BloggingBusinessEntrepreneurshipStartup

ब्लाॅगिंग कशी सुरु करायची ?

ज्यांच्या अंगी उत्तम लेखन कौशल्य आहे तसेच ज्यांना लेखणाची आवड आहे अणि रायटिंग मधून आपले करीअर घडवायचे आहे अशा व्यक्तींसाठी ब्लाॅगिंग ही एक उत्तम व्यवसाय कल्पणा ठरू शकते.

ब्लाँगिंग हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला फक्त आॅनपेज एसईओ तसेच ब्लाँग वेबसाईटवरील इतर टेक्निकल बाबींचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

ब्लाँगिंग हा एक असा आॅनलाईन व्यवसाय आहे ज्यात आपण ब्लाँगला माॅनिटाईज करून जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमवू शकतो.

ब्लाँगिंग हा व्यवसाय आपण एकट्याने सुरू करू शकतो किंवा चार पाच जणांची एक टीम बनवून देखील सुरू करू शकतो.

ब्लाँगिंग हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सुरूवातीला डोमेन तसेच होस्टिंग वर थोडीफार गुंतवणुक करावी लागते.ही गुंतवणुक साधारणतः १० ते २० हजारांपर्यंतची असु शकते.

ब्लाँग सुरू केल्यानंतर सुरूवातीला आपल्याला किमान ५० युनिक काॅपीराईट फ्री आर्टिकल आपल्या ब्लाँग वेबसाईटवर पब्लिश करावे लागतात.यानंतर आपण अॅडसेन्स अॅपरूव्हल करीता अर्ज करू शकतो.

अॅपरूव्हल प्राप्त झाल्यानंतर जसजशी आपल्या ब्लॉगवर ट्रॅफिक येईल,आपल्या ब्लॉगवर जाहीराती दिसतील लोक त्यावर क्लिक करतील तसतसे आपल्या इन्कम मध्ये वाढ होत असते.

ब्लाँगिंग हा व्यवसाय आपण इंग्रजी हिंदी तसेच आपल्या मराठी भाषेत देखील सुरू करू शकतो.फक्त मराठी भाषेत ब्लाँग सुरू केल्यावर आपल्याला हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या तुलनेत खुप कमी सीपीसी प्राप्त होत असतो.

अणि मराठी मध्ये ब्लाँग सुरू केल्यावर आपल्या इन्कमला देखील काही विशिष्ट मर्यादा असतात.हेच कारण आहे की आज जास्तीत जास्त व्यक्ती हिंदी तसेच इंग्रजी मध्ये ब्लाँग आपला ब्लॉग सुरू करून इंटरनॅशनल ब्लाँगिंग करणे अधिक पसंत करत आहेत.

१) आपल्याला ब्लाँग कुठे सुरू करायचा आहे ते ठरवावे – Decide where you want to start your blog

सगळ्यात पहिले आपल्याला आपला ब्लाँग वेबसाईट कुठे सुरू करायची आहे हे ठरवून घ्यायला हवे.आपण गुगलचे फ्री प्लॅटफॉर्म ब्लाँगर डाॅट काॅम वर आपला ब्लॉग तयार करू शकता.

फक्त ब्लाँगर डाॅट काॅम वर फ्री मध्ये ब्लाँग सुरू केल्यावर आपल्याला blogspot.com. हे डोमेन प्राप्त होत असते.
ब्लाँगर डाॅट काॅम यात आपल्याला एकही रूपया खर्च न करता फ्री मध्ये ब्लाँग सुरू करता येईल.

आपण वर्डप्रेसवर देखील आपला ब्लॉग सुरू करू शकता.फक्त इथे आपल्याला डोमेन अणि होस्टिंग हे दोघेही खरेदी करावे लागेल.वर्डप्रेसवर फ्री मध्ये देखील ब्लाँग सुरू करता येतो.

पण जास्तीत जास्त फिचरचा लाभ प्राप्त करण्यासाठी आपण डोमेन होस्टिंग खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते.

आज बाजारात अशा अनेक कंपन्या उपलब्ध आहेत ज्यांच्याकडून आपण डोमेन तसेच होस्टिंग खरेदी करू शकतो.फक्त आपण डोमेन होस्टिंग खरेदी करताना चांगल्या कंपनीचे खरेदी करायला हवे.

जेणेकरून भविष्यात आपल्या वेबसाइटला ट्ॅफिक हाताळताना कुठलीही अडचण येणार नाही आपली वेबसाईट हॅग वगैरे होत नाही.

उदा,होस्टिंगर,गो डॅडी,नेमचीप,होस्ट गेटर,इत्यादी अशा नामांकित कंपन्या आज बाजारात आहेत ज्यांच्याकडून आपण डोमेन होस्टिंग खरेदी करू शकता.

तीन वर्षांसाठी डोमेन होस्टिंगची खरेदी केल्यास कंपनीकडून आपल्याला चांगली सुट सवलत दिली जाते.अणि आपल्याला काही अडचण आल्यास कस्टमर सपोर्ट देखील कंपनीकडून देण्यात येत असतो.

२) आपल्या नीशशी संबंधित डोमेन खरेदी करणे -Buying a domain related to your niche

डोमेन खरेदी करत असताना आपल्याला असे निवडायचे आहे ज्यात आपल्या ब्लाँगचा नीश देखील समाविष्ट असेल.

समजा आपला ब्लाँग पर्यटनाशी संबंधित आहे तर आपल्या डोमेन मध्ये ट्रॅव्हल हा शब्द येणे गरजेचे आहे.किंवा आपला ब्लॉग टेक्नॉलॉजीवर आधारीत आहे तर आपल्या डोमेन मध्ये टेक हा शब्द येणे आवश्यक आहे.

यालाच आपण आपल्या नीशशी संबंधित स्पेशल डोमेन खरेदी करणे असे देखील म्हणतो.

आज गुगलवर अशा अनेक वेबसाईट आपणास पाहावयास मिळतात ज्या स्पेशल डोमेन वर सुरू करण्यात आलेल्या आहेत.

म्हणुन आपण गुगलवर सरकारी योजना मराठी असे टाईप करून सर्च केले तर आपल्याला लगेच मराठी भाषेतील सर्व सरकारी योजनांवर काम करत असलेल्या सरकारी योजनेवर स्पेशल डोमेन घेतलेल्या मराठी मधील स्पेशल वेबसाईट टाॅपला दिसुन येतील.

३) आपल्या ब्लॉगवर काही महत्वाचे पेज तयार करणे -Creating some important pages on your blog

ब्लाँग सुरू केल्यानंतर आपल्याला काही महत्वाचे पेजेस तयार करून घ्यावे लागतील.

ज्यात प्रायव्हेसी पाॅलिसी, टर्म्स अॅण्ड कंडिशन,अबाऊट अस, काॅन्ट्ॅक्ट हे चार महत्वाचे पेजेस असणे आवश्यक आहे.

गुगल कडुन अॅडसेन्स अॅपरूव्हल प्राप्त करण्यासाठी आपल्या ब्लॉगवर हे चार महत्वाचे पेजेस असणे खुप आवश्यक असतात.हे चार पेजेस ब्लाँगवर नसतील तर गुगल कडुन आपल्याला अॅडसेन्स करीता अॅपरूव्हल प्राप्त होत नसते.

४) ब्लाँगवर आर्टिकल लिहण्यासाठी टाॅपिकची निवड करणे -niche selection for blog

ब्लाँगिंग सुरू केल्यावर आपल्याला ब्लाँगवर लेख लिहिण्यासाठी सर्वप्रथम एखादा टाॅपिक निवडावा लागतो.यालाच नीश सिलेक्ट करणे असे म्हटले जाते.

ब्लाँगवर लेख लिहिण्यासाठी आपल्याला अशा टाॅपिक्सची निवड करावी लागेल ज्यात आपल्याला रूची आहे ज्याचे आपल्याला उत्तम ज्ञान आहे अणि ज्यावर आपण रोज कुठलाही कंटाळा न करता लेखन देखील करू शकतो.

समजा आपल्याला फिरण्याची आवड असेल तर आपण वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळे,पर्यटन स्थळे,निसर्गरम्य ठिकाण यांच्याविषयी लेख लिहुन इतरांना त्याची माहीती आपल्या ब्लाँग वेबसाईट द्वारे देऊ शकतो.

ब्लाँगवर आर्टिकल लिहिण्यासाठी आपल्याला असा टाॅपिक निवडायचा आहे ज्याचे आपल्याला उत्तम ज्ञान आहे ज्यावर लोक जास्तीत जास्त माहिती गुगलवर सर्च करतात अणि त्या टाॅपिकवर सीपीसी देखील आपल्याला चांगला भेटेल.

लिहिण्यासाठी विषय निवडत असताना आपण कुठलाही एक सिंगल टाॅपिक निवडु शकतात किंवा मल्टीनीश म्हणजे वेगवेगळ्या टाॅपिकवर देखील आपणास आर्टिकल लिहता येतील.

उदा,आरोग्य,आर्थिक,क्रिडा,मनोरंजन,व्यवसाय कल्पणा, सरकारी योजना,ट्रेडिंग न्युज अॅफिलिएट प्रोडक्ट अशा विविध टाॅपिकवर आपण आपल्या ब्लॉगवर आर्टिकल लिहु शकतो.

५) ब्लाँग माॅनिटाईज करण्यासाठी सुरूवातीला किमान ५० आर्टिकल लिहिणे -monetize your blog

ब्लाँगवर अॅडसेन्स अॅपरूव्हल प्राप्त करण्यासाठी आपल्याला सुरूवातीला किमान ४० ते ५० युनिक अणि प्लॅगॅरिझम फ्री आर्टिकल लिहुन आपल्या ब्लॉगवर पब्लिश करावे लागतील.

आपले आर्टिकल प्लॅगॅरिझम फ्री आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपण डुप्लीचेकर,स्माॅल एस ईओ,इत्यादी सारख्या फ्री टूलसचा देखील वापर करू शकतात.

यानंतर आपण अॅडसेन्स अॅपरूव्हल प्राप्त करण्यासाठी गुगलकडे अर्ज करायचा आहे.अॅडसेन्स मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आपल्या ब्लॉगवर जाहीराती दिसणे सुरू होईल.

जितके क्लिक ह्या जाहीरातीवर आपल्या ब्लॉगवर माहीती वाचण्यासाठी आलेले वाचक वर्ग करतील तितकी कमाई आपली यातुन होत असते.

यात जाहीराती द्वारे झालेल्या कमाईचा ७५ टक्के हिस्सा गुगल आपल्याला देत असते अणि २५ टक्के स्वता ठेवून घेत असते.

जेव्हा आपल्या खात्यावर १०० डाॅलर जमा होतात तेव्हा ते पैसे आपल्या बॅक खात्यावर सर्व व्हेरीफिकेशन वगैरे करून जमा केले जातात.फक्त पैसे आपल्या बॅक खात्यावर जमा होण्यासाठी आपल्याला आधी अॅडसेन्सला आपली बॅक डिटेल द्यावी लागते.

याचसोबत आपण आपल्या ब्लॉगवर वेगवेगळ्या प्रोडक्टची अॅफिलिएट लिंक शेअर करुन अॅफिलिएट मार्केटिंग दवारे देखील पैसे कमवू शकता.

किंवा आपले स्वताचे एखादे प्रोडक्ट सर्विस कोर्स आॅनलाईन आपल्या ब्लाँग वेबसाईट वरून प्रमोट करून त्याची विक्री करून चांगली कमाई करू शकतो.

६) सोशल मिडिया वर आपल्या ब्लाँगचे प्रमोशन करणे-promote your blog on social media

ब्लाँग लिहुन झाल्यावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचावा म्हणून आपल्या व्यवसायाची मार्केटिंग व्हावी प्रमोशन व्हावे म्हणून आपण आपल्या सर्व सोशल मिडिया अकाऊंट वर पेजेस वर आपल्या ब्लाँग वेबसाईटची लिंक शेअर करु शकतात.

७) रोज सातत्याने आपल्या ब्लाँग वेबसाईटससाठी आर्टिकल लिहावे लागतील-consistently write article for blog

ब्लाँगवर अॅडसेन्स मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आपल्या ब्लॉगवर जाहीराती दवारे कमाई व्हावी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या ब्लाँगला सबस्क्राईब करावे यासाठी आपल्याला रोज सातत्याने आपल्या ब्लाँगवर आर्टिकल पब्लिश करावे लागतील.

आपल्या ब्लाॅगसाठी आपण स्वता आर्टिकल लिहु शकता किंवा वेळेच्या अभावामुळे आपल्याला स्वता आपल्या ब्लाँग वेबसाईट करीता आर्टिकल लिहिता येत नसतील तर आपण एखादा कंटेट रायटर देखील हायर करू शकतो.

जो काही चार्ज घेऊन आपल्या ब्लाँग,वेबसाईट करीता आर्टिकल लिहिण्याचे काम करेल.मार्केट मध्ये आज अशा अनेक प्रोफेशनल एजन्सी आहेत तसेच व्यक्ती आहेत जे आपल्याला कंटेट रायटिंगच्या सर्विस देतात.

आपण वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर ब्लाँगर कंटेट रायटर्सच्या फेसबुक,टेलिग्राम,व्हाटस अप गृपवर देखील कंटेट रायटर करीता मॅसेज करू शकतात.

आपल्या ब्लॉगवर जास्तीत जास्त ट्ॅफिक यावी म्हणून आपणास लोकांना आपल्या ब्लाँग वेबसाईट द्वारे आपल्या इतर प्रतिस्पर्धीपेक्षा जास्तीत जास्त व्हॅल्यू द्यावी लागेल.

म्हणजे इतर ब्लाॅगपेक्षा अधिक सविस्तरपणे माहीती आपल्या ब्लाँग वरून द्यावी लागेल जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपल्या ब्लाँगवरील लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लाँगला सबस्क्राईब करतील.

८) आपल्या ब्लाँग वेबसाईटससाठी योग्य थीमची निवड करणे -select good theme for your blog

जशी आपल्या ब्लाँग वेबसाईटची थीम असते तसाच आपल्या ब्लाँगचा लेआऊट अणि डिझाईन देखील राहत असते.म्हणुन आपण आपल्या ब्लाॅगसाठी डिझाईन ले आऊटच्या दृष्टीने एक चांगली थीम निवडायला हवी.

ब्लाँगिंग ह्या व्यवसायाविषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न –

9) ब्लाँगिंग द्वारे आपण महिन्याला किती पैसे कमवू शकता?

ब्लाँगिंग द्वारे आपण महिन्याला किती कमाई करू शकतो हे आपण कोणत्या भाषेतून ब्लाँगिंग करतो ह्यावर अवलंबून आहे.

जर तुम्ही मराठी मध्ये ब्लाँगिंग करत असाल तर ब्लाँगवर एक वर्ष सातत्याने ब्लाँगवर काम करून पोस्ट पब्लिश केल्यावर आपण एक महिन्याला १५ ते २० हजारांपर्यंत मराठी ब्लाँग दवारे कमाई करू शकता.

पण समजा तुम्हाला लाखोमध्ये कमाई करायची असेल तर आपण इंग्लिश किंवा हिंदी मध्ये ब्लाँग सुरू करायला हवा कारण हिंदी इंग्रजी मध्ये आपण ब्लाँगिंग दवारे महिन्याला पाच ते सहा लाखापर्यंत महिन्याला कमाई करू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button