नमो शेतकरी महासन्मान निधी योजना विषयी माहिती
आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगभरात ओळखला जातो.कारण वर्षानुवर्षे पासुन इथे अधिकतम प्रमाणात पिढीजात परंपरेने चालत असलेला
शेती हा पारंपरिक व्यवसाय केला जात आहे.
याचकरीता आपल्या देशातील केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकार येथील शेतकरी बांधवांचे भविष्य अधिक उज्ज्वल व्हावे,त्यांची आर्थिक उन्नती व्हावी त्यांच्या उत्पन्नात वाढ घडुन यावी यासाठी नेहमी नवनवीन उपक्रम योजना राबवित असते.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र तसेच राज्य सरकारने एकत्रितपणे मिळुन सुरू केलेली अशीच एक महत्वाची योजना आहे.
आजच्या लेखात आपण ह्याच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्र आणि राज्य सरकार यांनी एकत्रितपणे मिळुन सुरू केलेली एक महत्वपूर्ण सरकारी योजना आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट् राज्यातील प्रत्येक शेतकरीला दरवर्षी १२ हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते.
ह्या रक्कमेत पन्नास टक्के इतका हिस्सा केंद्र सरकारचा असतो तर उर्वरीत पन्नास टक्के इतका हिस्सा राज्य सरकारचा असतो.
म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थींना केंद्र सरकारच्या वतीने सहा हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते.अणि राज्य सरकारच्या वतीने सहा हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते.
महाराष्ट्र राज्यातील अधिकतम शेतकरी बांधवांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे.त्यांच्याकडे शेती व्यवसाय करण्यासाठी लागणारी आवश्यक अवजारे शेतीत पिकांवर फवारणी करण्यासाठी लागणारी कीटकनाशके,बियाणे उपलब्ध नसतात.
शेतीसाठी आवश्यक असलेली ही सर्व अवजारे कीटकनाशके बियाणे वगैरे खरेदी करण्यासाठी कित्येक शेतकरी बांधवांकडे पुरेसे पैसे नसतात.
अशा परिस्थितीत शेतकरींना सावकाराकडे स्वताचे घर शेतजमिन, दागदागिने, इत्यादी मौल्यवान वस्तू गहाण ठेवावी लागतात आणि व्याजाने पैसे उचलावे लागतात.
पण कित्येक शेतकरींना व्याजाने पैसे उचलून शेतीसाठी आवश्यक असलेली हत्यारे किटकनाशके बी बियाणे इत्यादी सामग्री विकत घेऊन शेती करताना अचानक आलेल्या अवकाळी पाऊस, दुष्काळ गारपीट वादळ इत्यादी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे संकटामुळे मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते.
कारण ह्या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीत कित्येक शेतकरींच्या लाखोंच्या पिकांचे नुकसान होत असते.
आधीच शेतकरींकडे शेती करण्यासाठी लागणारे अवजार आवश्यक ती किटकनाशके बी बियाणे विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतात.
ज्या करीता त्यांना व्याजाने पैसे उचलण्यासाठी घर, शेतजमिन दागदागिने इत्यादी आपल्या मौल्यवान वस्तू सावकाराजवळ गहाण ठेवाव्या लागतात.अणि शेतीत देखील आवश्यक ते उत्पन्न मिळत नसते.
अशातच अचानक आलेल्या अवेळी पाऊस,गारपीट वारा वादळ,दुष्काळ इत्यादी आर्थिक संकटामुळे पिकांचे देखील नुकसान झाल्याने शेतकरीला शेतीतुन कुठलेही उत्पन्न प्राप्त होत नाही.
अणि शेतकरींकडे उत्पन्नाचे एकमेव साधन माध्यम हे शेती असल्याने त्यांना सावकाराजवळुन घेतलेले पैसे वेळेवर फेडता येत नाही ज्यामुळे त्यांना आपले घर, शेतजमिन, दागदागिने देखील गमवावे लागतात.
अशातच डोक्यावरचे छत शेतजमीन इत्यादी सर्व संपत्ती गेल्याने निराश होऊन रस्त्यावर आलेला शेतकरी निराश होऊन आत्महत्या करण्यासारखा टोकाचा निर्णय घेतो.
महाराष्ट्र राज्यातील हेच शेतकरयांचे दिवसेंदिवस वाढत असलेले आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने मिळुन नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाने सुरू केलेल्या ह्या योजनेचा लाभ महाराष्ट् राज्यातील एक कोटी १५ लाख इतक्या शेतकरींना घेता येईल.
याकरिता राज्याकडून सहा हजार ९०० कोटी रुपये इतके बजेट देखील निर्धारित करण्यात आले असल्याचे आपणास दिसून येते.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना १२ हजार रुपये इतके अर्थसहाय्य प्रदान करत त्यांना शेती हा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर लोकांना देखील शेती व्यवसाय करण्यासाठी प्रेरीत करणे हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा मुख्य हेतू आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची इतर महत्वाची उद्दिष्टे-
- महाराष्ट्र राज्यातील सर्व गरजु शेतकरींना शासनाकडून आर्थिक पाठबळ प्रदान करणे.
- महाराष्ट्र राज्यातील सर्व गरीब शेतकरी बांधवांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास घडवून आणने
- महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरीला आर्थिकदृष्ट्या सक्षम सशक्त अणि आत्मनिर्भर बनण्यास मदत करणे.
- राज्यातील सर्व शेतकरींची आर्थिक प्रगती घडवून आणने.
- महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणे.
- महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ घडवून आणने.
- महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरींचे उज्वल भविष्य घडवणे.
- राज्यातील दिवसेंदिवस वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्यांना पुर्णतः आळा घालणे.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक असलेली अवजारे फवारणीसाठी लागणारे कीटकनाशके बी बियाणे खरेदी करण्यासाठी कोणावरही आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहावे लागु नये.तसेच अधिक व्याजदर आकारत कर्ज घेण्याची देखील गरज पडु नये.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची वैशिष्ट्ये –
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून राज्यातील शेतकरींसाठी एकत्रितपणे सुरू केलेली ही महत्वपूर्ण योजना आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वितरीत केली जाणारे शेती पीक विम्याची रक्कम राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल.
नमो शेतकरी महासन्मान निधी ह्या योजनेचा लाभ महाराष्ट् राज्यातील सुमारे १ कोटी १५ लाख इतक्या शेतकरींना देण्यात येणार आहे.
ज्यासाठी सहा हजार ९०० कोटी एवढे बजेट शासनाने ठरविले आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थी शेतकरींच्या खात्यात डायरेक्ट जमा केली जाते.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आॅफलाईन अणि आॅनलाईन अशा दोन्ही पद्धतीने ठेवण्यात आली आहे.
म्हणून अर्जदार शेतकरी हे कुठल्याही शासकीय कार्यालयात न जाता घरबसल्या देखील मोबाईलच्या माध्यमातून योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात.
याने शेतकरींना शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत ज्यामुळे त्यांचा वेळ अणि पैसे दोघेही वाचतील.
योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी योग्य तो दर दिला जाणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज करताना आपणास कुठल्याही अडीअडचणीला सामोरे जावे लागु नये यासाठी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील एकदम सहज अणि सोप्पी ठेवण्यात आली आहे म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य गरीब शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
नमो शेतकरी महासन्मान निधी ह्या योजनेत सर्व जाती धर्माच्या लोकांना समाविष्ट करण्यात आले आहे.म्हणजे ही योजना कुठल्याही एका विशिष्ट जातीतील शेतकरींसाठी नाहीये.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी महाराष्ट् राज्यातील सर्व शेतकरी असणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ तसेच योजनेअंतर्गत प्राप्त होणारे फायदे –
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना दरवर्षी १२ हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाईल.
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने शेती व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ प्राप्त करून दिले जाते.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकरींच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे आर्थिक भविष्य देखील उज्ज्वल होईल.
महाराष्ट्र राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांना आळा बसण्यास मदत होईल.
आपल्या देशातील सरकार संकटाच्या काळात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे याची जाणीव राज्यातील शेतकऱ्यांना होईल.याने त्यांना संकटाशी लढायला एक पाठिंबा प्राप्त होईल.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमुळे राज्यातील अधिकतम शेतकरी हे शेती हा आपल्या देशातील पारंपरिक व्यवसाय करण्याकडे वळतील.
तसेच देशातील इतर नागरीक देखील हा व्यवसाय करण्याकडे अधिक आकर्षित होतील.
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही शेतकरयाला आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही तसेच कुठल्याही सावकाराकडुन व्याजदर आकारून पैसे देखील घेण्याची वेळ येणार नाही.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमुळे आपल्या भारत देशातील सर्व शेतकरी स्वावलंबी बनतील त्यांना स्वताच्या पायावर उभे राहता येईल.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमुळे शेतकरींची आर्थिक स्थिती सुधारून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमुळे राज्यातील सर्व शेतकरी सशक्त आणि आत्मनिर्भर होतील.त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास घडून येईल.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पात्रतेच्या अटी तसेच नियम-
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी महाराष्ट् राज्यातील मुळ रहिवासी असायला हवा.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती शेतकरी असणे अनिवार्य आहे.
कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ फक्त शेतकरींनाच दिला जाणार आहे.
जे व्यक्ती एखादी सरकारी नोकरी करत आहेत किंवा शासकीय सेवेत रुजू आहेत त्यांना ह्या शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अर्ज सादर करता येईल.महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकरींना ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार नाही.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरीला आॅनलाईन किंवा आॅफलाईन ह्या दोघांपैकी कुठल्याही एका पद्धतीने अर्ज करावा लागेल.
लाभार्थी शेतकरीकडे स्वताची शेतजमिन असणे आवश्यक आहे.तसेच त्याचे राष्ट्रीय कृत बॅकेत खाते देखील असायला हवे.
अर्जदार लाभार्थी शेतकरीने त्याचे बॅक खाते त्याच्या आधार कार्ड सोबत लिंक केलेले असावे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत –
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार आॅनलाईन अणि आॅफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आपला अर्ज सादर करू शकतात.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅफलाईन अर्ज कसा करायचा-
सर्वप्रथम आपल्याला आपल्या जिल्हा कार्यालयात असलेल्या कृषी विभागाला भेट द्यायची आहे.
कृषी विभागात जाऊन संबंधित अधिकारी वर्गाकडून योजनेचा अर्ज प्राप्त करावा लागेल.
यानंतर अर्जात विचारण्यात आलेली सर्व आवश्यक ती माहिती भरून घ्यायची आहे अणि त्याला आवश्यक ते कागदपत्र जोडुन अर्ज जमा करायचा आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आॅनलाईन अर्ज कसा करायचा?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम पहिल्या टप्प्यात आपल्याला अर्जदार म्हणून आपली नाव नोंदणी करावी लागेल.
यासाठी सर्वप्रथम अर्जदार शेतकरीला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
यानंतर आपल्यासमोर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे होमपेज ओपन होईल इथे आपल्याला new applicant registration ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ज्यात आपल्याला आपली म्हणजेच अर्जदाराची सर्व माहिती भरून घ्यायची आहे.
सर्व आवश्यक ती माहिती भरून झाल्यावर खाली दिलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करायचे आहे.यानंतर आपली अर्जदार नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होईल.
यानंतर दुसरया टप्प्यात आपल्याला योजनेच्या होम पेजवर जायचे आहे तिथे आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर आपल्यासमोर योजनेचा फाॅम ओपन होईल तो भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडून ती अपलोड करून घ्यायची आहेत.
सर्व माहिती भरून झाल्यावर खाली दिलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करायचे आहे.अशा पद्धतीने आपली योजनेसाठीची आॅनलाईन अर्ज प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होईल.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशनकार्ड झेरॉक्स
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बॅक खाते तपशील
- रहिवासी प्रमाणपत्र
- सातबारा आठ अ उतारा
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थींची यादी कुठे अणि कशी पाहायची?
सर्वप्रथम आपल्याला शासनाच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जायचे आहे.
यानंतर आपल्यासमोर योजनेचे होम पेज ओपन होईल तिथे दिलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी यादी ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर आपल्यासमोर योजनेच्या लाभार्थींची यादी ओपन होईल.