नायका स्टार्टअप यशोगाथा
नायका ही भारतातील एक ई काॅमर्स कंपनी आहे.ही कंपनी सौदर्याशी संबंधित तसेच नवीन फॅशनशी संबंधित अणि सौंदर्यात भर घालणारे प्रोडक्ट बनविण्याचे काम करते.
नायका ह्या कंपनीला एका महिलेने उभे केले आहे जिचे नाव फाल्गुनी नायर असे आहे.फालगुनी नायर ह्या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक मानल्या जातात.
व्यावसायिक कुटुंबात जन्मलेल्या असल्यामुळे फाल्गुनी नायर यांना गुंतवणूक व्यवसाय अणि शेअर मार्केट ह्या विषयी चांगले ज्ञान होते.
फालगुनी नायर यांनी आय आय एम अहमदाबाद मधुन आपले शिक्षण पूर्ण केले.त्यांनी बी काॅम अणि मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला होता.
फालगुनी नायर यांनी ५० वर्षाच्या असताना नोकरी सोडून तब्बल १९ वर्ष आपल्या स्टार्ट अप आयडीयावर काम केले.अणि फक्त आठ वर्षांत त्या अरबपती देखील बनल्या.
नायका ह्या ईकाॅमर्स कंपनीची सुरूवात फाल्गुनी नायर यांनी एप्रिल २०१२ मध्ये केली होती.हया कंपनीचे मुख्यालय भारतातील मुंबई ह्या शहरात आहे.
नायका कंपनीने २०१८ मध्ये पुरूषांसाठी गृमींग प्रोडक्ट बनवण्यास सुरुवात केली होती.२०२० मध्ये त्यांनी नायका मॅन लाॅच केले जे मेन्स गृमिंगसाठी भारतातील पहिले मल्टी ब्रँड स्टोअर बनले.
यानंतर २०२० मध्ये त्यांनी नायको प्रो लाॅच केले.जो एक प्रिमियम मेंबरशीप प्रोग्राम होता.जो प्रोफेशनल ब्युटी प्रोडक्टचे स्पेशल अॅक्सेस देतो.
२०२० मध्येच नायका कंपनी भारतातील सर्वात पहिली युनिकाॅन स्टार्ट अप कंपनी बनली.ज्याचे नेतृत्व एक महिला करत होती.
पुढे १० नोव्हेंबर २०२१ रोजी नायका कंपनीला इंडियन स्टाॅक एक्सचेंज मध्ये सुचीबदध करण्यात आले.
नायका ही कंपनी २०२१ मध्ये इंडियन स्टाॅक एक्सचेंज मध्ये सुचीबदध झालेली भारतातील पहिली महिला नेतृत्व असलेली कंपनी होती.
असे सांगितले जाते की तब्बल १२० इन्वहेस्टर सोबत सल्ला मसलत केल्यानंतर फाल्गुनी नायर यांनी नायकाला शेअर बाजारात सुचीबदध केले होते.
अणि ज्या १२० इन्वहेस्टर कडुन त्यांनी गुंतवणूक करण्यासाठी सल्ला मसलत केली त्यांच्याशी फाल्गुनी नायर यांची ओळख तसेच व्यावहारिक संबंध कोटक सिक्युरिटी मध्ये एमडी पदावर असतानाचे होते.
त्यांनी आयपीओ दवारे 6.4 अब्ज डॉलर्सच्या मुल्यावर ५ हजार ३५२ करोड रुपये उभारले.
याचसोबत फाल्गुनी नायर भारतातील सर्वात श्रीमंत अणि स्वता बनलेली अब्जावधीश india wealthiest self made billionaire देखील बनल्या.
फालगुनी नायर यांचे नाव हुरून रिसर्च इन्स्टिट्यूट दवारे जाहीर करण्यात आलेल्या hurun richest self made women billionaires in the world 2022 मध्ये देखील समाविष्ट करण्यात आले होते.
यात फाल्गुनी नायर ७.६ बिलियन डॉलर्स एवढ्या संपत्ती सोबत जगातील दहाव्या अशा महिला बनल्या ज्यांनी स्वताच्या कर्तृत्वावर बिलिनिअर बनुन दाखवले आहे.
एकेकाळी नायकाने फक्त काही मोजक्याच ब्रॅड तसेच प्रोडक्ट सोबत आपला स्टार्ट अप व्यवसाय सुरू केला होता पण आज नायकाच्या वेबसाईटवर २४०० पेक्षा अधिक ब्रॅड १.९ पेक्षा जास्त प्रोडक्ट सुचीबदध करण्यात आले आहेत.
आज संपूर्ण देशभरात नायकाचे ७० पेक्षा अधिक स्टोअर उपलब्ध आहेत.
जर मनात काही करून दाखवण्याची तीव्र ईच्छा असेल तर माणुस काहीही करू शकतो हे नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर यांच्या यशोगाथेतुन आपणास शिकायला मिळते.
फाल्गुनी नायर यांनी नोकरी सोडून उभी केली ५६ हजार करोड रुपयांची कंपनी –
सर्वसामान्य व्यक्ती पन्नास वय होईपर्यंत सेवानिवृत्त होण्याचा विचार करत असतात पण फाल्गुनी नायर यांनी वयाच्या ५० व्या वर्षी नोकरी सोडून ५६ हजार करोड रुपयांची कंपनी उभी केली.
जेव्हा फाल्गुनी नायर यांनी २० वर्षे बॅकरची नोकरी केल्यानंतर ती सोडली तेव्हा लोकांना वाटले फाल्गुनी नायर वेड्या झाल्या आहेत.त्यामुळे असे पाऊल उचलत आहेत.
पण त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले.
नायका कंपनीची सुरूवात करण्याआधी फाल्गुनी नायर कोटक सिक्युरिटी कंपनीच्या एम डी होत्या.१५ वर्षे त्यांनी ह्या काॅर्पारेट क्षेत्रात काम केले.
ज्यामुळे पुढे त्यांना त्यांची ई काॅमर्स कंपनी नायकाला उत्तमरीत्या चालवण्यासाठी आपल्या कामातील अनुभवाचा फायदा देखील प्राप्त झाला.
नायकाच्या प्लॅटफॉर्मवर आज १.५ करोडपेक्षा अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आहेत.अणि नायका दरमहा १५ लाखापेक्षा अधिक आॅडरची डिलीव्हरी करते.
सौंदर्याशी संबंधित नवीन फॅशनशी संबंधित प्रोडक्ट बनविणारी कंपनी सुरू करण्याची आयडिया फाल्गुनी नायर यांच्या डोक्यात कुठुन आली?
फॅशन अणि काॅस्मेटिक मध्ये रूची असलेल्या फाल्गुनी नायर यांना माहीत होते की भारतात ब्युटी अणि काॅस्मेटिकला पाहीजे तसा दर्जा दिला जात नाही.
याचाच फायदा फाल्गुनी नायर यांनी उठवला.ही व्यवसाय कल्पणा त्यांना तेव्हा सुचली जेव्हा त्या सफोरा नावाच्या एका ब्युटी स्टोअर मध्ये गेल्या.
तिथेच फाल्गुनी नायर यांना कल्पणा सुचली की स्वस्त तसेच महाग अशा सर्व ब्युटी प्रोडक्टला एका डिजीटल प्लॅटफॉर्मवर आणायचे.
जिथुन मोठ्या शहरातील महिलाच नव्हे तर छोट्या शहरातील गावातील महिला देखील हे ब्युटी प्रोडक्ट मागवू शकतील.
आज नायकाजवळ ३४ राज्यात ४०० पेक्षा अधिक ब्रॅड अणि स्टोअर आहेत.नायकाजवळ चार हजार पेक्षा अधिक प्रोडक्ट देखील उपलब्ध आहेत. आपल्या ब्रॅडला जास्तीत जास्त कस्टमर पर्यंत पोहोचवण्यासाठी नायकाने २०१९ मध्ये बाॅलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ सोबत के ब्युटी नावाचे एक जाॅईट व्हेंचर देखील सुरू केले होते.