुळे आपण आपल्या रोजच्या आहारात जीवनशैलीत अनेक प्रकारचे बदल करत असतो.
योगा क्लासेस हा फिटनेसशी संबंधित उत्तम व्यवसाय आहे.योगा केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मध्ये वाढ होते.आपल्याला कुठलाही आजार जडत नाही.आपले शरीर नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त राहत असते.
३१) सण -उत्सव भेट व्यवसाय (festival gift business)
कुठलाही सण उत्सव असो आपण प्रत्येक जण एकमेकाला आपल्या प्रिय व्यक्तीला गिफ्ट शाॅपमधुन गिफ्ट विकत घेऊन नक्की देत असतो.
फेस्टिवल गिफ्ट हा एक फेस्टिवल बिझनेस आहे.जो आपण कुठल्याही सण उत्सवा दरम्यान सुरू करू शकतो.प्रत्येक सण उत्सवात वेगवेगळे गिफ्ट तयार करून विकण्याचा हा व्यवसाय आहे.
यात आपण ग्राहकांना घरबसल्या गिफ्ट पोहोचवण्याची सुविधा देऊ शकतो.ज्यासाठी आपण अतिरिक्त चार्जची आकारणी देखील करू शकतो.
आपण देखील हा हंगामी व्यवसाय करून चांगली कमाई करू शकतात.
फेस्टिवल गिफ्ट बिझनेसमध्ये आपल्याला गिफ्ट विकत घेण्यासाठी खर्च करावा लागतो.अणि समजा आपण फेस्टिवल गिफ्ट बिझनेस दुकानातुन सुरू करत आहे तर दुकान भाडयाने घेण्याचा खर्च देखील आपणास करावा लागेल.
याचसोबत दुकानात काम करण्यासाठी कोणाला ठेवले असेल त्या कर्मचारीचे वेतन देखील आपणास द्यावे लागेल.
३२) महिलांसाठी जिम सुरू करणे (ladies gym business)
आपण आपल्या घराजवळील शहरातील फिटनेस प्रेमी महिलांसाठी लेडिज जिम सुरू करू शकतात.पण यासाठी आपल्याला जिम,फिटनेसशी संबंधित सर्व आवश्यक माहीती असणे आवश्यक आहे.
जिम सुरू करण्यासाठी आपल्याला पाच लाखांपर्यंत गुंतवणुक करावी लागु शकते.जिममध्ये लोकांना गाईड करण्यासाठी एखादा सर्टिफाईड ट्रेनर हायर करावा लागेल.
आपल्या जिममध्ये किती महिला येता आहेत.त्यांना आकारली जाणारी फी काय आहे यावरून आपला नफा ठरत असतो.
३३) गेम स्टोअर व्यवसाय (game store business)
आज प्रत्येकालाच गेम खेळायला आवडते अधिकतम युवा हे आपला वेळ कंप्यूटर लॅपटॉप वर गेम खेळण्यात व्यतित करत असतात.
अशात गेम स्टोअर सुरू करणे ही एक उत्तम व्यवसाय कल्पणा ठरू शकते.आज खुप असे तरूण दिसुन येतात जे गेमिंग क्षेत्रात आपले करीअर घडवू राहीले.ज्यात त्यांना आपल्या कुटुंबाची देखील साथ प्राप्त होत आहे.
गेम स्टोअर सुरू करण्यासाठी आपल्याला गेम स्टोअर उभारण्यासाठी एक योग्य जागा निवडावी लागेल जिथे जास्तीत जास्त तरूण गेम खेळण्यासाठी येतील.
यानंतर आपल्या गेमिंग व्यवसायाची मार्केटिंग देखील करावी लागेल.जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्यवसाय पोहोचेल.
३४) मोबाईल फुड ट्रक व्यवसाय (Mobile Food Truck Business)
जागोजागी फुड ट्रक व्यवसायात आपणास वाढ होताना दिसुन येत आहे.मागील काही वर्षांपासून ह्या व्यवसायाची मागणी अधिक वाढत आहे.
ज्यामुळे शहरात कोठे ना कोठे आपल्याला फुड ट्रक पाहायला मिळेलच.यात आपण खाण्यापिण्याच्या वस्तू एका जागेवरून दुसरया जागेवर देखील नेऊ शकतो.
फुड ट्रक मध्ये स्वयंपाक बनवुन ग्राहकांना जेऊ घातले जाते.यात स्वयंपाक बनवायला लागणारे सर्व साहित्य असते.
फुड ट्रक व्यवसायादवारे आपण फुड ट्रक मधून सॅडविच,समोसा, फास्ट फूड,फ्रेंच फ्राईज सारख्या व्यंजनांची विक्री करून चांगली कमाई करू शकतो.
३५) वेडिंग प्लॅनिंगचा व्यवसाय सुरू करणे (Wedding Planning Business)
आज जागोजागी लग्नाची विवाहाची योजना आखण्यासाठी वेडिंग प्लॅनरची मदत घेतली जाते.
घरातील एखाद्या व्यक्तीचे लग्न असल्यावर वेडिंग प्लॅन करण्यात घरातील सभासदांना वेडिंगचा आनंद उठवू शकता येत नसतो.हयाच समस्येला दूर करण्यासाठी वेडिंग प्लॅनरची मदत घेतली जाते.
जेणेकरून वेडिंग प्लॅनर लग्नाची सर्व प्लॅनिंग करत असतो अणि आपल्याला लग्न समारंभाचा आनंद उठवता येतो.
फक्त वेडिंग प्लॅनरला आपल्याला सांगुन द्यावे लागेल की आपल्याला लग्नात कशी व्यवस्था हवी आहे?यानंतर लग्नाचे व्यवस्थित प्लॅनिंग नियोजन करण्याची जबाबदारी वेडिंग प्लॅनरची असते.
हा व्यवसाय आपण सुरूवातीला आपल्या घरातुन सुरू करू शकतो.पण हा व्यवसाय फक्त शहरी भागात सुरू केल्यास आपल्याला अधिक नफा प्राप्त होईल.कारण शहरी भागात अशा कार्यासाठी विपुल प्रमाणात खर्च केला जातो.
३६) फळांचे ज्युस बनविण्याचा व्यवसाय (fruit juice business)
फळांचे ज्यूस बनविण्याचा व्यवसाय उन्हाळ्यात फार जास्त चालतो.फक्त हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण योग्य जागा अणि वेळेची निवड करणे आवश्यक आहे.
आपण आपल्या व्यवसायासाठी अशी जागा निवडायला हवी जिथे जास्तीत जास्त लोकांची रहदारी असते.जसे की रेल्वे स्टेशन,बस स्थानक, मार्केट,अशा जास्तीत जास्त ट्रॅफिक असलेल्या एरिया मध्ये आपण आपला व्यवसाय सुरू करायला हवा.
जुसचे दुकान सुरू करण्यासाठी आपल्याला साधारणतः ५० हजारांपर्यंत खर्च करावा लागतो.यात आपल्याला जुस बनविण्याचे मशिन विकत घेण्यासाठी फ्रीज विकत घेण्यासाठी खर्च लागेल.
३७) झेरॉक्सचे दुकान सुरू करणे (Xerox machine business)
आपण शासकीय कार्यालयाच्या,शाळा,महाविद्यालयांच्या आवारात आपले स्वताचे झेरॉक्सचे दुकान सुरू करू शकता.
जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या दुकानात आपल्या शालेय महाविद्यालयीन नोटस महत्वाच्या कागदपत्र वगैरेंच्या झेराॅक्स करण्यासाठी येतील अणि आपली जास्तीत जास्त कमाई होईल.
झेरॉक्स दुकान सुरू करण्यासाठी आपल्याला फक्त झेराॅक्स मशिन विकत घेण्यासाठी खर्च करावा लागतो.अणि झेराॅक्स दुकान सुरू करण्यासाठी भाड्याने गाळा वगैरे घ्यावा लागेल.
३८) पाॅप काॅर्न व्यवसाय (popcorn business)
आज लहानमुलांपासुन मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच पाॅप काॅर्न खायला आवडते.पाॅप काॅर्न हे एक असे व्यंजन आहे जे आपण थिएटर मध्ये सिनेमा बघत असताना देखील खाऊ शकतो.किंवा कुठे प्रवासात देखील खाऊ शकतो.
पाॅप काॅर्न खाल्याने आपल्या शरीराला कुठलीही हानी देखील पोहोचत नाही म्हणून लहानमुलांपासून मोठया माणसांपर्यंत सगळेच सिनेमा बघत असताना, प्रवास करत असताना,पाॅप काॅर्न खात असतात.
पाॅप काॅर्नची मागणी थिएटर मध्ये अधिक प्रमाणात असते थिएटर मध्ये सिनेमा बघत असताना खाण्यासाठी लोक पाॅप काॅर्न विकत घेत असतात.
आपल्याला देखील हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर आपल्यासाठी ही एक उत्तम व्यवसाय कल्पणा आहे.यात आपण लोकांना वेगवेगळ्या फ्लेवरचे पाॅप काॅर्न खाऊ घालून चांगली कमाई करू शकतो.
३९) ब्युटी किंवा स्पा सेंटर सुरू करणे (beauty and spa centre business)
ज्या महिलांना ब्युटी अणि स्पाचे उत्तम ज्ञान आहे अशा महिला तसेच मुली हा ब्युटी स्पा सेंटर व्यवसाय आपल्या घरातुन देखील सुरू करू शकता.
पण ज्यांना जास्त नफा हवा आहे अशा महिला बाजारात ब्युटी किंवा स्पा सेंटर सुरू करू शकता.हया व्यवसायात गुंतवणुक फार कमी करावी लागते अणि नफा खुप जास्त असतो.
४०) आईस्क्रीम पार्लर सुरू करणे (ice-cream parlor business)
उन्हाळ्यात हा व्यवसाय खुप जोरात चालतो.आईसक्रीम पार्लर हा एक असा व्यवसाय आहे ज्यात कमी गुंतवणूक करून देखील आपण चांगली कमाई करू शकतो.
आईस्क्रीम पार्लर सुरू करण्यासाठी साधारणतः एक ते दोन लाख इतकी गुंतवणुक करावी लागु शकते.फक्त हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला एका चांगल्या जागी शाॅप भाडयाने घ्यावे लागेल.
आईस्क्रीम पार्लर मध्ये आपल्याला वेगवेगळ्या ब्रँडची आईस्क्रीम ठेवता येईल.कडकत्या उन्हाळ्यात आज सर्वांनाच आईस्क्रीम खायला आवडते.
उन्हाळ्यातच नव्हें तर असेही प्रत्येक जणाला आईस्क्रीम खायला आवडते.आईसक्रीम पार्लर आपण सिनेमा थिएटर,माॅल शाॅपिंग सेंटर,शाळा महाविद्याल, रेल्वे मेट्रो स्टेशन इत्यादी अधिक गर्दीच्या ठिकाणी सुरू करू शकता.
४१) सेकंड हॅड कारची डिल करण्याचा व्यवसाय (second hand car dealership business )
नवीन कार खरेदी करणे आज प्रत्येकासाठी शक्य नाहीये.अणि जरी कर्ज घ्यायचे ठरवले तरी देखील कारची पुर्ण किंमत कर्जात मिळत नसते.
त्यातच कार लोनवर व्याज देखील अधिक लावले जात असल्याने कस्टमर नवीन कार विकत घेण्यापेक्षा कमी किमतीत जुनी सेकंड हॅड कार विकत घेणे अधिक पसंत करतात.
त्यामुळे दिवसेंदिवस सेकंड हॅड कारची खरेदी विक्री करण्यात अधिक वाढ होताना दिसुन येत आहे.
अशातच आपण सेकंड हॅड कारची डिल करण्याचा खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला तर आपण चांगली कमाई करू शकतो.सध्या ह्या व्यवसायात अधिक वाढ होत आहे.
छोट्या पातळीवर हा व्यवसाय सुरू करायला आपल्याला ५० हजारांपर्यंतची अणि मोठ्या पातळीवर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला २ लाखापर्यंतची गुंतवणुक करावी लागु शकते.
सेकंड हॅड कार व्यवसायात आपल्याला कार खरेदी करत असलेल्या अणि विक्री करत असलेल्या व्यक्तीकडून कमिशन प्राप्त होत असते.
सेकंड हॅड कारची खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय ही एक उत्तम व्यवसाय कल्पणा ठरू शकते.फक्त हा व्यवसाय सुरू करण्याआधी आपल्याला शोरूम करीता योग्य लोकेशन निवडावी लागेल.
४२) ड्रायव्हिंग स्कूल सुरू करणे (driving school business)
आज वर्तमानात कुठेही बाहेरगावी जाण्या येण्यासाठी आपल्या प्रत्येकाकडे स्वताची कार असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण आपल्या कुटुंबासोबत आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी,लग्न समारंभासाठी किंवा पिकनिक करीता जाऊ शकतो.
पण कार चालविण्यासाठी आपल्याला आधी कार ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जाऊन ड्राईव्ह करणे शिकावे लागेल तेव्हा कुठे आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते.
आज जागोजागी ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्यात येत आहेत जिथे जाऊन आपल्याला ड्रायव्हिंग शिकता येते.कार चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
जर आपल्याला देखील उत्तम पद्धतीने कार चालवता येते अणि आपण इतरांना कार चालवायला शिकवून पैसे कमवू इच्छित आहे तर आपण देखील हा व्यवसाय सुरू करू शकता.
हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर आपल्यासाठी ही एक उत्तम व्यवसाय कल्पणा ठरू शकते.यात कार ड्रायव्हिंग शिकवून नफा प्राप्त केला जातो.
ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्यासाठी आपल्याला कार चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी पाच सहा कार खरेदी करणे आवश्यक आहे.
ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्यासाठी एक योग्य लोकेशन निवडावी लागेल.लोकांना ड्रायव्हिंग शिकविण्यासाठी कर्मचारी नियुक्त करावे लागेल.आपल्या व्यवसाया विषयी जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहीती पोहोचावी म्हणून आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करावी लागेल.
४३) इंटेरिअर डिझाईनिंगचा व्यवसाय सुरू करणे (Interior designing business )
इंटेरिअर डिझायनर हा तो व्यक्ती असतो जो आपल्या क्रिएटीव्हीटी, कौशल्य अणि ज्ञानाच्या आधारावर एखाद्या जागेचे घराचे रूप बदलून टाकत असतो.
म्हणजे वाईट दिसत असलेल्या जागेला देखील लक्षवेधी बनवण्याचे काम इंटेरिअर डिझायनर करत असतो.
आपण प्रत्येकजण जीवनात एकदाच घर घेत असतो बांधत असतो.त्यामुळे आपली प्रत्येकाची इच्छा असते की आपले घर दिसायला आकर्षक मोहक अणि उठावदार असायला हवे.
यासाठी आपण इंटेरिअर डिझायनरची मदत घेत असतो जो आपल्या घराला अधिक आकर्षक सुंदर बनविण्यास आपली मदत करत असतो.
आपल्याला देखील इंटेरिअर डिझाईनिंगचे चांगले उत्तम ज्ञान असेल आपला इंटेरिअर डिझायनिंगचा कोर्स झाला असेल तर आपण इंटेरिअर डिझायनिंगचा व्यवसाय सुरू करून लोकांना त्यांचे घर सुंदर अणि आकर्षक बनवण्यासाठी मदत करून चांगली कमाई करू शकतात.
ह्या व्यवसायात आपल्याला खूप चांगला मार्जिन प्राप्त होत असतो.
४४) ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू करणे (trading business)
ट्रेडिंग व्यवसायात,उद्योजक एक नव्हे तर अनेक घाऊक विक्रेते आणि उत्पादकांकडून वस्तू खरेदी करून आणि थेट ग्राहकांना किंवा किरकोळ विक्रेत्यांना विकून पैसे कमवतात.
ह्या व्यवसायांतर्गत,उद्योजकाची इच्छा असल्यास,तो कोणत्याही एका कंपनीचा किंवा एकापेक्षा जास्त कंपनीचा अधिकृत व्यापार भागीदार म्हणून काम करू शकतो.
ह्या व्यवसायात आपण मोबाईल अॅक्सेसरीज,संगणकाशी संबंधित विविध उत्पादने,केमिकल तसेच इलेक्ट्राॅनिक उत्पादनांची खाद्य पेय उत्पादनांची,कृषी उत्पादनांची ट्रेडिंग करू शकतो.
४५) भिंतीला रंग देण्याचा व्यवसाय (wall painting business)
प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराची साज सजावट करण्याचा शौक असतो.घराच्या आतील तसेच बाहेरील भागाला कलर देऊन घर अधिक आकर्षक सुंदर बनवण्याची आवड असते.
सण उत्सव आल्यावर तर प्रत्येक जण आपल्या घराला रंग देण्याचे काम करतो अशावेळी जर आपण वाॅल पेटिंगचा व्यवसाय सुरू केला तर आपण चांगली कमाई करू शकतो.
दिवाळी तसेच इतर सण उत्सवाच्या काळात वाॅल पेटिंगच्या व्यवसायातुन आपण लाखोची कमाई करू शकतात.फक्त वाॅल पेटिंगचे दुकान आपण अशा ठिकाणी सुरू करावे जिथे जास्तीत जास्त ग्राहक येतील.
हे दुकान सुरू करण्यासाठी आपण भाड्याने देखील एखादा गाळा घेऊ शकतात.
४६) बेकरी व्यवसाय सुरू करणे (bakery business)
आपण स्वताचा बेकरी व्यवसाय देखील सुरू करू शकता.बेकरी व्यवसायात आपल्याला पाव,ब्रेड टोस्ट बिस्कीट अशा बेकरी उत्पादने तयार करून त्यांची विक्री केली जाते.
यात आपल्याला बेकरी प्रोडक्ट उत्पादनाचे अणि वितरणाचे काम देखील करावे लागते.
आज बेकरी मध्ये तयार करण्यात आलेल्या उत्पादनांचा दिवसेंदिवस होत असलेला खप बघता ह्या व्यवसायाची मागणी अधिक वाढत आहे.शहरी तसेच ग्रामीण भागात देखील बेकरी उत्पादनांना विशेष मागणी असते.
४७) एटीएम मशिनची फ्रेंचाइजी घेणे (atm machine franchise business
हा एक कमी पैसे खर्च करून जास्त कमाई करता येईल असा उद्योग व्यवसाय आहे.मार्केटमध्ये आपले दुकान अशा ठिकाणी आहे जिथे एटीएम मशीनला अधिक स्कोप आहे.
अशा ठिकाणी एटीएम मशीन लावून आपण चांगली कमाई करू शकतात.वेगवेगळया एटीएम करीता वेगवेगळ्या प्रकारचे चार्ज तसेच कमिशन असते.
एटीएम मशीन फ्रेंचाइजी व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला दीड ते दोन लाख इतका खर्च करावा लागेल.
४८) वाढदिवस भेटवस्तू व्यवसाय – (birthday gift business)
रोज आपल्या कुठल्या ना कुठल्या मित्राचा,मैत्रिणींचा तसेच नातेवाईकांचा वाढदिवस हा असतोच अशा वेळी आपल्या जवळील लोकांना वाढदिवसाला भेट देण्यासाठी आपण दुकानातुन वाढदिवस भेटवस्तू विकत घेत असतो.
हा एक दीर्घकालीन चालणारा व्यवसाय आहे.यात आपण स्वताचे बर्थ डे गिफ्ट शाॅप सुरू करून त्यात वाढदिवसाला देण्यासाठी वेगवेगळ्या भेटवस्तू विक्रीसाठी ठेवू शकतो.
यात आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्यांच्या वाढदिवसाला भेटवस्तू म्हणून देण्यासाठी देण्यासाठी गिफ्ट आयटम ठेवू शकतो.
४९) भेटवस्तूंचे दुकान सुरू करणे (gift Shop business)
भेटवस्तुंचे दुकान सुरू करून आपण त्यात वेगवेगळ्या सण उत्सव प्रसंगी देण्यासाठी भेटवस्तू विक्रीसाठी ठेवू शकतो.
गिफ्ट शाॅप मध्ये आपण लहानमुलांपासून मोठया माणसांना सण उत्सव प्रसंगी वाढदिवस प्रसंगी देण्यासाठी भेटवस्तू विक्रीसाठी ठेवू शकतो.
हा एक उत्तम व्यवसाय आहे.कारण कुठल्याही लग्न समारंभ प्रसंगी आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना काही ना काही भेटवस्तू देतच असतो.
यावरून आपणास लक्षात येईल की ह्या व्यवसायाला किती मागणी आहे.
५०) टी शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करणे (T shirt printing business)
आज आपल्याला प्रत्येकाला उत्तम डिझाईन असलेले कपडे परिधान करायला आवडते.सध्या मार्केट मध्ये प्रिंटेड अणि स्टायलिश टी शर्ट विकण्याचा ट्रेंड सुरू आहे.
जर तुम्हाला देखील मार्केट मध्ये वेगवेगळ्या रंगाचे डिझाईनचे स्टायलिश टी शर्ट विकण्याचा व्यवसाय करायचा आहे तर टी शर्ट प्रिंटिंग बिझनेस आपल्यासाठी उत्तम व्यवसाय ठरू शकतो.
यात तुम्ही नवनवीन डिझाईनचे स्टायलिश टी शर्ट विकुन चांगली कमाई करू शकतात.
५१) शेळीपालन करण्याचा व्यवसाय – (goat farming business)
शेळीपालन हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला सरकारकडुन सबसिडी देखील प्रदान केली जाते.
शेळीपालन हा एक असा व्यवसाय आहे ज्यात कमी गुंतवणूक करून देखील आपण दरमहा चांगली कमाई करू शकतो.
जे व्यक्ती शेतकरी आहेत ते शेतीसोबत शेळीपालन हा व्यवसाय देखील जोडधंदा म्हणून करू शकता.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी एक युनिट शेळ्या असणे आवश्यक आहे अणि ह्या सर्व शेळ्या एकाच जातीच्या असायला हव्यात.
शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी आपल्याला एका जागेची निवड करावी लागेल अणि निवडलेल्या जागी शेळ्या ठेवण्यासाठी शेड बांधावे लागेल.
५२) व्हिडिओ शुटिंग करणे (video shooting business)
सध्या फोटोग्राफी ह्या व्यवसायाला बाजारात अधिक मागणी आहे.त्याचमुळे जास्तीत जास्त व्यक्ती ह्या व्यवसायाची सुरूवात करत आहेत.
आपल्याला देखील एक असा व्यवसाय सुरू करायचा आहे जो खुप चालेलही अणि त्यातुन कमाई देखील होईल तर आपण फोटोग्राफी व्यवसायाकडे वळु शकतात.
आधी लोक फक्त लग्नामध्ये लग्नाचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरला बोलवायचे.
पण आता आपल्या लग्नातील लग्नाच्या आधीचा प्रत्येक क्षण कॅमेरा मध्ये कैद करण्यासाठी तरूण तरुणी प्री वेडिंग शुट,शाॅवर शुट,मर्टिनिटी शुट, बर्थ डे शुट, डान्स शुट इत्यादी करीता प्रोफेशनल फोटोग्राफरला बोलवत असतात.यावरून आपणास लक्षात येईल की बाजारात ह्या व्यवसायाला किती अधिक प्रमाणात मागणी आहे.
५३) डान्स क्लासेस सुरू करणे (start dance classes)
आज आपल्याला प्रत्येकाला नृत्य करायला शिकायला आवडते लग्न असो किंवा कुठलीही पार्टी,कुठलाही आनंदाचा क्षण असो आपण नेहमी नृत्य करत तो साजरा करत असतो.
ज्यांना उत्तम प्रकारचे नृत्य जमते असे व्यक्ती स्वताचा एखादा डान्स क्लास सुरू करू शकतात.कारण आपल्या शहरात असे खुप व्यक्ती असतात ज्यांना नृत्य शिकायचे असते पण त्यांना चांगले नृत्य शिकवणारे कोणी नसते.
आज शहरात डान्स क्लासेस जागोजागी आपल्याला पाहायला मिळतील पण प्रत्येक ठिकाणी फी जास्त असते किंवा ट्रेनर चांगले नसल्याची समस्या असते.
अशा परिस्थितीत जर आपण स्वताचा एखादा डान्स क्लास सुरू केला ज्यात विद्यार्थ्यांना परवडेल अशा फी मध्ये चांगली ट्रेनिंग उपलब्ध करून दिली तर आपण ह्या व्यवसायात खुप कमाई करू शकतात.
५४) चिप्स बनवण्याचा व्यवसाय (chips making business)
चिप्स बनवून व्यवसाय आपण आपल्या घरातुन देखील सुरू करू शकता.
चिप्स बनवण्याचा व्यवसाय घरातुन सुरू करण्यासाठी आपल्याला पाच ते दहा हजाराची गुंतवणूक करावी लागेल.
केळी बटाटयाचे वेफर्स चिप्स इत्यादी उत्पादने आपण आपल्या घरातुनच छोट्या पातळीवर व्यवसाय सुरू करून चिप्स तयार करायला सुरुवात करू शकतो.
५५) ब्युटी पार्लर सुरू करणे (beauty parlour business
ब्युटी पार्लर हा व्यवसाय ज्या महिलांचा ब्युटी पार्लरचा कोर्स झाला आहे त्या महिला आपल्या घरातून देखील सुरू करू शकता.
ब्युटी पार्लर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला खुप जास्त गुंतवणूक करावी लागत नाही.पण हा व्यवसाय करण्यासाठी आपल्या अंगी स्कील असणे आवश्यक आहे.
जर आपल्याला ब्युटी पार्लरचे दुकान टाकायचे असेल तर शहरात किंवा ग्रामीण भागात ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी आपल्याला तेथे एका योग्य लोकेशनची निवड करावी लागेल.जिथे जास्तीत जास्त कस्टमर आपल्यापर्यंत येतील.
यानंतर निवडलेल्या लोकेशनवर ब्युटी पार्लरचे दुकान सुरू करण्यासाठी जागा भाडयाने घ्यावा लागेल.तसेच दुकानात काम करण्यासाठी कर्मचारी वर्गाची नियुक्ती देखील करावी लागेल.
आपल्या उद्योग व्यवसायाचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रचार प्रसार व्हावा म्हणून आपल्या उद्योग व्यवसायाची आॅनलाईन तसेच आॅफलाईन पद्धतीने मार्केटिंग करायला हवी.
५६) साबण बनविण्याचा व्यवसाय (soap making business)
रोजच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जात असलेल्या वस्तुंचा व्यवसाय सुरू केल्यास त्याची जास्तीत जास्त विक्री होण्याची जास्त शक्यता असते.कारण ती वस्तु रोज ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात उपयोगात येत असते.
साबण बनविण्याचा व्यवसाय हा एक अत्यंत फायदेशीर उद्योग व्यवसाय आहे.
कारण अंघोळीचा साबण,कपडे धुण्याचा साबण,भांडे धुण्याचा साबण यांचा आपल्या दैनंदिन जीवनात रोज उपयोग होत असतो.त्यामुळे जास्तीत जास्त कस्टमर साबणची खरेदी दुकानातुन करत असतात.
यात आपल्याला वेगवेगळ्या साबण बनविण्यासाठी आवश्यक साहित्याचा वापर करून साबण बनवून आॅफलाईन तसेच आॅनलाईन पदधतीने मार्केट मध्ये साबण कस्टमरला विकायचा आहे.
किंवा आपण आपला तयार केलेला साबण होलसेलरला देखील विकु शकतो.
छोट्या पातळीवर आपल्याला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण २ ते ३ लाखापर्यंतची गुंतवणुक करून देखील आपला साबण बनविण्याचा व्यवसाय सुरू करू शकतो.
मोठ्या पातळीवर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला ७ ते ८ लाखापर्यंतची गुंतवणुक करावी लागु शकते ज्यात साबण बनविण्यासाठी लागत असलेल्या मशिन,कच्चा माल,दुकानात काम करण्यासाठी आवश्यक श्रमिक वर्ग इत्यादींचा समावेश होतो.
ह्या व्यवसायात १५ ते २० टक्के इतका नफा आपल्याला प्राप्त होत असतो.जसजशी आपली मार्केट मध्ये ओळख वाढत जाईल आपले कस्टमर वाढुन ह्या नफ्यात अधिक वाढ होईल.
५७) सोशल मिडिया सर्विस देण्याचा व्यवसाय -social media service business)
सोशल मिडिया सर्विस हा एक उत्तम व्यवसाय आहे.यात आपण सोशल मिडियाशी संबंधित वेगवेगळ्या सर्विसेस देऊन चांगली कमाई करू शकतो.
५८) मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय (candle making business)
मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे ज्याची बाजारात सर्वात जास्त मागणी आहे.वेगवेगळया धार्मिक कार्यात,घराची सजावट करण्यासाठी तसेच रोमॅन्टिक कपल कडुन देखील कॅन्डल लाईट डिनर करण्यासाठी मेणबत्त्यांचा उपयोग केला जातो.
मेणबत्त्यांचा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला जास्त भांडवल देखील लागत नाही.हा व्यवसाय आपण १० ते ५० हजारांपर्यंतची गुंतवणुक करून देखील सुरू करू शकतो.
५९) टिकली बनविण्याचा व्यवसाय सुरू करणे –
टिकली बनविण्याचा व्यवसाय हा व्यवसाय करू इच्छित व्यक्तींसाठी एक उत्तम पर्याय आहे.हया व्यवसायात भरपुर नफा आहे अणि हा वर्षभर चालणारा व्यवसाय आहे.
कारण प्रत्येक महिला तसेच लहान मुलगी देखील रोज आपल्या कपाळावर टिकली लावत असते.
हा व्यवसाय आपण घरबसल्या करून दिवसाला ३ हजार रुपये कमवू शकतो.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला फक्त कच्च्या मालाची अणि एका वेलवेट शिटची आवश्यकता असते.
६०) सकाळची उत्पादने विकण्याचा व्यवसाय (morning products selling business)
रोज सकाळी आपण चहासोबत टोस्ट,खारी,ब्रेड,पाव बिस्किटे इत्यादी सकाळची उत्पादने खात असतो.ही सर्व अशी उत्पादने आहेत जी प्रत्येकाला रोज सकाळी चहासोबत हवी असतात.
जर आपल्याला देखील ह्या उत्पादनांची विक्री करून चांगली कमाई करायची आहे तर हा आपल्यासाठी एक उत्तम व्यवसाय ठरणार आहे.
कारण ह्या उत्पादनांची रोज सकाळी मागणी असते.फक्त आपल्याला अशा ठिकाणी ह्या उत्पादनांची विक्री करावी लागेल जिथे जास्तीत जास्त लोक ही उत्पादने खरेदी करण्यासाठी येतील.
६१) स्वीट बाॅक्स बनविण्याचा व्यवसाय (sweet box making business)
भारतात मिठाई खाणारयांची संख्या खुप अधिक प्रमाणात आहे.हेच कारण आहे की आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई तयार करून बाजारात रोज विकल्या जात असतात.
आज कुठल्याही सण उत्सवात लग्न समारंभात तसेच वाढदिवसाच्या पार्टीत देखील मिठाईची आवश्यकता असते.आज कुठलाही कार्यक्रम मिठाईविना पुर्ण होत नाही.
अशात जर आपणास मिठाईचा डब्बा बनविण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर आपल्यासाठी ही एक उत्तम व्यवसाय संधी आहे.कारण मिठाईचा डब्बा बनविण्याचा व्यवसाय बाजारात खुप कमी व्यक्ती करताना दिसुन येतात.
समजा आपण फुल आॅटोमॅटिक स्वीट बाॅक्स मेकिंग मशिन सोबत आपल्या व्यवसायाला सुरुवात करत आहे तर हे मशिन खरेदी करण्यासाठी आपल्याला ६ ते ७ लाखापर्यंत खर्च करावा लागु शकतो.
याचसोबत कच्च्या मालाची खरेदी करण्यासाठी, व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी,वीज अणि कर्मचारी वर्गावर गुंतवणुक करण्यासाठी १५ लाखापर्यंत खर्च करावा लागु शकतो.
६२) पेपर बॅग बनविण्याचा व्यवसाय (paper bag making business)
प्लास्टिक पिशवी ही बाजारातील सामान वाहून नेण्याचे प्रमुख साधन माध्यम आहे.आज बाजारातील भाजीपाला फळे,दुकानातुन विकत घेतलेले कपडे, दैनंदिन जीवनातील आपली रोजची महत्वाची कागदपत्रे इत्यादी ठेवण्यासाठी आपण प्लास्टिक पिशवीचा वापर करत असतो.
पण पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आल्यापासून कागदी पिशव्यांचा वापर होऊ लागला.
अशातच कागदी पिशव्या तयार करणे हा एक फायदेशीर व्यवसाय आपल्यासाठी ठरू शकतो.कारण लोक ग्रीन कन्सेप्ट पासुन अधिक प्रभावित असलेले आपणास दिसून येतात.
कागदी पिशव्या ह्या वापरण्यास ट्रेंडी अणि इको फ्रेंडली असल्याने बाजारात ह्या पिशव्यांची मागणी अधिक वाढत आहे.
ह्या कागदी पिशव्या पर्यावरणास हानीकारक नसतात.यात वस्तू ठेवणे अधिक सोपे असते.कागदी पिशव्यांची किंमत देखील सर्वसामान्य व्यक्तींना परवडेल अशी असते.
६३) सजावटीच्या वस्तू बनविण्याचा उद्योग व्यवसाय (decoration items making business)
दिवाळी तसेच कुठल्याही सण उत्सवात लोक आपल्या घराची साजसजावट करत असतात.
दिवाळी मध्ये,गणेशोत्सवा दरम्यान लोक वेगवेगळ्या डेकोरेशन आयटमच्या साहाय्याने आपल्या घराला सजवत असतात.
जर तुम्हाला देखील अशाच सण उत्सवात साजसजावट करण्यासाठी वापरल्या जात असलेल्या वस्तु बनविण्याचा शोक आहे तर तुम्ही सजावटीच्या वस्तू बनविण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.
६४) टेलरींगचे दुकान सुरू करणे (tailoring Shop business)
जर आपल्याला देखील शिलाई जमत असेल तर आपण शिलाईचे दुकान सुरू करू शकतात.हा व्यवसाय महिला तसेच पुरूष देखील करू शकतात.
टेलरींग हा एक असा व्यवसाय आहे जो कधीही बंद पडणार नाही.हा प्रत्येक हंगामात तसेच रोज चालणारा व्यवसाय आहे.
सण उत्सव आल्यावर तर महिला पुरुष तसेच तरूण तरूणी कपडे शिवायला टाकण्यासाठी टेलरच्या दुकानात गर्दी करत असतात.
हा व्यवसाय आपण स्वताचे टेलिरींगचे दुकान टाकुन किंवा घरातुन देखील सुरू करू शकता.फक्त हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला एका शिलाई मशीनची आवश्यकता असते.
टेलरींगचा व्यवसाय महिला घरगृहिणी घरातुन देखील सुरू करू शकतात.टेलरींग शाॅप सुरू करण्यासाठी आपल्याला एक लाखापर्यंत गुंतवणुक करावी लागेल.
अणि घरातुन हा व्यवसाय सुरू केला तर आपण ३० हजारात देखील आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो.
६५) द्रोण तसेच पत्रावळी बनविण्याचा व्यवसाय सुरू करणे
द्रोण तसेच पत्रावळी बनविण्याचा व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे ज्यात आपण कमी गुंतवणूक करून देखील चांगली कमाई करू शकतो.
अनेकदा आपण लग्नात तसेच एखाद्या पार्टीत समारंभात द्रोण पत्रावळी मध्ये जेवण करत असतो.मंदिरात प्रसाद देखील आपल्याला द्रोण पत्रावळी मध्ये दिला जातो.
यावरून आपणास कळुन येते की मार्केट मध्ये द्रोण पत्रावळी बनविण्याचा व्यवसायाला किती अत्याधिक प्रमाणात मागणी आहे.जर आपल्याला देखील हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर आपल्यासाठी ही एक कमाईची चांगली संधी आहे.
आपण कोणते मशिन खरेदी करता यावर ह्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल अवलंबून असते.समजा आपण सेमी आॅटोमॅटिक मशिन खरेदी केले तर किमान ३० हजारामध्ये आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो.
पण याचठिकाणी आपण जर फुल आॅटोमॅटिक मशिन खरेदी करायचे ठरवले तर आपल्याला ७० ते ९० हजारांपर्यंतचे भांडवल लागण्याची शक्यता आहे.
हा व्यवसाय जर आपण एखाद्या दुकानातुन सुरू करायचे ठरवले तर द्रोण पत्रावळीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भाड्याने एखादी जागा घ्यावी लागेल.त्यासाठी देखील वेगळा खर्च आपल्याला करावा लागेल.
६६) खेळणींचे दुकान सुरू करणे –
प्रत्येक घराघरात लहान मुले आपल्याला दिसुन येतात.लहान मुले म्हटले तर त्यांच्यासाठी खेळायला वेगवेगळ्या प्रकारच्या खेळणी वगैरे आईवडिलांना आजी आजोबांना नेहमी आणावीच लागतात.
अशात आपण जर एखादे लहान मुलांच्या खेळणीचे दुकान सुरू केले तर आपण चांगली कमाई करू शकतो.हा व्यवसाय कुठल्याही वयोगटातील व्यक्ती करू शकते.
खेळणीचे दुकान सुरू करण्याचा हा व्यवसाय आपण खुप कमी भांडवल लावून सुरू करू शकतो.यात नफा देखील खुप अधिक प्रमाणात प्राप्त होतो.
खेळणींचे दुकान सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम योग्य स्थळाची निवड करणे आवश्यक आहे.खेळणींचे दुकान आपण अशा ठिकाणी सुरू करायला हवे जे लहान मुलांच्या खेळणींसाठी अधिक प्रसिद्ध आहे.
अशा स्थळांमध्ये विविध पर्यटनस्थळ, मार्केट मधील जागांचा समावेश होतो.पर्यटन स्थळी सर्व व्यक्ती आपल्या कुटुंबासमवेत लहान मुलांना घेऊन फिरायला येत असतात.
अशा ठिकाणी लहान मुलांसाठी पर्यटन करण्यासाठी आलेले पालक खेळणी वगैरे खरेदी करत असतात.
खेळणींचे दुकान सुरू करणे हा एक उत्तम अणि फायदेशीर व्यवसाय आहे जो करून आपण चांगली कमाई करू शकतो.
खेळणींचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला खेळणी बनवणारया मॅन्युफॅक्चरींग कंपन्यांची माहिती असणे आवश्यक आहे.
जिथुन आपण कमी दरात खेळणी विकत घेऊन आपला प्राॅफिट मार्जिन समाविष्ट करून इतर खेळणी विक्रेत्यांना खेळणी विकु शकतो.अणि जास्तीत जास्त नफा प्राप्त करू शकतो.
६७) ज्युट बॅग बनविण्याचा व्यवसाय –
ज्युट बॅग बनविण्याचा व्यवसाय हा आपण कमी गुंतवणूक करून देखील सुरू करू शकता.गृहिणी अणि विद्यार्थी देखील हा व्यवसाय घरातुनच रिकाम्या वेळात पार्ट टाइम मध्ये करू शकतील.
हा एक सर्वात कमी गुंतवणूक करून कमी मशिन विकत घेऊन सुरू करता येणारा स्वस्त व्यवसाय आहे.ज्युट बॅगच्या मागणीत सध्या दिवसेंदिवस वाढ होत आहे.
ज्युट बॅगचा वापर प्रामुख्याने पॅकेजिंग करण्यासाठी तसेच मार्केटिंग करण्यासाठी केला जात असतो.हा व्यवसाय आपण घरातुन देखील सुरू करू शकता.
६८) बेबीसिटरचा व्यवसाय सुरू करणे –
आज सर्व स्त्रिया पुरुष पैसे कमविण्यासाठी बाहेर कंपनीत कामाला जात असतात.अशावेळी आपण बाहेर कामावर गेल्यावर आपल्या मुलाबाळांची काळजी कोण घेईल याची काळजी आपणास सतावत असते.त्यांच्या सुरक्षेची काळजी आपणास नेहमी भेडसावत असते.
अशा परिस्थितीत आपल्या अनुपस्थितीत देखील आपल्या मुलाबाळांची व्यवस्थित काळजी घेतली जावी.ते सुरक्षित असावे यासाठी आईवडिल आपल्या मुलाबाळांची काळजी घेण्यासाठी एक बेबीसिटर ठेवत असतात.
जी त्यांच्या अनुपस्थितीत देखील त्यांच्या मुलाबाळांची व्यवस्थित काळजी घेते.
बेबी सिटर हा एक भरपुर कमाई करून देणारा फायदेशीर व्यवसाय आहे.ज्या महिलांना लहानमुलांसोबत खेळायला आवडते.त्यांच्यासोबत राहुन त्यांची काळजी घ्यायला आवडते अशा महिला मुली बेबी सिटरचा व्यवसाय सुरू करू शकतात.
६९) केटरींग सर्विस देण्याचा व्यवसाय सुरू करणे –
केटरींग हा एक असा व्यवसाय आहे ज्याला बाजारात अत्याधिक मागणी आहे.ज्या व्यक्तींना उत्तम स्वयंपाक बनवता येतो.
ज्यांच्या हातात चांगली पाककला आहे असे व्यक्ती स्वताचा केटरींग सर्विस देण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात.
आज प्रत्येक छोटमोठया पार्टीमध्ये लग्न समारंभात केटरींग सर्विसची आवश्यकता भासत असते.
कारण पार्टीत लग्न समारंभात आलेल्या लोकांना उत्तम अणि दर्जेदार अन्न मिळावे अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते अणि लग्न समारंभाच्या घाईगडबडीत आपल्याकडे एवढा वेळही नसतो की आपण सर्व लोकांसाठी जेवण बनवू शकु.
अशावेळी आपण केटरींग सर्विसेसचा लाभ घेत असतो.जेणेकरून आपल्याला लग्नात,समारंभात पार्टीत आलेल्या पाहुण्यांसाठी स्वता जेवण बनवत बसावे लागत नाही.
७०) स्पोर्ट्स शाॅप सुरू करणे –
आज प्रत्येक आईवडिलांची ईच्छा असते की त्यांच्या मुलाने काही अभ्यासासोबत स्पोर्ट्स मध्ये देखील अव्वल असायला हवे.
त्याने वेगवेगळ्या क्रिडा स्पर्धेत भाग घेऊन अभ्यासा सोबत स्पोर्ट्स मध्ये देखील आपले नाव कमवायला हवे.
जेव्हा मुले अभ्यासासोबत स्पोर्ट्स अॅक्टीव्हीटी देखील करत असतात तेव्हा विद्यार्थ्यांना खेळाशी संबंधित वेगवेगळ्या क्रिडा साहित्य सामग्रीची आवश्यकता भासत असते.
आपण देखील स्पोर्ट्स शाॅप सुरू करण्याचा विचार करत आहे तर ही एक आपल्यासाठी उत्तम व्यवसाय कल्पणा ठरू शकते.
कारण अभ्यासासोबत मुले खेळामध्ये देखील विशेष रूची घेत असल्याने दिवसेंदिवस क्रिडा साहित्याला मागणी ही वाढत आहे.
अशात आपण हा क्रिडा साहित्य सामग्री विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला तर आपण ह्या व्यवसायातुन चांगली कमाई करू शकतो.
स्पोर्ट्स शाॅप मध्ये आपण क्रिकेट,हाॅकी, फुटबॉल इत्यादी प्रकारच्या क्रिडा प्रकारात लागत असलेले आवश्यक क्रिडा साहित्य विक्रीला ठेवू शकतो.अणि ते विकुन चांगली कमाई करू शकतो.
स्पोर्ट्स शाॅप व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला स्पोर्टसच्या सामानाची विक्री करण्यासाठी एका योग्य जागेची अणि दुकानाची आवश्यकता असणार आहे.
हे दुकान छोटे किंवा आपण मोठे देखील सुरू करू शकतो.हे आपल्यावर निर्भर करते की आपल्याला हा व्यवसाय छोट्या पातळीवर सुरू करायचा की मोठ्या उच्च पातळीवर.
स्पोर्ट्स शाॅप उघडताना अशी जागा निवडायला हवी जिच्या आसपास शाळा महाविद्यालय आहेत.विदयार्थी मोठ्या संख्येने जमा होत असतात.याने आपल्या सामानाची जास्तीत जास्त विक्री होईल.अणि जास्तीत जास्त कमाई आपल्याला करता येईल.
७१) पशुखाद्य व्यवसाय सुरू करणे –
एक गोष्ट आपल्या सर्वांनाच माहित आहे की भारतात पशुसंवर्धन मोठ्या प्रमाणावर केले जाते,त्यामुळे जनावरांची दूध क्षमता वाढवण्यासाठी त्यांना पौष्टिक आहार आणि पशुखाद्य देण्याची नितांत आवश्यकता असते.
जनावरांना पुरेसा चारा मिळत नसल्याने पशुखाद्याची मागणी वाढते.अशा परिस्थितीत आपण पशु आहार व्यवसाय सुरू करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
पशुखाद्य व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नधान्यापासुन पशुंसाठी प्रोटीन युक्त आहार तयार केला जातो.
७२) पेपर लिफाफा व्यवसाय सुरू करणे –
पेपर लिफाफा हा आपणास कमी पैशांची गुंतवणूक करून करता येईल असा एक फायदेशीर व्यवसाय आहे.(envelope making business)
आज प्रत्येक घरात शासकीय कार्यालयांमध्ये, बॅकेमध्ये,कंपनी मध्ये कारखान्यात लिफाफ्याचा वापर केला जातो.
आजच्या मोबाईल इंटरनेटच्या दुनियेत देखील लिफाफ्याचा वापर आॅफिशल कागदपत्रे एका जागेवरून दुसरया जागेवर पाठविण्यासाठी केला जात असतो.
याचसोबत वेगवेगळ्या सण उत्सवामध्ये आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना ग्रिटींग कार्ड पाठविण्यासाठी पेपर लिफाफ्याचा वापर केला जात असतो.
पेपर लिफाफा बनविण्याचा व्यवसाय हा आपण घरातुनच खुप कमी गुंतवणूक करून देखील सुरू करू शकतो.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कुठल्याही टेक्निकल नाॅलेजची आवश्यकता नसते.तसेच कुठल्याही शैक्षणिक पात्रतेची अट देखील नसते.
७३) रिसेलिंगचा व्यवसाय –
रिसेलिंग हा एक अत्यंत फायदेशीर आॅनलाईन व्यवसाय आहे.हा व्यवसाय महिला घरगृहिणी पुरूष विद्यार्थी इत्यादी कोणीही घरबसल्या करू शकते.
हा व्यवसाय आपण आपल्या वेळेनुसार पार्ट टाइम किंवा फुलटाईम देखील करू शकतात.
रिसेलिंग हा एक असा व्यवसाय आहे ज्यात कुठल्याही वस्तुला खरेदी केल्यानंतर त्यात आपला प्राॅफिट मार्जिन समाविष्ट करून त्याची पुन्हा विक्री केली जाते.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर ह्या व्यवसायात कमी किमतीत कुठलीही वस्तु खरेदी केली जाते अणि आपला प्राॅफिट मार्जिन समाविष्ट करून ती वस्तु जास्त किंमतीत विकली जाते.
समजा एखादी वस्तु आपण २०० रुपयात खरेदी केली अणि तीच वस्तु दुसरया एखाद्या व्यक्तीला आपला प्राॅफिट मार्जिन समाविष्ट करून ४०० रूपयात विकली तर त्याला रिसेलिंग असे म्हटले जाईल.
रिसेलिंग हे एक जुने बिझनेस माॅडेल आहे ज्याचा वापर आधीपासून आॅफलाईन विक्री मध्ये केला जात आहे यात दुकानदार कमी किंमतीत शहरातुन माल कपडे वगैरे खरेदी करून आणतो अणि आपल्या गावात स्वताचा प्राॅफिट मार्जिन समाविष्ट करून जास्त किंमतीत विकत असतो.
आता हेच बिझनेस माॅडेल आता आॅनलाईन मध्ये देखील वापरले जात आहे.आपल्याला देखील हे बिझनेस माॅडेल पसंत असेल तर आपण देखील आॅनलाईन रिसेलिंगचा व्यवसाय सुरू करू शकता.
७४) मास्क बनविण्याचा व्यवसाय –
आजुबाजुची धुळ आपल्या नाकातोंडात जाऊ नये म्हणून आपण तोंडावर रूमाल किंवा मास्क बांधत असतो पण जेव्हापासून आपल्या भारत देशात कोरोना व्हायरसने प्रवेश केला अणि कोरोनामुळे लोकांचा जीव जायला सुरुवात झाली तेव्हापासून तोंडावर फेस मास्क बांधायला अधिक सुरूवात झाली.
आपल्या नाकातोंडावाटे कुठल्याही व्हायरसने आपल्या शरीरात प्रवेश करू नये यासाठी फेस मास्क लोक वापरत असतात.
वाढत्या रोगराईमुळे लोक सार्वजनिक ठिकाणी जाताना आपल्या नाकातोंडावर मास्क लावणे अधिक पसंत करत आहेत.
हेच कारण आहे की सध्या मास्क बनविण्याचा व्यवसायाला बाजारात एवढी डिमांड आहे.मास्क बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला काही आवश्यक साधन सामग्री, मशिनरीची आवश्यकता असते.
ही सर्व साधनसामग्री खरेदी करण्यासाठी मशिन विकत घेण्यासाठी आपल्याला यात खर्च करावा लागेल.
जर आपण छोटे मशिन खरेदी करून ह्या व्यवसायाला सुरुवात केली तर आपल्याला यंत्र खरेदी करण्यासाठी १ लाखापर्यंतची गुंतवणूक करावी लागु शकते.
तसेच जर आपण मोठे आॅटोमॅटिक मशिन खरेदी करून ह्या व्यवसायास सुरुवात केली तर आपल्याला ६ते ७ लाखापर्यंतची गुंतवणुक करावी लागु शकते.
७५) सीएससी सेंटर सुरू करणे (Starting CSC Centre)
आपले स्वताचे एक सीएससी सेंटर सुरू करून आपण लोकांना त्याद्वारे वेगवेगळ्या ई सेवा उपलब्ध करून देऊ शकतो.
ज्या व्यक्तींना काही नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे असे व्यक्ती स्वताचे एक सीएससी सेंटर सुरू करू शकता.
सीएससी सेंटर सुरू करण्यासाठी आपल्याला दीड ते दोन लाख इतका खर्च करावा लागु शकतो.
सीएससी सेंटर दवारे आपण नागरीकांना बी टु सी,बीटुसी,जी टु सी इत्यादी प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो.
७६) दलिया मेकिंग व्यवसाय (Daliya Making Business)
दलिया मेकिंग हा एक असा व्यवसाय आहे ज्याला गावात अणि शहरात देखील खुप अधिक प्रमाणात मागणी आहे.
हा व्यवसाय आपल्याला खुप कमी पैशांची गुंतवणूक करून देखील सुरू करता येईल.
आरोग्याच्या दृष्टीने दलिया खुप पौष्टिक मानले जाते.यात कार्बोहाइड्रेट अणि प्रोटीन देखील असते.म्हणुन मिड डे मिल मध्ये हा आहार दिला जात असतो.
जर दलिया मेकिंग व्यवसाय आपल्याला छोट्या पातळीवर सुरू करायचा असेल तर १ लाख दीड हजार इतका खर्च लागेल.
हयाच ठिकाणी हा व्यवसाय आपण मोठ्या पातळीवर सुरू करायचे ठरवले तर आपल्याला ७ लाखापर्यंत खर्च करावा लागु शकतो.
७७) बेसन उत्पादनाचा व्यवसाय सुरू करणे (Starting a gram flour manufacturing business)
आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात बेसनचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान तसेच मिठाई तयार करण्यासाठी केला जातो.
आज बेसनचा घरगुती वापरासाठी उपयोग तर केला जातो आहेच शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान मिठाई वगैरे बनविण्यासाठी देखील याचा वापर केला जात आहे.
यावरून आपणास लक्षात येईल की मार्केट मध्ये बेसनला किती अधिक प्रमाणात मागणी आहे अशात आपण जर बेसन उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला तर ह्या व्यवसायातुन ४० टक्के पेक्षा अधिक मार्जिन प्राप्त करू शकतो.
बेसनचे पक्वान मिठाई बनविण्या व्यतीरीक्त अनेक औषधी फायदे देखील आहेत.बेसनमुळे मुलांच्या शरीरातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
७८) ट्रॅव्हलिंग एजंटचा व्यवसाय (Business of traveling agent)
आपल्या भारत देशात पर्यटकांना बघण्यासारखी अशी काही निसर्गरम्य अणि ऐतिहासिक स्थळ आहेत ज्यांना भेट देण्यासाठी पर्यटक दुरवरून परदेशातुन भारतात येत असतात.
आज आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था पर्यटन क्षेत्रावर आधारलेली आहे कारण आज भारतातील पर्यटक वेगवेगळ्या देशात पर्यटनासाठी जात असतात.
भारतातील लोक परदेशात फिरण्यासाठी तर जाताच सोबत परदेशातील पर्यटक देखील मोठ्या संख्येत भारतामध्ये पर्यटनासाठी येताना दिसुन येतात.
अशात जर आपण भारतात परदेशातुन भारतात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसाठी आपला एखादा ट्रॅव्हलिंग एजन्सी व्यवसाय सुरू केला तर आपण किती कमाई करू शकतो किती अधिक नफा प्राप्त करू शकतो याची आपण कल्पना करू शकता.
ह्या व्यवसायादवारे आपण पर्यटकांना टुरिझम सेवा प्रदान करू शकतो.
७९) मोबाईल शाॅप तसेच रिपेअरींग व्यवसाय (Mobile Shop as well as repairing business)
सध्या मोबाईल फोनचा वापर लोक अधिक प्रमाणात करत आहे लहानमुलांपासून ते मोठ्या वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत आज सगळयांजवळ आपणास अॅड्राॅईड मोबाईल पाहायला मिळतो.
यावरून आपणास लक्षात येईल की मोबाईल फोनला बाजारात आज किती विपुल प्रमाणात मागणी आहे.
त्यामुळे आपण जर एखादी मोबाईल शाॅपी सुरू केली किंवा एखादा मोबाईल रिपेअरींगचे दुकान सुरू केले तर आपण चांगली कमाई करू शकतो.
फक्त मोबाईल रिपेअरींगचे दुकान सुरू करण्यासाठी आपल्याला आधी मोबाईल रिपेअरींगचा एखादा कोर्स करावा लागेल.
मोबाईल शाॅपी मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लेटेस्ट मोबाईल मोबाईलचे कव्हर,बॅटरी,चार्जर,मोबाईल रिचार्ज व्हाउचर इत्यादी वस्तु आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवू शकतो.
८०) भाजीपाला व्यवसाय (Vegetable Business)
जे व्यक्ती शेतकरी आहेत ते आपल्या शेतात भाजीपाला लागवड करून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकतात.
हा व्यवसाय करण्याचा एक फायदा आहे तो म्हणजे हा व्यवसाय नेहमी चालणारा व्यवसाय आहे हा व्यवसाय कधीही बंद पडणार नाही.कारण भाजीपाला हा लोकांना रोज लागत असतो.
ज्यांची स्वताची शेती नाहीये असे व्यक्ती बाजारातुन कमी किमतीत भाजीपाला विकत घेऊन देखील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता.
किंवा आपण एखाद्या शेतकरी कडुन देखील भाजीपाला खरेदी करू शकतो यात आपल्याला जास्त नफा प्राप्त होईल.यात आपल्याला अजुन एक फायदा होईल तो म्हणजे आपण भाजीपाला घेताना शेतकरीच्या शेतातुन छाटणी करून आपल्या हाताने घेऊ शकतो.
पण बाजारातुन भाजीपाला खरेदी केल्यास आपल्याला बंद गोणी मध्ये भाजीपाला दिला जातो हा गोणीतील भाजीपाला वरवर चांगला दिसुन येईल पण खाली काही खराब भाजीपाला देखील असण्याची शक्यता असते.
यातच आपण बाजारातुन भाजीपाला खरेदी केला तर आपल्याला ७ ते १० टक्के प्रति कमिशन द्यावे लागेल.
भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आपण ८०० ते हजार रुपये लावून देखील सुरूवातीला सुरू करू शकता.जसजशी आपल्या कमाईत वाढ होईल तसतसे आपण अधिक भाजीपाला विक्रीसाठी खरेदी करू शकतो.
आपण घरातुन देखील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता त्यासाठी आपल्याला ५ ते १० हजार रुपये खर्च करावे लागतील.
पण याचठिकाणी आपण एखाद्या मार्केट मध्ये भाजीपाला विक्रीचे दुकान सुरू केले तर आपल्याला एक ते दोन लाख रूपये इतका खर्च करावा लागु शकतो.
८१) चाॅकलेट बनविण्याचा व्यवसाय ( Chocolate Making Business )
आज लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्या माणसांना देखील चाॅकलेट खायला अधिक आवडते.
आपल्याला जर चाॅकलेट बनवता येत असेल तर आपण चाॅकलेट बनविण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.चाॅकलेट कसे बनवायचे याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रशिक्षण संस्थेत जाण्याची आवश्यकता नाहीये.
आज आपण युटयुब वर व्हिडिओ बघुन देखील चाॅकलेट बनवायला सहजरीत्या शिकु शकतात.फक्त आपण बनवलेले चाॅकलेट खायला उत्तम असायला हवे.
चाॅकलेट बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण एखाद्या बाजारात, शाॅपिंग माॅल सुपर मार्केट एरिया मध्ये देखील आपले दुकान सुरू करू शकतो.
किंवा आपण घरबसल्या चाॅकलेट बनवून इतर रिटेलरला चाॅकलेट विकुन चांगली कमाई करू शकतो.
८२) वाहन धुण्याचे दुकान (Car Wash shop)
आज शहरातच नव्हे तर गावाखेडयात देखील घराघरासमोर आपल्याला टु व्हिलर फोर व्हीलर पाहावयास मिळतात यावरून आपणास लक्षात येईल की वाहनांचे प्रमाण सध्या किती अधिक प्रमाणात वाढते आहे.
वाहन म्हटले तर त्याच्यात बिघाड झाल्यावर दुरूस्ती करणे त्यांची नियमित सर्वीसिंग करणे येतेच अशात आपण आपल्या गावात स्वताचे एखादे कार वाॅशिंग सेंटर सुरू केले तर आपण इतरांना कार वाॅशिंग सर्विस देऊन चांगली कमाई करू शकतो.
कमी बजेटमध्ये सुरू करता येतील असे काही इतर व्यवसाय –
- मग प्रिंटिंगचा व्यवसाय –
- गुळ बनविण्याचा व्यवसाय सुरू करणे-
- प्ले स्टेशन सुरू करणे-
- मनुष्य बळ संसाधन व्यवसाय- (manpower resourcing business)
- पॅकेजिंगचा व्यवसाय –
- अपसाईकल फर्निचर व्यवसाय सुरू करणे –
- आॅनलाईन बुक स्टोअर सुरू करणे-
- प्लाॅवर गार्डनचा व्यवसाय –
- आधार बॅकिंग व्यवसाय –
- कोल्ड स्टोरेज व्यवसाय-
- स्मार्ट गॅझेटचे दुकान सुरू करणे –