कमी गुंतवणूक करून करता येतील असे १६ व्यवसाय

जेव्हा कधीही आपण स्वताचा व्यवसाय सुरू करायचा विचार करतो तेव्हा व्यवसायासाठी लागत असलेल्या अधिक भांडवलामुळे आपल्याला स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करता येत नसतो. पण आज आम्ही तुम्हाला काही अशा व्यवसायांविषयी सांगणार आहोत जे व्यवसाय करण्यासाठी आपणास फार जास्त गुंतवणकीची आवश्यकता नसते. आपण खुप कमी गुंतवणूक करून देखील हे व्यवसाय सुरू करू शकता अणि त्यातुन महिन्याला लाखोची कमाई देखील करू शकतात.
१) इव्हेंट मॅनेजमेंट :
सध्या लग्न,वाढदिवस,बारसे,समारंभ,मेळावे,सभा,सेमिनार मीटिंग इत्यादी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी एका इव्हेंट प्लॅनरची आवश्यकता भासत असते.ज्या व्यक्तींना कार्यक्रमातील सर्व कामे स्वता करता येत नाही असे व्यक्ती कार्यक्रमातील कामे करण्यासाठी इव्हेंट प्लॅनरची मदत घेत असतात. इव्हेंट मॅनेजर हा कुठल्याही इव्हेंटची संपूर्ण व्यवस्था हाताळण्याचे काम करतो.त्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट हा एक आपल्यासाठी उत्तम व्यवसाय आहे जो करून आपण चांगली कमाई करू शकतात.इव्हेंट मॅनेजमेंट हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला साधारणतः ४० हजार अणि जास्तीत जास्त १ लाखापर्यंत खर्च तसेच गुंतवणुक करावी लागु शकते.
२) ईकाॅमर्स व्यवसाय :
ईकाॅमर्स व्यवसाय मध्ये आपण आपली स्वताची ईकाॅमर्स वेबसाईट बनवून त्यावरून वेगवेगळ्या प्रोडक्टची ऑनलाईन विक्री करू शकतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला किमान २० हजार रुपये अणि जास्तीत जास्त १ lac इतकी गुंतवणुक करावी लागु शकते.
३) ब्लाॅगिंग :
ब्लाॅगिग हा एक असा व्यवसाय आहे ज्यात कमी पैशांची गुंतवणूक करून आपण हा सुरू करू शकतो. फक्त यासाठी आपल्याला कंटेट रायटिंग, किवर्ड रिसर्च,नीश निवडणे,एस ईओ करणे तसेच इतर टेक्निकल बाबींचे नाॅलेज असणे आवश्यक आहे.आपल्या ब्लाँगवर पोस्ट लिहुन वेगवेगळ्या सोशल मिडिया माध्यमांवर त्याची लिंक शेअर करावी लागते. जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त वाचक वर्ग प्राप्त होईल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला फक्त डोमेन होस्टिंग खरेदी करावे लागते.यात आपल्याला साधारणतः ४ ते ५ हजार इतकी गुंतवणुक करावी लागेल.यानंतर आपल्याला ऍडसेन्स approval प्राप्त करावे लागेल.adsenseapproval प्राप्त झाल्यानंतर जसजशा आपल्या वेबसाईटवर जाहीरात दिसु लागतील अणि लोक त्यावर क्लिक करतील तसतशी आपली ब्लाॅगिंग द्वारे कमाई होऊ लागते.
४) सोशल मिडिया इंफ्लुएन्सर :
सोशल मिडिया इंफ्लुएन्सर बनुन आपण वेगवेगळ्या ब्रँडचे प्रमोशन करून चांगली कमाई करू शकतो. यासाठी आपल्याला सोशल मिडियावर आपले खाते उघडावे लागेल अणि जास्तीत जास्त फाॅलोअर्स बनवून वेगवेगळ्या ब्रँडचे आपल्या सोशल मिडिया अकाऊंटच्या माध्यमातुन प्रमोशन करावे लागेल. सोशल मिडिया इंफ्लुएन्सरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला फक्त ५ ते २० हजार इतकी गुंतवणुक करावी लागेल.
५) विवाह सल्लागार :
विवाह सल्लागार हे उपवर मुलामुलींची माहीती प्राप्त करतात अणि ही प्राप्त केलेली माहिती विवाह इच्छुकांपर्यत पोहोचवण्याचे काम करतात. विवाह सल्लागार बनुन आपण नाती जुळवण्याचे काम करू शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला साधारणतः ५ ते ५० हजार इतकी गुंतवणुक करावी लागेल.
६) टयूशन क्लासेस :
आज आपण आपल्याला ज्या विषयाचे उत्तम नाॅलेज आहे अशा विषयाचे इतरांना ज्ञान देऊन चांगली कमाई करू शकतात.आपल्या अंगी जे कलाकौशल्य आहे ज्या विषयाचे आपल्याला उत्तम ज्ञान आहे असा विषय इतरांना शिकवून त्याचे ज्ञान देण्याचे काम यात आपल्याला करायचे आहे.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला किमान १० हजार रुपये अणि जास्तीत जास्त ५० इतकी गुंतवणूक करावी लागेल.
७) किराणा दुकान :
किराणा दुकान ही एक सर्वोत्कृष्ट व्यवसाय कल्पणा आहे.यात देखील स्पर्धा वाढत असल्याने ज्या परिसरात कुठलेही किराणा दुकान नाहीये अशा परिसरात आपल्याला किराणा दुकान टाकावे लागेल.याने आपल्याकडे जास्तीत जास्त कस्टमर येतील अणि आपला व्यवसाय जोरात चालेल.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला किमान ५० हजार अणि जास्तीत जास्त ५ लाख इतके भांडवल लागण्याची शक्यता आहे.ह्यात देखील आपल्या दुकानाच्या क्षेत्रानुसार आकारानुसार थोडे फार कमी जास्त होण्याची शक्यता असते.ज्यांच्याकडे एकट्याने व्यवसाय सुरू करायला पुरेसे भांडवल नसेल ते ५०-५० पार्टनर शिप मध्ये किराणा दुकान सुरू करू शकता.याचसोबत आपण होम डिलिव्हरी करण्याचे काम देखील करू शकतात यात आपल्याला आपल्या दुकानाच्या परिसरातील लोकांना त्यांच्या घरी जाऊन किराणा माल पोहोचवा लागेल.
८) मोबाईल शाॅप :
आज लहानमुलांपासुन मोठ्या माणसांपर्यंत आज सर्वांकडेच अॅड्राॅईड मोबाईल आपणास दिसून येतो.यावरून आपणास लक्षात येईल की मोबाईलचा वापर मार्केट मध्ये किती झपाट्याने वाढत आहे.दरवर्षी २५ कोटी पेक्षा अधिक मोबाईलची खरेदी विक्री केली जाते.अशा परिस्थितीत जर आपण स्वताचे मोबाईल शाॅप उघडले आपल्याला खूप फायदा होईल.मोबाईल शाॅप सुरू करण्यासाठी आपल्याला सुरूवातीला थोडे जास्त भांडवल लागु शकते.ज्यांच्याकडे अधिक भांडवल नाही ते छोट्या दुकानापासुन देखील आपल्या व्यवसायाची सुरुवात करू शकता.अणि चांगली कार्यक्षमता असलेल्या अणि कमी बजेटमध्ये बाजारात उपलब्ध होत असलेल्या रेडमी रिअलमी सारख्या मोबाईलची सुरूवातीला विक्री करू शकतात.
९) ब्युटी पार्लर :
ज्या महिलांना सौंदर्य प्रसाधनांचे मेक अपचे उत्तम ज्ञान आहे तसेच त्यांचा ब्युटी पार्लरचा कोर्स देखील झाला आहे अशा महिला आपल्या घरातच किंवा एखादे दुकान टाकुन ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू करू शकता.
१०) लॅपटॉप तसेच कंप्यूटर दुरूस्ती :
ज्या व्यक्तींना संगणक तसेच लॅपटॉप दुरूस्ती येत असेल ते लॅपटॉप तसेच कंप्यूटर दुरूस्तीचा व्यवसाय सुरू करू शकतात.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला एखाद्या शासकीय तसेच खासगी संस्थेतुन लॅपटॉप कंप्यूटर दुरूस्तीचा कोर्स करावा लागेल.हा कोर्स केल्यानंतर आपण स्वताचे लॅपटॉप कंप्यूटर दुरूस्तीचे शाॅप ओपन करू शकतो.
११) फ्रिलान्सिंग सर्विसेस :
फ्रिलान्सिंग मध्ये आपल्याला जे स्कील येत असेल त्याची इतरांना सर्विस देऊन चांगली कमाई करता येते.फ्रिलान्सिंग मध्ये आपण वेब डिझायनिंग,कंटेट रायटिंग, ग्राफिक डिझायनिंग,व्हिडिओ एडिटिंग, साॅफ्टवेअर डेव्हलपमेंट,सोशल मिडिया मॅनेजमेंट इत्यादी अशा विविध सर्विसेस इतरांना देऊन चांगली कमाई करता येते. फ्रिलान्सिंग मध्ये आपल्याला स्वताची एखादी फ्रिलान्सिंग एजन्सी देखील सुरू करता येईल.ज्यातुन आपण क्लाईंटला फ्रिलान्सिंगच्या वेगवेगळ्या सर्विसेस देऊ शकतो. फ्रिलान्सिंग मध्ये आपल्याला कोणत्या क्लाईंटचे काम करायचे केव्हा करायचे कुठे बसुन काम करायचे हे स्वता ठरवता येते.फ्रिलान्सिंग सर्विस मध्ये आपल्याला आॅनलाईन काम करायचे असते हे काम आपण पार्ट टाइम किंवा फुलटाईम देखील करता येते.फ्रिलान्सिंग मध्ये आपण वेगवेगळ्या ब्लाँग,वेबसाईट, कंपन्या,डिजीटल मार्केटिंग एजन्सी यांना फ्रिलान्सिंगची सर्विस देऊ शकतो अणि त्याद्वारे चांगली कमाई करू शकतो.फ्रिलान्सिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम फायवर,अपवर्क,फ्रिलान्सर वेबसाईट वर रेजिस्ट्रेशन करावे लागेल इथे आपल्याला फ्रिलान्सिंग सर्विस करीता क्लाईंट प्राप्त होतील.
१२) कार बाईक वाॅशिंग दुकान :
आपण स्वताच्या घरामध्ये कार वाॅशिंगचे दुकान सुरू करून चांगली कमाई करू शकतो.यात आपल्याला फक्त कार बाईक वाॅशिंग करण्यासाठी मशिन घेण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागेल. यात आपण एक कार तसेच बाईक धुण्यासाठी १०० रूपये घेतले अणि रोज पाच कार धुतल्या तरी देखील आपण दरमहिन्याला ३० हजारांपर्यंत कमाई करू शकतो.
१३) मेणबत्तीचा व्यवसाय :
मेणबत्ती हा देखील व्यवसायाचा एक उत्तम पर्याय आहे.साजसजावट करण्यासाठी बाजारात मेणबत्तीला खुप अधिक मागणी असलेली आपणास दिसून येते. आज मोठमोठ्या लग्न,समारंभ,मेजवानी मध्ये साजसजावट करण्यासाठी मेणबत्त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.आपण ह्या मेणबत्त्या बनवून त्याची विक्री करून चांगली कमाई करू शकता. मेणबत्ती बनविण्याचा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपले १५ हजारांपर्यंत बजेट असणे आवश्यक आहे.युटयुबवर असे अनेक व्हिडिओ फ्री मध्ये उपलब्ध आहेत ज्यावर आपल्याला मेणबत्ती बनवायचे शिकवले जाते. सुरूवातीला आपण एकट्याने हा व्यवसाय सुरू करायला हवा पुढे कमाई वाढल्यावर आपण आपल्या हाताखाली कामासाठी कामगारांना लावू शकतो.
१४) ब्रेक फास्ट काॅर्नर :
ब्रेक फास्ट शाॅप हा एक फार उत्तम अणि फायदेशीर व्यवसाय आहे.यात आपल्याला नोकरी शिक्षण करण्यासाठी जे विद्यार्थी तसेच लोक बाहेरगावी रूम करून राहत असतात. त्यांना सकाळी कंपनीत कामावर जाण्याआधी नाश्ता उपलब्ध करून देण्यासाठी ब्रेक फास्ट काॅर्नर सुरू करू शकत. ब्रेक फास्ट शाॅप उघडण्यासाठी आपल्याला साधारणतः १० ते २० हजार रुपये लागतील. आपले सर्व कस्टमर आपल्याकडे नेहमी नाश्ता करण्यासाठी यावे म्हणून आपल्याला त्यांना उत्तम सर्विस द्यावी लागेल जेणेकरून ते दिर्घकाळासाठी आपल्याशी जोडले जातील.
१५) घरगुती कॅटिन :
आपण शासकीय खाजगी कार्यालय,शाळा महाविद्यालय इत्यादींच्या आवारात स्वताची कॅटिन सुरू करू शकता.ज्या कर्मचारींना त्यांचे घर कार्यालयापासून दुर असल्याने तसेच ते बाहेरगावी नोकरी करत असल्याने दुपारी घरी जाऊन जेवण करू शकत नाही अशा कर्मचारी वर्गासाठी कार्यालयीन आवारात आपण एखादी घरगुती कॅन्टीन सुरू करू शकता. जेथे कर्मचारींना नोकरदारांना घरगुती स्वरूपाचे जेवण प्राप्त होईल.ही घरगुती कॅन्टीनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यास आपण स्वताच्या घरातुन देखील ही सर्विस देणे सुरू करू शकतो. यात आपली कमाई देखील चांगली होईल अणि लोकांना वाजवी दरात उत्तम अन्न उपलब्ध करून देण्याचे पुण्य देखील आपणास प्राप्त होईल.
१६) बेकरी व्यवसाय :
हा एक दीर्घकालीन चालणारा एक अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे.यात जास्त गुंतवणूक देखील करण्याची गरज नसते.घाऊक विक्रेत्यांनी बनवलेले ब्रेड टोस्ट बिस्कीट असे बेकरीतील पदार्थ घेऊन आपल्याला जवळच्या बाजारपेठेत विकायचे आहे. यात आपला व्यवसाय वाढावा म्हणून होम डिलिव्हरीची सुविधा देखील कस्टमरला देता येईल. यात आपणास एका निश्चित भागात जाऊन ब्रेड टोस्टची विक्री करावी लागते.जिथे लोकांना सकाळी जास्तीत जास्त ब्रेड टोस्ट विकत घेण्यासाठी येतात.