BusinessEntrepreneurshipStartup

कंटेट रायटिंगचा व्यवसाय कसा सुरु करायचा?

जे व्यक्ती घरबसल्या आपला स्वताचा एखादा उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छित आहे अशा व्यक्तींसाठी कंटेट रायटिंग ही एक चांगली व्यवसाय कल्पणा आहे.

आजच्या डिजीटल युगात जास्तीत जास्त लोक आपल्या प्रोडक्ट सर्विसेसला आॅनलाईन विकणे अधिक पसंद करतात.

अणि जे व्यक्ती आॅनलाईन पदधतीने आपल्या प्रोडक्ट सर्विसेसची विक्री करत असतात त्यांना जर आपल्या कस्टमरला आपल्या जवळील उपलब्ध प्रोडक्ट सर्विस विषयी माहिती द्यायची असेल तर ते दोनच पद्धतीने देऊ शकतात.

एक म्हणजे ते एक व्हिडिओ तयार करून त्यात आपल्या प्रोडक्ट सर्विस विषयी सर्व माहिती देऊ शकतात.किंवा लिहुन आपल्या प्रोडक्ट सर्विसेसची माहीती देऊ शकतात.

फक्त व्हिडिओ मध्ये आपल्याला व्हिडिओ स्वरूपातील कंटेटची आवश्यकता असते तर टेक्स्ट मध्ये आपल्याला लिखित स्वरूपात कंटेटची आवश्यकता असते.

पण दोघेही स्वरूपात आपल्या प्रोडक्ट सर्विस विषयी माहिती देत असताना आपल्याला कंटेटची आवश्यकता भासत असते.अणि हा कंटेट आपल्याला लिहुन देण्याचे काम कंटेट रायटर करत असतो.

आपण देखील कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू करून महिन्याला २५ ते ५० हजारापर्यत कमाई करू शकता.

कंटेट रायटिंग व्यवसाय म्हणजे काय?

कंटेट रायटिंग हा एक असा व्यवसाय आहे ज्यात आपण फक्त लेख लिहुन पैसे कमवू शकतो.

कंटेट रायटिंगच्या ह्या व्यवसायात आपल्याला आपल्या क्लाईंटकडुन परवर्ड नुसार पैसे मिळत असतात.आपण इथे आपल्या एक्सपर्टीज नुसार क्लाईंटला पैसे चार्ज करू शकतो.

कंटेट रायटिंगचा व्यवसाय आपण इंग्रजी भाषेत सुरू केले तर अधिक उत्तम आहे.कारण यात आपल्याला परदेशातील क्लाईंट कंटेट रायटिंगच्या सर्विससाठी मिळत असतात.जे आपल्याला एक पोस्ट लिहिण्यासाठी कमीत कमी ३०० रूपये च्या पुढे इतके हाय पे करीत असतात.

पण समजा तुम्हाला कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण तुमची इंग्रजी भाषेवर पाहिजे तशी पकड नाहीये तर अशा परिस्थितीत आपण हिंदी तसेच मराठी सारख्या लोकल भाषेत देखील कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू करू शकतात.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला इंग्रजी मध्येच लिहिताच आले पाहिजे असे कुठलेही बंधन नसते.

आपण आपल्या हिंदी,मराठी इत्यादी प्रकारच्या कुठल्याही लोकल भाषेत देखील कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू करू शकतो.

कंटेट रायटिंग ह्या व्यवसायामध्ये आज हिंदी इंग्रजी ह्या भाषेत मार्केट मध्ये आपल्याला २० पैसे ते ५० पैसे परवर्ड प्रमाणे पे करणारे अनेक क्लाईंट सहज भेटुन जातात.

पण मराठी भाषेत जाहीरातीवर खूप कमी पैसे लावले जात असल्याने मराठी भाषेत कंटेट रायटिंग केल्यास आपल्याला जास्तीत जास्त हजार शब्दांचे एक आर्टिकल लिहायचे १५० रूपये मिळतात.

म्हणजे समजा आपण हजार शब्दांचे एक आर्टिकल हिंदी इंग्रजी भाषेत क्लाईंटसाठी लिहिले तर आपल्याला २०० रूपये पासुन ५०० रूपये पर्यंत एका आर्टिकलचे भेटु शकतात.

अणि मराठी मध्ये हजार शब्दांचे एक आर्टिकल लिहायचे आपल्याला किमान १०० रूपये अणि जास्तीत जास्त १५० रूपये भेटु शकतात.

हजार शब्दांचे एक आर्टिकल रिसर्च वगैरे करून लिहायला आपल्याला जास्तीत जास्त २ किंवा ३ तीन तास इतका कालावधी लागु शकतो.

कंटेट रायटिंगच्या कामासाठी आपण फायवर अपवर्क फ्रिलान्सर डाॅट काॅम इत्यादी सारख्या फ्रिलान्सिंग वर्क प्राप्त होत असलेल्या वेबसाईटस वर देखील रेजिस्ट्रेशन करू शकतात.इथे आपल्याला विपुल प्रमाणात कंटेट रायटिंगचे फ्रिलान्सिंग वर्क प्राप्त होते.

कंटेट रायटिंगचा व्यवसाय कसा सुरु करायचा?

कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला एक नीश सिलेक्ट करावे लागेल की कोणत्या विषयावर आपण आपल्या क्लाईंटसाठी कंटेट लिहु शकतो.

कंटेट रायटिंग ही साधारणतः आपल्याला ज्या विषयाचे उत्तम नाॅलेज आहे त्याच विषयावर करायला हवी.

१)सर्वप्रथम आपण क्लाईंटला देत असलेली सर्विस समजुन घ्या –

कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू करण्याआधी आपल्याला हे समजुन घ्यावे लागेल की आपण आपल्या क्लाईंटला कंटेट रायटिंग मध्ये कोणती सर्विस पुरवणार आहोत.

कंटेट रायटिंग हा एक वैविध्यपूर्ण उद्योग व्यवसाय आहे म्हणून यात आपण आपल्या क्लाईंटला कोणती सर्विस देत आहोत कोणत्या प्रकारचा कंटेटची सर्विस देत आहोत हे आपणास माहीत असणे आवश्यक आहे.

आज बाजारात वेगवेगळ्या कंटेटची मागणी असते.आज बाजारात कंपन्या एजन्सी आहेत ज्या कंटेट रायटिंगची सर्विस घेत असतात.

आपण आपल्या क्लाईंटला पुढीलप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेट रायटिंगच्या सर्विस आपल्या क्लाईंटला पुरवू शकतो-

एसईओ कंटेट रायटिंग

सोशल मिडिया कंटेट रायटिंग

टेक्नीकल रायटिंग

वेब कंटेट रायटिंग

काॅपी रायटिंग

क्रिएटिव्ह रायटिंग

बिझनेस रायटिंग

प्रोडक्ट डिस्क्रिप्शन

ई बुक रायटिंग

इत्यादी

वरील कंटेट रायटिंग व्यवसायातुन दिल्या जात असलेल्या सर्विसेसची यादी बघुन आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की कंटेट रायटिंग हा एक किती मोठा वैविध्यपूर्ण उद्योग व्यवसाय आहे.

म्हणुन ज्या व्यक्तींना स्वताचा कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी आधी हे ठरवून घ्यायला हवे की त्यांना आपल्या क्लाईंटला कंटेट रायटिंग मध्ये कोणकोणत्या सर्विस प्रदान करावयाच्या आहेत.

त्यानंतरच आपण कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू करायला हवा.

२)बिझनेस प्लॅन तयार करणे –

कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्लॅनिंग आहे.

आपल्याला आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्याआधी काही महत्वपूर्ण गोष्टींची योजना करणे आवश्यक आहे.

कंटेट रायटिंगच्या व्यवसायात आपल्याला व्यवसाय योजना तयार करावी लागते.आपण कुठल्या नीशवर काम करणार हे देखील ठरवावे लागते.एवढेच नव्हे तर आपले बिझनेस माॅडेल सुद्धा निवडावे लागते.

कंटेट रायटिंग हा एक असा व्यवसाय आहे जो सुरू करण्यासाठी आपल्याकडे वेळ व्यवस्थापन अणि संस्था कौशल्य असणे गरजेचे असते.

कंटेट रायटिंग हा व्यवसाय सुरू करण्याआधी आपण आपल्या व्यवसायादवारे कोणाला मदत करणार आहोत.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी यात आपण किती खर्च करणार आहोत.आपले एकुण बजेट किती आहे?आपण आपला व्यवसाय कसा चालवणार आपण आपले टार्गेट क्लाईट कुठे अणि कसे शोधणार? रायटर्सला किती पे करणार अणि स्वता किती ठेवणार या विषयी आपण योग्य ती प्लॅनिंग करायला हवी.

३) नीश सिलेक्ट करणे –

कुठल्याही क्लाईंटला एखाद्या ठाराविक नीशवर आर्टिकल लिहुन घेण्यासाठी त्या क्षेत्रातील उत्तम ज्ञान असलेल्या एक्सपर्ट कंटेट रायटरची आवश्यकता असते.त्यासाठी क्लाईंट पाहीजे तितके पैसे देण्यास देखील तयार असतात.

म्हणुन कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू करण्याआधी आपण आपले नीश सिलेक्ट करून घ्यायला हवे याने आपल्याला आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करणे, मार्केटमध्ये आर्टिकल लिहिण्यासाठी हाय पे करत असलेल्या टार्गेट क्लाईंटला शोधणे अधिक सोपे जाते.

नीश सिलेक्ट करताना आपण काही महत्वाच्या बाबींचा विशेष विचार करायला हवा.

आपल्याला शैक्षणिक रीत्या अणि व्यावसायिक दृष्ट्या कोणत्या क्षेत्राचा उत्तम अनुभव आहे कोणत्या क्षेत्राचे आपल्याला उत्तम ज्ञान आहे.

आपण कशाबाबद अधिक पॅशोनेट आहोत.आपल्याला कशाची आवड आहे.आपल्याला कुठल्या विषयावर लिहायला अधिक आवडते.

आपण ज्या नीशवर क्लाईंटसाठी आर्टिकल लिहणार आहोत ते नीश फायदेशीर आहे का? त्यात आपल्याला चांगले पेमेंट प्राप्त होईल का?कारण कंटेट रायटिंग ह्या व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या हाताखाली काम करण्यासाठी रायटर्सला हायर करावे लागणार म्हणून नीश निवडताना आपण आपल्याला आवडतो अणि जो आपल्या व्यवसायासाठी अधिक फायदेशीर ठरेल ज्यावर लेखन करण्यासाठी क्लाईंट जास्त पे करतात असा नीश सिलेक्ट करायला हवा.

४) योग्यरीत्या रिसर्च करणे –

कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू करण्याआधी आपण मार्केट डिमांड काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू करताना सर्वप्रथम आपण बाजारात लोकांना काय हवे आहे कशा प्रकारचे कंटेट लिहुन घ्यायला क्लाईंट अधिक पे करतात हे मार्केट रिसर्च करून लक्षात घ्यावे लागेल.

मग त्यानुसार योग्य तो नीश सिलेक्ट करून हाय पेईग क्लाईंट शोधावे लागतील.

५) स्वताची वेबसाईट तयार करणे –

कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला आपली स्वताची एक आॅफिशिअल वेबसाईट सुरू करावी लागेल.

ज्यात आपण कोणकोणत्या प्रकारच्या कंटेट रायटिंगच्या सर्विस आपल्या क्लाईंटला पुरवता हे देऊ शकतात.आपले चार्जेस काय आहेत हे आपल्या वेबसाईट वर देऊ शकता.

त्यावर आपण आपला आपल्या टीम मध्ये काम करत असलेल्या रायटर्सचा पोर्टफोलिओ देखील समाविष्ट करू शकतात.

पोर्टफोलिओ मध्ये याआधी कोणकोणत्या क्लाईंटसाठी काम केले होते त्यांचा आपल्या कामाच्या बाबतीत रिस्पॉन्स काय होता त्यांनी आपल्या कामाला किती रेटिंग दिले हे दिलेले असते.

६) कंटेट रायटरला हायर करणे –

कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू करताना आपल्याला वेगवेगळ्या क्लाईंटसाठी वेगवेगळ्या नीशवर कंटेट लिहण्यासाठी एक्सपर्ट कंटेट रायटर्सची देखील आवश्यकता भासणार आहे.

कारण एकाच वेळी वेगवेगळ्या क्लाईंटसाठी दिलेल्या डेडलाईन मध्ये कंटेट लिहणे आपल्याला एकट्याला जमु शकत नाही.त्यासाठी आपल्याला एका टीमची आवश्यकता असते.

म्हणुन कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण क्लाईंटसाठी आर्टिकल लिहायला किमान दोन तीन कंटेट रायटर हायर करून घ्यायला हवेत.

पुढे जसजसा आपल्या व्यवसायात क्लाईंटच्या संख्येत वाढ होईल आपण तसतसे रायटर्सच्या संख्येत देखील वाढ करू शकतो.

७) आपल्या व्यवसायाची कमाई संरचना तयार करणे-

कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्याला आपल्या व्यवसायाची कमाई संरचना देखील तयार करावी लागेल.

म्हणजे आपल्याला आपल्या व्यवसायातुन कमाई कशी प्राप्त होईल याची संरचना आपल्याला तयार करून घ्यावी लागेल.

८)लोकांना आपल्या सर्विस विषयी माहिती प्रदान करा-

कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण कंटेट रायटिंगची सर्विस क्लाईंटसाठी सुरू केली आहे याची माहिती आपल्याला लोकांना द्यावी लागेल.

म्हणजे वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला आपण बाजारात उपलब्ध करून देत असलेल्या आपल्या सर्विसेसची माहीती द्यावी लागेल.

तेव्हा कुठे आपल्या टार्गेट कस्टमर पर्यंत आपल्या व्यवसायाची माहिती पोहचेल अणि ते कंटेट रायटिंगच्या सर्विसेस करीता आपल्याला संपर्क साधतील.

९) सोशल प्रोफाईल तयार करणे-

कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी एक सोशल प्रोफाईल तयार करून घ्यावे.

१०) फ्रिलान्सिंग वेबसाईटस वर नोंदणी करणे –

कंटेट रायटिंगच्या सर्विसेस करीता आज फ्रिलान्सिंग वेबसाईटसवर आपल्याला विपुल प्रमाणात क्लाईंट प्राप्त होतात.

म्हणुन आपण आपल्या सर्विस विषयी अपवर्क फायवर फ्रिलान्सर डाॅट काॅम इत्यादी सारख्या फ्रिलान्सिंग वेबसाईटसवर स्वताचे नाव रेजिस्ट्रेशन करून माहीती द्यायला हवी.

११) आपल्या सर्विसेसची जाहीरात करा-

कुठल्याही व्यवसायाच्या यशासाठी तो जोरात चालण्यासाठी त्याची जाहीरात करणे खुप महत्वाचे असते.

म्हणुन आपण देखील आपल्या व्यवसायाची वेगवेगळ्या सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे जाहीरात करायला हवी याने आपल्या व्यवसायाची माहिती जास्तीत जास्त कस्टमर पर्यंत पोहोचेल.त्यांना आपल्या सर्विस विषयी ज्ञात होईल.

१२) आपल्या उद्योग व्यवसायाचे रेजिस्ट्रेशन करणे-

कंटेट रायटिंगचा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण आपल्या व्यवसायाला एक नाव द्यायला हवे त्या नावाने आपल्या व्यवसायाचे रेजिस्ट्रेशन करावे लागेल.

ज्यांना आपल्या कंटेट रायटिंगच्या व्यवसायात रायटर्सला हायर करायचे आहे.तसेच बिझनेस टॅक्स भरायचा आहे अशा व्यक्तींनी आपल्या उद्योग व्यवसायाची नोंदणी आपल्या राज्यात करायला हवी.

याचसोबत आपला व्यवसाय क्रमांक ई आय एन देखील प्राप्त करायला हवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button