मासे खाण्यासाठी कोकणातील १० उत्तम हाॅटेल्स

आपल्यातील अनेक जणांना हा प्रश्न पडतो की कोकणात फिरायला गेल्यावर आपल्याला कोणत्या ठिकाणी सर्वात उत्तम प्रकारचे मासे खायला मिळतील.
आपल्या मनातील हाच संभ्रम दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला कोकणातील काही अशा ठिकाणांविषयी माहीती देणार आहोत जिथे आपणास उत्तम प्रकारचे मासे खायला मिळतील.
चला तर मग जाणुन घेऊया मासे खाण्यासाठी कोकणातील १० उत्तम हाॅटेल्स कोणकोणती आहेत.
अतिथी बांबू हाॅटेल-
अतिथी बांबू हाॅटेल हे मालवण मध्ये असलेले कोकणात मासे खाण्यासाठीचे एक उत्तम ठिकाण मानले जाते.इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या माशांच्या थाळया खायला मिळतील.
कोळंबी थाळी,पुरी भाळी,पापलेट थाळी,सरंगा थाळी,सौदाळा थाळी,इत्यादी अशा मासे प्रकारातील थाळी आपणास ३०० ते ५०० रूपये इतक्या किंमतीत खाता येतात.
त्यामुळे मालवणात फिरायला गेल्यावर गणेश मंदिराजवळ असलेल्या ह्या अतिथी बांबू हाॅटेल मध्ये कित्येक पर्यटक आवर्जून माशांच्या वेगवेगळ्या थाळयांचा आस्वाद घेण्यासाठी येतात.
आमंत्रण हाॅटेल –
रत्नागिरी मध्ये गांधी पेट्रोल पंप जवळ आमंत्रण हाॅटेल आहे.आमंत्रण हाॅटेल मधील सर्वच पदार्थ उत्तम दर्जाचे असतात.
पण ह्या सर्व पदार्थांमध्ये सर्वात भारी असते ती येथील महाराजा थाळी.हया महाराजा थाळी मध्ये आपल्याला १५ ते १६ प्रकारचे मासे खायला मिळतील.
आमंत्रण हाॅटेल मध्ये मिळत असलेल्या महाराजा थाळी मध्ये आपल्याला सुरमई,बांगडा, पापलेट,शिरप्या,खेकडा,बांधेली, फ्राॅन्स इत्यादी असे एकापेक्षा एक मासे खायला मिळतील.
ही महाराजा थाळी इतकी मोठी असते की ही संपवण्यासाठी अक्षरश लोकांमध्ये पैजा लागतात.हया हाॅटेलात अनेक पर्यटक महाराष्ट् तसेच महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून मासे खायला येत असतात.
महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्रा बाहेरून आलेल्या ह्या पर्यटकांना सर्व प्रकारच्या माशांचा आस्वाद घेता यावा यासाठी आमंत्रण हाॅटेलने ही महाराजा थाळी परिचयात आणली आहे.
याचसोबत महाराजा थाळी मध्ये खेकडा लाॅलीपाॅप नावाची डिश सुद्धा सर्व केली जाते.
आशा लंच होम –
आशा लंच होम हे मालवण मधील चिवला बीचजवळ आहे.नारळाच्या झाडांनी आच्छादलेले छत,समुद्र किनारा अणि आशा लंच होम मधील अस्सल मालवण जेवण याची बातच निराळी आहे.
पापलेट अणि खेकडा ह्या ठिकाणी मिळणारी सर्वात उत्तम गोष्ट मानली जाते.आशा लंच होम मध्ये आपल्याला चुलीवर बनविण्यात आलेले मालवणी जेवणाचा आस्वाद घेता येईल.
आशा लंच होम मध्ये खेकडा मसाला अणि खेकडा फ्राय ह्या दोन्ही गोष्टी इथे भारी मिळतात.हया डिशेस बनविण्यासाठी नदी अणि समुद्र दोघांमधील खेकडे वापरले जातात.
समुद्रातील खेकडे मऊ असतात त्यामुळे ते फ्राय करण्यासाठी वापरले जातात.अणि खाडीतील खेकडे ग्रेव्ही करीता वापरले जातात.याचसोबत इथे असलेले कोळंबी फ्राय,कोकम कढी,वडे, तांदळाची भाकरी,बांगडा फ्राय हे सर्व पदार्थाची देखील पर्यटक चव चाखु शकतात.
सावंतवाडीची भालेकर खानावळ –
सावंतवाडीची भालेकर खानावळ कोकणात इतकी फेमस आहे की येथील चमचमीत जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी लोकांना तासनतास वाट पाहत बसावे लागते.
ह्या खानावळीत जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तीच नव्हे तर अनेक राजकीय कार्यकर्ते,अभिनेते देखील येत असतात.
इथे सिल्व्हर फिश थाळी अणि गोल्ड फिश थाळी अशा दोन युनिक थाळया माशांच्या प्रकारात खाता येतात.इथे आपणास चणक माशाची थाळी देखील खायला मिळते.
येथील थाळयांत देखील मोरी,बांगडा,पापलेट,घिसरे इत्यादी प्रकार आपणास पाहावयास मिळतात.श्री महालक्ष्मी भालेकर खानावळ ही सावंतवाडीला काॅलेज रस्त्यावर सबनीस वाडयाजवळ आहे.
हाॅटेल अभिषेक –
हाॅटेल अभिषेक मधील कोंबडी वडी हा एकदम स्पेशल पदार्थ आहे.अणि माशांमध्ये येथे सुरमई थाळीचा आवर्जून समावेश होतो.
इथला खेकडा अणि तिसरे थाळी खाण्यासाठी अनेक जण येतात.हया हाॅटेलला आतापर्यंत मोठमोठ्या सेलिब्रिटीने देखील भेटी दिल्या आहेत तशी चित्रे देखील देखील आपल्याला हाॅटेलच्या भिंतीवर दिसुन येतील.
यावरून आपणास लक्षात येईल की हाॅटेल अभिषेक हे सेलिब्रिटींचे देखील अत्यंत आवडते हाॅटेल आहे.
वसंत विजय हाॅटेल –
वसंत विजय हे देवगड मधील हाॅटेल आहे.हे हाॅटेल सुरमई थाळी साठी खूप प्रसिद्ध आहे.येथे मिळणारी बटर फिश थाळी देखील एकदा खाऊन बघावी अशा स्वरूपाची आहे.
बटर फिश मासा चवीला बांगडा माशा प्रमाणेच लागतो.इथे क्रॅप थाळी,सुरंगा थाळी,जंबो सुरमई,क्राॅन्स फ्राय कालवा थाळी इत्यादी थाळी देखील एकदा चव चाखण्यासारख्या आहेत.
वसंत विजय हाॅटेल देवगड काॅलेज जवळ तुळशी नगर ह्या ठिकाणी आहे.
चैतन्य हाॅटेल –
चैतन्य हाॅटेल हे मालवण मध्ये आहे.हया हाॅटेल मध्ये आवर्जून खाण्यासारख्या थाळींमध्ये बांगडा थाळी,पापलेट थाळी,हलवा थाळी अणि रावस थाळी ह्या आहेत.
चैतन्य हाॅटेल मध्ये फिश करी राईस देखील उत्तम प्रकारचे मिळते.इथे बोंबिल डक नावाची देखील एक विशिष्ट थाळी उपलब्ध आहे.
ह्या थाळीत वाढले जाणारे भात,कालवण सोलकढी इत्यादी पदार्थ हे अनलिमिटेड वाढण्यात येत असतात.चैतन्य हाॅटेल मालवण डेपोपासुन सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाताना दिसुन येते.
हाॅटेल पंकज खानावळ-
हाॅटेल पंकज ही कुडाळजी भाऊजींची खानावळ आहे.ही खानावळ कुडाळ येथे केळवाई मंदिराजवळ आहे.
ह्या हाॅटेलची सुरूवात १९८४ मध्ये झाली होती.हे हाॅटेल प्रकाश कामंत यांनी सुरू केले होते.जिथे ह्या हाॅटेलची सुरूवात करण्यात आली ते गाव पंकज कामंत यांच्या पत्नीचे गाव होते.
म्हणुन गावातील लोक ह्या खानावळीत जेवणासाठी आल्यावर भाऊजींची खानावळ असाच उल्लेख करत असत म्हणून ह्या हाॅटेलला भाऊजींची खानावळ असे नाव पडले.
हाॅटेल पंकज हे ठिकाण मासे खाण्यासाठी कुडाळ मधील एकमेव ठिकाण आहे.हया ठिकाणी पर्यटकांना बांगडा,सुरम ई, पापलेट चने खाडीतला मासा अशा वेगवेगळ्या माशांच्या बनविण्यात आलेल्या अनेक डिशेस परवडेल अशा दरात खायला मिळतील.
हाॅटेल सन्मान –
हाॅटेल सन्मान रेस्टॉरंट हे अलिबाग मधील हाॅटेल आहे.इथे आपणास गोमांतक पद्धतीचे जेवण करायला मिळते.हया हाॅटेल मध्ये वापरण्यात येणारा गोमांतक घरगुती पद्धतीचा बनविण्यात आलेला मसाला असतो.
ह्या गोमांतक पद्धतीच्या बनविण्यात आलेल्या मसाल्यांमुळे येथील पदार्थ खाण्यासाठी अधिक चविष्ट लागतात.असे म्हटले जाते की ह्या हाॅटेल मधील जेवणाची टेस्ट आहे तशीच आहे त्यात कुठलाही बदल झालेला नाहीये.
फ्राॅन्स करी,आॅईलस्टर मसाला,खेकडे,काजु करी हे पदार्थ इथले मास्टर पीस म्हणून ओळखले जातात.येथील अस्सल नारळाच्या दुधाने बनविण्यात आलेली सोलकढी देखील फार छान लागते.
म्हणून अलिबागला आल्यावर मासे खाण्यासाठी सन्मान हाॅटेल हे एक उत्तम ठिकाण आहे.
वेंगुर्लयाचे गजाई हाॅटेल –
येथील समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकताना ताजे टवटवीत मासे खाण्याची मजाच निराळी आहे.हे हाॅटेल वेंगुर्ला बंदर रोडजवळ आहे.
ह्या हाॅटेलमध्ये रोज बनविण्यात येत असलेल्या मेनयुची यादी फळ्यावर पाहायला मिळते.येथील बांगडा सुरमई पापलेट असे वेगवेगळ्या प्रकारचे भारी पदार्थ चाखायला मिळतात.