चिकन अणि मटण खाण्यासाठी पुण्यातील ८ बेस्ट हाॅटेल्स

आज आपल्यातील कित्येक जणांना नाॅन व्हेज म्हणजेच चिकण अणि मटण खायला आवडते.आपण प्रत्येक जण सुट्टीच्या दिवशी घरी किंवा हाॅटेलात जाऊन चिकण तसेच मटण खाण्याचा बेत आखत असतो.
त्यातच आपण राहायला पुण्यातील पेठेत असेल तर काही चिंताच नाही कारण इथे एकापेक्षा एक सरस अशा खाणावळ आपणास पाहावयास मिळतात.
येथील खानावळींमध्ये आपल्याला महाराष्टातील सर्व चवींचा अनुभव प्राप्त करता येतो.ते ही आपल्याला परवडेल अशा किमतीत.
आजच्या लेखात आपण पुण्यात उत्तम प्रकारचे चिकण मटण मिळत असलेल्या ८ ठिकाणांची नावे जाणुन घेणार आहोत.
साईनाथ खानावळ
नादखुळ अणि अस्सल मराठमोळ जेवण ह्या टॅगखाली साईनाथ खानावळ अत्यंत प्रसिद्ध आहे.
मटण थाळी,मटण फ्राय थाळी,मटण करी,चिकन मसाला थाळी,चिकन करी ह्या थाळया साईनाथ खानावळ मधील प्रमुख ओळख आहेत.
याचसोबत तांबडा पांढरा रस्सा अणि सुके चिकन मटण दिले जाते.मराठवाडयाचा स्पेशल मसाला इथे वापरला जातो.अणि तुपात इंद्रायणी भात दिला जातो.
मटण भाकरी स्पेशल ह्या साईनाथ खानावळीची स्पेशालिटी आहे.स्पेशली घरी बनविण्यात आलेल्या मसाल्यात ह्या ठिकाणी मटण चिकन तयार केले जाते.
अमोल निकम हे ह्या खानावळीचे मालक आहेत.हया खानावळीची सुरूवात २०१६ मध्ये करण्यात आली होती.
अलका चौकात कुंठेकर रस्त्याला लागुनच आपणास ही साईनाथ खानावळ पाहायला मिळते.
मिलन खानावळ
मिलन खानावळ पुण्याच्या मध्यभागी असलेल्या सदाशिव पेठेत कुंठेकर रस्त्यावर आपणास ही मिलन खानावळ पाहावयास मिळते.
मिलन खानावळ मधील मेन्यूत आपणास चिकन मटण सोबत फिश थाळी देखील दिली जाते.
येथील मटण राईस प्लेट,मटण फ्राय राईस प्लेट,चिकन राईस प्लेट, मसाला राईस प्लेट,चिकन फ्राय राईस प्लेट,चिकन मसाला राईस प्लेट इत्यादी सर्व थाळया अत्यंत खास आहेत.
वरील सर्व गोष्टींसोबतच इथे तांबडा पांढरा रस्सा देखील दिला जातो.ज्यासोबत थाळी चपाती किंवा भाकर देखील आपण खाण्यासाठी घेऊ शकतो.
मारूती दळवी यांनी ही मिलन खानावळ सुरू केलेली आहे.मारूती दळवी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील आहेत.
१९९३ पासुन ते पुण्यातील सातारा रस्त्यावर असलेल्या हाॅटेलात काम करत होते.पुढे २००० साली त्यांनी स्वताची मिलन खानावळ सुरू केली होती.
संध्याकाळी ह्या खानावळी जवळ नुसता फिरायला गेले तरी देखील ह्या खानावळी समोरची गर्दी पाहून आपल्या लगेच लक्षात येईल हे हाॅटेल किती जोरात चालते अणि हे हाॅटेल किती फेमस देखील आहे.
आवारे मराठा खानावळ
सदाशिव पेठेतील आवारे मराठा खानावळ खानावळ चिकन अणि मटणसाठी खुप फेमस आहे.
येथील चिकन हांडी,चिकन मसाला थाळी,अळणी मटण करी थाळी,अळणी मटण थाळी अत्यंत प्रसिद्ध आहे.ह्या खानावळीत घरी बनविलेल्या मसाल्यातुन सर्व पदार्थ बनविण्यात येत असतात.
कोल्हापूर पद्धतीने बनविण्यात येणारा तांबडा पांढरा रस्सा थाळीसोबत दिला जातो.अवघ्या पाचशे रूपयात इथे दोन व्यक्ती पोटभर चिकण मटण खाऊ शकतात.
आवारे मराठा खानावळ १९०१ साली बाळा रघू आवारे यांनी सुरू केली होती.आता त्यांची चौथी पिढी नरेंद्र आवारे ही खानावळ चालवत आहे.
जगदंब हाॅटेल
जगदंब हाॅटेल मधील काळ्या मसाल्याचे मटण खुप प्रसिद्ध आहे.जगदंब हाॅटेल ह्या ठिकाणी लोक पन्नास ते शंभर किलोमीटर इतक्या अंतरावरून खास मटण खाण्यासाठी येतात.
जगदंब हाॅटेल मध्ये तयार केले गेलेले सर्व पदार्थ साजुक तुपातील असतात.मालवणी मटण खरडा,मटण मसाला,मटण हंडी,चिकन हंडी,चिकन करी,चिकन मसाला असे सर्व काही इथे उपलब्ध आहे.
याचसोबत स्पेशल मटण भाकरी,चिकन भाकरी थाळी,बाॅयलर ताट असे अनेक पदार्थ देखील इथे मिळतात.
खेड शिवापूर येथे वास्तव्यास असलेल्या गणेश पायगुडे यांनी २०१२ मध्ये ह्या हाॅटेलची सुरूवात केली होती.काळया मसाल्याचे मटण ही जगदंब हाॅटेलची खरी ओळख आहे.
पुणे सातारा हायवेवर खेड शिवापूर तोल नाक्याजवळ हे जगदंब हाॅटेल आहे.विकेंड वगळता देखील इतर दिवशी इथे हाॅटेलात जेवणासाठी तासनतास वाट पाहत बसावे लागते.
हाॅटेल संदीप
हाॅटेल संदीप उकडलेले सुके मटण अणि काळ्या मसाल्यात बनविण्यात येत असलेल्या मटणामुळे अत्यंत प्रसिद्ध आहे.
बोलाई मातेचे मंदिर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडे बोलाई ह्या ठिकाणी आहे.त्यामुळे ह्या जिल्ह्यात बोकडयाचे मटण खाल्ले जात नाही.
पण संदीप हाॅटेल मध्ये बोकडयाचे मटण खायला मिळते म्हणून पुण्याच्या बाहेरून आलेले अनेक लोक ह्या हाॅटेलात जेवणासाठी जायला पसंती देतात.
संदीप हाॅटेलच्या मेन्युमध्ये चिकण बोकड,चिकन फ्राय,चिकन हंडी,चिकन रोस्ट,मटण बोकड,मटण फ्राय,मटण हांडी इत्यादी पदार्थ अधिक प्रसिद्ध आहेत.
पुण्यातील हे हाॅटेल चारमजली आहे तरी देखील वाट बघितल्याशिवाय इथे जागा लवकर मिळत नाही.
हाॅटेल संदीपचे मालक संदीप खोतकर आहेत.सप्टेंबर २०२० मध्ये हाॅटेल संदीपचा ब्रँड पुण्यातील जंगली महाराज रोडवर सुरू झाला होता.
जय भवानी मटण भाकरी हाॅटेल
मटण भाकरी हे नवीनच फुड कल्चर आहे.मटण भाकरी खाण्यासाठी जरी पन्नास ते शंभर किलोमीटर इतक्या अंतरावर जावे लागले तरी देखील लोक मटण भाकरी खाण्यासाठी कंटाळा करत नाही.
शिवापूर येथे जगदंब हाॅटेल प्रमाणे जय भवानी मटण भाकरी हाॅटेल देखील खुप प्रसिद्ध आहे.हया हाॅटेलात घरी तयार केलेल्या मसाल्यात मटण अणि चिकन बनविण्यात येते.
मटण मसाला,मटण अळणी, मटण सुका,मालवणी चिकन हांडी हे हाॅटेल भवानी मधील फेमस पदार्थ आहेत.
जय भवानी हाॅटेल मध्ये चिकन मटण प्रमाणे सुपातील दम बिर्याणी देखील लोक अत्यंत आवडीने खातात.हाॅटेलचे मालक शंकर देशमुख आहेत.२००० साली हे हाॅटेल सुरू करण्यात आले होते.
पुणे सातारा रस्त्यावरील शिवापूर तोल नाक्याजवळ हे हाॅटेल आहे.
भुजबळ बंधु हाॅटेल आपुलकी
१९९६ पासुन भुजबळ बंधु आपुलकी हाॅटेल सुरू करण्यात आले होते.तेव्हापासून घरी बनवलेल्या काळ्या मसाल्यापासुन चिकन मटण बनविण्यात येत आहे.
इथे खरडा मटण फ्राय,मटण दम किमा,मटण चिकन मसाला थाळी प्रसिद्ध आहे.कपिल भुजबळ हे ह्या हाॅटेलचे मालक आहेत.
हाॅटेल नागपूर
हाॅटेल नागपूर मध्ये नावाप्रमाणेच नागपूर मधील बनविण्यात आलेला सावजी मसाला वापरून चिकन मटण बनविण्यात येते.
हे चिकन मटण अत्यंत जुन्या पद्धतीने शिजविले जाते.मटण करी,मटण फ्राय,मटण पुलाव,भेजा फ्राय,चिकन फ्राय चिकन पुलाव ह्या हाॅटेल नागपूर मधील काही प्रसिद्ध थाळया आहेत.
इथे बसायला टेबल खुर्ची नसुन भिंतीला लागून बॅच ठेवण्यात आले आहेत.