BusinessEntrepreneurshipStartup

गावात सुरू करता येतील असे २१ व्यवसाय

आज असे अनेक व्यवसाय उद्योग आहे जे आपण आपल्या गावातच सुरू करू शकतो.कित्येक जण आज स्वताच्या गावात उद्योग व्यवसाय करून चांगली कमाई देखील करत आहे.

अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला जास्त पैशांची गुंतवणूक देखील करावी लागत नाही.अत्यंत कमी भांडवलात आपल्याला हे व्यवसाय सुरू करता येतात.

आजच्या लेखात आपण ह्याच व्यवसाय उद्योगांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

किराणा दुकान/जनरल स्टोअर्स

किराणा दुकान हा एक उत्तम व्यवसाय आहे जो आपण आपल्या गावातल्या गावात सुरू करू शकतो.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला ५० हजार ते १ लाखापर्यंतची गुंतवणुक करावी लागेल.

ज्यांचे बजेट चांगले आहे असे व्यक्ती होलसेल मध्ये ह्या व्यवसायास आरंभ करू शकतात.

किराणा दुकानात आपण अन्नधान्य स्टेशनरी,फरसान, कोल्ड्रिंक्स,व्हेपर इत्यादी वस्तुंची विक्री करून आपण चांगला नफा प्राप्त करू शकतो.

फोटोग्राफीचा व्यवसाय

फोटोग्राफी हा व्यवसाय पार्ट टाइम तसेच फुलटाईम देखील करता येतो.

ज्यांचे गाव मोठे आहे ते आपल्या गावातच फोटोग्राफीचे दुकान टाकु शकतात.अणि समजा आपले गाव छोटे आहे तर आपण हा व्यवसाय आपल्या घरातुन देखील सुरू करू शकतो.

घरातच पडदे साईड लाईटस कॅमेरा वगैरे आणत आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो.

मसाला पॅकिंग,मसाला तयार करण्याचा व्यवसाय

मसाला पॅकिंग मेकिंग हा व्यवसाय आपण दोन पद्धतीने करू शकतो.यात आपल्याला मसाल्याच्या पदार्थांचे कुट करून त्यापासून वेगवेगळे मसाले तयार करता येतील.

यात आपण बिर्याणी मसाला,खडा मसाला,गरम मसाला,पनीर मसाला असे वेगवेगळे मसाले तयार करून त्याचे चांगले पॅकेज तयार करून विक्री करू शकतो.

याचसोबत मसाल्याचे पदार्थ दालचिनी,काळी मिरी,विलायची,खसखस अशा विविध मसाल्यांचे पॅकिंग करून हा मसाला आपण ग्राहकांपर्यंत आपल्या दुकानादवारे पोहचवू शकतो.किंवा होलसेलरला देखील देऊन चांगला नफा प्राप्त करता येईल.

फुटवेअरचा व्यवसाय

फुटवेअरचा व्यवसाय आपणास पार्ट टाइम तसेच फुलटाईम देखील करता येईल.हा व्यवसाय कमी गुंतवणूक करून देखील आपल्याला सुरू करता येईल.

यात आपण मोठमोठ्या ब्रॅडेड कंपन्यांचे चपला तसेच बुट विक्रीसाठी ठेवून महिन्याला चांगली कमाई करू शकतो.

लेडिज काॅर्नर

हा व्यवसाय महिला आपल्या गावात घरातुनच सुरू करू शकतील.यात ज्वेलरी,लेडिज वेअर,काॅस्मॅटिक अशा महिलांना लागत असलेल्या विविध वस्तू दुकानात ठेवता येतील.

चिप्स बनवण्याचा व्यवसाय

बटाटे,केळी इत्यादी पासुन चिप्स बनवून त्याची व्यवस्थित पॅकिंग करून आपण आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचवू शकतो.

पुढे हा उद्योग जोरात सुरू झाल्यावर भविष्यात आपण पॅकिंग मशीन देखील खरेदी करू शकतो.याने आपल्या मालाच्या उत्पादनात देखील वाढ होईल.

लाकडी तेल घाण्याचा व्यवसाय

लाकडी तेल घाणा दवारे आपण नैसर्गिक अणि केमिकल नसलेले तेल काढुन ग्राहकांपर्यंत पोहचवू शकतो.

रिफाईंड तेलापेक्षा केमिकल रहित तेलाला अधिक मागणी असल्याने गावात हे तेल विक्री करत आपण चांगली कमाई करू शकतो.

याचसोबत सोयाबीन,शेंगदाणा,मोहरी,ह्या विविध तेलबियांमधुन तेल काढुन अणि त्याची व्यवस्थित रीत्या पॅकिंग करून आपल्या ग्राहकांना विकु शकतो.किंवा इतर दुकान दारांना होलसेलरला देखील विकु शकतो.

टेलरींग व्यवसाय

टेलरींग हा देखील गावात करता येईल असा एक उत्तम व्यवसाय आहे.

ज्या महिलांना तसेच पुरूषांना टेलरिंगची कला उत्तमरीत्या अवगत आहे ते आपल्या गावात टेलरींगचा व्यवसाय सुरू करून आपल्या गावातील लहानमुलांपासून मोठया माणसांपर्यंत स्त्रिया पर्यत सर्वांचे कपडे शिवण्याचे काम करू शकतात.

टेलरींग हा व्यवसाय पार्ट टाइम तसेच फुलटाईम यापैकी कुठल्याही एका पदधतीने आपण आपल्या आवशयकतेनुसार करू शकतात.

नर्सरी तसेच रोपवाटिका व्यवसाय

आपल्या गावात असलेल्या शेतीच्या काही भागात आपणास रोपवाटीकेचा व्यवसाय सुरू करता येईल.यात आपल्याला काही जातीवंत कंपनीच्या बिया आणायच्या आहेत अणि त्यापासून रोप तयार करून गावातील शेतकरयांना आपण विकु शकतो.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला जास्त भांडवल देखील लागत नाही.

कापड व्यवसाय

कापड व्यवसाय हा व्यवसाय महिला अणि पुरूष दोघेही करू शकतात.हा व्यवसाय करण्यासाठी आपण स्वताचे कापड दुकान सुरू करू शकता किंवा घरातुनच आपण ह्या व्यवसायास सुरुवात केली तरी देखील चालेल.

ह्या व्यवसायात लहान मुलांचे रेडिमेड कपडे,स्त्रियांसाठी साड्या, लग्न समारंभासाठी आवश्यक वस्तु टाॅवेल टोपी उपरणे इत्यादी प्रकारचे कपडे विकुन आपण चांगला नफा प्राप्त करू शकता.

ह्या व्यवसायात कमी गुंतवणूक करून देखील आपल्याला चांगला नफा प्राप्त होतो.

वाॅशिंग सेंटर

आपल्या गावात जेवढयाही दुचाकी चारचाकी वाहने आहेत त्या धुण्यासाठी आपण गावातच एक वाॅशिंग सेंटर सुरू करू शकता.

आज प्रत्येक गावात ८० ते ९० टक्के लोकांकडे दुचाकी चारचाकी वाहने आहेत.ज्यात जेसीबी ट्रॅक्टर इत्यादी वाहनांचा समावेश होतो.

ह्या सर्व वाहनांना धुण्यासाठी वाहन चालक एक वाॅशिंग सेंटर शोधत असतात अशात आपण गावातच वाॅशिंग सेंटर सुरू केले तर आपण चांगली कमाई करू शकतो.

मोटार सायकल ऑटो गॅरेज

आज आपल्याला प्रत्येक घरापुढे टु व्हिलर पाहावयास मिळते.वाहन म्हटले तर त्यात बिघाड होणे मग त्याची रिपेअरींग करणे आहेच.

म्हणुन गॅरेज हा एक उत्तम व्यवसाय आहे.ज्यात आपण गावातील लोकांना टु व्हिलर दुरुस्तीची सर्विस देऊ शकता.

आर ओ प्लांट

ग्रामीण भागात हा व्यवसाय खुप जोरात सुरू आहे.आर ओ प्लांट मध्ये पाण्याचे शुद्धीकरण करून त्याला जारमध्ये विकले जाते.हे जार आपण आपल्या आजुबाजुच्या गावात जाऊन विकु शकतो.

पण यासाठी आपल्याकडे विपुल प्रमाणात पाणी असणे देखील गरजेचे आहे.आर ओ प्लांट करीता लागणारे मशिन असणे आवश्यक आहे.

याचसोबत आजुबाजूच्या गावात जाऊन जार विकण्यासाठी स्वताचे वाहन देखील असायला हवे.

नमकीन/फरसान बनवण्याचा व्यवसाय

नमकीन फरसान बनवण्याच्या व्यवसायात आपण चिवडयाचे वेगवेगळे प्रकार,शेव,इत्यादी फरसान बनवुन दुकानात विकु शकतो किंवा इतर दुकानदारांना होलसेलरला पॅक करून त्यांना विकु शकतो.

वस्तु भंडार/मंडप डेकोरेशन

आपल्या गावातील होत असलेल्या लग्न समारंभ तसेच सामाजिक,राजकीय कार्यक्रम इत्यादी मध्ये मंडप डेकोरेशन करण्याचे काम आपण करू शकतो.

हीच सर्विस आपण आपल्या गावासोबत आपल्या गावाच्या आजुबाजुच्या गावातील लोकांना देखील देऊ शकतो.

सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती मधुन पिकलेल्या पिकांना लोक सध्या प्राधान्य देऊ लागले आहे.कारण ही पिके पिकवत असताना कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा किटकनाशकांचा वापर केला जात नसतो.

यात पालेभाज्या पिकवताना देखील नैसर्गिक प्रक्रिया वापरण्यात येते.म्हणुन यातील जीवनसत्त्व नष्ट होत नसतात.सेंद्रिय शेती मधुन पिकलेले धान्य भाज्या फळे शरीराच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते.

मोबाईल Accesories दुकान

आज शहरातच नव्हे तर गावाखेडयातील लहानमुलांपासून मोठया माणसांपर्यंत सर्वांना मोबाईल वापरताना आपण बघतो.

म्हणुन आपण आपल्या गावात मोबाईल अॅक्सेसरीजचे दुकान टाकुन चांगली कमाई करू शकता.

यात सुरूवातीला आपण सर्वेक्षण करून हे बघायचे आहे की आपल्या गावात कोणत्या वस्तुला अधिक मागणी आहे.मग त्याच वस्तु आपण विकायला हव्यात.

जेव्हा व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळु लागेल तेव्हा आपण आपल्या दुकानातील वस्तूंमध्ये वाढ करू शकतो.यात आपण मोबाईल कव्हर,बॅटरी, चार्जर,हेडफोन इत्यादीं वस्तू आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवू शकतात.

पोल्ट्री फार्म

आज जगभरातील ८० ते ९० टक्के लोक मांसाहारी आहाराचे सेवन करतात.यावरून आपण अंदाज लावू शकतो की पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरू केल्यास आपण किती कमाई करू शकतो.

पोल्ट्री फार्म मध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत यात मांस उत्पादन,अंडी उत्पादन,कुकुक्ट खाद्य उत्पादन इत्यादींचा समावेश होतो.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल.मग आपण हा व्यवसाय सुरू करून यातुन पाहीजे तेवढी कमाई करू शकता.

१९) खते आणि बियाणांचे दुकान :

ग्रामीण भागात शेती हा व्यवसाय अधिक प्रमाणात केला जातो.सर्वच शेतकरयांना शेतीसाठी खते अणि बियाण्यांची आवश्यकता असते.त्यामुळे जर आपण गावात खते अणि बियाण्यांचे दुकान सुरू केले तर शेतकऱ्यांना खते अणि बियाणे विकुन आपण चांगली कमाई करू शकतो.

हाॅटेल

आपल्या गावात जर हाॅटेल नसेल तर आपण गावात एखादे हाॅटेल टाकु शकता.हाॅटेल मध्ये चहा,मिसळपाव,वडा,भजे असे जास्त खपणारे पदार्थ ठेवायचे.

गाव म्हटली की चहा पिणारी अणि खाद्यपदार्थ खाणारी माणसे कमी नसतात.हाॅटेल सुरू करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त २५ ते ३० हजार एवढे भांडवल लागु शकते.

आज असेही लोक पाहायला मिळतात ज्यांनी छोट्याशा हातगाडी पासुन सुरूवात केली अणि आज त्यांचा धंदा इतका जोरात चालतो आहे की त्यांनी मोठे हाॅटेल सुरू केले आहे अणि त्या मोठ्या हाॅटेलचे ते मालक आहेत.

फळे अणि भाजीपाला व्यवसाय

फळे अणि भाजीपाला व्यवसाय हा गावाखेडयातील सर्वाधिक चालणारा व्यवसाय आहे.ज्यांच्याकडे फळ अणि भाजीपाला उत्पादनासाठी स्वताचे शेतजमीन आहे असे व्यक्ती ‌हा व्यवसाय सुरू करू शकतात.

ह्या व्यवसायातुन आपण खुप कमी भांडवल लावून देखील जास्त नफा प्राप्त करू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button